ब्लॉग, ब्लॉगर्स आणि ब्लॉगिंग २

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

गेल्या रविवारी म्हणजे ९ मे २०१० ला मुंबईत दादर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ब्लॉगर्स मेळावा दणक्यात पार पडला. त्याबद्दल मायबोलीवर बोलायचं काय प्रयोजन असं वाटेल अनेकांना. मायबोलीवर लिहिणार्‍यांपैकी बरेचसे लोक नियमित ब्लॉगर्स आहेत. उत्तमोत्तम लिखाण ते सगळे आपल्या ब्लॉगवर करत असतातच. तसेच ब्लॉग लिखाणासंदर्भातले बरेचसे मुद्दे हे मायबोलीवरच्या लिखाणांनाही लागू होतात. मराठी ब्लॉग जगत या अस्तित्वाला मायबोली, मिसळपाव किंवा तत्सम साइटसवरचे लिखाण हे जगही जोडलेलेच आहे. त्यामुळे हे इथल्यांपर्यंतही पोचवावे असे वाटले.
तर असो....
कांचन कराई, महेंद्र कुलकर्णी आणि रोहन चौधरी या तिघांनी अतिशय उत्तमपणे या मेळाव्याचे संयोजन (आर्थिक बाजूसकट) उत्कृष्टरित्या पार पाडले. त्यांचे आभार. या सगळ्याबद्दल वेगवेगळ्या ब्लॉगर्सनी लिहिलंच आहे. कोण कोण आले होते पासून काय काय खाल्ले इथपर्यंत सगळंच बहुतेक ब्लॉगपोस्टस मधे आलेलं आहे. तेव्हा मी त्यावर काय बोलणार अजून!
मेळाव्यानंतर घरी गेल्यावर लगेच लिहिले गेले असते तर नक्कीच सरळसोट वृत्तांतापलिकडे मीही लिहिलं नसतं आणि कदाचित ज्यांनी लिहिलंय त्यांच्याइतकं चांगलं मला लिहिताही आलं नसतं. आणि माझा आळशीपणाही होताच त्यामुळे मेळावा झाल्या झाल्या लिहायचं राहूनच गेलं.
तेव्हा आता वृत्तांतापलिकडे जाऊन मेळाव्यासंदर्भाने पुढे आलेल्या आणि मला महत्वाच्या वाटलेल्या काही गोष्टींबद्दलच मी लिहेन म्हणते.
मेळावा छान पार पाडण्यासाठी संयोजकांचे कष्ट होतेच यात वाद नाही पण त्यांनी जे ठरवलंय ते योग्य रितीने पार पडावं याची जबाबदारी आपली सगळ्यांची म्हणजे जमलेल्या सगळ्या ब्लॉगर्सची आहे. हे अर्थातच ब्लॉगर्स मेळावाच नव्हे तर कुठल्याही सभासंमेलनाच्या बाबतीत खरं आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी आणि इतरत्रही आपण ते पाळतो का? संयोजकांनी मेळाव्याची एक रूपरेषा ठरवलेली आहे. ती इमेलमधून पाठवलेलीही आहे तर त्या रूपरेषेनुसार कार्यक्रम व्हावा ही जबाबदारी उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नाही का? जर पहिलं सेशन, पहिला कार्यक्रम हा केवळ ब्लॉगर्सनी स्वतःची थोडक्यात ओळख करून देण्याचा आहे तर आपण किती वेळ बोलायचं याला मर्यादा आपण घालायला नको का? की थोडक्यात या शब्दाची व्याख्या/ अर्थ आपल्याला माहीत नाहीयेत? जे सगळे विस्ताराने बोलले त्यांचं म्हणणं महत्वाचं होतं हे निश्चित. पण थोडक्यात ओळख च्या ऐवजी नंतरच्या सेशनमधे ते केलं गेलं असतं तर विस्तृत भाषणांनंतर ज्या ब्लॉगर्सच्या ओळखी झाल्या त्यांच्या ओळखींमधे आणि नंतरच्या सेशनमधेही लोकांना इंटरेस्ट राह्यला नसता का? संयोजकांनी ठरवलेल्या रूपरेषेला धाब्यावर बसवण्यात आपल्याला काय भूषण वाटतं? की हा पण एक मराठी बाणा आहे?
देवनागरी लिखाणाचे तंत्र यावर आपण सगळ्यांनी भरपूर किंवा सगळ्यात जास्त उहापोह केला. काहींना मुळाक्षरांच्या सेटसप्रमाणे किबोर्ड असल्यामुले लिखाण सोपे वाटत होते. काहींनी फोनेटिक किबोर्ड जवळ केला होता. स्पेलचेक, शुद्धलेखन इत्यादींच्या अनुषंगाने काही मुद्दे मिळाले. ते जामच तांत्रिक असल्याने माझ्या अर्थातच लक्षात राह्यले नाहीत. आणि मुळात ओळख प्रकरणांमधे खूप वेळ गेलेला असल्याने तोवर काही ऐकण्याचा पेशन्स बहुतेक संपला होता. तिथे दिली गेलेली तांत्रिक माहिती कुणी एकगठ्ठा आपल्या ब्लॉगमधे टाकली तर नीट समजून घ्यायला फार आवडेल.
