बेस्ट ऑफ सारेगमप

Submitted by Adm on 24 April, 2010 - 13:46

पुन्हा एकदा सारेगमप !!!! Happy
मराठी सारेगमप चं पुढचं पर्व सोमवार दिनांक २६ एप्रिल पासून होतय. ह्या पर्वात आधीच्या १८-३० वयोगटांच्या पर्वातले अंतिम फेरीत गेलेले (विजेते नाही) स्पर्धक सहभागी होणार आहेत. होस्ट परत एकदा पल्ल्वी जोशी. अवधूत गुप्ते परिक्षक आणि मान्यवर परिक्षक दर आठवड्याला बदलणार आहे. स्पर्धक पुढील प्रमाणे :
१. राहूल सक्सेना
२. अनिरुध्द जोशी
३. मंगेश बोरगावकर
४. ज्ञानेश्वर मेश्राम
५. आनंदी जोशी
६. सायली ओक
७. अपुर्वा गज्जला
८. विजय गटलेवार
९. अनिकेत सराफ
१०. संहिता चांदोरकर

हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल चर्चा करण्यासाठी....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूनम तुला खूप सारे मोदक आणि त्यावर साजूक तुपाची धार पण Wink

मी पण आजकाल फक्त इंडियन आयडल बघते. धम्माल करतात सगळे मिळुन !

काल सारेगमपची सुरूवात पाहिली का? वैशाली सामंत परिक्षक होती. तिने भागाच्या सुरूवातीलाच जे गाणे गायले ते तिने संगीत दिलेल्या आगामी सिनेमाचे- 'जेता'चे होते. हे गाणे सिनेमात शंकर महादेवनने गायले आहे. रमेश देव प्रॉडक्शनचा हा सिनेमा आहे. तिने जे सांगितले नाही ते हे, की ह्या सिनेमात चार गाणी आहेत, आणि ती चारही वैभव जोशीने लिहिली आहेत Happy तेच ते- 'मखमली मनाचे' Proud Light 1

संहिता बेकारच गात होती. उत्तम निर्णय. समस अंतिम पाचाला असतील बहुधा.

पराग, अजून आयडॉलला ऑडीशन्सच दाखवत आहेत, आणि तसंही तो प्रोग्राम टिपी असतो रे, वेगळ्या बाफची गरज नाही त्याला Happy

पूनम,
कोंबडी पळाली, नवीन पोपट गाणार्‍या शिन्दे घराण्यातल्या आनन्द शिन्देचा मुलगा सिलेक्ट झालाय आयडॉल ला.

हो, मी पाहिला काल त्याचा भाग.. त्यांना आनंद शिंदे आणि कोंबडी ठाऊक आहे, ह्यानेच मला भरून वगैरे आलं Proud

इथले वाचुन काल सारेगामापा बघायचा प्रयत्न केला... 'तुझ्या माझ्या संसाराला' सुरू झाले आणि वाटले अरारारा.. हे बेस्ट ऑफ सारेगामा नाहीये तर वर्स्ट ऑफ सारेगामा आहे.... Sad परत तिकडे जाणे नको..

आनन्दी जोशी केवढी overact करते गाताना...आणि गाण सम्पल्यावर मात्र मख्ख चेहरा करुन उभी रहाते....

यंदाचा इ,न्डियन आयडॉल सेलेब्रिटी नातेवाईक स्पेशल करायला हरकत नाही
रविंद्र जैनचा नातू
आदेश श्रीवास्तवची पुतणी
आणि आनंद शिंदेह्चा मुल्गा.

आनंदी जायला पाहीजे पुढच्या वेळेस.. मला तिचे हातवारे अन उगीच हसणं फार डोक्यात जाते.. आय मिन गाते बरी.. आभास हा चांगलं झालं..
ज्ञानेश्वर मेश्राम एव्हढा आगाऊ वाटण्याइतपत कधी बदलला? मला आठवतंय त्या प्रमाणे आधीच्या पर्वात अगदी वेगळा होता तो.. गाण्यावर जास्त फोकस असलेला.. आता बर्‍याच अ‍ॅडीशन्स झाल्यात.. नाच, दंगा, ऑफीसवाईफ! वगैरे! Proud
ऑब्व्हियस कारणं नसतील तर तो ही जावा.. फार ठराविक साच्यात त्याचा आवाज चांगला वाटतो.. जसे ते लिंगोबाचा डोंगर.. (अनिकेतचा आवाज फारच नाजुक आहे खरंतर या गाण्यासाठी!)
संहिता अन गटलेवार मला या बाकिच्या लोकांपासून लांब कुठेतरी कोपर्‍यात बसल्यासारखे वाटतात.. फक्त एखादं गाणं चांगलं झालं असेल त्या दोघांचे.. गटलेवार चांगल्या न्हाव्याकडे का जात नाही बायदवे?? संहिता गेली ते बरंच झालं..

