बेजबाबदार वृत्तपत्रे की श्रेय उपटण्याची वृत्ती

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

हे पोस्ट म्हणजे एखादा लेख नव्हे.
आज(२१.४.२०१०) लोकसत्ताच्या नागपूरच्या पत्रकार राखी चव्हाण बाईंनी लिहिलेल्या

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=639...

या बातमीमधे 'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक अरूण नलावडे असं छातीठोकपणे लिहिलेलं होतं. बहुतेक दिवसभर आलेल्या प्रतिक्रियांचा ओघ बघता एकही प्रतिक्रिया नेट एडिशनवर प्रसिद्ध न करता त्यांनी ती ओळच सरळ काढून टाकलेली आहे.
तस्मात छापील प्रतीमधे असलेल्या त्या ओळीसकटचा हा स्कॅन. वाचता यावी म्हणून ती ओळ मुद्दामून मोठी केली आहे.
loksatta-wrong-news.jpg

हे असं खोटं छापून येण्याची ही पहिली वेळ नाही.
'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक हे संदीप सावंतच होते. पटकथा आणि संवादही संदीप सावंत यांचेच होते.
अरूण नलावडे यांचा चित्रपटाच्या दिग्दर्शनाशी काहीही संबंध नाही. ते निर्माते आणि प्रमुख नट होते.
तरीही आजवर अनेकदा लोकसत्ताच नाही तर इतर विविध मोठ्या वृत्तपत्रांमधेही अतिशय सहजपणे दिग्दर्शकाच्या नावाच्या ठिकाणी अरूण नलावडे यांचेच नाव बिनदिक्कतपणे छापून आलेले आहे.

चित्रपटाच्या श्रेयनामावली मधे ही चूक नाही. नटमंडळी आणि तंत्रज्ञ(यापैकी मी एक) यांच्याही मनात दिग्दर्शक संदीप सावंतच याबद्दल संभ्रम नाही.

तरीही ही चूक अधूनमधून कोणी ना कोणी करत असतंच.

याला काय म्हणायचं?
नटालाच केवळ ग्रेट मानण्याच्या सामान्यांच्या वृत्तीतून पत्रकारही सुटले नाहीत असं मानायचं?
कि दिग्दर्शक आणि प्रमुख नट यात मोठा फरक असतो हेच या पत्रकारांना समजत नाहीये?
कि जाणूनबुजून नरो वा कुंजरो वा करत काही व्यक्तींकडून पत्रकारांची दिशाभूल केली जातेय?
कि लोकांची दिशाभूल करण्याचं काही व्यक्तींनी कंत्राटच दिलंय?

आणि चूक एकदा होते ठिके. परतपरत कशी काय होते? चूक झाल्यावर ती निदर्शनास आणून दिली तरीही त्यावर चुकीची दुरूस्ती होत नाही. सगळंच कॅज्युअली घेतलं जातं. यानंतर हेतूबद्दलच शंका यायला लागली तर चूक काय?

आजवर आम्ही (मी आणि संदीप सावंत) यासंदर्भात सार्वजनिकरित्या कधी बोललो नव्हतो. पण हा हेतुपुरस्सर वा हलगर्जीपणाने केला गेलेला माहितीचा प्रसार आता आमच्या नवीन कामासाठी त्रासदायक ठरतो आहे. त्यामुळे हे बोलण्याची गरज पडली आहे.

