पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वाचाच प्रश्न मलाही पडलाय..:-)

नॅशनलाईज बँकेत 'एफ. डी." , " एम.आय.एस." की पुण्यात फ्लॅट अथवा कमर्शियल प्रॉपर्टी घ्यावी?

घेतली तर कुठे घ्यावी? जेणेकरुन महिन्याकाठी ब-यापैकी पैसे हातात पडतील?

मी सिंगल पॅरेंट असून आर्थिक जबाबदारी माझ्या एकटीवर आहे.

कृपया मार्गदर्शन करावे.

बाळू जोशी,

सानेवाडी मधे ४५ ते ५० पर्यंत अवघड आहे. पण ५५ ला २ bhk हातात पडू शकतो कदाचित, जर नियमित पणे लक्ष ठेवले तर.

नागरस रोड, वायरलेस कॉलनी मधे ५२ ते ५५ पर्यंत २ BHK मिळेल वर लिहिल्याप्रमाणे पण कुमार पद्मालया, साई रेसिडेन्सी मधे वगैरे. बाकि त्या भागात साधारण जुने २ BHK ५५ ते ६० च्या पुढे.

मित्रान्नो....मला पुण्यात एक किन्वा दोन बेडरुम चा फ्लॅट घ्यायचा आहे...केवळ investment म्हणुन....Budget आहे साधारण ४० लाख्.....कुठेही चालेल...Like Talegaon etc....कोणाला एखादी चांगली scheme माहित असेल तर please share करा ना....thanks in advance

धन्यवाद...! एका ब्लोग मध्ये वाचले होते कि परांजपे स्कीम्स ने मध्यमवर्गीयांसाठी ३५ ते ४० लाखात घरे आणली होती, आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता तशी स्कीम कुठे दिसत नाही. मग मध्यमवर्गीयांनी घरच स्वप्न कस पूर्ण करायचं कि आयुष्यभर भाड भरायचं?

आज मी एक प्लॉट बघायला गेलो होतो. http://www.goodlandcounty.com/ गुडलॅन्ड काउंटी आणि आयफेल ऑलिम्पिया असे मिळून एकूण ४०० एकर्सची टाऊन शिप हिंजवडी फेज ३ पासून १० किमी लांब अन पिरंगुट पासून ५ किमी (हिंजवडी -पिरंगुट रस्तावर) मुगौडे गावात होते आहे. इथे आजूबाजूस पाहिले असता सगळीकडे १०० एकर किंवा मोठ्या टाऊनशिप आहेत.

२२०० स्वेअर फुटचा प्लॉट साधारण १४ लाख (इ एम आय ऑप्शन घेतला तर) आणि वन टाईम पेमेंटमध्ये तोच १० लाखात. पण प्लॉट NA नाही. टाऊनशिप साठी अप्रुव्हल अजून मिळाले नाही. ती प्रोसेस चालू आहे.

अडिच किलोमिटर वरून नवीन (प्रस्तावित) रिंग रोड जाणार आहे. ( घोटावडे गावातून) तसे हिंजवडी ते पिरंगुट रस्ता १२० फुटांचा होणार आहे. त्यामूळे कनेक्टिव्हिटी असेल असे दिसते. सध्या तरी तिथे निसर्गातील हिरवळी शिवाय काहीही नाही. रस्ता आहे पण साधारणच.

कोणी बघीतले आहे का हे आधी? काय विचार केला? अजून १० वर्षांनंतर साठी बहुदा तिथेही २५०० भाव होईल असे मला वाटत आहे.

सुचेता जोशी | 15 August, 2012 - 12:22>>>> यावर एक वेगळ बाफ काढला तर बरं होइल. बर्‍याच जणांना हा प्रश्न दर महिण्याला पडत असेल. Happy

२२०० स्वेअर फुटचा प्लॉट साधारण १४ लाख >>> केदार हा भाग कोठे येतो त्याची काही कल्पना नाही पण इकडे गावाकडे वस्तीजवळील शेत जमिन १०० ते २०० रु स्के . फु. रु विअकताहेत. एन ए झालेली नसलेली पण नजिकच्या काळात होण्याची शक्यता असलेली. बाकि शेतजमिनिचा भाव पण २० लाख (पाणी असलेली) सांगताहेत पण व्यवहार खुप कमी आहेत. एक मात्र नक्कि, या व्यवहारात व्हाइट पैसा मात्र बर्‍यापैकी ब्लॅक होतो. घेणारा पण चेक्ने पैसे घ्यायला कां कु करतो... अवघडे....

