असा करुया आनंद साजरा!

Submitted by आशूडी on 7 June, 2010 - 03:21

समजा, आपल्याला एखादा समारंभ करायचा आहे, पण तो साजरा करण्यासाठी काय काय नवीन गोष्टी करता येतील याची मायबोलीवर चर्चा करण्याची कल्पना कशी वाटते? म्हणजे उत्सवमूर्तीसाठी काही विशेष, आमंत्रितांचे आदरातिथ्य, गिफ्ट्स इ विषयी कित्येकांच्या डोक्यात काही अभिनव कल्पना असतात, ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युलेही असतात, कधी थोडं पारंपारिक पण हटके असं मस्त मिश्रण जमून येतं मग हे अनुभव शेअर करण्याविषयी काय मत? Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर साठ वस्तूंबद्दल लिहिलं आहे, तर हल्ली अशा personalized वस्तू मिळतात. म्हणजे मग, किंवा चित्रं.. अगदी बूटसुद्धा. अशा काही वस्तू तयार करून घेता येतील. शिवाय या वस्तू फार महाग नसतात.

अमृता, मध्यन्तरी ब्लॅकअ‍ॅण्ड्व्हाईट फोटोची स्पर्धा झालीहोती ना? त्यात हे फोटो मस्त उठून दिस्ले अस्ते की Happy का नाही टाकले तेव्हा? असो.
फोटो कोलाज करा, पण निवडक फोटोन्च्या मोठ्या प्रिन्ट्स काढा अगदी ए३ साईझ पर्यन्त मिळाल्या तरी चालतील Happy
बाकी भन्नाट कल्पना आहेत सगळ्यान्च्या

फोटोंच्या कोलाज बद्दल लिहिलय न. तसं सगळे फोटो जमवून त्याचा छान व्हिडीयो करता येईल. आणि प्रोजेक्टर वापरून दाखवता येईल.
माझ्या भावाच्या लग्नात आम्ही त्याचे आणि त्याच्या बायकोच्या सगळ्या फोटोज चा व्हिडीयो केला होता १५ मिनिटांचा. अगदी त्यांचे जन्मल्यापासुन चे ते साखरपुड्यापर्यंतचे फोटो, त्याला साजेशी गाणी असा केला होता.
सीमांत पूजनाच्या वेळी हॉल मध्ये प्रोजेक्टर लावून सतत ती फिल्म चालू ठेवली.

लोको, मला जरा मदत करा प्लीज.

माझ्या मुलाचा पहिला वादि येत्या ११ सप्टें. ला गणेश चतुर्थीला आहे. हॉल वै. घेऊन मोठ्ठा समारंभ करायचा नाही असे मी आणि मोदकने ठरवले आहे. शिवाय त्या दिवशी घरात गणपतीची धामधूम असल्याने ते शक्यही नाहीये. त्याऐवजी पुढच्या रविवारी (१९ सप्टें. ला) फक्त जवळच्या नातेवाईकांना (माहेरचे व सासरचे) जेवायला बोलावून घरच्या घरी एक छोटेसे फॅमिली गटग करावे असे ठरवतो आहोत.
त्या दिवशी पिल्लूच्या वादि च्या निमित्ताने सगळे एकत्र येतील. छान निवांत गप्पा, दुपारी जेवण असा बेत आहे. वादि साठी बोलावल्यामुळे नातेवाईक काही ना काही भेटवस्तु नक्की आणतील. हल्ली रीटर्न भेटवस्तु देण्याचे फॅड निघाले आहे. त्यामुळे आपण एका हाती भेटवस्तु स्वीकारली की दुसर्‍या हाती रीटर्न गिफ्ट ही द्यावे लागते. तसे करायचे नसेल तर भेटवस्तुच आणू नका असे लोकांना सांगावे लागते. पण पिल्लू चा पहिला वादि असल्याने जवळच्या नातेवाईकांना असे सांगता येणार नाहीये. (कारण ते सगळे कौतुकाने काही ना काही आणणारच.)
त्यामुळे मी आणि मोदकने असे ठरवले आहे की त्या दिवशी घरी आलेल्या प्रत्येकाला एखादे रोपटे द्यायचे as a return gift. कशी वाटते ही आयडीया. किंवा अजून काही आयडीया तुम्हाला सूचत असतील तर सांगता का प्लीज?
नर्सरी मधून per family एखादे रोपटे (छोट्या कुंडीत लावता येण्याजोगे) + माती + प्लास्टीकची छोटी कुंडी आणायची असे ठरवत आहोत. तर रोपट्यांसाठी ऑप्शन्स सूचवू शकाल का प्लीज??? आयुर्वेदीक उपयोगी अशी द्यावीत कि फुलांची रोपटी द्यावीत? मला झाडा-फुलांची फारशी माहिती नाही.