राहुल सक्सेना प्रचंड आवडू लागलाय मला! तो सगळी आवडती गाणी म्हणातो म्हणून असेल कदाचित! आणि अजय अतुलची गाणी म्हणावीत ती यानीच..हा सुद्धा अमराठी असून गज्जलाच्या मानानी , जास्त चांगली व मराठमोळी वाटतील अशी गाणी गातो.. (बायदवे, अवधुत गुप्ते काल काय म्हटला, "जीव रंगला"-जोगवा हे गाणं त्यानी आधी ऐकले नव्हते??? Uhoh त्याची काय खुन्नस सुरू झालीय का अजय अतुलबरोबर ? थोडासा रिझर्व्ह्डच कमेंट्स केल्या त्याने! Happy )
मंगेश बोरगावकर, अनिरूद्ध जोशी व राहूल सक्सेना यांच्यात फाईट व्हावी असं फार वाटतंय.. मुली नाही कोणी एव्ह्ढ्या छान यावेळेस.. सायली ओक आहे, पण तितकी नाही.

"गटलेवार चांगल्या न्हाव्याकडे का जात नाही बायदवे?? संहिता गेली ते बरंच झालं.. "
संहिता न्हाव्याकडे गेली?
राहुल सक्सेना बद्दल बस्के, अनुमोदन.
मराठीत पार्श्वगायन योग्य नवा (आगदी आजचा ) आवाज नाही का?
जोगवा मधली गणे गाण्यासाठी हरिहरन आणि श्रेया घोषाल लागले.(इथे मी प्रांतवाद्/अस्मिता वगैरे आणत नाहीये). मराठीतले नवे गायक गाण्यात कुणाला हार जाणार नाहीत, पण वैशाली माडे सोडली तर ध्वनिमुद्रिकेत्/चित्रपटात ऐकण्यासारखा आवाज कुठे आहे.
हृषिकेश रानडे हिंदीतल्या सारेगमच्या स्पर्धा जिंकला(एस एम एस च्या आधीच्या युगातली गोष्ट) अगदी...विविध स्पर्धांच्या विजेत्यांच्या स्पर्धा पण जिंकला..पण तिथे पण त्याचा आवाज पार्श्वगायन योग्य नाही असेच म्हटले गेले.

जरा ऑफ टॉपिक आहे बहुतेक, पण बरेच दिवसांपासून हा प्रश्न छळतोय. "मल्हारी वारी मोतियांनी द्यावी भरून" हे गाण कोणी म्हटलंय?? मला तो आवाज फार आवडतो!

मल्हारवारीची सुरुवात शाहीर साबळेंनी गायलीये आणि नंतर अर्थातच " अजय " अजय अतुल मधला . Happy सुंदर आवाज लागलाय त्याचा त्या गाण्यात . Happy

मराठीतले नवे गायक गाण्यात कुणाला हार जाणार नाहीत, पण वैशाली माडे सोडली तर ध्वनिमुद्रिकेत्/चित्रपटात ऐकण्यासारखा आवाज कुठे आहे.
हृषिकेश रानडे हिंदीतल्या सारेगमच्या स्पर्धा जिंकला(एस एम एस च्या आधीच्या युगातली गोष्ट) अगदी...विविध स्पर्धांच्या विजेत्यांच्या स्पर्धा पण जिंकला..पण तिथे पण त्याचा आवाज पार्श्वगायन योग्य नाही असेच म्हटले गेले.
<<< खरय.. राहुल सक्सेना या स्पर्धकान मधे बेस्ट आहे.
मराठी मधे वैशाली माडे बेस्ट आहे गायिकां मधे.. एकदम प्ले बेक आवाज.. सामंतांच्या वैशाली पेक्शा किती तरी जास्त चांगला.
मराठी गायकां मधे स्वप्नील बान्दोडकर चा आवाज एकदम हिरो मटेरियल आहे, मस्तं आहे.
अजय गोगावले चा आवाज लोकसंगीताला बेस्ट.
मला वाटतं राहुल वैद्य ला पण थोडी संधी द्यायला हवी म्हणजे मराठीतली सोनु स्टाइल्ची गाणी तो चांगली गाईल.
'आभास हा' त्याचच आहे ना?
पण तरीही शंकर महादेवन, सुनिधी, श्रेया ची मराठी गाणी या मराठी गायकां पेक्षा ऐकायला जास्त आवडतात हे पण तेवढच खरय.
सुख्विन्दर ची 'हो राजे' आणि ' घे सावरून' पण छान आहेत.

