बेस्ट ऑफ सारेगमप

Submitted by Adm on 24 April, 2010 - 13:46

पुन्हा एकदा सारेगमप !!!! Happy
मराठी सारेगमप चं पुढचं पर्व सोमवार दिनांक २६ एप्रिल पासून होतय. ह्या पर्वात आधीच्या १८-३० वयोगटांच्या पर्वातले अंतिम फेरीत गेलेले (विजेते नाही) स्पर्धक सहभागी होणार आहेत. होस्ट परत एकदा पल्ल्वी जोशी. अवधूत गुप्ते परिक्षक आणि मान्यवर परिक्षक दर आठवड्याला बदलणार आहे. स्पर्धक पुढील प्रमाणे :
१. राहूल सक्सेना
२. अनिरुध्द जोशी
३. मंगेश बोरगावकर
४. ज्ञानेश्वर मेश्राम
५. आनंदी जोशी
६. सायली ओक
७. अपुर्वा गज्जला
८. विजय गटलेवार
९. अनिकेत सराफ
१०. संहिता चांदोरकर

हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल चर्चा करण्यासाठी....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनस्मी... मला वाटलं आता(तरी) झी सुधारलं असेल.. Wink

मंजू.. Proud

रच्याकने, सोमवार, मंगळवार मिळून अनिरुध्दा जोशी सगळ्यात चांगला गायल.. मंगेशने पण वेगळ्या प्रकारची गाणी म्हंटली... गज्जला सोमवारी गंडली, मंगळवारी खूपच सुधारली.. बाकीची गाणी विशेष ऐकली नाहित किंवा फारशी उल्लेखनीय नव्हती..

" सायली ओकच्या तारखा झी ला मिळाल्या नसतील"
का ती इतकी व्यस्त कशाने?

सुसिक्षित बेकार सारखा आणखी एक शब्द शोधा...रिअलिटि शोज जिंकुनही काम न मिळाल्याने बेकार झालेल्या लोकांसाठी

अभिजीत सावंत, आणि त्या नंतरचे सगळे आयडॉल्स. या सगळ्या गायकांना(?) आता कुणी गायला बोलवत नाही, पण सूत्रसंचलनाला कसे बोलवतात?
त्यापेक्षा मियांग चँग बरा, निदान यशराज फिल्म्स मधे तरी त्याला ब्रेक मिळाला.

शिळ्या कढीला ऊत आणणे म्हणजे काय तर बेस्ट (?) ऑफ सारेगमप,

अनिकेत सराफ साठी कुणीच दोन मिनिटे का उभे राहत नाही..अर्र टायपत नाहीए?
मागे मी लोकसत्ता मधे सारेगमच्या संवाद लेखकाचे मनोगत/मुलाखत वाचले होते.
तो म्हणे पल्लवी साठी संवाद लिहून देतो. हे पर्व पाहून मला वाटले की तो स्पर्धकांना पण संवाद लिहून देतो का? आठवा अनिरुद्ध जोशीने सांगितलेला त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी आलेल्या फोनवर बोलण्याचा किस्सा(आणि त्यातले मधले पल्लवीचे प्रॉंप्टिंग) सोमवारी अनिकेत सराफने किती अभिमानाने आनि मोहरलेल्या आवाजात सांगितले की एका मरणासन्न व्यक्तीला त्याने गाणी ऐकवली आणि दुसर्‍या दिवशी ते गेले की हो. हे सांगितल्याच्या दुसर्‍या दिवशी अनिकेत पण गेला(स्पर्धेबाहेर)

भरत, .. दुसर्‍या दिवशी अनिकेत पण गेला ( स्पर्धेबाहेर ) .. सही !
पूनम,
साडेनवाला ई टीव्ही वर "वॉव" आहे. बघ, आवडतय का !

मी एलिमिनेशनचा भाग आवडीने बघते Proud
काल अहोआश्चर्यम् म्हणजे मेश्रामसाहेब गेले की बाहेर! (कॉलबॅक आहे ना? :))

तेज, थँक्स- 'वॉव'बद्दल. काल तेच पाहिलं, मस्त आहे, आवडला तो शो.

हुश्श्श् मेश्राममाऊली गेल्या स्पर्धेबाहेर (एकदाच्या ;))!
कालचा बेस्ट परफॉमन्स होता तो मान्यवर पाहुण्यांचा.. अतिशय छान तुकडे वाजवले त्यांनी तबल्यावर.. मजा आली! Happy

वॉव म्हणजे भाऊजी होस्ट आहेत तोच शो का?

ते सारेगमप गेलं खड्ड्यात. कोण आलं कोण गेलं याच्याशी मला काडिचंही कर्तव्य नाही, पण मी ठरवलंय हे इथलं रोज न चुकता वाचायचं, झक्कास टीपी होतोय.

हो मी त्या वॉव च्या पहिला एपिसोड १० मि पाहीला होता.. कोणी तरी तीन प्रतिथयश (?) नायिका आलेल्या.. मराठी शो ला न शोभणारे कपडे घालुन.. Uhoh

आता तु "मस्त" म्हणतेच आहेस तर परत बघण्याचा प्रयत्न करेन! Happy

मंगेश बोरगावकरची गच्छंती झाली काल! Uhoh

मी फक्त शेवटची ५ मि बघितल सो गाणी कशी झाली नाही माहीत..

