वर्षाविहार २०१० : दवंडी !!

Submitted by ववि_संयोजक on 8 June, 2010 - 00:34

पी.सी. ऑन करून आय-डी-१नं त्याच्या पुढ्यात बसकण मारली. तिचा नवरा आणि मुलगा आपापल्या कामाला निघून गेले होते. आता दिवसभर माबोवर टवाळक्या करायला ती मोकळी होती. तिनं माबोचं मुख्य पान उघडलं. लॉग-इन करण्यापूर्वीच तिचं एका गोष्टीकडे लक्ष गेलं. जागची उठून ती तडक फोनच्या दिशेला धावली. आधी आय-डी-२ ला फोन लावावा की आय-डी-३ ला? की परदेशात असलेल्या आय-डी-४ला विपू किंवा मेल करावी हेच तिला उलगडेना.
कॉल-लॉगमधे आय-डी-३चा नंबर दिसल्यावर तिनं आधी तिलाच फोन लावला.
माबोच्या मुखपृष्ठावर असं काय दिसलं आय-डी-१ला, ज्यामुळे तिनं तडकाफडकी आय-डी-३ ला फोन लावला?

----------

आठ वाजले होते. रोजच्याप्रमाणे आय-डी-३ला निघायला उशीर झाला होता. स्वतःची पर्स आणि दुपारच्या जेवणाच्या डब्याची पिशवी काखोटीला मारून आणि पाठीवर दप्तर लावलेल्या मुलीचं बखोट दुसर्‍या हातानं पकडून ती घाईघाईत घराबाहेर पडली. मुलीच्या शाळेच्या नव्या वर्षाचा आज पहिला दिवस होता. आज ८.१७ची फास्टही चुकणार बहुतेक या विचारासरशी कंटाळत, रेंगाळत चालणार्‍या मुलीच्या अंगावर ती खेकसणार इतक्यात तिचा फोन वाजला. कपाळावर सतरा आठ्या घालत, नाही त्या वेळेला फोन करणार्‍याला मनातल्या मनात हजार शिव्या मोजत तिनं पर्समधून फोन बाहेर काढला. आय-डी-१चा फोन होता. आदल्या रात्री झोपण्यापूर्वी अर्धा-पाऊण तास गप्पा मारूनही आता पुन्हा आय-डी-१ला काय सांगायचंय ते तिच्या लक्षात येईना. एकीकडे मुलीला शाळेच्या बसमधे चढवत तिनं फोन घेतला. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या थाटात आय-डी-१नं तिला माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीबद्दल सांगितलं. ते ऐकलं मात्र आय-डी-३चा चेहरा झरझर बदलला. डोळ्यांत निराळेच भाव प्रकटले. बसच्या खिडकीतून डोकावणार्‍या मुलीला टाटा करायचंही भान तिला उरलं नाही. आता जी मिळेल ती ट्रेन, पण ट्रेनमधे चढल्यावर कुणाकुणाला फोन करून याबद्दल सांगायचं याचा ती विचार करायला लागली.
असं काय सांगितलं तिला आय-डी-१नं ज्यामुळे तिला ८.१७च्या फास्टचाही विसर पडला?

----------

सकाळची पहिली मिटींग आटोपल्यामुळे आय-डी-४ आता जरा निवांत होता. चहा घेता घेता त्यानं माबोला लॉग-इन केलं. आज एकच नवीन विपु दिसत होती. त्यानं विपुचं पान उघडलं. आय-डी-१नं माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीबद्दल कळवलं होतं. शेजारीच तिची नेहमीची दात विचकणारी स्मायली हजर होती. ‘तुला नाही, टुकटुक!’ टाईपचंही काहीतरी लिहिलेलं होतं.
ते वाचून आय-डी-४ स्वतःशीच गालातल्या गालात हसला. आपण अजूनही कसं सगळ्यांना मामू बनवून ठेवलंय या विचारानं त्याला गुदगुल्या झाल्या.
असं काय कारण होतं की ज्यामुळे आय-डी-१ची विपु वाचूनही आय-डी-४चा चेहरा झरझर बदलला नाही? त्याच्या डोळ्यांत निराळेच भाव प्रकटले नाहीत?

