वर्षाविहार २०१० : दवंडी !!

Submitted by ववि_संयोजक on 8 June, 2010 - 00:34

पी.सी. ऑन करून आय-डी-१नं त्याच्या पुढ्यात बसकण मारली. तिचा नवरा आणि मुलगा आपापल्या कामाला निघून गेले होते. आता दिवसभर माबोवर टवाळक्या करायला ती मोकळी होती. तिनं माबोचं मुख्य पान उघडलं. लॉग-इन करण्यापूर्वीच तिचं एका गोष्टीकडे लक्ष गेलं. जागची उठून ती तडक फोनच्या दिशेला धावली. आधी आय-डी-२ ला फोन लावावा की आय-डी-३ ला? की परदेशात असलेल्या आय-डी-४ला विपू किंवा मेल करावी हेच तिला उलगडेना.
कॉल-लॉगमधे आय-डी-३चा नंबर दिसल्यावर तिनं आधी तिलाच फोन लावला.
माबोच्या मुखपृष्ठावर असं काय दिसलं आय-डी-१ला, ज्यामुळे तिनं तडकाफडकी आय-डी-३ ला फोन लावला?

----------

आठ वाजले होते. रोजच्याप्रमाणे आय-डी-३ला निघायला उशीर झाला होता. स्वतःची पर्स आणि दुपारच्या जेवणाच्या डब्याची पिशवी काखोटीला मारून आणि पाठीवर दप्तर लावलेल्या मुलीचं बखोट दुसर्‍या हातानं पकडून ती घाईघाईत घराबाहेर पडली. मुलीच्या शाळेच्या नव्या वर्षाचा आज पहिला दिवस होता. आज ८.१७ची फास्टही चुकणार बहुतेक या विचारासरशी कंटाळत, रेंगाळत चालणार्‍या मुलीच्या अंगावर ती खेकसणार इतक्यात तिचा फोन वाजला. कपाळावर सतरा आठ्या घालत, नाही त्या वेळेला फोन करणार्‍याला मनातल्या मनात हजार शिव्या मोजत तिनं पर्समधून फोन बाहेर काढला. आय-डी-१चा फोन होता. आदल्या रात्री झोपण्यापूर्वी अर्धा-पाऊण तास गप्पा मारूनही आता पुन्हा आय-डी-१ला काय सांगायचंय ते तिच्या लक्षात येईना. एकीकडे मुलीला शाळेच्या बसमधे चढवत तिनं फोन घेतला. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या थाटात आय-डी-१नं तिला माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीबद्दल सांगितलं. ते ऐकलं मात्र आय-डी-३चा चेहरा झरझर बदलला. डोळ्यांत निराळेच भाव प्रकटले. बसच्या खिडकीतून डोकावणार्‍या मुलीला टाटा करायचंही भान तिला उरलं नाही. आता जी मिळेल ती ट्रेन, पण ट्रेनमधे चढल्यावर कुणाकुणाला फोन करून याबद्दल सांगायचं याचा ती विचार करायला लागली.
असं काय सांगितलं तिला आय-डी-१नं ज्यामुळे तिला ८.१७च्या फास्टचाही विसर पडला?

----------

सकाळची पहिली मिटींग आटोपल्यामुळे आय-डी-४ आता जरा निवांत होता. चहा घेता घेता त्यानं माबोला लॉग-इन केलं. आज एकच नवीन विपु दिसत होती. त्यानं विपुचं पान उघडलं. आय-डी-१नं माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीबद्दल कळवलं होतं. शेजारीच तिची नेहमीची दात विचकणारी स्मायली हजर होती. ‘तुला नाही, टुकटुक!’ टाईपचंही काहीतरी लिहिलेलं होतं.
ते वाचून आय-डी-४ स्वतःशीच गालातल्या गालात हसला. आपण अजूनही कसं सगळ्यांना मामू बनवून ठेवलंय या विचारानं त्याला गुदगुल्या झाल्या.
असं काय कारण होतं की ज्यामुळे आय-डी-१ची विपु वाचूनही आय-डी-४चा चेहरा झरझर बदलला नाही? त्याच्या डोळ्यांत निराळेच भाव प्रकटले नाहीत?

