बे एरिया गटग - २६ मे आणि ३० मे २०१०

Submitted by क्ष... on 17 May, 2010 - 19:35

तारिख - २६ मे २०१० - संध्याकाळी ७.००वाजता
ठिकाण - बनाना लीफ रेस्टॉरंट, मिलपिटस
कारण - जिटीजी आहे कारणे काय विचारता आँ!!!
आता विचारलेच आहे म्हणून सांगते - सुनिधीला भेटण्यानिमित्त आहे हे जीटीजी

तारिख - ३० मे २०१० - सकाळी ११.०० वाजता
ठिकाण - माझे घर Happy
कारण - माननिय झारा आणि अ‍ॅडमिन यांच्याशी गप्पा मारण्याप्रित्यर्थ

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>फारएण्ड ला बसायला मिळावं म्हणून वेटरने शेजारच्या टेबलावरच्या चायनीज सुंदर्‍यांना उठवलं
शक्य आहे, कॅलिफोर्निया आहे.. Wink Light 1

<<<<हो कि नाही गं रमा?>>>

तर काय. व्हिएतनामि (कि मलेशिअन?) हाटलात कसले मेले खाण्याचे बेत करायचे ह आता फ्रिमाँटच्या सुगरणि घरि बोलावणार असतिल तर गोष्ट वेगळि आहे ;).

व्हिएतनामि (कि मलेशिअन?) हाटलात कसले मेले खाण्याचे बेत करायचे >>>>
सुनिधीकडे कोणी बर इतकी केळ्याच्या पानाची स्तुती केली Wink Light 1

विथ फॅमिली मला हरकत नाही. लोकाना बाहेर(च) जेवायचे असेल तर तसे सांगा.

माझ्या घरी चालू शकेल. आणि मुख्य म्हणजे आमच्या घरी तेव्हा भुभु असेल. लोकाना भिती वगैरे वाटत असेल तर स्पष्ट सांगा प्लीज.

भुभु विषयी फार प्रेम नाही. त्याचा बॅकयार्ड मधे बंदोबस्त करता येत असेल तर चालेल.
पॉटलक / बाहेर / किंवा बाहेरुन आणणे .. काहीही चालेल. सह-कुटुंब की नाही ते आत्ताच सांगु शकत नाही पण (सौ.ला पटवण्याचा) प्रयत्न करीन.

मनाली, गुर्जी, रश्मी, दीपाली तुमच्याकडे माझा आणि माझ्याकडे तुमचे नंबर्स आहेत. राखी तुला पाठवलाय अत्ताच. माझ्याकडे करायचे फायनल असेल तरकिती लोक येतील याचा अंदाज द्या म्हणाजे सोय करता येईल. शक्यतो ११ ल भेटुयात कारण अ‍ॅडमिन आणि झारा यांना पुढे ड्राईव्ह एलए ला जायचय.

सध्याचे होकारार्थी - अ‍ॅडमिन, झारा, मी, महागुरु, दिपाली, राखी.

धमाल करा लोकहो. आम्ही नाही यावेळेस. 'एका वेळी दोन ठिकाणी' गटग असतील रविवारी Happy (नवीन लोकांसाठी संदर्भः बाग राज्यातील गटग ला एका वेळी एका ठिकाणी असे म्हणतात).

पॉटलक ठरवुयात.
राखी - तू शिरा आण चालेल.
मी भाजी/उसळ, आमटी आणि भात करते.
प्रसाद तू कोशिंबीर आण
अभिजीत येईल त्याला चपात्या विकत आण म्हणुन सांगते.

माझा पत्ता जे येणार आहेत त्यांना कळवते आहे.
येणार्‍यांची संख्या -

मिनोती (२)
समिर (१)
सुप्रिया (१)
प्रसाद (२+१)
अभिजीत (२+२)
राखी (२+२)
दीपाली (१)
प्रविण आणि मनाली - तुमचे कसे काय जमते ते कळवा.

सविस्तर वृत्तांत लिहिणारे लिहतीलच.. तो पर्यंत हा एक (मायक्रो) वृत्तांतः
३० मे चे जीटीजी छान झाले. सगळी मंडळी आली होती. अ‍ॅडमिन आणि झारा हे प्रमुख पाहुणे होते. भोजन, गप्पा आणि शेवटी कोकम्/चहा ... २-३ तास कसे गेले कळालेच नाही. खुप मजा आली.

काल खरोखर सहि मजा आली. अगदी जुने मायबोलीकर म्हणजे स्टोर्वि-केटी, अभिजित-अंजली हे देखील आले होते. रजनिगंधा आणि कुटुंब हे म्हणजे नविन मायबोलीकर. सायलीमी हा येउन जाऊन असणारा जुना आयडी पण होता. आणि प्रमुख पाहुणे म्हणजे झारा आणि अ‍ॅडमिन.
आम्ही निम्म्या पार्लेकरणी मग मेनु हा डकवलाच पाहिजे -

वॉटरमेलन लेमोनेड
भजी
बुंदी रायता
काकडीची कोशिंबीर
खानदेशी पद्धतीचे वांग्याचे भरीत
पोटॅटो सागू
सफरचंदाचे लोणचे
बीट-कॅरट पुलाव
आंब्याचा शिरा
पोळ्या

मज्जानी लाईफ एकदम Happy

Pages