----------

ट्रेनमधे जंप करून पलिकडच्या दरवाज्याजवळ उभं रहायला जागा पटकवल्यावर आय-डी-३नं आधी आय-डी-२ला फोन लावला. आय-डी-१ कडे आय-डी-२ चा नंबर नव्हता म्हणून तिनंच त्याला आधी फोन करायला सांगितला होता.
सकाळची पहिली मिटींग आटोपल्यामुळे आय-डी-२ आता जरा निवांत होता. तो चहा घेत असतानाच त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर आय-डी-३चं नाव पाहताच त्याला फोनचं कारण लक्षात आलं. पाच मिनिटांत दुसर्‍यांदा तो गालातल्या गालात हसला आणि अगदी ऐटीत त्यानं ‘हॅलो’ म्हटलं. ट्रेनच्या आवाजाच्या वर आवाज चढवत आय-डी-३नं आय-डी-१चा निरोप म्हणजेच माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीबद्दल त्याला सांगितलं. आपण अजूनही कसं सगळ्यांना मामू बनवून ठेवलंय या विचारात गुरफटल्यामुळे त्याच्या तोंडून "हो! आय-डी-१नं सांगितलं मला आत्ताच..." असं निघून गेलं आणि त्यानं जीभ चावली. ते ऐकून आय-डी-३चा चेहरा बावळट झाला. ती संभ्रमात पडली. तिच्या शेजारी उभी असलेली बाई तिच्याकडे विचित्र नजरेनं पहायला लागली.
आय-डी-३नं सांगितलेल्या गोष्टीऐवजी स्वतः केलेल्या यडपटपणामुळेच आय-डी-२चा चेहरा झरझर बदलला. डोळ्यांत निराळेच भाव प्रकटले.

----------

अर्ध्या तासांत पुन्हा आय-डी-३ चा फोन आलेला पाहून आय-डी-१ ला आश्चर्य वाटलं. आय-डी-२ आणि आय-डी-४ चा काहीतरी घोटाळा आहे हे कळताच दोघींनी बाकीच्या सगळ्यांना माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीसोबत हे ही सांगायचं ठरवलं.
आता तर त्या दिवशी अजून मजा येणार होती. आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ ला सगळे मिळून धुणार होते. डुप्लिकेट आय-डी बनवून सगळ्यांना व्यवस्थित गंडवणार्‍या आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ कडून सगळे जोरदार पार्टी कबूल करवून घेणार होते.

आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ चं पितळ उघडं पाडायला कारणीभूत ठरली होती ववि-२०१० ची दवंडी! आपण वाचलंय म्हणजे इतरही त्याबद्दल वाचतीलच हे लक्षात न घेता आय-डी-१ आणि आय-डी-३ सर्वांना त्याबद्दलच फोन करत सुटल्या होत्या.

मंडळी, तुम्हालाही कदाचित त्यांचा फोन येईल. पण आम्ही त्यापूर्वीच तुम्हाला सांगतो -

यंदाचा मायबोली वर्षाविहार आहे १८ जुलै २०१० यादिवशी.
यू.के.’ज रिसॉर्ट (U. K.'s Resort), खोपोली इथे !!!

तेव्हा आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ला धुवायला तुम्हीही येणार ना?

वर्षाविहाराच्या इतर सविस्तर माहितीसाठी http://www.maayboli.com/node/16976 हे पहा.
यंदाच्या मायबोली-टीशर्ट च्या सर्व माहितीसाठी http://www.maayboli.com/node/16873 हे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहान स्विमिंग पुल साधरन ३ ते ५ फुटाचा आहे. त्यामुळे लहान मुलं तिथं खेळु शकतात.

