Submitted by अमृता on 25 May, 2010 - 12:13
इथे मिरच्यांच्या चटण्या, ठेचे, तिखट्या इ. तोंपासु पाककृत्या येउदेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे मिरच्यांच्या चटण्या, ठेचे, तिखट्या इ. तोंपासु पाककृत्या येउदेत.
कळणा?? कळ्ळं नाही दक्स..
कळणा?? कळ्ळं नाही

दक्स.. तुझ्या ठेच्यात गूळ घालतेस का नाय भरर्प्प्प्पूर
आमच्या घरी होणारा प्रकार..
आमच्या घरी होणारा प्रकार..
मिरचीच चिटमिटं
हिरव्या मिरच्या तेल लावून सुरीत खुपसायच्या. (बार्बेक्यूची काडी असल्यास उत्तम) गॅस वर मस्त परतायच्या..
नंतर त्याचा ठेचायच्या.. आणि त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि योग्य प्रमाणात दही घालायच.
झालं चिटमिटं तयार... आणि एकदम झणझणीत...
आणि हे सिंहगडावर मिळणारं लाला तिखटं..
कांदा मस्त बारिक चिरायचा... त्यात तिखटं घालायचं आणि नंतर वरुन जरा तेल घालायचं... आणि गडावर मिळणार्या खेकडा भज्यांबरोबर खायचं...
आणि ही माझ्या आज्जीची रेसिपी..
लसणाच्या पाकळ्या तेलात मस्त तळून घ्यायच्या.. आणि त्यात तिखटं घालून ते पण तळायचं... आणि पोळी बरोबर हे मिश्रण खायचं....
इथे लिहिता लिहिताच तोंपासू....
<<,कळणा?? कळ्ळं नाही
<<,कळणा?? कळ्ळं नाही <<<
वर्षु...मागे मी काही खान्देशी पाककृतींची माहिती दिली होती ही बघ त्याची लिंक
http://www.maayboli.com/node/14887
त्यातच खाली "कळण्याची भाकरी" ची रेसीपी दिलिये!
धन्स आर्या
धन्स आर्या
वर हिम्सकूलनी तो तिसरा प्रकार
वर हिम्सकूलनी तो तिसरा प्रकार लिहिला तो आमच्यकडेही करतात. त्याला आम्ही कढवलेली चटणी म्हणतो. याला मात्र बारीक दळलेली चटणी चालत नाही. थोडी भरडचं असावी लागते.
हिम्सकुलने दिलेली पहिली
हिम्सकुलने दिलेली पहिली रेसिपी म्हणजेच माझी तिखटी.
कसल्या मस्त रेसिप्या आल्यात अजुन.
जळजळ क्लबात सामिल व्हायला कोण कोण आहे रेडी??
माझ्या कडून ही एकः ७-८ लसूण
माझ्या कडून ही एकः
७-८ लसूण पाकळ्या बारिक किसणीवर किसायच्या किंवा मिक्सरवर बारिक वाटायच्या.
त्यात साधारण पाव ते अर्धा टे.स्पून मिरची पावडर टाकायची.
त्यात २ टे.स्पून तेल नि २-३ टे.स्पून पाणी घालायचे.
मग सगळे मिश्रण चमच्याने नीट एकजीव करायचे.
ही चट्णी non-coastal आंध्रात इडली बरोबर खातात्..मस्त लागते!
दोन रुपायांच्या मिरच्या मला
दोन रुपायांच्या मिरच्या मला महिनाभर जातात!>>चला माझ्या सोबत आहे कोणी तरी म्हणजे
नुसतच तोपासू .. कधी तरी साधी खिचडी/ डाळ भात करून मी पण नख नखभर लावून खाते .. किवा साबा कळण्याची भाकरी करतात तेव्हा तरी हावरट पणा आड येतो मग पोटात खड्डा 
मी पण फॅन. हळुहळु सगळ्या
मी पण फॅन. हळुहळु सगळ्या पोस्टी वाचिन
मला पण ठेचा खायला आवडतो.
मला पण ठेचा खायला आवडतो. पाट्यावर वाटलेला छान लागतो. मिक्सर मधे बारिक केल्यास चव येत नाही.
उदय सही लागतो हिरव्या मिरचीचा
उदय सही लागतो हिरव्या मिरचीचा लसुण घातलेला ठेचा ,
ठेचा , गरम गरम ज्वारीची भाकरी आणि कांदा , अहाहा ! एकदम किलिंग डिश आहे .
इंडोनेशियन सांबल १) ८ लाल
इंडोनेशियन सांबल
१) ८ लाल ताज्या मिर्च्या(लांब),८ ताज्या लहान लाल मिर्च्या(तिखट) ,६,७ लसणाच्या कळ्या,१ मिडियम टॉमेटो, ३ सांबारात वापरतो तसे लहानगे कांदे,३ काजू ,मीठ खलब्त्त्यात किंचीत भरड वाटावे.
कढईत १ टेबल स्पून तेल तापवून कुटलेले हे मिक्स्चर तेल सुटेपर्यन्त फ्राय करावे.
थंड झाल्यावर काचेच्या बाटलीचं झाकण घट्ट लावून फ्रिज मधे २ महिने स्टोअर करता येतं
फ्राईड चिकन ,खिचडी ,दाल चावल बरोबर मस्त लागतं
अहाहा.. काय बीबी आहे. मजा आ
अहाहा.. काय बीबी आहे. मजा आ गया.
माझी आज्जी दह्यातली मिरची करते. सॉल्लिड लागते ती. नावडती भाजी असली की माझा झटपट मेनू तोच असतो.
आमच्याकडे रंजका ही कायम लागणारी डिश आहे. कशाहीसोबत म्हणून रंजका खपतो. त्याचबरोबर चिंचेचा ठेचा, कैरीची लाल चटणी हे पण रोज लागतात.