तुळस, गुलाब ही रोपे जनरली सर्वांकडेच असतात. उपयोगी रोपट्यांमध्ये कढीपत्ता असं सध्या सूचतंय. पण "वादिला कढीपत्ता???" असे उद्गार नको निघायला! Uhoh
फुलांमध्ये सदाफुली किंवा एक जांभळ्या छोट्या छोट्या फुलांचे रोप असते. नाव आठवत नाहीये पण वर्षभर फुले येत राहतात त्याला. खूप सुंदर दिसते ते. असं सूचतंय. किंवा मग एक डीसेंबर प्लांट म्हणून पण आहे, ज्याला डीसेंबरच्याच आसपास (हिवाळ्यात) फुले येतात. अजून काय ऑप्शन्स असू शकतील.
मदत करा प्लीज लवकर.

निंबे ओडोमॉसचं रोपटं ठिक वाटतंय का बघ. Uhoh त्याने मछरही/किडे दुर राहतील घरातले, अन सुगंधही संथ दरवळत राहील. निगाही जास्त राखावी लागत नाही.

रोपटी देणार असशील तर तुला एक्झॅक्ट नंबर माहीतीय का किती नातेवाईक येतील तो?? म्हणजे त्यानुसार तुला रोपटी आणायला. तुळस, कडूनिंब अशी रोपटी देऊ शकतेस.

तुझ्या पिल्लाचा बड्डे गणपतीत येतोय त्यामुळे गणपती अथर्वशीर्षाचं छोटं पुस्तकही देऊ शकतेस तु.

तुझ्या पिल्लाचा बड्डे गणपतीत येतोय त्यामुळे गणपती अथर्वशीर्षाचं छोटं पुस्तकही देऊ शकतेस तु. >>> अगं वादि गणपतीत असला तरी सगळ्यांना घरी १९ ला (म्हणजे गणपती होऊन गेल्यावर) बोलवतोय. शिवाय घरी बाय डीफॉल्ट सगळ्यांना अथर्वशीर्ष पाठ असतंच असतं. आणि हल्ली वर्तमानपत्रांतूनही अथर्वशीर्षाची आणि आरत्यांची वगैरे पुस्तके येतातच घरात. त्यामुळे हा ऑप्शन नको वाटतोय.

मल्ल्या, ओडोमॉसचं रोपटं म्हणजे कडुनिंब का? :भा.प्र.:

छोटं पुस्तकही देऊ शकतेस तु.<< पुस्तक हा चांगला ओप्शन आहेच
पण रोप द्यायची असतील तर सदाफुली (तिन चार रंगामधे मिळते), चिनिगुलाब, ऑफिस टाईम, मोगरा, शेवंती (लवकरच फुलायला लागेल आता सिझन सुरु होतो आहे), अष्टर, बटन गुलाब,

मल्ल्या, ओडोमॉसचं रोपटं म्हणजे कडुनिंब का? :भा.प्र.:
नाही रे.. गवता सारखं असतं ते. वास ओडोमॉस सारखंच येतं (खरतर, ओडोमॉस क्रिम त्यापासुनच बनवली जाते असं ऐकन्यात आहे.)

तुला एक्झॅक्ट नंबर माहीतीय का किती नातेवाईक येतील तो?? म्हणजे त्यानुसार तुला रोपटी आणायला. >>> हो. संख्या मला माहीतीये. कारण आमंत्रण आम्हीच करणार आहोत ना! फक्त रोपट्यांचे ऑप्शन हवेत.

बर्‍याच जणांना स्वतःच्या किंवा घरातल्यांच्या वादिला झाडे लावणे, आनाथाश्रमाला किंवा तत्सम संस्थांना भेट देऊन कपडे, पैसे, खाऊ देणे इ. उपक्रम करताना ऐकले आहे, वाचले आहे. वेळेअभावी सध्या तरी आम्हाला शक्य होत नाहीये. त्यामुळे आम्ही जवळच्या गजानन महाराजांच्या मंदीरात पिल्लूच्या नावाने अन्नदानासाठी देणगी देणे इतकेच करू शकू. त्या व्यतिरिक्त हा रोपटी देण्याचा सुटसुटीत उपक्रम सूचतोय.

माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस केला तेव्हा आम्ही सगळ्यांना पुसतकंच दिली होती आणि बरीच पुस्तकं आणुन आलेल्यांनाच् चॉईस दिला होता हव ते पुस्तक निवडण्याचा. ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे जो तो पुस्तक घेतो. साधारण १५० ते २०० रुपये एका पुस्तकाला पड्तात. आम्ही अगदी मेजवानी ,अन्नपुर्णापासुन ते स्वामी, ययाती अगदी किरण बेदी चं आय डेअर पर्यन्त सगळ्या प्रकारची पुस्तकं आणली होती आणि आलेल्या सगळ्यांनाच ही कल्पना खुप आवडली होती.

नंदुजी, सर्वप्रथम ज्या मुलांना जेवायला बोलावणार आहात ती मुलं तुमच्या घरपर्यंत कशी येणार आहेत आणि कशी परत जाणार त्याची योजना करावी लागेल. त्यांना जेवायला सोपे जातील असेच पदार्थ ठेवावे लागतील, त्यात एखादा नाविन्यपूर्ण पदार्थ असला तर छानच. कारण त्या निमित्ताने कधी न पाहिलेल्या पदार्थाशी त्यांची ओळख होईल.

त्यांना गिफ्ट म्हणून त्यांना वापरता येतील अशाच वस्तू तुम्ही देणार हे ओघाने आलंच Happy तरी त्या वस्तू इतर सहृदय लोकांनी देऊन देऊन जास्त प्रमाणात जमा झाल्या असतील तर त्या टाळाव्यात.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद, अश्विनी के.
मुलांची नेण्या-आणण्याची सोय होईल.
जेवणात पुरणपोळी व मसालेभात आहे.
मी पिंपरी चिंचवड मध्ये राहतो.

छान धागा.
पंच्याहत्तरी निमित्त कुणाकडे एखादी कविता आहे का? माझ्या मामी च्या पंच्याहत्तरी साठी हवी आहे.

Hi,

Aaichya retirement baddal karyakram thevla ahe. Tila surprise ahe. Saglya relatives ani tichya nivdak maitrininna bolavaun shivay eka group cha program thevla ahe. Around 60 mansa astil. Krupaya return gift chi idea deu shakal ka..Total 20-22 families astil. Thank you so much.

हाय माबोकर्स,
आईच्या साठीचा कार्यक्रम कराय्चय. त्यनिमित्ताने एक छोटस गेट टू गेदार करणार आहोत. आई ला गाणे ,नाट्या, कवीतान्चि आवड आहे म्हणून एखादि मैफल ठेवायचा विचार आहे. फार शास्त्रोक्त नको अगदी हल्कि फुल्कि गाणी सदर करणारा कलाकार सन्च सुचवू शकाल क? एखादा तबलजी , २ गायक आणि की बोर्ड प्लेयर. कोणी हौशी कलाकारही चालेल. कुटुम्बत्ले सदस्य साधारण वय वर्षे ७५ ते २ असा प्रेक्शकवर्ग लक्षात घेता गाणी हवीत. साथीला कोरस म्हणून अम्ही असूच.

खूप छान धागा ... खरंच छान छान ideas दिल्या आहेत सगळ्यांनी..
बाबांची ७५ वि करायची आहे २५ मे ला... होम शांत तुला (डाळ गूळ ) वैगेरे करणार आहे गुरुजी सांगितले आहेत आणि
आम्ही घरातले सगळे एकत्र येऊन गावी घरी हा कार्यक्रम करणार आहोत

गावापासून जवळ एक विशेष मुलांची निवासी शाळा आहे त्यांना ७५ किलो धान्य आणि स्वीट्स देणार आहे त्यादिवशी बाबांच्या हस्ते

पण उद्या सगळ्यांना रीतसर निमंत्रण द्यायचे आहे आणि त्यासाठी छान पत्रिका किंवा मजकूर शोधत इथे आलो ..
आणि छान वाटले हा धागा पाहून ... सगळ्या कार्यक्रम वेगळ्या पद्धतींनी करायच्या कल्पना वाचून नवीन अजून काय करता येईल हे पाहतो

कोणाकडे ७५ वि किंवा ६१ निमित्त तयार केलेले निमंत्रण पत्रिका / मजकूर छानसा आहे का ? असल्यास नक्की पाठवा pls
WA केला तरी चालेल .. मोबा ९९२३७९९९५२

नातवंडांचा एक video करून सगळ्यांना पाठवणार आहे ..पण त्या आधी रीतसर निमंत्रण बनवायचे आहे .. Happy

