तीन वर्ष झाली असावीत त्या गोष्टीला. जपानमधून सुट्टीसाठी पुण्यात आलेला मिहीर म्हणाला, 'बिझनेस सुरू करायचा आहे.'
'अरे वा ! कसला ?'
'हॉटेल !'
आता हॉटेल हे उत्तर ऐकून आश्चर्य वाटल नाही आणि वाटलं पण.
आश्चर्य वाटल नाही कारण माझ्या माहितीच्या पन्नास टक्के मंडळींच्या मनात कधी ना कधी हॉटेल सुरू करण्याची सुप्त इच्छा आहे. अगदी माझ्या सुद्धा.
आश्चर्य वाटलं, कारण मिहीरला ते खरच सुरू करायच होतं. मिहीर पुण्यातल्या एका आयटी कंपनीतला ऑनसाईट जपानी भाषातज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापक. आमच्या मायबोलीवरच्या ट्रेकिंग ग्रुपचा धडाडीचा सदस्य. तसा त्याचा हॉटेल व्यवसायाशी काही संबंध नव्हता.
'कशा प्रकारचे हॉटेल ?'
'जपानी पद्धतीचे speciality restaurant'
सुट्टीवरून मिहीर जपानला परत गेला, आणि तसे हॉटेल कसे चालवतात याचा अनुभव घ्यायला नोकरी सांभाळून तिथे कामही करू लागला. मध्ये एकदा परत आला, परत गेला, जागेचा शोध वगैरे सुरू झाला. पण असे तळ्यात मळ्यात करत राहिला तर प्रकल्प काही पुढे सरकेल असे दिसेना तेंव्हा धाडस करून मार्च ०९ मध्ये नोकरी सोडून पुण्यात सर्ववेळ हॉटेलच्या मागे लागला.
speciality restaurant चा बिझनेस प्लॅन तयार झाला, पण त्यासाठी मोठे भांडवल लागेल असे लक्षात आले. इनव्हेस्टर काही मिळेना. हॉटेल व्यवसायाचा अनुभव नव्हता हेही एक कारण असेल.
दोनतीन महिने असेच शोधात गेले, आणि आधी काहीतरी छोटे हॉटेल चालवून बघू, मग काही काळाने speciality restaurant कडे वळू असा त्याने निर्णय घेतला.
एका मिसळ जॉईंटची franchise घेण्याचे ठरवले, पुन्हा जागेचा शोध, अपा बळवंत चौकाजवळ एक छान जागा भाड्याने मिळाली. उत्साहाने सगळे काम सुरू झाले. पण अचानक ज्या सोसायटीमध्ये ते शॉप होते, त्या सोसायटीने हरकत घेतली. दुकान सोडावे लागले, आर्थिक नुकसानही झाले.
पुन्हा जागेचा शोध, व्हेज्-नॉनव्हेज हॉटेल काढावे का अशी कल्पना, ढोले पाटील रोडला एक जागा मिळाली, तिथे सोसायटीची हॉटेलला हरकत नव्हती पण नॉनव्हेजला हरकत होती. पुनश्च हरी ओम.
एक कोल्हापुरी हॉटेल franchise सारख्या तत्वावर चालवायला मिळाले, ते दोन महिने चालवलेही पण स्वतःचे हॉटेल हवे ही कल्पना काही स्वस्थ बसू देत नव्हती.
या सगळ्या काळात व्यवसायातले काही माहितगार साथीदारही मिळाले, त्यांच्यासह बिर्याणी स्पेशल चेन चा थोडा मोठा प्लॅन ठरला. सेंट्रल किचन, पाच सहा आउटलेट्स वगैरे. त्या दृष्टीने सगळी जुळवाजुळव झाली, बेळगाव, हैदराबाद.. अजून कुठुन खानसामे, टेस्टिंग झाले पण आयत्या वेळी इन्व्हेस्टर मागे हटले.
या सगळ्या प्रयत्नांमध्ये एक वर्षाहून अधिक काळ गेला होता. जवळच्या पूंजीलाही ओहोटी लागली होती.
पण मिहीर आणि साथीदारांनी कंबर कसली, आकुर्डी एमायडीसीमध्ये थरमॅक्सच्या बाजूलाच एक चांगली जागा मिळाली आणि अक्षरशः बत्तीस दिवसात त्या जागेचा कायापालट करून 'लई भारी, कोल्हापुरी ' हे हॉटेल शनिवार, ८ मे रोजी चालू झाले. लगेच रविवारी जवळजवळ तब्बल तीनशे ग्राहकांनी गर्दी करून पसंतीची पावती तर दिलीच, पण एक जोरदार सुरूवात करून दिली.
