बेस्ट ऑफ सारेगमप

Submitted by Adm on 24 April, 2010 - 13:46

पुन्हा एकदा सारेगमप !!!! Happy
मराठी सारेगमप चं पुढचं पर्व सोमवार दिनांक २६ एप्रिल पासून होतय. ह्या पर्वात आधीच्या १८-३० वयोगटांच्या पर्वातले अंतिम फेरीत गेलेले (विजेते नाही) स्पर्धक सहभागी होणार आहेत. होस्ट परत एकदा पल्ल्वी जोशी. अवधूत गुप्ते परिक्षक आणि मान्यवर परिक्षक दर आठवड्याला बदलणार आहे. स्पर्धक पुढील प्रमाणे :
१. राहूल सक्सेना
२. अनिरुध्द जोशी
३. मंगेश बोरगावकर
४. ज्ञानेश्वर मेश्राम
५. आनंदी जोशी
६. सायली ओक
७. अपुर्वा गज्जला
८. विजय गटलेवार
९. अनिकेत सराफ
१०. संहिता चांदोरकर

हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल चर्चा करण्यासाठी....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो कलरचे सेटिंग असते की संचाला, मिनिमम वर ठेवायचे, पाहिजे तर ब्राइटनेस पण कमी करायचा. डिजिटल आयचा ऑप्शन असेल तर तो ऑन केला तर रात्रीच्या वेळी अगदी काळाकुट्ट पडदा दिसतो, मग टीव्हीचा रेडिओ होईल.

अनिरुध्द जोशी, अपूर्वा गज्जला आणि राहूल सक्सेना मेगा फायनलला गेले..
ह्या पर्वाच्या हेतुनुसार परप्रांतियच जिंकणार ह्यावेळी.. Happy

त्यांना परप्रांतीय का म्हणावे? त्यांचा जन्म महाराष्ट्रातला नाहीए का? फार तर अमराठी किंवा मराठी मातृभाषा नसलेले असे म्हणता येईल.

बाप्रे...........कालची पल्लवीची साडी खरंच बोहारिणीकडून आणलेली होती. चुरगाळलेली, निर्‍याही नीट केलेल्या नव्हत्या. आणि मॅचिंग तर? कप्पाळ!
क्रीम कलरच्या साडीवर लाल वगैरे फुलं होती. आणि ब्लाऊज ? हिरवं झबलं! ट्रान्सपरंट बाहीचं.

मी काल पुर्ण वेळ त्या क्रीम कलरच्या, लाल काठाच्या साडीवर हिरवा रंग शोधत होते.. मॅचिंग Wink

अन्नु कपुर आणि पल्लवी तर फक्त एकमेकांची स्तुती करत होते.. ते स्पर्धक आणि त्यांची गाणी राहिली बाजुलाच.

तिकडे महाअंतिम फेरी चाललीय
आणि इकडे कुणाला एकही पोस्ट टाकावीशी वाटत नाही

यातच या कार्यक्रमाचे अभूतपूर्व असे अपयश आहे.

अवनी Happy

आमच्याकडे बाहेरच्या खोलीत सारेगमपची महाअंतिम फेरी सुरु आहे आणि मी बोअर झाल्यामुळे माबो वर टीपी करतेय.. यातच माबोचं यश आहे. Wink Proud

जिंकला का अनिरुध्द ?? गूड ! एकतरी डिसर्व्हिंग विनर मिळाला..
राहूल सक्सेनाला न जिंकवल्याबद्दल झी मराठीचे अभिनंदन..

अनिरुद्धचे घोडे अखेर न्हाले गंगेत्...आधी सह्याद्रीच्या स्पर्धेत पण तो फायनल मधे गेला होता....तिथे फक्त परीक्षकंच्या गुणांवरच अंतिम विजेता निवडला होता.
सारेगमप मधे त्याच्यासमोर वैशाली भैसने माडे होती ना? ती अनडिझर्व्हिंग?

राहूल सक्सेनाला न जिंकवल्याबद्दल झी मराठीचे अभिनंदन..

खरंच अभिनंदन!!

दीपांजली | 2 August, 2010 - 00:55
जिंकला ना अनिरुध्द ?
थोडक्यात निदान छोट्या उप पर्वा मधे तरी डिझर्विंग लोक जिंकतात हे ही नसे थोडके

प्रतिसाद पराग | 2 August, 2010 - 05:10
जिंकला का अनिरुध्द ?? गूड ! एकतरी डिसर्व्हिंग विनर मिळाला..
राहूल सक्सेनाला न जिंकवल्याबद्दल झी मराठीचे अभिनंदन..