पुढचा मुद्दा कॉपीराइट इश्यूचा. आपण आपल्या लेखात फोटोग्राफ्स कुठून उचलून वापरत असू तर ते तसे वापरणे हे मुळात violation आहे. तसे करणे चुकीचे आहे हीच गोष्ट बहुसंख्य ब्लॉगर्स किंवा इतरांच्या गावी नसते. फॉरवर्ड पाठवणारे किंवा काही ब्लॉगर्स हे केवळ मला आवडलं मी शेअर केलं असा सूर लावतात, त्यापुढे जाऊन आम्ही प्रसिद्धी देतोय या गोष्टींना अशी शेखीही मिरवतात. ही वृत्ती मोडण्यासाठी मुळात काहीतरी करायची गरज आहे. मराठी ब्लॉगर्स म्हणून आपण आपलं अस्तित्व उभं करत असताना या काही मुद्द्यांकडे आपण जायला हवे. कॉपीराइट संदर्भातले तांत्रिक ज्ञान महत्वाचे आहेच पण अ‍ॅटिट्यूड, वृत्ती याबद्दल पण आपण जबाबदार मराठी ब्लॉगर्स म्हणून आपल्या ब्लॉग्जमधून भाष्य करायला हवे. निदान काही ढापू लोक जे अनभिज्ञ आहेत ते तरी सुधारतील. Happy
अर्थात ह्या झाल्या तांत्रिक गोष्टी. संपूर्ण कार्यक्रमात या तांत्रिक गोष्टींपलिकडे कोणी बोलायलाच तयार नाही की काय असं वाटलं. ब्लॉग्ज मधून येणारे विषय, लिखाण यांचा मर्यादित स्कोप यावर प्रसन्न जोशीने खूप महत्वाचे मुद्दे मांडले. मराठी ब्लॉग्ज मधे मराठीपण हे ज्ञानेश्वर-तुकाराम, वपु-पुलं, गणपती-दिवाळी, वडापाव यापलिकडे जातच नाही. मराठी ब्लॉग्जमधे या पलिकडचे विषय फारसे येत नाहीत. मराठी बाहेरचं इतर साहित्य मराठीत आणलं जाणं असं फारसं काही घडत नाही. ब्लॉगला मराठी शब्द शोधण्यापुरताच आपला मराठीचा अभिमान असतो. हा असा अट्टाहास योग्य आहे का? असं काहीसं त्याचं म्हणणं होतं. मुद्दा महत्वाचा होता. पण कदाचित खूप वेळ भाषणबाजी झाल्यामुळे असेल त्या मुद्द्याला सोयीस्कर बगल दिली गेली आपण सगळ्यांकडूनच. माझ्या आसपासच्या खुर्चीवरून कशासाठी जायचं या पलिकडे? कशासाठी पहायचं यापलिकडे? अशी कूपमंडूक प्रतिक्रियाही खुसखुसताना मी ऐकली.
मुद्दा मला महत्वाचा वाटला. मराठीपण हे खूपच मर्यादित मुद्द्यांपुरतं दिसून येतंय ब्लॉग्जमधे. कुठे ब्लॉग किंवा तत्सम अनेक गोष्टींना मराठी प्रतिशब्द शोधण्याच्या अट्टाहासापुरतंच रहातंय तर कुठे आमचे सण आणि आमची संस्कृती याबद्दल प्रचंड भावनांनी ओथंबून जात आंधळेपणाने जुनं ते सोनंचाच जप करताना दिसतंय तर कुठे वापरून गुळगुळीत झालेल्या शब्द आणि संकल्पनांना घेऊन run of the mill प्रकारची तथाकथित साहित्यनिर्मिती करताना दिसतंय इत्यादी. मराठी भाषेबाहेरचं काहीतरी मराठीत आणणं सोडाच महाराष्ट्रातल्याच आयुष्याबद्दल बरंच काही आपल्यापर्यंत सर्वांगाने पोचत नाहीये. आपल्याला ते शोधावसं, लिहावसं वाटत नाहीये. मराठीपणाच्या कक्षा आपल्या बुद्धीत रूंदावत नाहीयेत आणि त्यामुळे मराठीपणाचे बरेचसे पैलू आपल्याला दिसतच नाहीयेत.
आता याची कारणं म्हणायची तर मला सापडलेली ही काही कारणं...
१. इंटरनेट हा प्रकार उपलब्ध असणं, तेही अश्या प्रकारच्या लिखाणासाठी मुक्तपणे उपलब्ध असणं हे अजूनही ठराविक व्यवसायांपुरतंच आणि शहरांपुरतंच मर्यादित आहे.
२. उपलब्धता असली तरी कॉम्प्युटर आणि इंटरनेट या संदर्भातली भीड चेपली जायला अजून वेळ आहे. हे इतर व्यवसाय आणि लहान गावे यांच्यासंदर्भात
या दोन कारणांमुळे खूप ठराविक लोकच लिहिणारे आहेत आणि त्यामुळे निश्चितच वैविध्याची कमतरता आहे.