----------

ट्रेनमधे जंप करून पलिकडच्या दरवाज्याजवळ उभं रहायला जागा पटकवल्यावर आय-डी-३नं आधी आय-डी-२ला फोन लावला. आय-डी-१ कडे आय-डी-२ चा नंबर नव्हता म्हणून तिनंच त्याला आधी फोन करायला सांगितला होता.
सकाळची पहिली मिटींग आटोपल्यामुळे आय-डी-२ आता जरा निवांत होता. तो चहा घेत असतानाच त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर आय-डी-३चं नाव पाहताच त्याला फोनचं कारण लक्षात आलं. पाच मिनिटांत दुसर्‍यांदा तो गालातल्या गालात हसला आणि अगदी ऐटीत त्यानं ‘हॅलो’ म्हटलं. ट्रेनच्या आवाजाच्या वर आवाज चढवत आय-डी-३नं आय-डी-१चा निरोप म्हणजेच माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीबद्दल त्याला सांगितलं. आपण अजूनही कसं सगळ्यांना मामू बनवून ठेवलंय या विचारात गुरफटल्यामुळे त्याच्या तोंडून "हो! आय-डी-१नं सांगितलं मला आत्ताच..." असं निघून गेलं आणि त्यानं जीभ चावली. ते ऐकून आय-डी-३चा चेहरा बावळट झाला. ती संभ्रमात पडली. तिच्या शेजारी उभी असलेली बाई तिच्याकडे विचित्र नजरेनं पहायला लागली.
आय-डी-३नं सांगितलेल्या गोष्टीऐवजी स्वतः केलेल्या यडपटपणामुळेच आय-डी-२चा चेहरा झरझर बदलला. डोळ्यांत निराळेच भाव प्रकटले.

----------

अर्ध्या तासांत पुन्हा आय-डी-३ चा फोन आलेला पाहून आय-डी-१ ला आश्चर्य वाटलं. आय-डी-२ आणि आय-डी-४ चा काहीतरी घोटाळा आहे हे कळताच दोघींनी बाकीच्या सगळ्यांना माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीसोबत हे ही सांगायचं ठरवलं.
आता तर त्या दिवशी अजून मजा येणार होती. आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ ला सगळे मिळून धुणार होते. डुप्लिकेट आय-डी बनवून सगळ्यांना व्यवस्थित गंडवणार्‍या आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ कडून सगळे जोरदार पार्टी कबूल करवून घेणार होते.

आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ चं पितळ उघडं पाडायला कारणीभूत ठरली होती ववि-२०१० ची दवंडी! आपण वाचलंय म्हणजे इतरही त्याबद्दल वाचतीलच हे लक्षात न घेता आय-डी-१ आणि आय-डी-३ सर्वांना त्याबद्दलच फोन करत सुटल्या होत्या.

मंडळी, तुम्हालाही कदाचित त्यांचा फोन येईल. पण आम्ही त्यापूर्वीच तुम्हाला सांगतो -

यंदाचा मायबोली वर्षाविहार आहे १८ जुलै २०१० यादिवशी.
यू.के.’ज रिसॉर्ट (U. K.'s Resort), खोपोली इथे !!!

तेव्हा आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ला धुवायला तुम्हीही येणार ना?

वर्षाविहाराच्या इतर सविस्तर माहितीसाठी http://www.maayboli.com/node/16976 हे पहा.
यंदाच्या मायबोली-टीशर्ट च्या सर्व माहितीसाठी http://www.maayboli.com/node/16873 हे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आगावा...
ट्रायतो रे...

जून ची सुट्टी जुलै मधे द्या अशी रिक्वेस्ट टाकलिये...
{हो... आमच्या जगावेगळ्या कंपनीचा जगावेगळा नियम आहे... महिन्याला एकच सुट्टी आणि ती ही त्या च्या त्या महिन्यात घ्यायची... Sad }

>>>> ए मी माझ्या सासुबाईंना आणू? <<<<< Rofl
तू तर बॉम्बगोळाच टाकलास अश्विनी, बिच्चारे सन्योजक! Wink
बायदिवे, चारपाच सासवां एकत्र आल्या वविला, तर काय गप्पा मारतील? एनि गेस?

टाक रे सुर्‍या लौकर! Happy
बर, वविला "आजच्या सूना - उद्याच्या सासवां" असा परिसन्वाद ठेवावा का? Biggrin

शैलू, जुलैसाठी आता यापुढे शिल्लक ठेव सुट्टी.
सोमवारची सुट्टी बघ मिळतेय का. अंक्या पण आता बंगलुरुत आहे, तो पण ट्राय करतोय.

