बेस्ट ऑफ सारेगमप

Submitted by Adm on 24 April, 2010 - 13:46

पुन्हा एकदा सारेगमप !!!! Happy
मराठी सारेगमप चं पुढचं पर्व सोमवार दिनांक २६ एप्रिल पासून होतय. ह्या पर्वात आधीच्या १८-३० वयोगटांच्या पर्वातले अंतिम फेरीत गेलेले (विजेते नाही) स्पर्धक सहभागी होणार आहेत. होस्ट परत एकदा पल्ल्वी जोशी. अवधूत गुप्ते परिक्षक आणि मान्यवर परिक्षक दर आठवड्याला बदलणार आहे. स्पर्धक पुढील प्रमाणे :
१. राहूल सक्सेना
२. अनिरुध्द जोशी
३. मंगेश बोरगावकर
४. ज्ञानेश्वर मेश्राम
५. आनंदी जोशी
६. सायली ओक
७. अपुर्वा गज्जला
८. विजय गटलेवार
९. अनिकेत सराफ
१०. संहिता चांदोरकर

हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल चर्चा करण्यासाठी....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला काय माहित. मी नाही बाई बघत ते सारेगमप. तरीच म्हटलं पल्लवी त्याला असं काय म्हणाली? Proud
तीच ती गाणी आणि त्याच त्याच पाचकळ कमेंट्स. आज काल मॅचिंगचा फंडाच गेलाय जणु, कश्यावरही काहीही घाला आणि म्हणा पजो फॅशन आहे.

आहेच का हे परत Sad
सायली ओक चांगली गाते. अ. जोशी तोच ना जो फायनल ला गेला आणि एकदम जिंकल्यासारखाच समजत होता स्वतःला.

सायली ओकनं जिंकायला हवं हे पर्व. कधी तरी झी-ने कुठल्यातरी स्पर्धेत फेअर डिसीजन दिलेला बघायला मिळो.

सायली ओकमध्ये तेव्हा तरी आत्मविश्वास अजिबात नव्हता , आवाज उत्तम असूनही काहीवेळा उगाच चोरटे गायची . आतातरी काही फरक पडलाय का हे बघायला हवे . Happy

आनंदी जोशी - झक्कास ! हे माझे आवडते परफॉर्मंसेस -
http://www.youtube.com/watch?v=qiSq0APucz4&feature=related
http://www.youtube.com/watch?v=RCM6vcl9YIs&feature=related

मंगेश बोरगांवकरमध्ये स्टाईल आहे , पुन्हा बघायला छान वाटेल . हल्ली त्याच्या अल्बम रीलीझ नंतर सॉलिड फॉर्ममध्ये दिसतोय . Happy

राहुल , अपूर्वा , संहिता , नो कमेंट्स . Happy फार लवकर परत आलेत .

अनिकेत सराफ - मी हा एकच परफॉर्मंस पाहिलाय . काही खास वाटला नाही .
http://www.youtube.com/watch?v=L3PEdg_3imc

विजय गटलेवारबद्दल पूनमला अनुमोदन . Happy

ज्ञानेश्वर मेश्राम की जय !

फारच छान गायली सायली (यमक जुळल).
पल्लवी खुपच जाड वाटत होति आणि नेहमीचा उत्साह पण वाटला नाही तिच्यात.

पल्लवी ची साडी आणि ब्लाऊज यांचे combi बेक्कार होते. Angry

बाकी सारेगमप बद्दल : गाईन गीत मी तेच जुने, जे रसिकांना न आवडे......

अपूर्वा, राहुल किंवा सायली ओक यांपैकी कोणीही शेवटपर्यंत पोचले तर मी शेवटाचा भाग पाहीन. Proud

बाकीचे मला आठवत नाहीयत. काल कार्यक्रम बघत राहण्याचा अटोकाट प्रयत्न केला.
तो असफल ठरला. Biggrin

माननीय परिक्षकांनी यन्ट्रीपासूनच फटकेबाजी सुरू केलीय. वा!

निंबुडा LOL!

पल्लवी ची साडी आणि ब्लाऊज यांचे combi बेक्कार होते>>> ते कधी चांगले असते ते सांगा बघू आधी..

कोण आहे तिचा ड्रेस डिझायनर???

