आपलं कोण मेलं ?

Submitted by जीएस on 10 June, 2010 - 09:36

भोपाळचे गुन्हेगार सुटले ! बर मग ? पुढे ? मस्त फिफा वर्ल्ड कप सुरू होत आहे. हे कुठल कधीपर्यंत घेउन बसायच ? मरणारे वीस हजार कधीच मेले. यातना भोगणारेही बरेचसे मरून गेले असतील एव्हाना. मग आता काय उगाच ?

ज्यांच्यावर खटला भरला ते सुटले, ज्यांच्यावर भरलाच नाही त्यांचे काय ?

योग्य देखभाल न करता घातक रसायनांचा साठा करणारे कंपनी व्यवस्थापन हे गुन्हेगार क्रमांक एक.
अशा कारखान्यांची तपासणी करायला सरकारचे अनेक विभाग असतात, ती तपासणी न करताच पैसे खाऊन प्रमाणपत्र देणे हेच चालत असते सर्रास सगळीकडे. तसे ज्यांनी दिले ते गुन्हेगार क्रमांक दोन.

पण आता खालची बातमी बघा... अँडरसनच्या अटकेची मागणी होऊ शकते हे लक्षात घेऊन तेंव्हा त्याला भोपाळहून ताबडतोब दिल्लीला नेऊन अमेरिकेला पाठवले गेले. २०,००० बळींना जबाबदार अँडरसन भोपाळहून सरकारी विमानाने गेला, विमान तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्या आदेशावरून दिले गेले. काय कारवाई होणार आता अर्जुन सिंगवर? अर्जुन सिंग तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींकडे बोट दाखवू शकत असतील तर नक्कीच काहीच कारवाई होणार नाही. प्रकरण दाबले जाईल..

http://news.rediff.com/report/2010/jun/10/got-a-call-from-cms-office-to-...

-----
दाउदने तर भारताविरुद्ध युद्ध पुकारले आहे. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटानंतर केंद्र सरकारने हात धुवून दाउदच्या मागे लागयचे ठरवले होते. व्होरा कमिटी नेमली होती दाउदची पाळेमुळे खणण्यासाठी. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचा व्होरा कमिटीला दिलेला अहवाल सांगतो की शरद पवार, सलिम झकेरिया आणि जावेद खान हे भारतातले प्रमुख लागेबांधे आहेत दाउदचे. त्यांचे एकमेकांशी आर्थिक व्यवहार, स्वतःच्या सरकारी विमानातून दाउदच्या माणसांची शरद पवारांनी केलेली वाहतूक, मुंबईत दंगल उसळताच दाउदच्या आईला चोवीस तासात पासपोर्ट मिळवून देउन तिची केलेली पाठवणी... सगळे अगदी सविस्तर होते त्यात. केंद्र सरकारने आपल्याच लोकांवर उलटेय म्हटल्यावर दाबला रिपोर्ट, पण आउटलूकने फोडला होता तेंव्हा तो रिपोर्ट.

http://www.outlookindia.com/article.aspx?200793

महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला, पुढे काय झाले.... ?

पण पुढे काय ? जनतेची स्मरणशक्ती तर अगदी तोकडी. आजही हा मनुष्य समाजात उघडपणे केंद्रिय मंत्री म्हणून फिरतो आहे. सगळच मॅनेज करण्याची ताकद आज आहे.
-----

अशा किती केसेस दाखवायच्या ? बघत रहायच्या ?

लोकप्रतिनिधी, नोकरशाही आणि न्यापालिका हे आपण तीन स्तंभ म्हणतो लोकशाहीचे, पण या सगळ्यांनीच संगनमत करून दिवसरात्र फकत देशाचे लचके तोडत रहायचे म्हटल्यावर काय असणार आहे आपले भवितव्य? या तिघांपासून देशाला वाचवण्याचं काम कोण करणार ?

की आपल अजून कोणीच मेलं नाही म्हणून आपण गप्प बसायच आहे ? तोपर्यंत थांबायच आहे ??? जरूर थांबूया.. तो सुदिन लवकरच येईल यात मला तरी काही शंका दिसत नाही.

मला मार्टिन निमोलर या ख्रिस्ती धर्मोपदेशकाचे, नाझींना अटकाव करण्यासंदर्भातल्या जर्मन सुशिक्षितांमधल्या उदासीनतेबद्दलचे वक्तव्य आठवते

THEY CAME FIRST for the Communists,
and I didn't speak up because I wasn't a Communist.

THEN THEY CAME for the trade unionists,
and I didn't speak up because I wasn't a trade unionist.

THEN THEY CAME for the Jews,
and I didn't speak up because I wasn't a Jew.

THEN THEY CAME for me
and by that time no one was left to speak up

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीएस, खरं आहे. वाचताना चीड आणि उद्वेग वाटतोय.
पण आपण काय करावं हे खरंच लक्षात येत नाहीये.