लिंबू, एकदा फॅमिली गटग होतं बदलापुरला बारवी नदीकाठच्या रिसॉर्टमधे. तेव्हा आम्हाला एक्स्क्लुझिव्ह स्विमिंगपूल मिळाला होता. सा.बा. टकामका बघत होत्या आम्ही पाण्यात उतरलो सगळे तेव्हा. त्यांचे धाकटे भाऊ व बहिण काठावर खुर्च्या टाकून बसले होते. मग त्या हळूच मला विचारतात मी पण येऊ का गं पाण्यात? आता साडी नेसून यांना कसं उतरवायचं? मग मी बाहेर आले व त्यांना घेऊन बंगल्यात गेले. माझा ड्रेस घालायला दिला. या आल्या डुगुडुगु माझ्याबरोबर स्विमिंगपूलाकडे. मग त्यांच्या बहिणीच्या नातवाकडून गॉगल घेतला त्यांनी आणि सगळ्यांच्या मदतीने जवळजवळ अर्धा तास पाण्यात होत्या. त्यांच्या भावंडांची बडबड सुरु झाली होती "ही माई म्हणजे हाईट आहे. कुठे पडली बिडली म्हणजे !".
असो, मी त्यांना मुळ्ळीच आणणार नाहिये समजा त्या माबोकर झाल्या तरी Proud

अश्विनी, ग्रेट! Happy (सगळ्यान्च्याच सासवां अश्या असत्या तर? )
अर्थात त्यान्नाही हौशीमौजी अस्तात, अन त्यान्च्या तारुण्याच्या त्या काळात बरीच बन्धने होती - राहुन गेलेल्या अस्तात, आपल्याकडून जेवढ होईल तेवढ करायच त्यान्च्यासाठी! उगाच म्हातार्‍यान्ना आता या वयात कशाला हवेत नस्ते चोचले असे म्हणून टाळू नये - जग्लो वाच्लो तर आपणही उद्याचे म्हातारेच आहोत हे विसरू नये कधीच!
(असो, याचा अन वविचा काडीचाही सम्बन्ध नाही, विषय निघाला म्हणून लिहीले - सन्योजकान्नी उगाच "प्रेशर" घेऊ नये Proud )

नमस्कार लोक्स ,
सर्व पोस्ट वाचुन आंनंद वाटला,
सर्व संयोजकांचे हार्दिक आभिनंदन ..... तुम्ही पहीली टेस्ट १००% नी पास झाल्याबद्दल ..... छान स्पॉट.... सर्वांना सोइस्कर होइल अशी व्यवस्था,
सर्व माबोकरांचे आभिनंदन ........ यावेळी सर्व संयोजक नव्यानीच ही सर्व जबाबदारी उचलत आहेत त्यांच्या या प्रयत्नात तुम्ही सर्व उत्साहात सहभागी झालात ... कीप इट अप .......चलो ववि .....
मोठ्या संख्येनी सामील व्हा...........
टीशर्ट--- बाफ ची ही उत्साहात वाट बघतोय .......

हा काहीतरी छानच कार्यक्रम दिसतोय बुवा
मी अगदी कालच माबोकरांच्या यादी घुसलोय
ईथेपण घुसखोरी करावी म्हणतोय
चालेल ना... हो म्हणणार असाल तर पुढील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर देणे,
साधारण किती दिवस चालेल हे सगळे

आणी नाही म्हणणार असाल तर विचार करा एका निष्पाप(*) जिवावर आपण किती अन्याय करीत आहोत ते

* - अटी लागू

.......चलो ववि .....
मोठ्या संख्येनी सामील व्हा...........

घारु आपण वविला जातो आहोत.. मोर्च्याला नाहि

>>> मोर्च्याला ना>>>
नाही कस? दोन उर्फ चार नम्बरला धुवाय्ला मोर्चाच हवा की! Lol
फक्त धुवायचा साबण ब्रश वगैरे बाबी सन्योजक पुरविणार की ज्याच्या त्याने आणायच्या ते अजुन निश्चित कळले नाहीये! Wink

आंनंद , मयुरेश
वविला मोर्चा मोडच आसावा लागतो रे.... बरेच मोर्चेसांभाळावे लागतात ना
जुने संयोजक आपण मी बापडात्याबद्द्ल काय आधिक लिहावे....... Blush

घारु,
बापडात्याबद्द्ल काय आधिक लिहावे>>>>>> मी 'बडजात्या' वाचलं ना! म्हटलं, तो पण आता काहीही उद्योग न राहिल्यामुळे वविला येतो का काय? Proud

मी पण ९० % येणार ....
पण मंदार्,अरुंधती,वर्षु,मुटेजी,दिनेशदा,जाईजुई,सानी,आर्या यापैकी कोण्-कोण येणर ते आधी सांगा ...

Pages