वर्षाविहार २०१० : दवंडी !!

Submitted by ववि_संयोजक on 8 June, 2010 - 00:34

पी.सी. ऑन करून आय-डी-१नं त्याच्या पुढ्यात बसकण मारली. तिचा नवरा आणि मुलगा आपापल्या कामाला निघून गेले होते. आता दिवसभर माबोवर टवाळक्या करायला ती मोकळी होती. तिनं माबोचं मुख्य पान उघडलं. लॉग-इन करण्यापूर्वीच तिचं एका गोष्टीकडे लक्ष गेलं. जागची उठून ती तडक फोनच्या दिशेला धावली. आधी आय-डी-२ ला फोन लावावा की आय-डी-३ ला? की परदेशात असलेल्या आय-डी-४ला विपू किंवा मेल करावी हेच तिला उलगडेना.
कॉल-लॉगमधे आय-डी-३चा नंबर दिसल्यावर तिनं आधी तिलाच फोन लावला.
माबोच्या मुखपृष्ठावर असं काय दिसलं आय-डी-१ला, ज्यामुळे तिनं तडकाफडकी आय-डी-३ ला फोन लावला?

----------

आठ वाजले होते. रोजच्याप्रमाणे आय-डी-३ला निघायला उशीर झाला होता. स्वतःची पर्स आणि दुपारच्या जेवणाच्या डब्याची पिशवी काखोटीला मारून आणि पाठीवर दप्तर लावलेल्या मुलीचं बखोट दुसर्‍या हातानं पकडून ती घाईघाईत घराबाहेर पडली. मुलीच्या शाळेच्या नव्या वर्षाचा आज पहिला दिवस होता. आज ८.१७ची फास्टही चुकणार बहुतेक या विचारासरशी कंटाळत, रेंगाळत चालणार्‍या मुलीच्या अंगावर ती खेकसणार इतक्यात तिचा फोन वाजला. कपाळावर सतरा आठ्या घालत, नाही त्या वेळेला फोन करणार्‍याला मनातल्या मनात हजार शिव्या मोजत तिनं पर्समधून फोन बाहेर काढला. आय-डी-१चा फोन होता. आदल्या रात्री झोपण्यापूर्वी अर्धा-पाऊण तास गप्पा मारूनही आता पुन्हा आय-डी-१ला काय सांगायचंय ते तिच्या लक्षात येईना. एकीकडे मुलीला शाळेच्या बसमधे चढवत तिनं फोन घेतला. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या थाटात आय-डी-१नं तिला माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीबद्दल सांगितलं. ते ऐकलं मात्र आय-डी-३चा चेहरा झरझर बदलला. डोळ्यांत निराळेच भाव प्रकटले. बसच्या खिडकीतून डोकावणार्‍या मुलीला टाटा करायचंही भान तिला उरलं नाही. आता जी मिळेल ती ट्रेन, पण ट्रेनमधे चढल्यावर कुणाकुणाला फोन करून याबद्दल सांगायचं याचा ती विचार करायला लागली.
असं काय सांगितलं तिला आय-डी-१नं ज्यामुळे तिला ८.१७च्या फास्टचाही विसर पडला?

----------

सकाळची पहिली मिटींग आटोपल्यामुळे आय-डी-४ आता जरा निवांत होता. चहा घेता घेता त्यानं माबोला लॉग-इन केलं. आज एकच नवीन विपु दिसत होती. त्यानं विपुचं पान उघडलं. आय-डी-१नं माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीबद्दल कळवलं होतं. शेजारीच तिची नेहमीची दात विचकणारी स्मायली हजर होती. ‘तुला नाही, टुकटुक!’ टाईपचंही काहीतरी लिहिलेलं होतं.
ते वाचून आय-डी-४ स्वतःशीच गालातल्या गालात हसला. आपण अजूनही कसं सगळ्यांना मामू बनवून ठेवलंय या विचारानं त्याला गुदगुल्या झाल्या.
असं काय कारण होतं की ज्यामुळे आय-डी-१ची विपु वाचूनही आय-डी-४चा चेहरा झरझर बदलला नाही? त्याच्या डोळ्यांत निराळेच भाव प्रकटले नाहीत?

----------

ट्रेनमधे जंप करून पलिकडच्या दरवाज्याजवळ उभं रहायला जागा पटकवल्यावर आय-डी-३नं आधी आय-डी-२ला फोन लावला. आय-डी-१ कडे आय-डी-२ चा नंबर नव्हता म्हणून तिनंच त्याला आधी फोन करायला सांगितला होता.
सकाळची पहिली मिटींग आटोपल्यामुळे आय-डी-२ आता जरा निवांत होता. तो चहा घेत असतानाच त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर आय-डी-३चं नाव पाहताच त्याला फोनचं कारण लक्षात आलं. पाच मिनिटांत दुसर्‍यांदा तो गालातल्या गालात हसला आणि अगदी ऐटीत त्यानं ‘हॅलो’ म्हटलं. ट्रेनच्या आवाजाच्या वर आवाज चढवत आय-डी-३नं आय-डी-१चा निरोप म्हणजेच माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीबद्दल त्याला सांगितलं. आपण अजूनही कसं सगळ्यांना मामू बनवून ठेवलंय या विचारात गुरफटल्यामुळे त्याच्या तोंडून "हो! आय-डी-१नं सांगितलं मला आत्ताच..." असं निघून गेलं आणि त्यानं जीभ चावली. ते ऐकून आय-डी-३चा चेहरा बावळट झाला. ती संभ्रमात पडली. तिच्या शेजारी उभी असलेली बाई तिच्याकडे विचित्र नजरेनं पहायला लागली.
आय-डी-३नं सांगितलेल्या गोष्टीऐवजी स्वतः केलेल्या यडपटपणामुळेच आय-डी-२चा चेहरा झरझर बदलला. डोळ्यांत निराळेच भाव प्रकटले.