"गटलेवार चांगल्या न्हाव्याकडे का जात नाही बायदवे?? संहिता गेली ते बरंच झालं.. "
संहिता न्हाव्याकडे गेली? >>>> Lol

परवाची लोकगीतं बघितली.. संहिताचं कोळीगीत फारच फ्लॅट झालं होतं.. खर तर कोळी गीतं किती फुटटॅपींग असतात.. मला नाही आवडत इतका तो राहूल सक्सेना.. उगीच डोक्यावर चढवलेला वाटतो.. त्याच्या गाण्यात आणि एकूणच वागण्यात भयंकर अ‍ॅटिट्युड वाटतो.. आणि पल्लवी सारखं सारखं "तू मराठी नाहीस तरी कित्ती छान मराठी गाणी गातोस" म्हणते ते आणखीनच डोक्यात जातं.. !
सध्या मी फक्त मंगेश, अनिरुध्द, संहिता, आनंदी, सायली आणि अपूर्वा एव्हड्यांचीच गाणी बघतो.. !

<काडी मोड ऑन >
अ‍ॅटीट्युड? राहुल सक्सेना?? काहीतरी काय रे.. मला तर तो मॉडेस्ट वाटतो अगदी! बघू तसे दिसते (जशी आनंदी मला वाटते). तू जरा पुर्वग्रहदूषित डोळे धुवून ये बरं! Proud
<काडी मोड ऑफ>

पराग तू बस्के म्हणते तसे जरा डोळे धुऊन ये किंवा कमी नंबरचा चष्मा लाव बरं Proud
राहुल सक्सेना मला पण आवडतो.

गटलेवार चांगल्या न्हाव्याकडे का जात नाही बायदवे?? संहिता गेली ते बरंच झालं.. "
>>>> बस्के, अगं मला आधी खरच वाटलं की तिने केस वगैरे कापले म्हणून तू अशी कॉमेंट टाकलीस की काय Lol

अतुल चा आवाज लोकसंगीताला बेस्ट. >> डिजे, तुला अजय म्हणायच का? मस्त आहे त्याचा आवाज आणि 'खेळ मांडला' मध्ये त्याने लोकसंगीत सोडून तो सॉफ्ट गाणीही छान गातो हे दाखवून दिलय.

अजय सध्याच्या घडीच्या गायकांपैकी " द बेस्ट " आहे . Happy

कालचा एपिसोड आत्ता पाहिला . मंगेश बोरगांवकरने " काळी माती निळं पानी " सही म्हंटलं . स्टेज शोजमुळे तो अगदी तयार झालाय असं दिसत होतं . Happy स्टाईल मस्त आहे . Wink

राहुलने " जीव दंगला " छान म्हंटलं . त्याला गाताना बघितलं तर त्याला गाताना त्रास होतोय असं वाटत होतं , म्हणून मग एकदा फक्त ऐकलं , न बघता . ते जास्त चांगलं वाटलं . आनंदीबद्दल न बोलणे चांगले . Proud

मी कधीपासूनच म्हणतेय की राहुल चांगला गातो, पण पराग मला असं म्हटलं की तु क देतो, म्हणून मी आता जाहीरपणे म्हणत नाही, (विपूत म्हणते) Proud Light 1 मस्त आवाज आहे त्याचा, हाईप्डही नाहीये. (परागलाच का असं वाटतं कोण जाणे :अओ:)
मंगेशही मस्त गातोय, एक कॉन्फिडन्स आलाय त्याच्यात. अंतिम फेरीत हे दोघं हवेतच. यावेळी मुली काही खास नाहीत, त्यामुळे दरवेळी असतं ते चित्र बदलावं आणि मुलांची मेजॉरिटी असलेली फायनल व्हावी Happy

'अजय'चा आवाज मस्त आहे. आणि तो अगदी सिलेक्ट गाणी गातो- त्याच्या आवाजालाच सूट होतील अशी (रहमानसारखी). त्यामुळे ती गाणी अजून कोणी तशीच्यातशी गाऊच शकणार नाही असं वाटत रहातं

मराठीतले उगवते (हा काळ किती असतो, उगवण्याचा) संगीतकार का होताहेत? हृषिकेश कामेरकर, अजित परब , वैशाली सामंत...म्हणजे आव्हानात्मक गाणी मराठीत होत नाहीत, की ती गायला अमराठी गायकच लागतात? मराठी चित्रपटातली अलीकडची गाजलेली आणि जास्तकाळ(त्यातल्यात्यात) वाजलेली गाणी
सोनू निगम(नवरा माझा नवसाचा), शंकर महादेवन अशा आवाजात आहेत.
अरे हो बेला शेंडेचा पण आवाज छान आहे.

कालच्या एपिसोड मधे लिपस्टिक न बिघडवता गाणं सादर करता येतं (मग गाणं कसंही झालं तरी हरकत नाही) याचं उत्तम प्रात्यक्षीक 'आनंदी जोशी'ने सादर केलं....

याच्यावर 'ए. जो. टा. झा. पा.'... Happy

सायली ओक गेली ???? अरे अरे.. गट्लेवार, ज्ञानेश्वर मेश्राम आणि अनिकेत सराफ ला ठेऊन सायलीला का काढलं.. Uhoh

Pages