भाऊ,
यावर नवा बा.फ. ऊघडणार होतो. पण फार फार तर आपली चिडचिड, राजकीय पक्षांवर (अन एकमेकावर) आगपाखड, पुन्हा तेच तेच मुद्दे यापलिकडे काही होणे नाही. तरिही सध्ध्या ही उद्वीग्नता ईतकी टोकला पोचली आहे की "मेरा भारत एक भोपळा" असं म्हणायची वेळ आलीये.. आणि हे म्हणताना त्यातील क्रूर विरोधाभास पुन्हा मनालाच टोचत राहतो- कारण या सर्वाला जबाबदार कोण- आपणच!
कुणी? कुणावर? कशा कशाचा खटला चालवायचा?
न्याय कोण करणार? कोणाला मिळणार?
(आपल्याच लोकांनी ज्या अँडरसन ला देशाबाहेर सुखरूप जायला मदत केली तिथे आता आपलीच लोकं त्याचे खापर अमेरीकेवर फोडू पहात आहेत यासारखा दुसरा केविलवाणा विनोद नाही!)
१९९२, बोफोर्स, कंदाहार, २६/११, नक्षलवाद, माओवाद, अफजल गुरू, कसाब, कारगिल, आणि आता नव्याने जिवंत झालेलं भोपाळ भूत- आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपाणच किती हसू करून घेतोय.. आणि आपल्याला u n security council seat हवी. स्वताचं घर संभाळता येत नाही अन आपण चाललोय आंतरराष्ट्रीय सुरक्षेची चिंता करायला... महान विनोद!

देशाच्या ईतीहासातील हे सर्वात मोठे सार्वजनिक हत्त्याकांड असे म्हटले तरी कमी पडेल..

"भोपाळ से भोपळा तक"....... जोपर्यंत स्वताचा भोपळा फुटत नाही तोपर्यंत दुसरा जगो वा मरो, आपून को क्या फिकर? या मनोवृत्तीचा राक्षस एके दिवशी आपल्या मानगूटीवर बसून आपल्याला नामशेष केल्याशिवाय राहणार नाही.

लोकशाहीची पुरती भंकस केलीये या राजकारण्यांनी. लश्कराने ताब्यात घ्यावा हा देश. चांगली घासून पुसून साफ सफाई करावी.. आणीबाणी जाहीर करा आणि एकदाचेच मिटवून टाका सारे "वाद".

खरच एक नागरीक म्हणून काय करू शकतो? काहीही नाही........... कारण आपली सर्व व्यवस्था ईतकी सडलेली आहे की ते एक गँगरीन आहे, ज्यावर कापून फेकणे हाच एक ऊपाय आहे, कुठल्याही ऊपायच्या पलिकडे हा रोग गेलेला आहे..शेवटी गँगरीन पोसायचं का देश वाचवायचा? उत्तर सोपं आहे.

जीएसः आपलं कोण मेल?
उत्तरः देश
मी भारत देशाचा नागरीक आहे... अजूनही मी स्वाभिमानाने म्हणू शकतो का? मला ऊत्तर शोधावे लागेल.

.

Sad

आपण सगळे काय करू शकतो?

टॅक्स भरणे बंद करू शकतो का?
मतदानावर बहिष्कार घालू शकतो का?

आम्हाला सरकार ही कल्पना मान्य नाही. जोपर्यंत सामन्य माणसाला सन्मानाने जगता येईल असं वातावरण बनत नाही तोपर्यंत क्सलच सहकार्य नाही.

की आपण प्रतिसरकार बनवावं? पण मग नक्षलस आणि आपल्यात फरक काय राहिला?

नुसता भुंगा! भुंगा!!!

मतदान करा... हे तरी करू शकता.. तेच तर होत नाहीय ना..
घरच्या, ओळखीच्या सगळ्यांना मतदान करायला लावा...
आपणच त्यांच्या हाती सगळं देऊन विकेंड साजरा करायला गेलो ना?

जीएस, तुम्ही दिलेली लिंक माझ्याकडे चालत नाहीये. outlookindiaच ओपन होत नाहीये.
इतरांना दिसतंय का?

मला वाटतं काय करावं वगैरे विचार करायची वेळ संपली (कधीच).. धडक कृती आवश्यक आहे!
विनयभाऊ,
मतदान वगैरे सर्व मॅनेज केलं जातं हे तुला माहीत असेलच. I think lets accept that in india democracy in its current fashion (top to bottom) simply is not working and will not work, it needs complete revamp (read scrapped), period.

जी एस, भोपाळची दुर्घटना, कुणाच्या लक्षात असेल अशी आशाच करणे चूक आहे. (माझी एक लांबची बहीण, योगायोगाने इंदोरला गेली होती, म्हणुन वाचली ) इतक्या वर्षानी न्याय द्यायची काही गरजच नव्हती नाही का ? त्या वेळी मिडीया इतका प्रभावी नव्हता तरिही, त्या काळच्या बातम्या भयानक वाटायच्या वाचायला.
आपल्या देशात न्यायसंस्था स्वायत्त आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण होत चाललेय.

बाफ सुरु करण्याबद्दल धन्यवाद.