----------

अर्ध्या तासांत पुन्हा आय-डी-३ चा फोन आलेला पाहून आय-डी-१ ला आश्चर्य वाटलं. आय-डी-२ आणि आय-डी-४ चा काहीतरी घोटाळा आहे हे कळताच दोघींनी बाकीच्या सगळ्यांना माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीसोबत हे ही सांगायचं ठरवलं.
आता तर त्या दिवशी अजून मजा येणार होती. आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ ला सगळे मिळून धुणार होते. डुप्लिकेट आय-डी बनवून सगळ्यांना व्यवस्थित गंडवणार्‍या आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ कडून सगळे जोरदार पार्टी कबूल करवून घेणार होते.

आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ चं पितळ उघडं पाडायला कारणीभूत ठरली होती ववि-२०१० ची दवंडी! आपण वाचलंय म्हणजे इतरही त्याबद्दल वाचतीलच हे लक्षात न घेता आय-डी-१ आणि आय-डी-३ सर्वांना त्याबद्दलच फोन करत सुटल्या होत्या.

मंडळी, तुम्हालाही कदाचित त्यांचा फोन येईल. पण आम्ही त्यापूर्वीच तुम्हाला सांगतो -

यंदाचा मायबोली वर्षाविहार आहे १८ जुलै २०१० यादिवशी.
यू.के.’ज रिसॉर्ट (U. K.'s Resort), खोपोली इथे !!!

तेव्हा आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ला धुवायला तुम्हीही येणार ना?

वर्षाविहाराच्या इतर सविस्तर माहितीसाठी http://www.maayboli.com/node/16976 हे पहा.
यंदाच्या मायबोली-टीशर्ट च्या सर्व माहितीसाठी http://www.maayboli.com/node/16873 हे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना, धन्यवाद. तुमच्या सुचनेचे स्वागत आहे. थोड्याच वेळात संपर्काचा इमेल चेक करुन योग्य तो बदल केला जाईल Happy

संयोजक .. माझ्याबरोबर अजून एक व्यक्ती येणार आहे माझ्या विश्वासातली ,पण ती माबोवर नाहीये पण माबोबद्दल बरीचं माहिती आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास माझी होणारी बायको Blush

कुछ कह नही सकता...

जर वेळेत कळलं {स्वस्तात प्लेन चं बुकिंग आणि सुट्टी सँक्शन होत असेल} तर येऊ शकीन...

जर येऊ शकणार नसेन तर सां.स. ला डेंजर फिल्मी क्विझ तयार करण्यात मदत करू शकेन... Happy

तेव्हा आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ला धुवायला तुम्हीही येणार ना? >>> अरे संयोजक तो आयडी नक्की कुठल्या आयडीने येणार आहे? .. आय-डी-२ का आय-डी-४ तेही सांगा...

कुठल्या का आयडी येईना तो वृत्तांत दोन्ही आयडीने लिहू शकतो... एक खरा आणि एक काल्पनिक.. त्यासाठी तयार रहा मात्र झाले Wink

जल्ला १ टक्का काय शुभेच्छांसाठी राखून ठेवलास..>>> नाही काल्पनिक वृ लिहिण्यासाठी Happy

धोबीघाट Lol बाकी छायाचित्रे मस्त आहेत धोबीघाटाची

फोटो मस्तच आहेत. पण आपण धुमाकूळ घातल्यावर तो भाग नंतर कसा दिसेल याची कल्पना कर्तेय. before and after असे फोटो टाका नंतर कुणीतरी.

अ के.. योगेश२४ला ते जमतं. तेव्हा तो येणार आहे का याची खात्री करा. Wink इथे कुठल्यातरी एका आय-डी ने डुबकी जरी मारली तरी, घाट कोरडा होऊन जाईल्.:फिदी:

पण आपण धुमाकूळ घातल्यावर तो भाग नंतर कसा दिसेल याची कल्पना कर्तेय >>> Lol

यंदा चक्क आमचे चिरंजीव यायला तयार झालेत.
त्याला हे फोटो दाखवल्यावर तो तुडूंब खूष झाला. कुठेकुठे किती वेळ भिजायचं याचे प्लॅन्स सुरू केलेत त्यानं. Happy

मुलांना अलाउड आहे का? माझी लेक येयील मग माझ्याबरोबर तिला कुठे ठेऊ हा मोठा प्रश्न होता माझ्यासाठी.

सुकि - किती तो ढोल बडवायचा स्वताच्या लग्नाचा Proud
तु पत्रिका दिली नाहिस तरी आम्ही हजेरी लावु रे. आत्तापासुनच केळवणाच आमंत्रण तुला बायकोला घेऊन ये १८ जुलै २०१० यु.के. रिसोर्ट, खोपोली. Happy

अश्वे, सोल्यूशन काढायला मी केमिकल विंजीनेर नाय... Sad Wink

लले, लेक दहावीला ना यंदा? मग त्याच्याबरोबर तूही घरात बसायचं.. अभ्यास करतोय असं दाखवत Wink

Pages