३. आपली (माझ्यासकट आपली सगळ्यांची) कवाडं अजून बर्‍याच अंशी बंद आहेत. यापलिकडे आहेच काय/ गरजच काय याप्रकारची मानसिकता आपली सगळ्यांचीच आहे कमी अधिक प्रमाणात.
४. ब्लॉग लिहिणे हे अजूनही आपल्या ओळखीच्यांपुरते लिखाण, गंमत म्हणून लिखाण इतपतच आहे. त्याचे ते स्वरूप जोवर बदलत नाही (आपल्याकडून आणि इतर अनेक तांत्रिक पातळ्यांवर सुद्धा) तोवर त्यात गांभीर्याने दखल घ्यावी असे थोडेसेच असणार.

अर्थात ही सगळी 'कारणे' झाली. स्वतःच्या, स्वतःच्या मराठीपणाच्या मर्यादा मोडायची, कक्षा रूंदावायची वेळ झाली आहे हे आपलं आपल्यापुरतं आपल्याला टोचलं तरी खूप झालं की!!

या मर्यादित विषयांच्या पार्श्वभूमीवर मला काही जणांचं लिखाण महत्वाचं वाटतं. त्यातले आत्ता आठवणारे हे दोन.
१. झुलेलाल उर्फ दिनेश गुणे http://zulelal.blogspot.com - दर वेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जगण्याबद्दल, वेगवेगळ्या प्रकारच्या जगण्याबद्दल एक काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं. एखादा प्रश्न, समस्या, नवी वाटचाल, एखादा तिढा असं काहीतरी नेहमीच्या चक्कीपेक्षा वेगळं, काहीतरी खूप महत्वाचं आणि आपल्या आयुष्यांशी अप्रत्यक्षपणे का होईना निगडीत असणारं प्रामाणिक लिखाण. परत भाषाशैली अप्रतिम आहेच.
२. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com - सुरूवातीला मायबोलीवर याचं काही वाचलं तेव्हा ब्राह्मणविरोधी/ ब्राह्मणद्वेष्ट्या विचारांपलिकडे काही दिसलं नाही. रागही आला. पण मग त्याने त्याच्या भामरागडबद्दल, त्याच्या भाषेबद्दल, तिथल्या चालीरितींबद्दल लिहायला सुरूवात केली तेव्हा सुखद धक्का होता. सहज, उस्फूर्त आणि वेगळ्या आयुष्याबद्दलचं लिखाण. पण तरी मराठीपणातलंच(भाषा वेगळी असली तरी ते मराठीपणच), महाराष्ट्रातलंच. आपल्यापेक्षा वेगळा समाज आपल्यापुढे उभा करणारं आणि पर्यायाने आपल्याला विचारात पाडणारं.

अजूनही बरेच आहेत पण सध्या पटकन हे दोन आठवतायत.

तर असो.. मर्यादा तोडण्याच्या नावाने चांगभलं करून सध्यापुरती माझ्या किबोर्डाला विश्रांती देते. तुम्हीही थकला असाल तर उतारा म्हणून वरचे दोन ब्लॉग्ज नक्की वाचा. याला आमच्या मायबोलीवर रिक्षा फिरवणे म्हणतात. म्हणोत म्हणतात तर. मेरेको क्या!!

- नी

विषय: 
प्रकार: 

तुझा ब्लॉग मला तरी उत्स्फुर्तपणे लिहिलेला वाटतो (दर्जाबद्दल नी किंवा रैनाला विचार Proud :दिवा:)

मायक्रो वेब लॉग.. म्हणजे आपण फेसबूक वर जसे १ ओळीचे स्टेटस मेसेजेस लिहितो तसं

आरं तिच्या मारी...
म्हंजी तितं बी आता साहित्यिक मुल्यं आणि इशयाचं वैविध्य आन पुना कक्षा रुंदावलेलं बी लागंल म्हनता?

आवघड हे. Uhoh

कंपुबाजीबद्दल सुद्धा मायबोलीलाही तेच म्हणता येईल. चांगल्या लेखकांना प्रोत्साहन द्यायलाच हवे, पण अनेकदा ते अती होतं, आणि त्यात चांगले मुद्दे वाहुन जातात.

असे केले तर? प्रत्येक नवीन आर्टिकलला १-१० असे गुण प्रत्येक व्यक्ती एकदा देऊ शकेल (कुणी कोणत्या आर्टिकलला किती गुण दिले आहेत हे त्यांच्या पानावरुन दिसेल). मग वेगळे छान म्हणाय्ची गरज नाही, चर्चा मुद्देसुद होईल. वाचतांनाही मदत होईल (चांगले लिखाण शोधतांना). कानोकानी चा कन्सेप्ट तसाच असला तरी तो वापरला जात नाही.

अनेकदा मोठ्ठे काही लिहायला लागणारा वेळ नसतो. ऑडिओ ब्लॉग्स जास्त चांगले ठरतील (जो पर्यंत लोक स्व्तःच्या आवाजातील कविता टाकणे सुरु करित नाहीत).

less is more.

खरच अवघड आहे. अरे यार कुठे प्रत्येक लिखाणाचा साहित्यिक कीस काढत बसता? पटलं तर वाचा नाही सोडा की! प्रत्येक ब्लॉग मध्ये वैविध्य अन मुल्य बिल्य असावेच का? ब्लॉग काढण्याची सुविधा आहे, काढला ब्लॉग. इतके सोपे आहे ते, ब्लॉगच का काढले, त्यांचे सामाजिक, वैचारिक, साहित्यिक मुल्य हा चर्चा फुकाचा आहेत.

आणि आजकाल हे एक नेहमी वाचतो मी की जालावर मराठी लिहीले म्हणजे मराठी टिकेल. ईंटरनेटवर मराठी लिहीणे म्हणजे मराठी वाचवणे का? लोकही काहीही लिहीतात.

त्यानेच वाचेल असे नाही. वाचण्यास मदत होईल. पण टिकेल .डॉक्युमेन्टेशन होत राहील. लोकांच्या डोळ्यासमोर व्हिज्युअल एफेक्ट राहील. डोळ्याखालून जात राहने महत्वाते नाही का?