आता ५ स्पर्धक उरलेत..
राहूल सक्सेना
आनंदी जोशी
अपुर्वा गज्जला
विजय गटलेवार
अनिरुध्द जोशी(?)

कोणी बघत नाहीये वाटतं सारेगमप ? Happy म्हणा मी सुद्धा काल ४ - ५ आठवड्यांनंतरच पाहिले . अनुराधा पौडवालने सोमवारी " रजनीगंधा जीवनी या " हे गाणे खरंच म्हंटले की लिपसिंक केले ? माझ्या आवडत्या गाण्यांपैकी ते एक असल्याने मी फार उत्सुकतेने बघितले , तर माझा तरी हिरमोड झाला . कोणाचा काय अनुभव ?
कालच्या भागात अनिरुद्धच्या गाण्याने डोळ्यात पाणी येण्याएव्हढे काही सुंदर गाणे झाले नाही , असं माझं प्रामाणिक मत . Happy
राहूल छान गातोय , आनंदी अजून का आहे ? Sad विजय गटलेवार कधीतरीच बरं गातो , मंगेश बोरगांवकर ऐवजी त्याला काढले असते तर बरे झाले असते . Happy अपूर्वा ठीक गातेय , संहिता आता मात्र डोक्यात जातेय . Happy

अगदी सहमत संपदा!मलाही अनुराधा लिपसिंक करतेय अस वाटतच होतं! हा अनुभव तिच्या दोन्ही गाण्यांबाबत आला! बाकी....
>>>>>>कालच्या भागात अनिरुद्धच्या गाण्याने डोळ्यात पाणी येण्याएव्हढे काही सुंदर गाणे झाले नाही , असं माझं प्रामाणिक मत .
राहूल छान गातोय , आनंदी अजून का आहे ? विजय गटलेवार कधीतरीच बरं गातो , मंगेश बोरगांवकर ऐवजी त्याला काढले असते तर बरे झाले असते . अपूर्वा ठीक गातेय , संहिता आता मात्र डोक्यात जातेय . >>>>>>>>>>
सेम.......

कालच्या भागात अनिरुद्धच्या गाण्याने डोळ्यात पाणी येण्याएव्हढे काही सुंदर गाणे झाले नाही , असं माझं प्रामाणिक मत . >>>> चालालयच संपदा... इथे नाही का कविता, ललितं वाचून लोकांच्या डोळयात टचकन पाणी येत.. तसच ते.. Wink

अनुराधा पौडवालची गाणी इथली चर्चा वाचून परत पाहिली.. मला नाही वाटलं लिपसिंक वगैरे केलेलं..
रच्याकने मंगळवारच्या भागातली तीनही ड्युएट्स मस्त झाली एकदम.. अनिरुध्द आणि अपूर्वाच तर एकदम भारी..

आनंदीने दोन्ही आठवड्यांमधली गाणी छान गायली.. खूप खुल्या आवाजात..

राहूल छान गातोय , >>>> तो नाही गायला छान तरी त्याला डोक्यावर घेणारच !! हिम्या म्हणला मागे तसं हे पर्व त्याच्यासाठीच आहे.. अनुराधा पौडवालने पण "अमराठी असून कित्त्ती छान मराठी.. " छाप कमेंट्स दिल्याच.. ! त्याच्या आणि गटलेवारपेक्षा मंगेश आणि सायली ओक हवे होते...

अनुराधा पौडवालने पण "अमराठी असून कित्त्ती छान मराठी.. " छाप कमेंट्स दिल्याच.. ! >>> असं नाय काय, तिचे पूर्ण वाक्य - 'नॉन-मराठी लोकांना मराठी वर्ड्स प्रोनांउंस करायला फार डिफीकल्ट जातं,पण तू फार छान गायलास' असं शुद्ध मराठीत होतं Proud

मी पाहिलेल्या भागांत तरी राहुल परीक्षकांच्या टिप्पणीवर 'धन्यवाद' असे उत्तरतो. बहुतेक सगळे थँक्यु चा जप करतात. नुसते ऐकून मान डोलवली तर काय बिघडते?
टीव्ही हे दृक श्राव्य माध्यम आहे ना?

त्या पल्लवीची सोमवारची साडी अगदीच कैच्याकै होती. मान्य आहे मॅचिंग आज्जिबात म्हणजे आज्जिबातच नाही करायचय.....पण तरी काही तरी चॉईस? कसला घाणेरडा पिवळा रंग त्या साडीचा आणि त्यावर शाळेच्या कार्यक्रमात मुख्य पाहुण्यांच्या शर्टावर लावतात तशी कसली तरी फुलं आणि तीही कुठीही कशीही लावलेली! आणि त्या पिवळ्या रंगाच्या साडीवर आडव्या काळ्या पट्ट्या. आधीच ती आडवी...आपली पल्लवी हो..........त्यात त्या पट्ट्या आडव्या! आणि ब्लाउजचा आणि साडीचा तर अर्थाअर्थी काहीच संबंध नसतोच कधीच!

अगं हो प्राची.........ते शाळेत कापडी बॅज लावतात ना पाहुण्यांच्या शर्टवर तसली फुलं साडीवर. मी तर तिचं चर्वितचर्वण सुरू झालं की म्यूट करते.

Pages