या आधीच्या का कुठल्यातरी पर्वामध्ये पंजाबी ड्रेस घालत होती पल्लवी. तेव्हाचे combi बरे होते. साड्या छान असतात. पण ब्लाऊज लय बेक्कार . (विषयांतरः कुणी रेणुका शहाणे चं "याला जीवन ऐसे नाव" पाहतं का? त्यात पण रेणुका जाडी ढोल दिसते. आणि कोपरापर्यंत आलेले commedy ब्लाऊज . )

विषयांतरः कुणी रेणुका शहाणे चं "याला जीवन ऐसे नाव" पाहतं का? त्यात पण रेणुका जाडी ढोल दिसते. आणि कोपरापर्यंत आलेले commedy ब्लाऊज .>>>> ती बहुतेक अजून सुरभिच्या यशातून बाहेर आलेली नाहिये..

अगागा, ती पल्लवी जोशी दर पर्वात ठरवून आधीपेक्षा जाड होते राव! कस्ला ढब्बुकला फ्लॉवरपॉट वाटत होती! साडी अन ब्लाऊज दोन्ही बेक्कार! पहिल्याच एपिसोडला इतके 'सुंदर' कपडे पाहून डोळे दिपले बुवा..
आणि पहिल्याच एपिसोडला इतके महान वाद्यवृंद पाहून कान वाजले!! कुठे तो अमरओक-नीलेश-सत्या इत्यादींचा वाद्यवृंद, व कुठे हा! Uhoh मय्या मय्या तर मला बिचारी ती संहिता जरा तरी इमिटेट करण्याचा प्रयत्न करतीय, व इकडे वाद्यवृंद तबल्यावर भजनी ताल लावून बसल्यासारखे वाटले!! (नाही... आधीची सरच नाहीये! कशी ऐकायची गाणी..?)

चांगल्या गोष्टी: मंगेश बोरगावकर, अनिरूद्ध, ज्ञानेश्वर मेश्राम, सायली ओक.. थोडेसे राहुल सक्सेना व संहिता बरे आहेत.. बाकी अनुल्लेख!
(अनिकेत सराफचा आवाज इतका बायकी/नाकातला होता?आठवतच नाहीये!)

इकडे वाद्यवृंद तबल्यावर भजनी ताल लावून बसल्यासारखे वाटले!! (नाही... आधीची सरच नाहीये! कशी ऐकायची गाणी..?)
<<< अगदी अगदी मला तर त्या तबलेवाल्यचे वाजवणे बघून पु.लंच्या "रावसाहेबाचीच" आठवण झाली...
तबला वाजिवतय का मांडी खाजवतय रे आपलंच?

कुठे तो अमरओक-नीलेश-सत्या इत्यादींचा वाद्यवृंद, व कुठे हा! >> अरेच्च्या!! वाद्यवृंद बदलला?? बदलायचे ते लोक बदलत नाहीत आणि नको ते बदलतात. Uhoh

पुण्यवान माऊलींचं डायरेक्ट वर कनेक्शन आहे म्हणे !
अवधूतच्या मुखातून झीनी काय सांगितलं हे सूज्ञास सांगणे न लगे !
बिचार्‍याचा गुळाचा गणपती होणार बहुतेक.

>>>अनिकेत सराफचा आवाज इतका बायकी/नाकातला होता?आठवतच नाहीये!)<<< तेव्हाही आवडला नव्हता तो. तोच जावा पहिल्या फेरीत नाही तर लावतील नंबर आनंदीचा Sad
>>>बदलायचे ते लोक बदलत नाहीत आणि नको ते बदलतात.<<< अगदी Sad

ए कोणी कोणती गाणी गायली ते लिहा की.
वाद्यवृंद बदलला>> तेही बोर होऊन गेले बिचारे, आतातरी समजुन घ्या झीवाले Proud

राहूल सक्सेना - खेळ मांडला (सो), मंगळवारचं पाहिलं नाही
अनिरुध्द जोशी - या भवनातील गीत पुराणे (सो), मंगळवारचं पाहिलं नाही
मंगेश बोरगावकर - आठवत नाही
ज्ञानेश्वर मेश्राम - चाल राधे चाल चाल (सो), कोणता हा झेंडा (मं)
आनंदी जोशी - आठवत नाही
सायली ओक - मी मज हरपून बसले गं (सो), दिस चार झाले मन (मं)
अपुर्वा गज्जला - आठवत नाही
विजय गटलेवार - आठवत नाही
अनिकेत सराफ - (बहुतेक) हे सुरांनो चंद्र व्हा (सो)
संहिता चांदोरकर - माईयां माईया (सो), कांदे पोहे (मं)

सायली ओकचं लग्न ठरलंय आदित्य कल्याणपूरबरोबर.... www.adityatabla.com (फार्फार गोड आहेत दोघेही)

