बे एरिया गटग - २६ मे आणि ३० मे २०१०

Submitted by क्ष... on 17 May, 2010 - 19:35

तारिख - २६ मे २०१० - संध्याकाळी ७.००वाजता
ठिकाण - बनाना लीफ रेस्टॉरंट, मिलपिटस
कारण - जिटीजी आहे कारणे काय विचारता आँ!!!
आता विचारलेच आहे म्हणून सांगते - सुनिधीला भेटण्यानिमित्त आहे हे जीटीजी

तारिख - ३० मे २०१० - सकाळी ११.०० वाजता
ठिकाण - माझे घर Happy
कारण - माननिय झारा आणि अ‍ॅडमिन यांच्याशी गप्पा मारण्याप्रित्यर्थ

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाँग विकेंडला आमचा पण काही प्लॅन नाही. त्यावेळी पण असेल एखादे जीटीजी तर मी येउ शकेन.
सगळ्यांना जमत असेल तर आमच्या घरी पण भेटु शकतो.

ज्यांना २६ ला जमत नाहिये आणि ज्यांना जमतय पण "किती कमी वेळ मिळणार आहे २६ ला" (मला द्रा़क्ष आंबट कोल्ही म्हणू नये, हुक्मावर्न) असं वाटतय, त्यांच्याकरता लांबविकांताला ठेऊचया परत गटग Happy

फारएण्डः धन्यवाद.

आधी ठरलेल्या कामामुळे २६ तारखेला जमणार नाही, पण ३१च्या आसपास कधी असेल तर जमेल.

२००० साली आम्ही केलेली गटग आठवली.तेव्हा रंपा म्हणुन कोकम सरबत प्यायलेलं. :). तेव्हाचं कुणीच नाहिये का आता?

तुम्हाला गटगसाठी शुभेच्छा!

मला माहिती नव्हते स्वाती पण असते इथे ते. घेउन ये तिला पण खुप दिवसात भेटली नाहीये ती पण.

बुकिंग झालेय बनाना लिफ मधे. पण सात वाजताचे करावे लागले कारण सात वाजल्यानंतर ते रिझर्वेशन घेत नाहीत. आणि १० लोकांचे बुकिंग केलेय तर कमित कमी ६ लोक टेबल मिळाताना हजर हवेत. प्लीज हे लक्षात ठेवुन वेळेवर या.

माझी आठवण काढल्याबद्दल धन्यवाद. मी येण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, पण ७ वाजता जमणार नाहीं . आलोच तर ८ पर्यंत येईन.

सांगते, पण माझी यावेळेला आणायला मिळण कठीण आहे. घर बदलल्यापासून मी पुस्तकांचा बॉक्स अजून उघडला नाही Sad आज जमला तर लिस्ट टाकते

फायनल लिस्ट मध्ये कोणा कोणाची नावे आहेत उद्याच्या? मी ७:३० पर्यंत येईन. सह कुटुंब येता येणार नाही त्यामुळे एकटाच येईन.

मंडळी, आज मल जमेलसं दिसत नाहिये......कालपास्न तब्येत जरा गड्बडली आहे. काल वाट्लेले कि आज पर्यंत बरे वाटेल, पण आज सुटी घेऊन घरी आहे आणि संध्याकाळ बद्दल अजुन खात्री वाटत नाहिये.

शेवट्च्या क्षणी माघार घेतल्याबद्दल क्षमस्व.

तुम्हि सर्व मजा करा आणि पुधचा गटग लवकर ठरवा म्हण्जे मला येता येइल.

अरे कोणीतरी वृ. लिहा की लेको. जबरी धमाल आली काल.

सुनिधीकडून प्रतिक्रिया मागवली पाहिजे. तिला नक्की वाटले असेल की एरव्ही चार लोक जमायची मारामार असते, आणि जमलेच तर एकाच ठिकाणी जमतील याचा भरवसा नाही. त्यात बेकरीचे मालकच येणार नाहीत म्हंटल्यावर कोणी येणार नाही, पाच मिनीटात हॉटेल वर परत जाउन ट्रीप पुढे चालू करू, तर नेमके ९-१० जण उगवले आणि ४ तास पिळत बसले Happy निदान रोम मधे असलेल्यांनी रोमात असल्यासारखे वागावे, तर तेही नाही.

त्यात किचन मधून येणारा खेकड्याचा वास, "स्टिन्की" राईस आणि रंपा टोफू. ट्रीपबद्दलचे सल्ले तर एकाहून एक अफाट, गोल्डन गेट ब्रिज वर जुलैतही जॅकेट लागते, म्युईर वूड्स मधे थंडी असेल, योसेमिटीचे बहुतेक सर्व रस्ते बंद असतील. ग्ल्रेशियर पॉईंट वरून सूर्यास्त छान दिसतो, पण तेथे आत्ता जाता येणार नाही. बे जवळच्या फार्म मधे प्रचंड वारा असतो. एवढ्या मौलिक माहितीवर ट्रीप चे प्लॅनिंग करावे लागेल आता.

नशीब ती २-३ दिवस फिरत असल्याने येथे आपल्यावर टीका करायला येणार नाही Happy तेवढ्यात स्वतःचे कौतुक करून घेऊ. तर लोकहो बे एरियाच्या मानाने महागटग म्हणजे ९ लोक होते: (येथे नसलेल्या फोटोत बसलेले डावीकडून) रमा, प्रविणपा, मिनोती, सुनिधी, फुलपाखरू, फारएण्ड, सशल, सायलीमी आणि किमया. मधे बर्‍याच डिशेस आणि बरीच मराठी पुस्तके. नेहमीप्रमाणेच अत्यंत सात्विक विषयांवर विचारप्रवर्तक चर्चा झाली.

जबरीच, लय मजा केलेली दिसतीय तुम्ही Happy
मराठी पुस्तके देवाण्-घेवाण पण झाली काय?
आता इथे असलेला फोटो पण येउदेत

खरं तर सुनिधीने केळ्याच्या पानाच्या बाहेर बसलेलो असताना एक फोटो काढलाय पण मला नाही वाट्त तिच्या कॅमेर्‍यात तो अजून असेल म्हणून... बडबडणार्‍या कडू आठवणी कोण हो जतन करून ठेवेल Wink

बाकी, ट्रीप प्लॅनिंगबद्दलची मौलिक माहिती ऐकून काय वाटले ते सुनिधी लिहिच इथे. Happy

फारएण्ड ला बसायला मिळावं म्हणून वेटरने शेजारच्या टेबलावरच्या चायनीज सुंदर्‍यांना उठवलं Happy
रमा आणी फुलपाखरू १० मिनिटात पोचतो असा फोन करून अर्ध्या तासाने आल्या आणी उशीरा येण्याचे कारण "काय खायचे (किती खायचे) हे ठरवत होत्या असं सांगितलं " Proud

सायलीमी Proud अर्ध्या तासाने आलो होय मला उअगिचच वाटत होतं की १ तासाने आलोयत. Proud लेकाला बाबाच्या ऑफिस मधे सोडून आले गं म्हणून उशिर झाला हो कि नाही गं रमा?

Pages