गरजूंच्या संस्थेत व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त तिथे जाऊन त्यांच्या हस्ते वस्तू वाटपाची कल्पना बर्‍याच जणांनी मांडली आहे. मला यात थोडासा बदल सुचवावासा वाटतो. यात मी जे प्रत्यक्ष पाहिले आहे त्यावरून सांगतो. मी एका ऑर्फनेजमध्ये शिकवायला जात असे. तिथे काही पालक आपल्या पाल्याचा वाढदिवस त्या मुलांसोबत साजरा करायला म्हणून येत. एकतर ऑर्फनेजमधल्या मुलांना आपला असा वाढदिवस साजरा होण्याचा अनुभव कमी असतो. त्यात दुसर्‍याच्या वाढदिवसाला गोळा व्हायचं , गाणं म्हणायचं ; या ऑर्फनेजचा बँड होता, त्यामुळे ब्रदर त्या मुलांकडून गाणी वाजवून घेत. त्या बद्दल नेहमीचे स्नॅक्स एक छोटं चॉकलेट असं काहीतरी घ्यायचं. यात त्यांचं रूटिन डिस्टर्ब होई. मी क्लासरूम मध्ये बसून मुलांची वाट बघत असे. मुलांसाठी तो वाढदिवस नसे. आज कोणीतरी चॅरिटी करायला आलंय असं ती म्हणत. ज्याचा वाढदिवस ते मूलही अवघडलेलं असे.

तर असं करण्यापेक्षा त्या संस्थेसाठी शिधा किंवा अशा काही गोष्टी त्यांच्या ऑफिसात आधी विचारून नेऊन द्या. तुम्हांला त्या मुलांना किंवा समजा वृद्धाश्रमात, महि लाश्रमात राहणार्‍यांना भेटायचंय तर वर्षातून एकदा वाढदिवसाचं निमित्त साधू नका. त्यांच्या आणि तुमच्या सोयीने तिथे जाऊन त्यांना उपयोगी अशी एखादी अ‍ॅक्टिव्हिटी करा. त्यांच्या विशेष दिवशी जा. तुमच्या नव्हे. म्हणजे त्यांचाही अ‍ॅन्युअल डे असतो, फाउंडेशन डे असतो किंवा तत्सम.

तुमचा आनंद , ज्यांना त्यात नक्की आनंद वाटेल अशाच लोकांसोबत वाटा. ज्यांच्या आयु ष्यात आनंदाच्या जागा कमी असतात , त्यांच्यासाठी त्या त्यांच्या सोयीने आणि आवडीने निर्माण करा.

अतिवृद्धांच्या आपल्या समवय्स्कांसोबतच्या भेटागाठी कमी झालेल्या असतात. तर त्यांच्यासाठी सरप्राइज किंवा इन्फॉर्म्ड गेट टुगेदर ठेवणं हे त्यांच्या पुढच्या पिढीतल्या (म्हणजे सत्कारमूर्ती आणि अभ्यागत दोघांच्या) तयारीवर अवलंबून असेल. म्हणजे इतर वृद्ध व्यक्तींना कार्यक्रम स्थळी नेणं आणणं . इ.

अवांतर आधी - भरत यांनी अनाथाश्रमातील जी बाब सांगितली आहे ती मलाही एका आदिवासी भागातील निवासी शाळेत पाहायला मिळाली आहे. म्हणजे तेथील मुलांच्या प्रतिक्रिया नाही ऐकल्या. पण माझ्याच मनात दरवेळेस खंत वाटत असते की आपण आपल्या जगात - जे अतिशय वेगळं आणि अधिक आनंददायी आहे - परत जाणारच आहोत आणि ही मुलं इथेच असणार. मग एका दिवसात आपण काय नि किती आनंद देऊ शकणारे त्यांना इ. इ.
अर्थात या भेटींनी पांढरपेशा सुखवस्तू जगातील मुलांच्या बाबतीत सकारात्मक वैचारिक परिणाम होत असेल तर ते चांगलेच आहे.
बाकी ७५ वर्षे करिता एक उपक्रम ओळखीच्या एका कुटुंबात झाला होता. सर्व निमंत्रित मंडळींसह स्वतंत्रपणे उत्सवमूर्ती चा फोटो काढून मग तिथल्या तिथे फ्रेम करून रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेला.

अगदी प्राचीन.अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रम यात वाढदिवस साजरे करण्या बद्दल मनात याच भावना आणि हेच गोंधळ आहेत.
मनात इतके प्रश्न उभे राहायला लागतात की गुप्त दान करून बाजूला होते.पण त्याचबरोबर या आश्रमांचे संचालक 'नुसते पैसे देऊ नका, कधीतरी पैश्या ऐवजी वेळ द्या,रिसोर्स द्या' म्हणतात तेही पटतं.

Pages