नेटबाहेरच्या जगात गेली काही वर्षे अमाप संख्येने मराठी पुस्तके निघत आहेत पण त्यापैकी नव्वद टक्के पुस्तकांना दुसर्‍यांदा आवर्जून वाचावे इतकेही वाचनमूल्य नाही. मग मराठी ब्लॉगर्सकडून इतक्याच 'साहित्य निर्मितीची' अपेक्षा करणे चुकीचेच. पण असं असूनही उद्याचे दर्जेदार साहित्य किंवा कंटेपररी साहित्य हे ह्या ब्लॉग्जवरच्या पोस्ट्समधूनच निर्माण होऊ शकेल इतकी क्षमता नक्कीच निर्माण झाली आहे काही ब्लॉगर्समधे.
डायरीवजा लिखाण हा ब्लॉग्जचा काहीतरी 'कमीपणा' मानला जातो पण उलट मला तर ती ब्लॉग्जची स्ट्रेन्ग्थ वाटते. ब्लॉग्ज लिहिणारे सुरुवात 'मी' पासून करत असले तर ते योग्यच. अक्षरशः जगाच्या कानाकोपर्‍यात पसरलेले मराठी ब्लॉगर्स यानिमित्ताने आपले विविध क्षेत्रातले, विविध समाजांमधले अनुभव शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवात शाळकरी निबंधासारखी झाली तरी त्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगणे, पलीकडे जाणे यातूनच होते. अनुभवांना थेटपणे भिडून लिखाण करण्याची कुवत त्यांच्यापैकी काहींमधे निर्माण अवश्य होते आहे.
डायरीवजा किंवा 'मी'च्या लिखाणामधे कल्ट साहित्यकृती निर्माण होण्याची किती ताकद असते हे कित्येक क्लासिक्सनी ऑलरेडी दाखवून दिलेले आहे. कोसलाही याचेच उत्कृष्ट उदाहरण.
ब्लॉगर्समधे गुणवत्ता, क्षमता आहे फक्त कमतरता आहे ती सातत्याची आणि वेगवेगळे फॉर्म्स धीटपणे हाताळण्याची. आणि अजून एक वेगळेपणा म्हणजे येणार्‍या इन्स्टन्ट प्रतिक्रिया. ज्या बाहेरच्या जगातल्या लेखकांना कधीच मिळू शकत नाहीत. आपले पुढचे पोस्ट जास्त दर्जेदार किंवा वेगळे करण्याची स्फुर्ती ब्लॉगर्सना यातूनच मिळू शकते मात्र उगीच सामान्य लिखाणाला चढवले गेले तर ब्लॉगर कमी कालावधीत संपूही शकतो. यात मला वाटतं वाचकांचीही जबाबदारी खूप आहे. प्रतिक्रिया देताना परखड वस्तुनिष्ठपणा दाखवणे वाचकाला जमले पाहिजे आणि क्रिटिसिझम योग्य त्या स्पिरीटने घेणे ब्लॉगरला जमले तरच तो पुढे जाऊ शकेल.

वेगळ्या स्टाईलची भाषा, काहीतरी नवा वेगळा विचार, नवा फॉर्म ब्लॉगिंगमधे अचूक पकडता येऊ शकतो. मात्र असा प्रयत्न करणारे खूप कमी. जे करताहेत त्यांचे कौतुक आहे आणि करत नाहीत त्यांनी तो आवर्जून करायला हवा.

डायरीवजा लिखाणाने सुरुवात करुन स्वतःची स्टाईल मिळणे, मग त्यापुढे जाऊन काही वेगळे मांडणे, स्वतःच्या अनुभवांतून वाचकांना स्वतःशी जोडणे, अनुभवांच्या पलिकडचे काहीतरी वाचकांच्या पदरात टाकणे, भाषा समृद्ध करत नेणे, संदर्भ मिळवण्याचा प्रयत्न करणे हे करणारे काही ब्लॉगर्स बस्केने उल्लेख केले आहेतच. माझ्या माहितीप्रमाणे त्यातल्या एका ब्लॉगरला मराठीतल्या मान्यवर प्रकाशकांनी ऑलरेडी तिचे पोस्ट्स संकलित करण्याची ऑफर दिली होती. मराठी प्रकाशकांनी असे जास्तीतजास्त प्रयत्न आता करायला हवेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी काही सीमारेषा मराठी साहित्यकृतींमधे पुढल्या काळात नसावी.

ब्लॉगर्समधे गेल्या काही महिन्यांमधे पेन्शनर्स लिखाणाचा सुळसुळाट झाला आहे. रस्त्यावरुन जाताना दिसले अमुक की टाक त्यावर पोस्ट टाईप उत्साह त्यांच्यात अमाप ओसंडून जातो आहे. ब्लॉगर्सचा दर्जा आणि संख्या याचे प्रमाण यामुळे विपरित होईल की काय अशी भिती साहजिकच वाटते. पण हा ब्लॉगर्सचा एक वेगळा, स्वतंत्र प्रकार आहे आणि त्यांचा वाचकही वेगळाच रहाणार. यामुळे तरुण, उत्साही ब्लॉगर्सनी आपला ब्लॉगिंगचा उत्साह गमावता कामा नये. लिहित रहायला हवे.
चांगले, सकस असे काही जन्मतःच प्रत्येकवेळी नसते. ते घडत जाते. ज्यांच्यात क्षमता आहे ते घडतील. बाकी फोलपटे उडून जातील आपोआप.

उगीच सामान्य लिखाणाला चढवले गेले तर ब्लॉगर कमी कालावधीत संपूही शकतो. यात मला वाटतं वाचकांचीही जबाबदारी खूप आहे. प्रतिक्रिया देताना परखड वस्तुनिष्ठपणा दाखवणे वाचकाला जमले पाहिजे >>>
इथे लेखकाप्रमाने वाचकाची जबाबदारी अधोरेखीत केल्याबद्दल धन्यवाद, वर नीरजा आणि रैना ह्याच जबाबदारीतुन पोष्ट टाकत आहेत. वाचु नका हे सडेतोड उत्तर कदाचीत समोरच्याला गप्प बसवणारे वाटतही असेल पण ह्यातुन तुम्ही त्या लेखकाचीच वाढ खुंटवत नाही आहात का?
bloggers अभिव्यक्तीबद्दल बोलायचे झाले तर ती खोटी का वाटते ? ५० पोष्टनंतरही तुम्ही स्वतःच्या लिखाणाला 'मी लेखिका नाही' ह्या सबबीखाली रोजचे अनुभव ह्या सदरातच ठेवत असाल, तर तुम्हाला स्वतःला तुमचे लिखाणच नाही तर अनुभवही तपासुन बघायची गरज वाटत नाहीये. हे एक प्रकारे स्वतःला गोंजारणे नाही काय?
मी तर कुणालाच pesrsonally ओळखत नाही ,मला स्वतःला लिहिता येत नाही, तरी देखील 'अस्सल लिखाण' व 'निव्वळ आपण लिहु शकतो , आपले मराठी भाषेवर प्रभुत्व आहे हे सिध्द करण्यासाठी केलेले लिखाण' ह्यातला फरक ओळखता येणे हे वाचक म्हणुन मला आवश्यक वाटते . ते होत नसेल तर माझी वाचक म्हणुनच नाही तर माणुस म्हणुनही वाढ खुंटलेली आहे का हे मी तपासुन पाहिले पाहिजे.

