बेजबाबदार वृत्तपत्रे की श्रेय उपटण्याची वृत्ती

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

हे पोस्ट म्हणजे एखादा लेख नव्हे.
आज(२१.४.२०१०) लोकसत्ताच्या नागपूरच्या पत्रकार राखी चव्हाण बाईंनी लिहिलेल्या

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=639...

या बातमीमधे 'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक अरूण नलावडे असं छातीठोकपणे लिहिलेलं होतं. बहुतेक दिवसभर आलेल्या प्रतिक्रियांचा ओघ बघता एकही प्रतिक्रिया नेट एडिशनवर प्रसिद्ध न करता त्यांनी ती ओळच सरळ काढून टाकलेली आहे.
तस्मात छापील प्रतीमधे असलेल्या त्या ओळीसकटचा हा स्कॅन. वाचता यावी म्हणून ती ओळ मुद्दामून मोठी केली आहे.
loksatta-wrong-news.jpg

हे असं खोटं छापून येण्याची ही पहिली वेळ नाही.
'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक हे संदीप सावंतच होते. पटकथा आणि संवादही संदीप सावंत यांचेच होते.
अरूण नलावडे यांचा चित्रपटाच्या दिग्दर्शनाशी काहीही संबंध नाही. ते निर्माते आणि प्रमुख नट होते.
तरीही आजवर अनेकदा लोकसत्ताच नाही तर इतर विविध मोठ्या वृत्तपत्रांमधेही अतिशय सहजपणे दिग्दर्शकाच्या नावाच्या ठिकाणी अरूण नलावडे यांचेच नाव बिनदिक्कतपणे छापून आलेले आहे.

चित्रपटाच्या श्रेयनामावली मधे ही चूक नाही. नटमंडळी आणि तंत्रज्ञ(यापैकी मी एक) यांच्याही मनात दिग्दर्शक संदीप सावंतच याबद्दल संभ्रम नाही.

तरीही ही चूक अधूनमधून कोणी ना कोणी करत असतंच.

याला काय म्हणायचं?
नटालाच केवळ ग्रेट मानण्याच्या सामान्यांच्या वृत्तीतून पत्रकारही सुटले नाहीत असं मानायचं?
कि दिग्दर्शक आणि प्रमुख नट यात मोठा फरक असतो हेच या पत्रकारांना समजत नाहीये?
कि जाणूनबुजून नरो वा कुंजरो वा करत काही व्यक्तींकडून पत्रकारांची दिशाभूल केली जातेय?
कि लोकांची दिशाभूल करण्याचं काही व्यक्तींनी कंत्राटच दिलंय?

आणि चूक एकदा होते ठिके. परतपरत कशी काय होते? चूक झाल्यावर ती निदर्शनास आणून दिली तरीही त्यावर चुकीची दुरूस्ती होत नाही. सगळंच कॅज्युअली घेतलं जातं. यानंतर हेतूबद्दलच शंका यायला लागली तर चूक काय?

आजवर आम्ही (मी आणि संदीप सावंत) यासंदर्भात सार्वजनिकरित्या कधी बोललो नव्हतो. पण हा हेतुपुरस्सर वा हलगर्जीपणाने केला गेलेला माहितीचा प्रसार आता आमच्या नवीन कामासाठी त्रासदायक ठरतो आहे. त्यामुळे हे बोलण्याची गरज पडली आहे.

विषय: 
प्रकार: 

पिवळी टिकली म्हणजे काय? या वाक्प्रचाराचा अर्थ समजल्यास बरे होईल.. ४थी मिडल स्कूलच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात हा वाक्प्रचार नव्हता...

आपापसातले वाद मायबोलीवर कशाला? तुम्ही आणि लोकसत्ता पाहुन घ्या की....
---- अहो सत्यान्वेषी त्या सत्याचाच शोध घेत आहेत. ज्याच्या कामाचे श्रेय त्याला मिळायलाच हवे ह्या बद्दल दुमत नसावे. सर्वच व्यावसायात असे फुकटचे श्रेय लाटणारे लोकं आहेतच, त्या खोट्या लोकांचे बुरखे फाडण्या साठी मायबोलीचा आधार घेतला तर काही चुक होते आहे असे मला वाटत नाही.

प्रत्येकाला दैनंदीन जिवनात (व्यावसायत) असल्या खोट्यांशी सामना करावा लागतोच. वरिल चर्चेने वाचक थोडा तरी सावध बनेल, त्यातीलच काही लोकं सत्याचा पाठपुरावा घेण्यासाठी प्रेरणा घेतील...