चिंचेचा ठेचा: हिरवी चिंच/हिरवी मिरची/ हळद मीठ मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि मग वरून हिंग जिर्याची फोडणी द्यायची.
हिम्स ने सांगितलेली पाकृ ला
हिम्स ने सांगितलेली पाकृ ला कोल्हापूरात झिटलंमिटलं म्हणतात.
बाजरीची शिळी
बाजरीची शिळी भाकरी.....दह्यावरची साय.....आणि खरडा..... अहाहा !
आत्ताच्या भारतवारीत
आत्ताच्या भारतवारीत पार्ल्यातल्या 'पुरेपुर कोल्हापूर' मध्ये भाकरी व असा खर्डा खाल्ला. नवरा इथे घेऊन यायचा म्हणत होता, आता हे सगळं वाचून मला तो न आणल्याचा पश्चात्ताप होतोय.
हायला. टेरिफीक कृत्या आहेत
हायला. टेरिफीक कृत्या आहेत एकसेएक. वाचुनच बेहोष.
आमच्याकडे यातल्या बर्याचश्या असतात. आता आजपासुन पुन्हा एकेक चालु करणार.
कोणाला दह्यात/ आंबट ताकात
कोणाला दह्यात/ आंबट ताकात वाळवलेल्या मिरच्यांबद्दल माहीत आहे का? मी खाल्ल्या आहेत, मस्तच लागतात. आंबट दह्यात/ ताकात हिरव्या मिरच्या भिजवून त्या उन्हात वाळवायच्या आणि तळून खायच्या! दक्षिणेत हा प्रकार लोकप्रिय आहे.
त्याची कृती एका दाक्षिणात्य मैत्रिणीने अशी सांगितली : हिरव्या मिरच्यांना उभ्या चिरा देऊन त्या दाटसर अशा आंबट ताक + मीठाच्या मिश्रणात ३ दिवस भिजवत, झाकून ठेवायच्या. दिवसातून दोनदा तरी मिश्रण हालवायचे.
त्यानंतर चौथ्या दिवशी त्या मिरच्या काढून प्लास्टिक शीटवर कडकडीत उन्हात वाळवायच्या. सायंकाळी पुन्हा त्या आधीच्या आंबट ताकात ठेवायच्या. दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा काढायच्या व पुन्हा उन्हात दिवसभर वाळवून सायंकाळी ताकात. असे ३ दिवस तरी किमान करायचे.
त्यानंतर ते आंबट ताक फेकून द्यायचे आणि त्या हिरव्या मिरच्या उन्हात पूर्ण सुकेपर्यंत वाळवायच्या. (४-५ दिवस)
त्यानंतर त्यांना हवाबंद डब्यात भरून ठेवायचे व लागतील तेव्हा तळून खायच्या. ताकात भिजवल्याने त्यांच्यातील तीक्ष्णता कमी होते.
दक्षिणेकडे ह्या मिरच्या खास दहीभातासोबत खाण्यासाठी वापरतात. ह्या मिरच्या तयार स्वरूपात दाक्षिणात्य ग्रोसरी स्टोअरमध्येही मिळतात.
अरुंधती, अशाच मिरच्या मला
अरुंधती, अशाच मिरच्या मला इथल्या इं.ग्रोत मिळाल्या आहेत. दहीभात केला की त्यात हमखास घालते. मागे चेन्नईच्या मैत्रिणीकडून मिळालेल्या ऑथेंटी़क मिरच्या चवीला जास्त छान होत्या.
या मिरच्या कर्ड चिली म्हणून
या मिरच्या कर्ड चिली म्हणून मिळतात. पण त्याना चिर दिलेली नसते. फार तिखट लागतात.
आपल्या सांडगी मिरच्या, कुस्करून तेलात तळायच्या. मग त्यात लसणाचे तूकडे घालायचे. (लसूण फार तळायचा नाही.) मग त्यात थोडेसे लाल तिखट घालायचे. हा प्रकार मूगाच्या खिचडीबरोबर चांगला लागतो.
हिरव्या मिरच्या बारिक चिरुन, हिंगावर फोडणीला द्यायच्या. झाकण ठेवून जरा मऊ करायच्या. मग त्यात बारिक चिरलेली कोथिंबीर घालायची. ती मऊ पडली की दाण्याचे कूट घालायचे. मग साखर (हो साखर ) घालायची. साखर विरघळली कि गॅसवरुन उतरायचे आणि थंड झाले कि भरपूर लिंबाचा रस टाकायचा. (हा तिखट, आंबट, गोड असा प्रकार, खास कमी तिखट खाणार्यांसाठी ) हा प्रकार कुठल्याही जेवणात चांगला लागतो. फ्रिजमधे आठवडाभर टिकतो. कोथिंबीर जास्त आणली कि करता येतो.
मस्त धागा आहे.
मस्त धागा आहे.
साबुदाणा + दही अस कॉम्बो
साबुदाणा + दही अस कॉम्बो मिरच्या मधे भरुन ते कडकडीत उन्हात वाळवुन , तळुन खायच्या असतात.ह्याची रेसिपि , प्रमाण माहीत असेल तर प्लीज शेअर करा ना..
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/105536.html?1143560091
अन्कु, दिनेशजीनी लिहीलेत बघ इथे.
अरे व्वा.. करुन पाहते
अरे व्वा.. करुन पाहते आता.उपवासालाही चालतात तर मग करुन ठेवायला हव्या.
अन्कु त्या मिर्च्या अगदी
अन्कु त्या मिर्च्या अगदी कड्डक वाळव, नाहीतर कुबट वास येतो साबुदाण्याला.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/81959
अजून एक ठेचा धागा
Pages