शर्मिला, इथे बरचं काही वाचलं एकेकाच्या वक्तिरेखा सहज डोकावून पाहिल्या त्यात तुमचीही व्यक्तिरेखा पाहीली. तुमच्या ब्लॉगचं खरचं कौतूक करावसं वाटतं कारण त्यातलं लिखाण तर सुंदर आहेच पण ब्लॉगची मांडणी खूप सुरेख आहे. Happy

खरंय बस्के- गायत्री, नंदन, ट्युलिप इतके सुंदर लिहायचे. वाचुन वाटायचं या मुलांनी एक पुस्तक काढायला हवे. अलिकडेच कोणीतरी एका इंग्रजी ब्लॉगरने पुस्तक काढलेय म्हणे असे असामी सांगत होता. असो. तुझ्या आख्ख्या पोस्टलाच अनुमोदन.

सिंडे- वेगळं काही लिहावं असा प्रयत्न करावा लागतो यातच काय ते आलं ना? वेगळे तेच चांगले (असेलच)असेही नाही. इथे कोणाच्या अपेक्षेनुसार हाही एक प्रश्न आला ना? आपण किती वेगवेगळ्या पातळ्यांवर जगतो. नुसतं आसपास पाहिलं तरी त्यातले भावनिक, सामाजिक, राजकीय, वैचारिक धागेदोरे अनुभवत आणि मांडत राहिलो तर.. ते प्रामाणिक असले पाहिजेत ही आणि एवढी एकच अट आणि अपेक्षा जाचक आहे आणि रास्त नाही?
तू राहतेस तो भुप्रदेश मी कधी पाहिला नाही, तुझी कामाची जागा, तो समाज, तिथली माणसं, हे सगळं तुझ्या शब्दातुन, तुझ्या दृष्टीकोनातुन मला दिसली, त्यातले मर्म तुझ्या शब्दातुन अनुभवले, तेवढे तरी नको व्हायला? (तू आणि मी हे फक्त वानगीदाखल.)

मनोगतावर की कुठेतरी एक सीरीज वाचलेली आठवतेय एका आजोबांनी आपले अनुभव लिहीले होते, साधेसरळअस्सल चारचौघांसारखे म.व आयुष्य, केलेले कष्ट, मिळालेले आणि गमावलेले काही. एका पिढीच्या विचारधारेचा आणि कष्टांचा दस्ताएवज होता तो. साहित्यिक मुल्य मरुचदेत.

तसे तर आपण जगतो/ मरतो, आठवणींची काही पानं मागे राहतात, जगाला काही फार फरक पडतो असे नाही.... मग आपल्या अशा म्हणवणार्‍या रोजनिशीत दिसामाजी काहीतरी सापडलेले, खटकलेले, भिडलेले लिहायला फक्त प्रतिभेची कमतरता म्हणुन आपण लिहीत नाही हे पटतच नाही.

स्वाती/केदार/पराग- सँपल साईज अपुरे आहे, आणि म्हणुन असे वाटते. इतके सरळ आहे ते हे पटत नाही. आणि हे समाजमन नाहीच हेही. We can agree to disagree.
अ‍ॅनफ्रॅन्कच्या डायरीत असे काय वेगळे होते? साध्या मुलीची साधी रोजनिशी, तिने जग का ढवळले? प्रामाणिक द्स्ताऐवज होता तो. ब्लॉग हे समाजमन नसते तर चीनमध्ये ब्लॉक केले असते का? मुक्त विचारधारा न मानणारे देश आहेत अजुन पृथ्वीवर.
तुम्ही आम्हीही एका कालखंडाचे साक्षीदार आहोतच की. २६/११ नंतर अक्षरश: कितीतरी लोकांचे अनुभव ब्लॉगवर आले. म्हणजे त्या घटनेचे ते पडसाद होते आणि समाजमनाचेही. घटना भिडायला ती आपत्तीच असावी लागते असे नाही.

असो. हेमाशेपो. चर्चा वाचते आहेच.

आर्क- अनुमोदन.

शर्मिला- खरंच काही ब्लॉगर्समध्ये खुप पोटेन्शियल आहे.

<<<प्रतिक्रिया देताना परखड वस्तुनिष्ठपणा दाखवणे वाचकाला जमले पाहिजे आणि क्रिटिसिझम योग्य त्या स्पिरीटने घेणे ब्लॉगरला जमले तरच तो पुढे जाऊ शकेल.>>>
हो ना नाहीतर माबोसारखा दर २-३ महिन्यांनी 'कंपूशाही' चा गजर चालू होतो!

साहित्यिक मूल्य असण्याची काय व्याख्या आहे ते मला माहिती नाही,पण जे काही अस्सल आणि प्रामाणिक असेल ते कितिही वैयक्तिक असले तरी बहुतेक वेळा उच्च दर्जाचे असते.ब्लॉग्सवरील लिखाणाला साहित्यिक मूल्य आहे की नाही, ते लिहिणार्‍यांना किती प्रतिभा आहे हे मुद्दे दुय्यम आहेत.मूळ मुद्दा हा आहे की आपल्याला आलेला अनुभव, मुरवून,चिंतन करुन, त्यावर प्रक्रिया करुन, आपल्या पद्धतीने (कुणाचीही नक्कल न करता); थोडक्यात म्हणजे त्यावर जरा कष्ट घेउन मांडण्याची तयारी असेल तर असे लिखाण उत्तम असण्याची शक्यता वाढते.