मला निकाल जाहीर झाल्यावर पहिले दोन दिवस संतापात गेले... कशा साठी कोर्टात गेले होते सरकार? माझ्या माहिती नुसार, ज्या कलमांच्या आधारे आरोप ठेवण्यात आले होते त्या अंतर्गत आरोपींना कमाल २ वर्षांची सजा मिळणार होती. विस हजार लोकं गेल्यावरही असली पोकळ कलमे का लावलीत?

घडलेली घटना निव्वळ अपघात होता आणि तो पुर्णत: मानवी हलगर्जी पणा मुळे झाला आहे. अपघाताच्या अगोदर cost cutting च्या नावाखाली सुरक्षेच्या किमान पाळावयाच्या गोष्टीं कडे डोळेझाक केली गेली. या cost cutting ला मॅनेजमेंट जबाबदार आहे. म्हणुन अँडरसनला त्या वेळीच भारतात आल्यावर रोखायचे होते... आता २०१० मधे त्याचे हस्तांतरणाबाबत कशाला नाटक हवे ? २००८ मध्ये केलेल्या मागणीस अमेरिकेने भारताला अजुन पुरावे द्या असे कारण सांगुन बोळवण केली. अफगाण मधे सैन्य पाठवायला एक कागदी पुरावा मिळाला नव्हता - सर्व अंदाज होते. किती टोकाचा वोरोधाभास.

मी २०,००० लोकं गेलेत हा अपघात एक वेळा पचवेलही. चला एक वेळा मान्य करु मानव आहेत चुका होणारच. पण त्या नंतरच्या सर्वच घटना आणि तत्कालीन, तसेच त्या नंतरच्या आलेल्या प्रत्येक सरकारचे औदासिन्य संताप जनक आहे.

काहीच करु शकत नाही आपण ?

फॅक्टरीशी संबंधित लोकाना, फॅक्टरी इन्स्पेक्टर, बॉयलर इन्स्पेक्टर, वगैरे काय असतात याची चांगलीच कल्पना असेल. हे लोक काय कुणाच्या सुरक्षिततेची जबाबबारी घेणार ?
नियम केले कि पळवाटा आल्याच. ते पाळायची कुणाचीहि इच्छा नाही. सुरक्षितता, हा मुद्दाच गौण ठरला
आहे.
अशा घटना परत होऊ नयेत म्हणून काय करायला हवे, तेवढेही होत नाही. काहि हजार मेले त्यापेक्षा उरलेल्या करोडोंच्या सुरक्षिततेची काळजी कुणालाच नाही, याचेच जास्त दु:ख आहे.

खटले तूंबलेत, कुणाच्याही हयातीत त्यांचा निकाल लागण्याची शक्यता नाही. रोज बोर्डावर २००, ३०० केसेस असणार, त्या पुकारल्या जाणार, एवढे लोक कामधंदा सोडून तारखा पाळत बसणार, काहि बोलले तर ... असो.
वैयक्तीक पातळीवर आवाज उठवल्यास फायदा होतो, पण त्याला व्यापक स्वरुप येत नाही.

Sad

गोविंद, आणि आपलं कोणीही मेलं किंवा आपल्या आप्तस्वकियांपैकी कोणावरही अशी वेळ आली, तरीही आपण काय करु शकतो? काहीही नाही.
इथे सुद्धा मोठी बातमी होती- २६ वर्षांनंतर लागलेला निकाल आणि तोही हास्यास्पद.
Angry

>>>>मतदान
>>> आपण काय केल पाहिजे

अर्जुन सिंग वा पवार ही फक्त उदाहरणं झाली. आपली लोकशाही राज्ययंत्रणा पूर्ण सडली आहे. ही यंत्रणा ज्यांच्या ताब्यात आहे तेच आपले आणि या देशाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. त्यामुळे आम्ही मतदान केले, कमीत कमी वाईट उमेदवाराला वा दुसर्‍या पक्षाला मत दिले म्हणजे आमची जबाबदारी संपली असे स्वतःलाच फसवून उपयोग नाही. ( एनरॉन अरबी समुद्रात बुडवू, दाऊदला पकडू म्हणत भाजप सेना सत्तेवर आले. त्यांनी काय केले ?) हे सगळे कधी तरी लवकरच आपल्याही मुळावर येणार आहे, तसे येऊ नये या स्वार्थी हेतूने का होईना पण भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी याविरुद्ध आपले आपल्यालाच लढावे लागणार आहे आपापला थोडा वेळ आणि आपलाच पैसा खर्च करून. माहितीचा अधिकार्-प्रसार माध्यमे-इंटरनेट-पीआयएल अशी काही साखळी वापरून एकदा नव्हे - दररोज. लिहिणं सोप आहे. पण हे करायची आपली तयारी आहे का ?
याचा मी विचार करतो आहे....

दावुदच्या भारतातल्या माणसांची नावे वाचुन् प्रचंड धक्का बसला....

याचा मी विचार करतो आहे....

कर लौकर आणि लिही इथेही..
मला तरी या अंधारात काहीच दिसत नाहीये.

भयानक उद्विग्नता आणि संताप येतो हे सगळं वाचून. सडलेली यंत्रणा - सडलेले राज्यकर्ते आणि याविरुद्ध काहीही न करणारे नपुंसक सारे आपण.

Pages