पण कुठे आहे नी कसा आहे? त्यावर १७ की १५ ते ठरवा. वाकड मध्येही बरेच भाग अत्यंत टुकार अवस्थेतील आहेत.

या व्यवहारात व्हाइट पैसा मात्र बर्‍यापैकी ब्लॅक होतो >> हो त्यामुळे मी दोन डील ज्या ऑलमोस्ट फायनल झाल्या त्या सोडून दिल्या. मालकाला पैसे ब्लॅक ने हवे पण मी देणार नाही. मग प्रॉपर्टी नसली तरी चालेल.

केदार, इथेच छोटी जाहिरात आहे. ब्रम्हा पार्क हॉटेल अँबिअन्स च्या जवळ. बेसिकली एक खोली व किचन. पण मुंबईत अगदी पनवेल परेंत पण २५ - ३० लाखाच्य खाली वन बीहेच के नाही. मग पुण्यातच का नाही घेऊ? असा विचार होता. आय नीड अ स्मॉल रिटायरमेंट हॅवन.

ब्रम्हा पार्क हॉटेल अँबिअन्स >> एरीया बरा आहे. पण हा ब्रह्मा पार्क नेमका कुठे आणि कसा आहे ते बघून ठरवा. कारण जवळ पार्क स्ट्रीट पण आहे व इतर अनेक नवीन स्किम आल्या आहेत. पण १७ लाख खूपच कमी आहेत मग ह्या भागात. कारण ३० लाख भाव चालू आहे. त्यामुळे हा ब्रह्मा नेमका कुठे आहे, आजूबाजूला वस्ती कशी आहे त्यावर किंमत ठरते.

अश्विनीमामी तो एरीआ असेल तर नको.. वाकड मधे अजिबात सुनियोजीत विकसन झालेले नाही. बर्‍याच सोसायट्यांना चांगला access road नाही. बांधकामाचा दर्जा सुद्धा यथातथाच..पुन्हा काळेवाडी, थेरगाव, १६ नं. तर भयानक वस्ती..

परांजपे स्कीम्स ने मध्यमवर्गीयांसाठी ३५ ते ४० लाखात घरे आणली होती>>> Uhoh

सॉरी. मध्यमवर्गीयची व्याख्या फारच अघळपघळ असल्याने हसु आलं.
मी यम आय डि सीत काम करणारे लोक पाहिलेत ते ह्या रेन्ज मध्ये येणार नाहीत.
पण ते झोपडपट्टी लोकही नाहीत. त्यांचा वर्ग कोणता?
असो.
जागेच्या बाबतीत म्हणायच झाल तर डील करताना बरेच लफडे असतात.
त्यामुळेच टेन्शन आहे मेन.

पुण्यात मध्यमवर्गियांसाठी स्वस्तात घर कुठे अन किती रुपयाला मिळेल? सेकंडहॅंड चालेल Sad
वर मामींनी सांगितलं तसं एक खोली, किचन अन बाथरूम असलेले पुरेल.

संपादन : लोकहो, प्रश्न खरेच इमानदारीत अन गांभीर्याने (सिरियसली) विचारलेला आहे. कुणी जाणकाराने उत्तर दिले तर बरे. बजेट १५-२० लाख.

अरे धन्यवाद. मी फोनच करणार होते. जिमखाना आणि प्रभातरोड सोडले तर नव्या पसरलेल्या पुण्याची काहीच माहिती नाही.

एक बांधकामक भेटले होते त्यांच्या म्हणण्यानुसार बांधकामाना पाणी मिळणे कठीण झाले आहे आणि उत्तरोत्तर कठीण होणार आहे पुढच्या वर्षीपर्यन्त सबब बांधकामे रेंगाळणार आहेत. पुण्यात सध्या कंप्लीशन शेड्यूल्स साधारण दीड वर्षाची आहेत . त्यात वर्षभराने वाढ होऊ शकते....

पुण्यात सध्या कंप्लीशन शेड्यूल्स साधारण दीड वर्षाची आहेत . त्यात वर्षभराने वाढ होऊ शकते.... >> बाजो, होऊ शकते? होतेय. मी २००९ मध्ये बूक केलेला फ्लॅट, पझेशन ची कमिटमेंट होती डिसेंबर २०१०, फ्लॅट मिळाला जानेवारी २०१२ ला.
ते ही अजुन बिल्डींग कंप्लिट नाहिच आहे, गार्डन, पार्किंग अशा एरियात काम सुरूच आहे अजूनही.

