बेजबाबदार वृत्तपत्रे की श्रेय उपटण्याची वृत्ती

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

हे पोस्ट म्हणजे एखादा लेख नव्हे.
आज(२१.४.२०१०) लोकसत्ताच्या नागपूरच्या पत्रकार राखी चव्हाण बाईंनी लिहिलेल्या

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=639...

या बातमीमधे 'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक अरूण नलावडे असं छातीठोकपणे लिहिलेलं होतं. बहुतेक दिवसभर आलेल्या प्रतिक्रियांचा ओघ बघता एकही प्रतिक्रिया नेट एडिशनवर प्रसिद्ध न करता त्यांनी ती ओळच सरळ काढून टाकलेली आहे.
तस्मात छापील प्रतीमधे असलेल्या त्या ओळीसकटचा हा स्कॅन. वाचता यावी म्हणून ती ओळ मुद्दामून मोठी केली आहे.
loksatta-wrong-news.jpg

हे असं खोटं छापून येण्याची ही पहिली वेळ नाही.
'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक हे संदीप सावंतच होते. पटकथा आणि संवादही संदीप सावंत यांचेच होते.
अरूण नलावडे यांचा चित्रपटाच्या दिग्दर्शनाशी काहीही संबंध नाही. ते निर्माते आणि प्रमुख नट होते.
तरीही आजवर अनेकदा लोकसत्ताच नाही तर इतर विविध मोठ्या वृत्तपत्रांमधेही अतिशय सहजपणे दिग्दर्शकाच्या नावाच्या ठिकाणी अरूण नलावडे यांचेच नाव बिनदिक्कतपणे छापून आलेले आहे.

चित्रपटाच्या श्रेयनामावली मधे ही चूक नाही. नटमंडळी आणि तंत्रज्ञ(यापैकी मी एक) यांच्याही मनात दिग्दर्शक संदीप सावंतच याबद्दल संभ्रम नाही.

तरीही ही चूक अधूनमधून कोणी ना कोणी करत असतंच.

याला काय म्हणायचं?
नटालाच केवळ ग्रेट मानण्याच्या सामान्यांच्या वृत्तीतून पत्रकारही सुटले नाहीत असं मानायचं?
कि दिग्दर्शक आणि प्रमुख नट यात मोठा फरक असतो हेच या पत्रकारांना समजत नाहीये?
कि जाणूनबुजून नरो वा कुंजरो वा करत काही व्यक्तींकडून पत्रकारांची दिशाभूल केली जातेय?
कि लोकांची दिशाभूल करण्याचं काही व्यक्तींनी कंत्राटच दिलंय?

आणि चूक एकदा होते ठिके. परतपरत कशी काय होते? चूक झाल्यावर ती निदर्शनास आणून दिली तरीही त्यावर चुकीची दुरूस्ती होत नाही. सगळंच कॅज्युअली घेतलं जातं. यानंतर हेतूबद्दलच शंका यायला लागली तर चूक काय?

आजवर आम्ही (मी आणि संदीप सावंत) यासंदर्भात सार्वजनिकरित्या कधी बोललो नव्हतो. पण हा हेतुपुरस्सर वा हलगर्जीपणाने केला गेलेला माहितीचा प्रसार आता आमच्या नवीन कामासाठी त्रासदायक ठरतो आहे. त्यामुळे हे बोलण्याची गरज पडली आहे.

विषय: 
प्रकार: 

त्या बातमीच्या मॉडरेटरला आज भरपुर काम पडणार आहे.. भरपुर प्रतिक्रिया मॉडरेटरच्या अप्रुवलसाठी रांगेत आहेत Happy

प्रतिक्रिया दिल्यावर पॉपअप येतो ना, मॉडरेटरने बघितल्याशिवाय त्या प्रकाशित केल्या जाणार नाहीत म्हणुन.... आता मॉडरेटर कधी बघणार आणि त्यातल्या कितींना हिरवा कंदील दाखवणार हे जर तो खरेच अस्तित्वात असेल तर तोच बापडा जाणे...... बातमी प्रकाशित झाल्यानंतर आता सकाळी ११.३० पर्यंत तरी त्याला वेळ मिळाल्याचे दिसले नाही. एकही प्रतिक्रिया अजुन प्रकाशित झाली नाहीये.