<<ब्लॉगर्समधे गेल्या काही महिन्यांमधे पेन्शनर्स लिखाणाचा सुळसुळाट झाला आहे.........पण हा ब्लॉगर्सचा एक वेगळा, स्वतंत्र प्रकार आहे आणि त्यांचा वाचकही वेगळाच रहाणार. यामुळे तरुण, उत्साही ब्लॉगर्सनी आपला ब्लॉगिंगचा उत्साह गमावता कामा नये. लिहित रहायला हवे.>>
मी स्वतः "पेन्शनर्स" या संज्ञेत मोडतो म्हणून दुखावून हा प्रतिसाद देत आहे असा समज करून घेऊन
कॄपया हे वाचू नये. पण ब्लॉग हा "पब्लीक प्लॅटफॉर्म" आहे व दृष्टीकोनांची विविधता हा त्याचा अत्मा आहे हे
मान्य केल्यावर त्यांत वय, जात, शिक्षण इ. कोणताही निकष लावून ब्लॉग्सच्या एखाद्या संपूर्ण वर्गावरच असा शिक्का मारणे घातक ठरेल. एका ठराविक वयानंतर आत्मकेंद्रीत, "नोस्टॅल्जिक" होण्याकडे माणसाचा साधारणतः कल असतो, हे मान्य करूनही म्हणून त्यांचे सर्वच ब्लॉग्स 'लिखाणाचा सुळसुळाट " या सदरात टाकणं व त्यापासून "तरूण, उत्साही ब्लॉगर्स"नी दूर रहावं असं सुचवणं हे ब्लॉगिंगच्या संकल्पनेच्याच मुळावर घाव घालण्यासारखं आहे, असं मला प्रामणिकपणे वाटतं.

आय अ‍ॅम रिअली सॉरी भाऊ! लिहिण्याच्या ओघात अशी इन्सेन्सिटिव्ह टर्म वापरली गेली त्याबद्दल खरंच सॉरी. लिहित रहायलाच हवं या आग्रहामधे सर्व वयोगटांचे स्वागत व्हायला हवय हे शंभर टक्के मान्य.

>>म्हणावं की. पण त्यावर उपाय १. ------ २. ------- ३. -------- एकूण सकारात्मक काही करावं.<<
म्हणणारे म्हणण्यापलिकडे हे बाकीचं सकारात्मक करतच नाही असं थोडंच आहे स्वाती?

>>त्यामुळे त्या ब्लॉगरांचं अनुभवविश्व जितकं समृद्ध / तोकडं असेल, त्याप्रमाणे लेखनविषय किंवा अभिव्यक्त करण्याच्या पद्धती त्यांच्या ब्लॉगांवर आढळतील.<<
हे बरोबरच की. वरती माझ्या खरडण्यात जी कारणं लिहिलेयत त्यात हा एक मुद्दा आहेच की.

दर्जाबद्दल नी किंवा रैनाला विचार<<
सिंडे दिवा दिलायस तरीही. माझा मुद्दा दर्जाचा नाही.

>>अरे यार कुठे प्रत्येक लिखाणाचा साहित्यिक कीस काढत बसता? पटलं तर वाचा नाही सोडा की! प्रत्येक ब्लॉग मध्ये वैविध्य अन मुल्य बिल्य असावेच का? ब्लॉग काढण्याची सुविधा आहे, काढला ब्लॉग. इतके सोपे आहे ते, ब्लॉगच का काढले, त्यांचे सामाजिक, वैचारिक, साहित्यिक मुल्य हा चर्चा फुकाचा आहेत. <<
प्रत्येक ब्लॉगचा मुद्दा नाहीये हा. एकुणात प्रमाणाबद्दल म्हणणं आहे. आणि हो साहित्यिक मूल्य ही फार दूरची गोष्ट आहे. ती काही जणांनाच झेपते. माझ्यासारख्याला तर नाहीच झेपत.
थोडं चौकटीच्या बाहेरचं, थोडं नेहमीच्या पेक्षा वेगळं, नवीन अनुभव असं काही असावं अशी अपेक्षा करणं यात काय फुकाचं आहे?

>>जालावर मराठी लिहीले म्हणजे मराठी टिकेल. ईंटरनेटवर मराठी लिहीणे म्हणजे मराठी वाचवणे का? लोकही काहीही लिहीतात.<<
टिकेल की नाही माहित नाही. इंटरनेटवर त्याच त्या प्रकारचे (वरती माझ्या मूळ खरडाखरडीत एक यादी दिलीये याच्यासाठी) दळण घालणे म्हणजे मराठी टिकवणे निश्चितच नव्हे.
मुळात मी मराठी भाषेसाठी काहीतरी करायचं म्हणून ब्लॉग लिहितो/ एकुणातच लिहितो यासारखं भंपक वाक्य नाही.
पण तरीही कुठलाही निर्बंध नसणारं (व्यावसायिक गणितांपासून प्रकाशकाचा चॉइस यापर्यंत) आणि तरीही खूप लोकांपर्यंत पोचण्याची सहजपणे पोचण्याची ताकद असलेलं असं लिखाणाचं हे माध्यम म्हणून ब्लॉग हा प्रकार प्रस्थापित होताना/ झालेला असताना त्यातून वैविध्याची, सकसतेची, नाविन्याची अपेक्षा करणं हे too early म्हणू शकता पण चुकीचं तर मुळीच नाही.

<<लिहिण्याच्या ओघात अशी इन्सेन्सिटिव्ह टर्म वापरली गेली त्याबद्दल खरंच सॉरी.>> शर्मिलाजी, उभयपक्षीं व्यक्तीगत असं यात कांहीच नाही . चर्चा होणं, हे महत्वाचं. त्या ओघात असं कांही क्वचित होणं हे अपरिहार्य आहे. तुमचा खुलेपणा भावला. धन्यवाद.

>>माझा मुद्दा दर्जाचा नाही.

मग कसला आहे?
बर लोकान्नो ज्यान्ना साहित्तिक वगैरे लिवता येत त्यांनीच लिवा -म्हंजे हे लोक
बाकीच्यान्नी लिवूच नगा
नाय्तर यांचा कोप हुतो हितं

मग कसला आहे?<<
ते स्पष्ट केलंय. ते जर कळत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे.