दोघांचं एकमत????????? हे काय वाचतेय मी???? Proud

Light 1 घ्या हो दोघांनी. Happy

अनिरुद्ध जिंकला??? अपूर्वामध्ये खूपच सुधारणा झाली होती, मला वाटत होतं तीच जिंकेल. अनिरुद्ध मला नाही आवडत इतका. त्याने नवीन गाण्यांची वाईट वाट लावली होती काही काही, पण समस भरपूर होते त्याला.

पराग, का रे राहुलवर राग तुझा? मस्त गातो की. आणि पोलाईटही आहे.

पूनम, सारेगमप वर्ल्ड चॅलेंजला जायला मराठीमध्ये काही स्पर्धा नाही म्हणे म्हणून राहूल सक्सेना मराठी सारेगमपला आला अशी ऐकीव बातमी... खरंखोटं माहित नसलं तरी उगाचंच मनातून उतरला.

असे बरेच 'म्हणे' आहेत... प्रत्यक्षात भेटू तेव्हा बोलूच. Happy

अनिरुद्ध जिंकला! Uhoh
राहुल जास्त चांगला गायक आहे, सेनेचा रोष (श की ष ?) टाळण्यासाठी त्याला कटवलं हे माझं मत!

मस्त >>>> म्हणजे अबाव्ह अ‍ॅव्हरेज.. Happy अवधूत आणि सलिल ने मागच्या पर्वात ज्या काही स्पर्धकांना डोक्यावर चढवलं होतं त्यातला एक... पोलाईट मला नाही वाटला काधी तो.. उलट त्याची (आणि त्या चेल्लमची पण) बॉडी लँग्वेज मला खटकली नेहमीच.. "आम्ही लै भारी" असा एकंदर अविर्भाव आहे असं वाटायचं...
मागच्या पर्वात तो पडळकर आणि अजून एक कॉलबॅक मधून आलेला मुलगा हे राहूल पेक्षा कसे काय कमी होते हे मला कळलं नाही. त्यात काही "मान्यवर" परिक्षकांनी "मराठी नसूनही कित्त्ती छान मराठी उच्चार आहेत नै" करत जास्त मार्क्स / बेस्ट परफॉर्मर दिले... आता मराठी सारेगमप मधे मराठी उच्चार चांगले आहेत ह्यात क्रेडीट काय ??? नसतील मराठी उच्चार चांगले तर नका येऊ... !!
अनिरुध्द मागच्या पर्वात क्लासिकल बेस गाणी छान गायचा पण यंदा त्याने इतर सगळ्याच प्रकाराची गाणी बर्‍यापैकी चांगली गायली. ह्या सगळ्यामुळे अनिरुध्द जिंकला आणि राहूल सक्सेना जिंकला नाही ते बरच झालं असं मला वाटतं. रच्याकने अपूर्वाने काही काही गाणी उत्तम गायली. ती जिंकली असती तर एकवेळ चाललं असतं आणि ती पोलाईट पण आहे.. Happy

काल अपूर्वाने गायलेले " पांडुरंग नामी लागलासे ध्यास " जे गाणे म्हंटले ते ओरिजिनल कोणाच्या आवाजात आहे ? क्लास गाणं आहे . अपूर्वाने ते गायचा प्रयत्न चांगला केला . Happy

उत्तर सापडले , बेला शेंडेने गायलंय . अल्बम - पंढरीचा स्वामी .

भ्रमर, गाण्यावर बोलून झाल्यानंतरच बाकी बाबतीत बोललोय मी आणि पराग. असो. संपलेच आहे हे पर्व, माझ्याकडून इथे लेखनसीमा.

राहुल, अपूर्वा अपघातात जखमी

झी मराठीवरील सारेगमपच्या अलीकडेच संपलेल्या पर्वाचे उपविजेते अपूर्वा गज्जला आणि राहुल सक्सेना यांच्या गाडीला आज पहाटे जालन्याजवळ भीषण अपघात झाला. कार-ट्रकच्या धडकेत अपूर्वाच्या डोक्याला जबर मार लागला असून तिची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत औरंगाबादचे साउंड रेकॉर्डिस्ट उदय दंताळे यांच्यावर काळाने झडप घातली आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6570136.cms

आज अपूर्वा गज्जला झी-मराठीवरच्या 'हप्ता बंद' या कार्यक्रमात आली आहे. त्या भीषण अपघातानंतर पुढे नक्की काय झाले, काहीच कळत नव्हते. एका कार्यक्रमात राहुल सक्सेना म्हणाला होता की आपण आता तिच्यासाठी केवळ प्रार्थनाच करू शकतो. ते ऐकून तर मनाला आणखी चुटपूट लागली होती.. अपूर्वा बरी व्हावी असे खूप मनापासून वाटायचे.. आज तिला कार्यक्रमात बघून खरंच खूप आनंद झाला.

Pages