चूक ही चूकच आहे, असते, असेल. दुरूस्ती झाली पाहिजे.
याला बेजबाबदारपणा म्हणायचे का, हा तपशीलाचा प्रश्न. तीच बाब 'हा श्रेय उपटण्याचा प्रकार आहे का' या प्रश्नासंबंधातही आहे. एकाचे उत्तर माध्यमे देऊ शकतात, दुसऱ्याचे उत्तर चित्रपटाशी संबंधित मंडळी देऊ शकतात.
ही चूक सातत्याने होत असल्याचे नीधप यांचे म्हणणे आहे. त्यानुसार त्यांना इतर शंका येणे स्वाभाविक आहे. पण, याला काय म्हणायचे, या प्रश्नाची असंख्य उत्तरे असू शकतात. 'या विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या-त्याच्या डोक्याएवढा' हेच त्याबाबत खरे असते.

आता मी 'श्वास’ फेम अरुण नलावडे यांचे अभिनंदन अशी प्रतिक्रिया दिली आहे. बघू ती छापतात का ? म्हणजे माझी आधीची श्वासचा दिग्दर्शक संदीप सावंत आहेत व नलावडे नाहीत ही न छापता फक्त वरचीच छापली तर लोकसत्ता किती पाण्यात आहे हे तरी कळेल .

नंदिनीला अनुमोदन.
आतापर्यंत जेवढ्यावेळा श्वास किंवा त्यासंबधित लिखाण वाचण्यात आलय त्या त्या वेळेस (काही अपवाद वगळता) अरुण नलावडेंचा उल्लेख दिग्दर्शक म्हणुन झाल्यावर ते सोयीस्कररीत्या गप्प बसलेत. अर्थात आयतंच श्रेय मिळतय तर का नाकारा हा ही छुपा उद्देश असू शकतोच.
पण हीच चूक जर सातत्याने होतेय किंवा केली जात असेल तर त्या त्या वेळेस आवाज उठवून चूक कबूल करायला भाग पाडणे महत्वाचे.
संदीप सावंत यांनी देखील स्वतः यात पुढाकार घ्यावाच.

किती राग येतो. पब्लिशर/ एडिटरशी बोलले पाहिजे त्यांनी चूक दुरुस्त केली पाहिजे. त्यात इ- चूक दीर्घकाळ तशीच राहू शकते. कागद नष्ट होउ शकतो.

वृत्तपत्राविरुद्ध, कार्यवाही करण्यात फारसा अर्थ नाही. (वेळखाऊ आणि खर्चाचे काम आहे.) त्यापेक्षा लवकरात लवकर खुलासा येईल, असे बघावे. (शिवाय पुढे प्रसिद्धीसाठी, वृत्त्पत्रेच कामाला येणार आहेत, हे विसरता येणार नाहि.)
राम, आणि नंदीनीला अनुमोदन.
संदीप प्रसिद्धीपासून, दूरच राहिले आहेत. या क्षेत्रात नखभर करुन हातभर सांगायची रित आहे.
ते जमणार नाही तूम्हाला, त्यापेक्षा संदीपने श्वास आणि इतर कामाबाबतचे, लेख लिहून प्रसिद्ध करावेत.

दिनेशदा, अनुमोदन! संपादकांकडून व संबंधित पत्रकाराकडून दिलगिरी तर हवीच, पण संदीप यांनीही आपल्या श्रेयासाठी व कार्याच्या ओळखीसाठी त्यांच्या कार्याची माहिती ठळकपणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न करायला हवेत!

>>>दुसरी महत्वाची गोष्ट जी मला श्वास च्या ऑस्कर वारी पासुन खुप जाणवली होती ती म्हणजे इतरांच्या तुलनेत संदीप प्रसिद्धी माध्यमांपासुन बरेच दुर रहातात..

हे पटतयं. कारण ऑस्करच्या वेळी आमच्याइथे "श्वास" चा फंड- रेजिंगसाठी एक स्पेशल प्रयोग झाला होता. तेव्हाही नलावडेच पुढे होते. भाषणही त्यांनीच केल होत. संदीप सावंत होते त्यावेळेस पण ते फारसे कोणाच्या लक्षातही आले नाही. नलावडेंनाच प्रसिद्धी जास्त मिळाली. कदाचित आपण नटाला पाहत असतो स्क्रीनवर सतत म्हणून असेल.

खरंतर याच कारणासाठी मी 'माझा श्वास' लिहायला घेतली होती. जेणेकरून संदीपचं काम लोकांसमोर यावं. पण ते राह्यलंच. असो.

आम्ही नाशिकला झालेला श्वास चा प्री रीलीज शो बघितला होता तेव्हा पण श्री नलावडे या चित्रपटाचे सर्वेसर्वा आहेत असे वाटत होते. पण तशीच प्रसिद्धी त्याना मिळेल असे वाटले नव्हते.