मला आठवलेली उरलेली गाणी :
राहुल सक्सेना : जोगवातील गोंधळ (लल्लाटी भंडार) (मं)
आनंदी जोशी : ? (सो) शुक्राची चांदणी (मं)
विजय गटलेवार: मन उधाण वार्‍याचे (सो) उदेश उमपचे कुठले तरी(शब्द नाही आठवत.) (मं)
अपुर्वा गज्जला : ? (सो) हुरहुर असते तीच उरी (मं)
अनिकेत सराफ : हे सुरांनो चंद्र व्हा(सो)? .. छे आठवत नाहीये.. (मं)
मंगेश बोरगावकर : राधा ही बावरी (सो) कुठल्यातरी पंजाबी चालीचे फास्ट शब्दांचे स्वप्नील बांदोडकरचे गाणे(मं)

काही अंदाज...

मान्यवर पाहुणे...
१> श्री. सलिल कुलकर्णी... (असलेच पाहिजेत - कारण नविन 'लिटील चॉम्प्'चि घोषणा झालेली आहे)
२> श्री. कौशल इनामदार... (मराठि 'अभिमान गीत'च्या गोष्टी सांगण्यासाठी, आणि आपण त्यावर 'जो. टा.' वाजवण्यासाठी)
३> सौ. पद्मजा फेणाणी जोगळेकर... ('मागच्या पेक्षा तुम्ही खरंच छान गायलात' हे वाक्य पुन: पुन्हा सांगण्यासाठी). सौ. आशा खाडिलकर येऊ शकणार नाहित - कारण त्या 'साम - गुरुकूल' वर परिक्षक म्हणुन हजर झालेल्या आहेत...
४> श्री. सुरेश वाडकर... (आलेच पाहिजेत, कसलाही आक्षेप नाही)
५> श्री. रविन्द्र साठे... (आलेच पाहिजेत, कसलाही आक्षेप नाही)
६> पं. विजय घाटे किंवा पं. सुरेश तळवलकर... (एक तरी 'तबला-नवाज' लागतोच)
७> मान. पोहनकर (नव्या पिढीचे दमदार 'फ्युजन संगित' पेशालिस्ट. सध्या ई-टी.व्ही. वर काही संगित कार्यक्रम नसल्यामुळे रिकामे आहेत).
८>झी. टॉकिज तर्फे येऊ घातलेल्या नव्या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक,कलाकार, तंत्रज्ञ... (कुणाला माहिती आहे का याबद्दल काही?)
९>'अनुबंध' या मराठी सिरीयलची शक्य तेवढी 'टीम'... (कारण 'सिरियल' पल्लवी जोशी आणी चिन्मय मंडलेकर यांची आहे. तेव्हा त्यांच्या साठी (किमान) 'एकदा जो. टा.' आपल्याला वाजवायच्या आहेत)
१०>अभिजीत कोसम्बी, वैशालि माडे आणि ऊर्मिला धनगर... (पुन्हा एकदा या 'प्लॅटफॉर्म'वर येऊन कसं वाटतय?... त्याच्यावर एकदा 'जो. टा'...)

एकुणात दहा स्पर्धक असल्या मुळे 'किमान दहा संभाव्य' लिहिलेले आहेत... कधीही आणि कसाही 'बदल' करण्याचे हक्क 'झी सारेगमप' जवळ आहेत...

फक्त एकच गोष्ट निश्चित आणि खात्रिची आहे... प्रत्येक वेळी आपल्याला किमान 'ए.जो. टा.' वाजवायच्या आहेत... तयारीला लागा...

फक्त एकच गोष्ट निश्चित आणि खात्रिची आहे... प्रत्येक वेळी आपल्याला किमान 'ए.जो. टा.' वाजवायच्या आहेत... तयारीला लागा...
>>> पर्फेक्ट Lol

वर आडमाने लिहिलंय ना- अपूर्वा खूप कष्ट घेऊन गाते असं वाटतं- अनुमोदन. खेचत खेचत कशीबशी गाते.

परभणीचा प्रिन्स!!! म्हणजे कोण तर अनिकेत सराफ! आईगं! काय वाट्टॅल ते! Lol
हा आधी आणि मग सारेगमपची माऊली मेश्रामसाहेब आणि मग गटलेवार जावेत. काय एकसूरी गातात Angry मंगेश, राहुल आणि अनिरुद्ध बरे आहेत मुलांमध्ये.

सायली ओक जिंकलेली बघायला आवडेल. माडे पर्वात अनिरुद्ध जोशीला मध्येच घुसवून तिला बाद केली होती. नाहीतर सायली पानसे आणि ओक आणि माडे अशी खलास फायनल झाली असती!

Pages