मिरची ठेचा उर्फ तोंपासू फॅन क्लब

Submitted by अमृता on 25 May, 2010 - 12:13

इथे मिरच्यांच्या चटण्या, ठेचे, तिखट्या इ. तोंपासु पाककृत्या येउदेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहाहा!!
अमृताबाई, एकावर एक बाफ काढताय तुम्ही!! तांदळाची भाकरी काय, मिरचीचा ठेचा काय!!
आता एक झुणका/पिठलंचा आणि एक भरल्या वांग्याचा काढ!
करणं जमलं नाही तर नुस्ते बाफ वाचून दु त ता भागवेन! Happy

सहीच.. मिर्ची ठेच्याचे फॅन सगळॅच असतील :).
पुण्यातला प्रसिध्द 'गणेश भेळ' (कोथरुड मधला) भेळे मधे पण लाल मिर्ची-लसुण घालून केलेला ठेचा घालतो .. थोडा फार वर्‍हाडी ठेच्या सारखी चव असते त्याला, आंबटपणा कमी असतो ठेच्याला, पण तय सवयीमुळे भेळ मिर्ची लसुण ठेच्या वाचून खाणे म्हणाजे फार च मिळमिळीत !!..
आमच्या आईच्या भेळ रेसिपी मधे हा ठेचा आणि चिंच गुळाच्या पाण्यात सुध्दा थोडा कान्दा लसुण मसाला असतो.. झणाझणीत सही लागते !!....तों पा सु.. Happy

Schezwan हक्का नुडल्स करताना Schezwan sauce ऐवजी वर्‍हाडी ठेचा घातला तर मस्तं होतात :).

डिजे, भेळेची तशीच लाल मिरच्या,लसूण वाली चटणी इथेही मिळतेच की. तसंच स्वादचं रेडिमेड भेळेचा पॅक आणला तर त्यातही येते ती चटणी. मस्त झणझणीत होते त्याने भेळ.

बायांनो, बाफ फार चांगला आहे. अगदी तोंपासु. पण आता दोन दिवसांनी आरोग्यम धनसंपदामध्ये दुसरा एक बाफ काढायला नाही लागला म्हणजे मिळवली Proud Light 1

पण आता दोन दिवसांनी आरोग्यम धनसंपदामध्ये दुसरा एक बाफ काढायला नाही लागला म्हणजे मिळवली
अगो, उद्याच जळजळ फॅन क्लब काढणार आहोत.
>> Lol

अगो, ते चीज केकसारख नाही खायच. चटणीसारखं खायचं. थोड तिखट खाणं चांगल अस परवा रेडिओवर ऐकलं. Proud

अगो Happy
अजून एक प्रकार
हिरव्या मिरच्या तळून त्याचे बारीक तुकडे करायचे आणी त्यात दाण्याचं कूट, मीठ, साखर आणी घट्ट गोड दही घालायचं
मूग-तांदळाच्या खिचडीबरोबर मस्त लागतं

माझ्याकडे पण खूप रेसीपीज आहेत ठेच्याच्या.

हे तोंपासू म्हणजे नक्की काय?

इथे कुणी पित्झ्यावर पसरवतात ती डाळिंबी चटणी वापरली आहे का?

लाल सुक्या मिरच्यांना एक दिवस उन द्यायचं. त्या खणखणीत वाळल्यात की कढईत एक दोन चमचे तेलावर मिरच्या भाजायच्या. मग त्यात अर्धा चमचे मीठ घालायचे. मिक्सरमधून इतकं भरडं काढायचं मी डाळिंम्ब्या दिसायला हव्यात. चव खूप वेगळी येते या चटणीची. हवं तर थोडं सुक खोबर, धणे पण घालता येतात.

अमृता, काढलास बीबी!! सही!
सगळ्याच पाकृ मस्त..

रच्याकने, हा माबोवरचा सगळ्यात "जहाल" बीबी म्हणून प्रसिध्द होईल असं दिसतयं Wink

मला तर हा बीबी खूप्प्प्प्प आवडलाय्..सध्या रेसिपीज वाचूनही खोकला येतोय्(:राग: )
पण सर्व रेसिपीज उतरवून घेईन मात्र Lol

कांदा चटणी
२ कांदे, जरा तुकडे करून घ्या + चांगले ४/५ चमचे लाल तिखट + मीठ + दाण्याचे कूट १ च. मस्त फिरवून ह्या. अगदी गंध नको पण बारीकच करा. याला १ च. तेलाची मोहोरी, हिंग व परत १ च. लाल तिखटाची फोडणी द्या.
अगदी मस्त चरचरीत!
झाली चटणी. काय? तोंपासू की नाही?

बापरे! काय तिखट खाता गं! Happy मला अजिबात सहन होत नाही तिखट, एकदम कोकणस्थी गोडखाऊ मी या बाबतीत. दोन रुपायांच्या मिरच्या मला महिनाभर जातात! Uhoh

त्यामुळे नुस्त्याच कृती वाचते. (कोणी करून दिला तर नखभर खाईन ;)) मस्त वाटत आहेत. फोटोही येत आहेत मस्त मस्त Happy

चला ही रेसिपी अजुन कोणी नाही टाकली म्हणायची अजून.
हिरव्या मिरच्या बारीक चिरुन, थोडं तिळाचं कुट, गुळ, चिंचेचा कोळ, कढीपत्ता, चवीपुरतं मीठ, पाणी, फोडणीसाठी तेल, हिंग.
तेल तापवुन हिंगाची फोडणी करावी, त्यात कढीपत्ता आणि मिरच्या घालाव्यात, थोडसं परतुन मग त्यात तिळाचं कुट, चिंचेचा कोळ, गुळ आणि मीठ घालून थोडं पाणी घालून ढवळून एक उकळी येउ द्यावी.
इडलीच्या चटणी इतकी consistancy असु द्यावी.

कश्या बरोबरही खाऊ शकतो.
मिरचीचं पंचामृत म्ह्णतो आम्ही याला.

वंजारी खुडा: खान्देशात ठेच्याला खुडा म्हणतात.

थोड्या कोरड्या लाल मिरच्या घेउन थोड्या पाण्यात हातानेच (जरा जाडसर)चुराव्यात. वरुन लसणाचे बारीक तुकडे आणि चवीपुरते मीठ आणि पळीभर तेल घालुन खुडा जरासा पातळसरच करावा.
'कळण्या'च्या भाकरीबरोबर तर चांगला लागतोच....पण सर्वात मजा येते ती शिळ्या कडक भाकरी/पोळ्यांबरोबर खायला! याला वंजारी खुडा का म्हणतात माहिती नाही, पण वंजारी ही भटकी जमात असा खुडा करत असावी....!

Pages