नी, माझा श्वास पूर्ण कर लवकर आणि जमल्यास मायबोली व्यतिरिक्त दुसरीकडेही publish कर.
आपल्या हक्काचं श्रेय आहे, ते का म्हणून गमवायचं?

मलाही ही बातमी वाचल्यावर धक्का बसला होता. इतक्या बेजबाबदारपणाचा निषेध. Angry

बाकी त्याखाली मॉडरेटरने अजूनही एकही कॉमेंट पब्लिश केलेली नाही यातच सर्वकाही आलं.

मॉडरेटर (किंवा कोणी तत्सम) ही व्यक्ती नक्कीच अस्तित्त्वात आहे. याचा मला आलेला अनुभव म्हणजे आत्ता काही दिवसांपूर्वीच एका लेखावर मी एक प्रतिक्रिया दिली होती.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=602...
ती लगेच पब्लिश झाली नाही पण थोड्या वेळाने झाली. (कारण त्यात काहीच न छापण्यायोग्य नव्हतं म्हणून छापली). म्हणजेच कुणीतरी 'छापायचं की नाही' हे ठरवणारी व्यक्ती असणार हे निश्चित.

नीधप,

त्यांनी बातमीत फेरफार केलेत बहुधा. सकाळी वाचली तेव्हा त्यात 'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक अरुण नलावडे असाच उल्लेख होता. पण आता तसा नाहीये.

ऑनलाईन प्रतीत बदल केला तरी छापील प्रतींचं काय हा प्रश्न उरतोच. (आणि कुणाच्याही प्रतिक्रिया प्रकाशित न करता गुपचुप बदल करून टाकलाय.)

राम आणि नंदिनी यांच्याशी सहमत. नी , या बाबत तुम्ही जरा अ‍ॅग्रेसिव्ह व्हायला हवं. तुम्हाला आणि संदिपना शुभेच्छा!

छापील मधलं स्कॅन करून आता टाकते सगळीकडे.
म्हणजे त्यांना चूक मान्य आहे पण नेटवर कबूल करायची नाहीये.

लिहायचं आणि मग संपादित करून पिवळी टिकली लावायच्या फ्याशनीतून ते पण सुटले नाहीत तर...

या सगळ्या प्रकाराचं - श्री सावंत यांना योग्य ती प्रसिद्धी न मिळणं, श्री नलावडेंसारख्या प्रतिथयश कलाकाराने पण प्रसिद्धीमाध्यमांना योग्य माहीती न देणं, लोकसत्तासारख्या वर्तमानपत्राने प्रतिक्रिया न छापणं - सखेद आश्चर्य वाटतं आहे. उद्याच्या प्रिंट एडिशनमध्ये जाहीर माफी मागतात का हे बघायचं. नी, तू उद्याचा पेपर बघशीलच पण आम्हाला ईथे नक्की सांग काय होतंय ते.

वरती बदल करून छापील आवृत्तीतला पुरावा स्कॅन करून ठेवलाय. उद्या काय होईल ते कळवतेच.

एक गोष्ट चांगली झाली पण निदान ऑनलाईन वरुन तरी काढून टाकलय.. बर्‍याच जणांनी चुकीच्या दुरूस्ती संदर्भात प्रतिक्रिया दिल्यामुळे झाले असेल कदाचित.. मी पण टाकली होती प्रतिक्रिया तिथे.. पण हे ही नसे थोडके..

सकाळी बातमी वाचली तेव्हा अडमा सारखा स्क्रीन शॉट घेऊन ठेवायला पाहिजे होता..

नीधप, तो लेख पूर्ण करून लोकसत्ता व इतर वृ. मधे छापून येणे हा चांगला उपाय दिसतो. त्यात शेवटी एक भागात ही अशी चुकीची माहिती असलेले लेख वगैरे यावरही लिहू शकशील.

श्वास दिग्दर्शनाच्या वेळी आलेले अनुभव - संदीप सावंत यांच्याशी दिलखुलास चर्चा (किंवा खुसखुशीत मुलाखत)

PR अगदीच म्हत्वाचे, वेगवेगळ्या मथळ्यांनी लेख आणावेत.

डुआय म्हणूनच खूप दुर्लक्ष करून झालेय त्यांच्याकडे.
आता नाही.
ह्या अश्या तथाकथित 'चुकां'मुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं कुणाचंतरी. आणि कुणाचातरी अकारण फायदा.

Pages