केवळ पाण्याशी संबंधित बाबींमुळे एखादे वर्ष. बाकी मग कॅशफ्लो, वगैरे बिल्दरच्या नादानपणामुळे ते तर नेहमीचेच आहे. तरी थोबाड उघडून दीड वर्शाचे आश्वासन देतातच.
तूर्त घर घेणे म्हणजे आपल्याला कळत असूनही आपली फसवणूक होत आहे या भावनेने होणारी तडफड येवढेच राहिले आहे.

पुण्यात सुनियोजीत विकसन झालेले नाही तर वाकड तरी अपवाद कसा असेल?

वाकड मधील होणार्‍या रस्त्यांचे प्लान - प्रत्येक जोडणी रस्ता ८० फुटी अन मुख्य १०० फुटी. तिथे मध्ये त्या पमकिम पॅच ते वाकड प्लायओव्हर १०० फुटी रस्ता होतोय. वाकड प्लायओव्हर (सध्याचा) तोडून तिथे दुसरा येणार आहे. वाकड - पिंपळे निलख - बाणेर असा दुसरा नियोजीत (हायवेला प्यारलल असणारा) रस्ता ७० % झाला आहे. ब्रिज झाला की वाकड - बाणेर १५ मिनिटात. पिंपळे निलख हा वाकडच्या डावीकडचा भाग, इथे कोल्टे पाटील ची २४ के अन गंगा पनामा अन इतर तत्सम स्किम आहेत. ५ वर्षांनतर हा भाग इतका वेगळा असेल की रेट आजच्या डबल होतील. त्या रस्ताला कोणी विचारत नव्हते पण आता कोल्टे पाटील मुळे भाव डबल होऊन गेले.

वाकड- औंध हा रस्ता व काळेवाडी औंध रस्ता ऑलरेडी मोठे केले गेले आहेत. काळेवाडी-औंध वर आणि एक लेन दोन्ही बाजूने म्हणजे १०० फुटी रस्ता होणार तर औंध ते हिंजेवडी - वाकड १२० फुटी.

अ‍ॅम्बीयन्स पासून पुढे डाव्याहाताने हायवे पर्यंत (कस्पटे वस्ती आणि इतर वस्त्यांचा भाग) ते पार सयाजी पर्यंत फक्त आणि फक्त मल्टी स्टोरी अपार्टमेंटस आणि स्किम आहेत काळेवाडी ते डांगेचौक अन मधले गावठाण हा भाग इग्नोर करा. पण वाकडला पर्याय नाही.

पुण्यात मेट्रो आलीच तर हिंजवडी ते मनपा असा टप्पा येणारच कारण हिंजवडीत पुण्यातले ऑलमोस्ट अर्धे लोक काम करतात. मग वाकडला अजून भाव येईल.

BTW माझे वाकडला घर / जमीन नाही. Happy फक्त तो अतिमहत्वाचा भाग ठरणार ह्यात मला तरी कुठेही शंका दिसत नाही.

अर्थात मामींनी ते घर घ्यावे असे सुचवत नाही कारण मी आधीच लिहिले. भाव ३० असताना १७ ला का मिळतोय? फक्त वाकडचे स्ट्रॅटेजिकल महत्व सांगतोय.

कोणतीही गोष्ट सर्वसाधारण बाजारभावापेक्षा अ‍ॅबनॉर्मली कमी भावात मिळतेय म्हणजे त्यात काही तरी धोका आहे हे साधे व्यवहार ज्ञान आहे.

केदार, वाकड हिंजवडीत (IT) काम करणार्‍यांना बरा option आहे. पण तिथल्या बांधकामांचा दर्जा सुमार वाटतो. सध्याच कधी तरी Pune Mirror मधे Park Street च्या बांधकामाबद्द्ल अगदी २ पानी लेख आला होता (त्यांच्या सोसायटीच्या सेक्रेटरीने च मुलाखत दिली होती). प्रशस्त रस्ते आहेत पण गावठाण भाग (इथे ईमारती सुद्धा आहेत) असल्यामुळे ह्याच रस्त्यांवर संध्याकाळी ६ नंतर काय वाट्टेल ती दुकाने थाटली जातात. Mont Vert चा स्पंदन (?) हास्पिटलकडचा access road भयानक आहे. वाकडपेक्षा रावेत प्राधिकरण एरीआ चांगला वाटतो. पुन्हा वाकड काय, रावेत काय तिथल्या जमिनींची titles कितपत clear आहेत हा सुद्धा एक मुद्दा आहेच.

Pages