त.टि. त्यांच्यावर पालकांचे लक्ष असेल असे गृहित धरण्यात येत आहे. Proud कोणी पाणी पिल्यास नंतर तक्रार करु नये.. Light 1

मी आणि मोदक पण नक्की.
confirmations कधी पर्यंत द्यायचेत??? कुणाकडे द्यायचेत???
माझ्या बहिणीला आणलं तर चालणारै का? ती माबोकर नाही. Sad

वर्षाविहाराला कोणकोण येऊ शकतात याबाबत अनेकांच्या मनात अजूनही संभ्रम आहे. त्याचा हा खुलासा -

१) मायबोलीवर ज्यांचा आयडी आहे असे सर्व मायबोलीकर
२) त्या मायबोलीकराचा नवरा / मायबोलीकराची बायको (स्पाऊज)
३) मायबोलीकरांची मुलं

या तीन प्रकारात बसणारे कुणीही वर्षाविहाराला येऊ शकतात.

(ललिता-प्रीति यांची यासंदर्भातली पोस्ट आता संपादित केलेली आहे.)

येणार म्हणजे येणारच, कारण जातो कुठे? खोपोली माझी सासुरवाडी आहे Proud
संयोजक, हे ते 'अंकल्स किचन'च ना हो?
अँकी, जमव रे बाबा!

आगावा हो रे तेच ते... तुझ्या सासुरवाडीला ववी म्हणल्यावर तुला आम्हा सगळ्यांची उठबस करावी लागेल हां...

माझ्या बहिणीला आणलं तर चालणारै का? ती माबोकर नाही. >>> तीला माबोकरीण करुन घे...

धन्स,
confirmations कधी पर्यंत द्यायचेत??? कुणाकडे द्यायचेत???

हा आत्ता फक्त दवंडीचा बाफ आहे, ववीचा बाफ काही दिवसात चालू होइल, त्याव्र सगळी माहिती दिलेली असेल.

अ के.. योगेश२४ला ते जमतं. तेव्हा तो येणार आहे का याची खात्री करा>>>> सुकि येणारच रे यंदा.

लगे हाथ सुकिच केळवण पण करुन टाकु.>>>> गुब्बी Lol

१) मायबोलीवर ज्यांचा आयडी आहे असे सर्व मायबोलीकर
२) त्या मायबोलीकराचा नवरा / मायबोलीकराची बायको (स्पाऊज)
३) मायबोलीकरांची मुलं

या तीन प्रकारात बसणारे कुणीही वर्षाविहाराला येऊ शकतात.
>>

संयोजक ह्यातलं माझ्याकडे कुणीच नाहीय हो. Proud माझ्या लहान भावाला आणलं मी तर चालेल का प्लीज??

लाडके, तु येणार नाही मग आमच्या सेडवीचचे काय होणार... ते चालणार नाही, तुला सलाबादाप्रमाणे यावर्षी सुध्दा यावे लागणार.. आणि माझ्यासाठी २ सेडवीचेस पनवेल पर्यंत साभाळुन आणावे लागतील तुला...

नीरजा ... Lol Lol
>>> माझ्या लहान भावाला आणलं मी तर चालेल का प्लीज?? <<<<
बहुधा नाही, चालू शहरी जनरितीप्रमाणे, इकडच्या कायद्यातही कुटुम्ब म्हणजे नवराबायको नि त्यान्ची चिल्लीपिल्ली इतकेच मोडते! Wink
(इतर भाऊ/बहिण, आईबाप, सासूसासरे इत्यादी नातेवाईकान्ची जत्रा भरवायला हे ववि म्हणजे काय "देब्रा सम्मेलन" वाटले की लग्नाच्या बस्त्याची बैठक वाटली तुम्हाला??? Biggrin Light 1 )

असो, इकडे लक्ष देऊ नका, जाणकार किन्वा सन्योजक खुलासा करतीलच, त्याची वाट पहा नैतर हातासरशी भावाला माबोकर बनवुन टाका! Happy है कै नै कै

अगंगं, बिचारी नंदिनी Sad पुढच्यावर्षी तुम्ही सव्वादोन माणसं या हं Happy

ए मी माझ्या सासुबाईंना आणू? Rofl (असंही गेल्यावर्षी आपण धबधब्याकडे उतरत असताना त्यांचा फोन आला होता आणि मी माझं काय चाल्लंय त्याची कॉमेंट्री दिली होती. अगदी आत्ता बरोबर साधना नावाची मैत्रिण चाललीय हे पण सांगितलं होतं Proud त्यांना खूप मजा वाटली होती.

Pages