>>बर लोकान्नो ज्यान्ना साहित्तिक वगैरे लिवता येत त्यांनीच लिवा -म्हंजे हे लोक
बाकीच्यान्नी लिवूच नगा
नाय्तर यांचा कोप हुतो हितं<<
या वाक्यांना उगाच काड्या घालणे, बाष्कळ बडबड, व्यवस्थित चाललेल्या चर्चेत आगी लावायचा प्रयत्न करणे अश्या सगळ्या शीर्षकांखाली गणता येईल.

तुम्हाला हि व्यवस्थित चाललेली चर्चा वाटत असेल तर तुम्हि स्वताची फसवणूक करुन घेताहात.
तुम्हाला अस वाटत कि ब्लोग वर लिहाव ते (तुम्हाला मान्य असलेल्या) दर्जानुसारच.
चिनुकस ने बरोबरच म्हटलय की मुळात ब्लॉगाला साहित्यिक मूल्य असलंच पाहिजे, असं काही आहे का?
पन तुम्हाला ते मान्य नाहि अस दिसतय
लोकान्नि नाहि दर्जा सांभाळला तर तुम्च काय गेलं? आवडलं नाहि तर वाचु नका

तुम्हाला अस वाटत कि ब्लोग वर लिहाव ते (तुम्हाला मान्य असलेल्या) दर्जानुसारच.<<
दत्तात्रय, तुम्हाला दिसत नाही? कि समजत नाही? कि समजून न घेता मुद्दामून फालतू वाद घालायचेत?
दर्जाचा मुद्दा नाही हे मी किमान ५ वेळा तरी लिहिले असेन.ते वाचा. मी काय म्हणतेय ते समजून घ्यायचा प्रयत्न करा जमल्यास.

चिनुकस ने बरोबरच म्हटलय की मुळात ब्लॉगाला साहित्यिक मूल्य असलंच पाहिजे, असं काही आहे का?
पन तुम्हाला ते मान्य नाहि अस दिसतय<<
"साहित्यिक मूल्य ही फार दूरची गोष्ट आहे. थोडं चौकटीच्या बाहेरचं, थोडं नेहमीच्या पेक्षा वेगळं, नवीन अनुभव असं काही असावं अशी अपेक्षा करणं यात काय फुकाचं आहे?" हे मीच वरती लिहिलंय. ते अर्थातच तुम्ही वाचलेलं नसणार.
आणि चिनूक्सने म्हणलेलं ही काळ्या दगडावरची रेघ आहे असं कुठे वाचलेलं आठवत नाही मला. त्याचंही ते म्हणणं नसणारे. तेव्हा त्याला मान्य असलेली प्रत्येक गोष्ट मला मान्य असेलच असं नाही. आणि ती मान्य नसणे यात काही जगबुडी नाहीये.

>>लोकान्नि नाहि दर्जा सांभाळला तर तुम्च काय गेलं? आवडलं नाहि तर वाचु नका<<
परत एकदा शेवटचं सांगते. मी किंवा कुणीच काय वाचावं आणि वाचल्यावर त्या गोष्टीबद्दल कुणाला काय वाटावं आणि त्याने काय प्रतिक्रिया द्यावी याबद्दल मला किंवा कुणालाच तुम्ही किंवा कुणीच सांगू नये.

तेव्हा आता फालतूपणा बास करा. हो आणि तुम्ही जे करताय त्याला फालतूपणा हा फारच सभ्य शब्द आहे.

या चर्चेत जरा विषयांतर करतेय्..कुणाच्या बाजूने बोलतेय काय माहीत..तुम्हीच निष्कर्ष काढा.
मी एक इंग्रजी ब्लॉग सुरु केला होता..अगदी डायरी लिहावी तसा. पेनाने लिहिण्यापेक्षा टाइप करणे सोपे जाते म्हणून Happy त्याला सहित्यिक मुल्य, दर्जा वगैरे काही असावे/असू शकते/असण्याची अपेक्षा आहे हेच मला माहीत नव्हते. पण मी जे लिहिते आहे, ते कुणी वाचावे अशीही काही अपेक्षा नव्हती. मी कुणालाही त्याच्या लिंक्स दिल्या नाहीत, अगदी घरच्यांनाही. पण काही चुकून वाट भटकलेल्यांना तो ब्लॉग बर्यापैकी आवडला Happy
आता त्या ब्लॉगकडून जर का कुणी अपेक्षा ठेवल्या तर माझी काय चूक? मी अगदी खरोखर फक्त काही प्रसंग, गोष्टी, भावना document व्हाव्यात, म्हणून तो लिहिला होता.. माझी ही document करण्याची गरज संपली नी मी तो ब्लॉग बंद केला..
असेच अजूनही अनेक ब्लॉगर्स असतील म्हणून उदाहरणा दाखल हे लिहिलंय, बाकी माझं काही मत नाही या विषयावर Happy

<<असेच अजूनही अनेक ब्लॉगर्स असतील म्हणून उदाहरणा दाखल हे लिहिलंय >> माझं उददाहरणही
असंच आहे. मला व्यंगचित्रं काढायची खूप आवड आहे व त्या अनुषंगाने कल्पनाही सुचत. मी स्केचबुक म्हणूनच एक ब्लॉग [ईंग्लीश] उघडून त्यांत एमएस ऑफीसच्या "पेंट"मध्ये काढलेली व्यंगचित्रं टाकत असे.
व्यंगचित्रांच शतक झाल्यावर मी ते स्केचबुक बंद केलं. मी प्रशिक्षीत किंवा व्यावसायिक व्यंगचित्रकार नसल्याने, सराव रहाणे व कांही अभिप्राय मिळालेच तर आपली कला सुधारण्यास मदत होईल, एव्हढाच मर्यादित हेतू होता. त्यातला निर्भेळ आनंद अर्थात वेगळा सांगायला नकोच !