मी तर "माझा श्वास" वाचण्यापुर्वी अरुण नलावडेंनाच श्वास चे दिग्दर्शक समजत होते. मला वाटते की जेव्हा "श्वास" रिलिज झाला तेव्हा interviews/news मध्ये त्यांनाच जास्त बघितले होते म्हणून असेल Sad
आताही "kites" चे दिग्दर्शक राकेश रोशन असे वाटत होते (कारण पुन्हा सगळीकडे दिग्दर्शक अनुराग बासु (?)सोडून तेच!)

चला पण या वेळेला तरी श्रेय मिळाले. नेहमी इतकी फाइट मारायची वेळ न येवो ही सदिच्छा!!

जाताजाता: पुणे मिरर फेम पेज थ्री जनतेकडून |(builders च्या बायका- पोरं,कुठल्याशा गुटक्याच्या जाहिरातीतल्या मॉडेल्स इ.इ. ) बाकी काही नाही तरी limelight मध्ये कसे राहावे हे मात्र जरुर शिकण्यासारखे आहे Lol
माबोच्या भाषेत दिवे घ्या बरं का!!

लोकसत्ताच्या इ-आवृत्तीमधे प्रतिक्रिया टाकली तेर ती पोस्ट होते का हे कळायला मार्ग नाही. पण त्यांना इ-मेल ने प्रतिक्रिया पाठवली तर ती वाचली जाते, दखल घेतली जाते हे मी अनुभवले आहे. कोणतेही संदर्भ/फॅक्टस न तपासता बातम्या छापण्याची खोड बोकाळत चाललीय हे नक्की. इंडियन एक्स्प्रेस दर दिवशी वाचकांनी दाखवलेल्या चुका प्रसिद्ध करते. लोकसत्ताने ही हे करावे म्हणुन सगळ्यांनी इ-मेल चा मारा करा.
सामना मधे तर वेब पेज वर प्रतिक्रिया नोंदवली तर पेज नॉट फाउंड येते आणि इमेलही परत येतो.
इमेल : pratikriya@expressindia.com विषय मधे लोकसत्ता आणि सदर्/बातमीचा उल्लेख करावा.

"उलट चूक लपवण्यासाठी चूक असलेलं वाक्य काढूनंच टाकलं?"

चूक लपवण्यासाठी की दुरुस्त करण्यासाठी? नॉट फेअर.

चूक लपवण्यासाठी की दुरुस्त करण्यासाठी? नॉट फेअर.<<
मे बी नॉट. चूक दुरूस्त करताना चूक झाली होती हे जाहीररित्या मान्यही करायला हवं जर चूक आणि दुरूस्ती जाहीर ठिकाणी होणार असेल तर. नाही का?
आणि दिलेली एकही प्रतिक्रिया उघड न होणं हे पण तसं गमतीशीरच नाही का?
हे जर फेअर तर लपवणं हा शब्दही फेअर. असो.

>>> लोकसत्ताच्या इ-आवृत्तीमधे प्रतिक्रिया टाकली तेर ती पोस्ट होते का हे कळायला मार्ग नाही. पण त्यांना इ-मेल ने प्रतिकिर्या पाठवली तर ती वाचली जात, दखल घेतली जाते हे मी अनुभवले आहे.

आपल्या मतांच्या विरूध्द मते असणारी ई-मेल लोकसत्ता प्रसिद्ध करत नाही. मी पुर्वी २-३ वेळा केतकरांनी आपल्या अग्रलेखात लिहिलेली मते खोडणारी ई-मेल्स पाठविली होती. आजतगायत ती प्रसिद्ध झालेली नाहीत.

मी पुर्वी २-३ वेळा केतकरांनी आपल्या अग्रलेखात लिहिलेली मते खोडणारी ई-मेल्स पाठविली होती. आजतगायत ती प्रसिद्ध झालेली नाहीत.
--- त्यांच्या मताशी सहमत, अग्रलेखाची स्तुती करणारी मेल पाठवा... म्हणजे ते किमान बघतात अथवा नाही हे तरी कळेल.

>>> --- त्यांच्या मताशी सहमत, अग्रलेखाची स्तुती करणारी मेल पाठवा... म्हणजे ते किमान बघतात अथवा नाही हे तरी कळेल.

ते ती नक्कीच बघतात. त्यांच्या एका अग्रलेखाशी सहमत होणारी ३-४ पत्रे त्यांनी छापली होती.

Pages