असा प्रतिसाद आणि उत्तम दर्जा व चव बघता मिहीरचे हॉटेल बघता बघता मोठी भरारी घेईल यात शंका नाही. मिहीरला शुभेच्छा.
वरची वाटचाल आपण पाहिली तर या एक वर्षाहून अधिक काळात मिहीरला परिस्थिती, अडचणी, कदाचित अननुभवातून झालेल्या काही चुका यांचाही सामना करायला लागला, पण त्यातून मार्ग काढत, धीर न सोडता, माघार न घेता तो काम करत राहिला आणि मिहीरचे हॉटेल उभे तर राहिलेच पण दणक्यात चालूही लागले.
उद्योग करू इच्छिणारे अनेक मित्र, मैत्रिणी संपर्क साधत असतात, कुणी एक अडचण आली तरी मागे फिरतात, तर कुणाला काही अडचण तर येणार नाही ना याची आधीच खात्री हवी असते. अशा सगळ्यांनीच घेण्यासारखा जिद्द आणि चिकाटीचा एक धडा मिहीरच्या हॉटेलने दिला आहे. पुन्हा एकदा अभिनंदन.
टीपः मराठी उद्योजक या ग्रूपमधला हा सार्वजनिक मजकूर आहे. या व्यतिरिक्त ग्रूपमधे इतर अनेक धागे आहेत जे फक्त सभासदांपूरते मर्यादित आहेत. http://www.maayboli.com/node/13459 या पानावर मराठी उद्योजक ग्रूपचे सभासद होण्यासंबंधी माहिती आहे.)
एक जीटीजी ठरवा खरच तिकडे >>>
एक जीटीजी ठरवा खरच तिकडे >>> GS मी पण तेच म्हणतो... प्रत्यक्षात भेटून पोटभरून शुभेच्छा देऊया...
बर, जीएस, मला एक सान्गा की मायबोलीचा टीशर्ट घालून गेल्यावर एक वाटी रस्सा एक्स्ट्रॉ किन्वा दोन पीस जास्तीचे अस्ली काही स्किम आहे का त्याची??? >>> लिंबू सोबत कांदा फ्री असेल रे... :p
आत्ताच माझ्या ऑफिसमधले चार जण
आत्ताच माझ्या ऑफिसमधले चार जण जेवणाच्या वेळेत तिथे जाऊन जेवुन आले.. सगळ्यांना तिथल्या जेवणाची चव खूप आवडली... तेव्हा आता लवकरच भेट द्यावी असं वाटतय...
जीएस तू खरच खूप छान लिहीले
जीएस तू खरच खूप छान लिहीले आहेस. प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपने लिहीली आहेस,"लै भारी". बद्दल तुला धन्यवाद; आणि दादाला खुप खुप शुभेछा.
झकासराव अनुमोदन पण लवकर करुया
झकासराव अनुमोदन पण लवकर करुया राव
एक जीटीजी ठरवा खरच तिकडे ,मी
एक जीटीजी ठरवा खरच तिकडे ,मी पण तेच म्हणतो... प्रत्यक्षात भेटून पोटभरून शुभेच्छा देऊया...
व्वा !! आता इकडे एक चक्कर
व्वा !! आता इकडे एक चक्कर होणारच लवकर. माझ्या घराच्या अगदी जवळ आहे हे हॉटेल.
मिहिरला शुभेच्छा. जमेल तितकी पब्लीसीटी नक्की करणार ह्या हॉटेलची.
हार्दिक
हार्दिक शुभेचा...............! पुन्यात आल्या वर नक्की येइन
अरे हे आजच वाचनात आलं. आम्ही
अरे हे आजच वाचनात आलं. आम्ही आपलं जपानच्या बीबीवर सायबरमिहीर केव्हा येईल याची वाट बघतोय.
मिहीरचं मनापासून अभिनंदन व भविष्यासाठी शुभेच्छाही.
आम्हीही उत्तरांचलमधल्या जोशीमठ या ठिकाणी हॉटेल काढायचं सगळं प्लॅनिंग केलं होतं, पण तो प्लॅन फक्त कागदावरच राहिला.
अरे मिहीर! माहितच नव्हतं!
अरे मिहीर! माहितच नव्हतं! अभिनंदन आणि देशात आलो की नक्की येतो हाटेलात
लयलय शुभेच्छा!!!!
Pages