..

एक फूल, साहित्यिक मूल्य, दर्जा ह्या गोष्टी आपल्या लेखनात असल्या पाहिजेत असं ठरवून कुणीच लिहायला सुरुवात करित नाही.आपल्या मनात जे आहे ते प्रगट करण्याची इच्छा, यापलिकडे लेखन करायला अजून काही लागतं असं मला वाटत नाही. तुम्ही लिहिलय त्यात मुल्य,दर्जा आहे का नाही हे ठरवण्याची जबाबदारी वाचकाची असते, आणि तो ते त्याच्या पात्रतेप्रमाणे ठरवतो. आपल्याला चांगलं म्हणणार्‍या लोकांचा दर्जा काय आहे हा प्रश्न उरतोच आणि आंतरजालावर हे कळणे नक्कीच अवघड असते. अमिताभ मागे एका मुलाखतीत म्हणाला होता.'माझ्या वडीलांची लोकप्रियता ही माझ्या लोकप्रियतेपेक्षा नक्कीच जास्त उच्च प्रतीची आहे, कारण ती जास्त जाणकार लोकांची दाद आहे.'

मुळात कुणाला लिंक द्या न द्या. ब्लॉग हा सार्वजनिक ठिकाणी वाचायला ठेवलेला असतो. आपल्या दैनंदिन आणि खाजगी डायरीसारखा कुलूपबंद नसतो. तेव्हा वाचकाचा प्रतिसाद हा भाग त्यात येणारच. आणि आमच्यासारखे तोंडफाटके वाचक केवळ लिहिलंय म्हणून कौतुक करणार नाहीतच. पर्याय नाही.

..

<<आपल्या मनात जे आहे ते प्रगट करण्याची इच्छा, यापलिकडे लेखन करायला अजून काही लागतं असं मला वाटत नाही. >> या विधानाला एक पुस्ती जोडणं आवश्यक वाटतं. जोपर्यंत केवळ अभिव्यक्तीच्या आनंदापुरतंच आपण लिहीतो, तोपर्यंत हे ठीक आहे. पण आपला विचार, दॄष्टीकोन पडताळणीसाठी लोकांपुढे ठेवण्याचा मानस असेल, तर तो सुस्पष्ट व परिणामकपणे सादर करणे व
त्यासाठी भाषेच्या व मांडणीच्या किमान अपेक्षा पूर्‍या करणे, हे ओघानेच आलं असं मला वाटतं.

माहितीपुर्ण लेख?
या लेखात नक्की माहितीपुर्ण काय आहे? बाकीच्या ब्लॉगर्सपेक्षा मी कस वेगळ आणि वेगळ्या दृष्टिकोनातुन लिहतेय या मेळाव्याबद्दल ते ....की ...मेळाव्यातले ब्लॉगर्स कसे बेशिस्त वागले ते ....की .... घासुनघासुन गुळगुळीत झालेला कॉपीराइटचा मुद्दा... की.... आजुबाजुला बसलेल्यांची कूपमंडूक प्रतिक्रिया... की.... मराठीपणाच्या कक्षांबाबतचे पुरातन रडगाणे?

बर ... ब्लॉग लिखाणाच्या दर्जाबद्दल लेखिकेला आक्षेप दिसत नाहिये ही चांगली गोष्ट पण त्यांचा आक्षेप लिखाणात वैविध्य नसण्याला आहे... पण हाही मुद्दा फारसा पटत नाही!
आता याच लेखात उल्लेख झालेले काही ब्लॉग्स बघा.... वर लेखिकेने रिक्षा फिरवलेले २ ब्लॉग्स. म्हणजे झुलेलाल (एखादा प्रश्न, समस्या, नवी वाटचाल, एखादा तिढा असं काहीतरी नेहमीच्या चक्कीपेक्षा वेगळं, काहीतरी खूप महत्वाचं आणि आपल्या आयुष्यांशी अप्रत्यक्षपणे का होईना निगडीत असणारं प्रामाणिक लिखाण) आणि मधुकर (भामरागडबद्दल, त्याच्या भाषेबद्दल, तिथल्या चालीरितींबद्दल). . लेखिकेचा स्वताचा ब्लॉग.... कांचन कराई सुरु करत असलेला कॉपीराइट संदर्भात माहितीचा गठ्ठा प्रकारचा ब्लॉग.... ऋयाम यांनी रिक्षा फिरवलेले ३ ब्लॉग्स.... पाटील यांचा चित्राचा ब्लॉग.... बस्के यांनी उल्लेख केलेले आणि त्यांचा स्वताचा ब्लॉग... शर्मिला यांचा ब्लॉग.... रैना यांनी उल्लेख केलेला आजोबांच्या अनुभवांचा ब्लॉग....
आता इथल्या इथेच एव्हढे वैविध्य मग पुर्ण मायाजालावर ते किती असेल.....
कस आहे ना की "लिहणार्‍याचे हात हजारो.... अपुरे माझे वाचन" असे झालेय आपले!
आणि हे ब्लॉग्स इतके विखुरलेल्या स्वरुपात असतात की ते सगळे फॉलो करण अशक्यच बाब.

पराग आणि सिंडरेला.... तुमचे बहुतांश मुद्दे पटतात
शर्मिला फडके तुमची पोस्ट ही खुपच मुद्देसुद आणि परफेक्ट आहे!

रैना म्हणतात तसे जर ५% च ब्लॉग वाचणेबल असतील तर हेही नसे थोडके! नाहीतरी नियमितपणे आपली वाचायची क्षमता अशी किती असते.... महाराष्ट्रात रोज शेकड्याने पेपर निघतात पण एखादादुसरा मटा, लोकसत्ता किंवा सकाळ पुरतो ना आपल्याला Happy

स्वाती आंबोळे,
>>म्हणोनि काय कवणे चालोचि नये?
व्हेरी वेल सेड Happy

Pages