अजून एक निसर्गचित्र
२००९च्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने नचिकेताने पहिल्यांदा हातात सीरीयसली रंगपेटी घेतली. स्वाईन फ्ल्यूच्या साथीमुळे पुणं गप्पगार पडलं होतं, तेव्हा घरात नुसतंच खेळताना हा चाळा लागला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं हे पहिलं सीरीयस चित्र त्याने काढलं-
http://www.maayboli.com/node/10456
माझ्या दृष्टीने अगदीच फसलेलं हे चित्र (प्रपोर्शनच्या मानाने) मायबोलीच्या अनेकांनी उचलून घेतलं. मग सुरू केली चित्रकलेची शिकवणी. शिकवणीतही ताईने काढून दिलेली चित्रंच मुलं थोडी डार्क करून रंगवत आहेत. म्हणून त्याला स्वतंत्रपणे चित्र काढूनच मग रंगवायला प्रोत्साहन देत राहिलो. सुरूवातीला अर्थातच जमलं नाही. मग तो हौसेनी स्वतःच काढायला लागला. खूप भारी चित्र नाही जमलं तरी चालेल, पण मनात जे आहे, ते समजलंय त्याला आणि म्हणूनच उतरवायला येतंय आता. तो अजूनही 'डोंगर, नदी, सूर्य' यातच आहे पण कल्पना अजून स्पष्ट होत आहेत.
त्याला काही चित्रकार वगैरे बनवायचं ध्येय वगैरे नाहीये
एका जागी बसावा, थोडं कल्पनेत रमावं, रंगात बुडावं इतपतच विचार होता चित्रकलेच्या शिकवणीचा. त्याला आवड लागली आपोआपच ते बघून छान वाटतं, म्हणून हा सगळा प्रपंच. ज्यांनी ज्यांनी त्याला नकळत का होईना, प्रोत्साहन दिलं, त्या सर्वांना एक झलक दाखवायची होती, म्हणून हे चित्र-
सध्या सुट्टी सुरू झाल्यामुळे क्रिकेट जोरात चालू आहे. आमचा हा क्रिकेटपटू टोपी, बॅट, बॉल घेऊन सदैव तयार असा असतो
मस्त ! टोपीपण भारी आलीय
मस्त ! टोपीपण भारी आलीय
मस्तय!!
मस्तय!!
चित्र फारच मस्त!!! त्या
चित्र फारच मस्त!!! त्या 'प्रपोर्शन' वगैरे भानगडी ह्या आपल्या कल्पनाविस्ताराच्या सीमा!
झक्कास.....
झक्कास.....
अजून एक मस्त बातमी- हे चित्र
अजून एक मस्त बातमी- हे चित्र मी सकाळच्या बालमित्रमध्ये दिलं होतं, ते आज छापून आलंय पेपरात
सकाळी सकाळी नचिकेतालाच ते सर्वात आधी दिसलं, त्यामुळे जामच खुश आहे.
(ते येईल अशी अजिबात आशा नव्हती, कारण चित्रांचा गठ्ठा जो येतो तो मी पाहिलाय, आणि याआधीही दोनदा चित्र दिली होती, ती आली नव्हती
आणि आमच्यात वशीला लावणं तर दूरच, ढुंकून बघतही नाहीत :()
खूप मस्त वाटलं तुमचं प्रोत्साहन आणि कौतुक पाहून त्याला
प्रपोर्शनवरूनवगैरे नाही छळणार आता
अरे वा ! अभिनंदन नचिकेत. अगदी
अरे वा ! अभिनंदन नचिकेत. अगदी खुश असणार ना आज?
छान आलंय हे चित्र.
पूनम, मिल्या आणि नचिकेतचे
पूनम, मिल्या आणि नचिकेतचे अभिनंदन

बालमित्र बाजूला ठेवायला सांगते आईला
वा..मस्त आहे की चित्र...
वा..मस्त आहे की चित्र...
फार छान चित्र काढलय.मस्त
फार छान चित्र काढलय.मस्त एकदम. मुलीला पण दाखवल.
मुल कस विचार करतात हे लक्षात आल कि इतकी गंमत वाटत. अस वाटत कि अरेच्या हे आपल्याला का नाही सुचल. प्रपोर्शन वगैरे गोष्टी त्यांच्या द्र्ष्टीने त्या तशा का असतात याच रिझन असत त्यांच्याकडे.
मस्त काढलयं . कविता तुझ्या
मस्त काढलयं .
कविता तुझ्या सानुच्या लॉजिकला तर उत्तरच नाही. हल्लीच्या मुलांच इमॅजिनेशन इतकं भारी असतं की , त्याच्या आसपास पण आपण जाऊ शकत नाही .
छान काढलंय चित्र
छान काढलंय चित्र
अरे वा ! नचिकेतचं अभिनंदन
अरे वा ! नचिकेतचं अभिनंदन
सकाळमध्ये छापून आलंय...
सकाळमध्ये छापून आलंय... सहीच!! गो नचि गो
Pages