विषय: 
प्रकार: 

>>नी, ह्या अश्या चुका कित्तीतरी वेळा होतात लोस काय मटा काय सेमच >> छापिल चुका होऊ शकतात, पण चूक सुधारून दाखवणार्‍या इतक्या प्रतिक्रिया आल्यावर त्यांनी जाहीर माफी मागण्याचं सौजन्य दाखवायला हवं होतं (जे सकाळ या वृत्तपत्राकडे नक्कीच आहे.) आणि योग्य नाव छापून लेख पुन्हा प्रदर्शित करायला हवा होता. त्यांनी ते केलं नाही उलट चूक लपवण्यासाठी चूक असलेलं वाक्य काढूनंच टाकलं? Angry यावरून कळतेच की लोस ची पातळी काय आहे ती.
आज आपल्याला माहीत आहे श्वास च्या दिग्दर्शकाचं नाव, पण इतर अनेक बातम्यांत घातलेले घोळ आपल्याला कसे लक्षात येणार? Uhoh

१) असत्य दहा वेळा उगाळल की तेच सत्य भासायला लागत!
२) तसेच "छापिल ते सर्व सत्य (त्याशिवाय का छापुन आल?)" हा पन्नास पाऊणशे वर्षान्पूर्वीचा मापदन्ड अजुनहि तितक्याच अन्धश्रद्धेने ( Proud ) माणसे पाळतात!
हे दोन मुद्द्यांआधारेच पत्रकारीता सुरू अस्ते! (अस माझ मत)
तेव्हा वरील सारख्या घटना म्हणजे नवल नाही!
याव्यतिरिक्त, कॉस्ट सेव्हिन्गच्या नावाखाली जुनेजाणते अनुभवी लोक काढून टाकून, व "आधुनिक म्यानेजमेण्टचे शास्त्र" आधुनिक तन्त्रज्ञानासहित सरसकट ढोबळपणे वापरुन गेल्या जवळपास शम्भरवर्षान्ची वृत्तपत्रीय शिस्त खुन्टीला टान्गुन ठेवल्याने वरील प्रकारच्या कळत्/नकळतच्या चूका राहुन जातात.
पूर्वी व्रुत्तपत्रीय भाषा ही "मापदन्ड" या सदरात मोजली जायची, हल्लीची वाक्यरचना बघता हसाव की रडाव की दोन थोतरीत देऊन ठेवाव्यात या सम्भ्रमात पडायला होत!
असो.
नीधप, निषेध नोन्दवला ते चान्गलेच केले, पण असे कुठे कुठे पुरे पडणार?

नीधप, निषेध नोन्दवला ते चान्गलेच केले, पण असे कुठे कुठे पुरे पडणार?<<
जिथे शक्य आहे तिथे निषेध नोंदवणार. याहून जास्त काय करणार.
निदान यापुढे ह्याबाबतीत हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशी आशा....

नी, मलाही हेच वाटतं- माहिती नसलेलं लोकं बिनदिक्कत लिहितात/छापतात.
प्रेस कॉन्फरन्स किंवा अशाच माध्यमांतून संदीपचं नाव दिग्दर्शक म्हणून पुन्हापुन्हा हॅमर व्हायला हवं.

खरंच वाईट प्रकार आहे हा. बेजबाबदार पत्रकारितेचे अजून एक उदाहरण.

अरुण नलावडेंच्या नव्या चित्रपटाच्या जाहिरातींमधून ते फार अ‍ॅग्रेसिव्हली श्वासच्या यशावर लक्ष केन्द्रित करत असल्याचे स्पष्टच दिसते आहे. त्यामुळेच अशा चुकीच्या गोष्टी त्यांच्या नजरेस येऊनही (त्या आल्या नसतील असे समजणे भाबडेपणाचे आहे) फुकटचे श्रेय मिळते आहे तर का सोडा अशा वृत्तीतून याकडे ते जाणूनबुजून काणाडोळा करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसत्ताच्या आजच्या छापील आवृत्तीत स्पष्टीकरण आहे.
"अनवधानाने अरूण नलावडे यांचे नाव दिग्दर्शक म्हणून छापले गेले. 'श्वास' चे दिग्दर्शक संदीप सावंतच आहेत. "

वेल हे ही नसे थोडके.

फारएंड ला अनुमोदन. "माझा श्वास" हि लेखमालिका लोकसत्ता मध्येच प्रकाशित करावि, ती जास्त लोकांपर्यंत हि पोहोचेल आणि निदान त्यांच्या कडुन तरि भविष्यात अशि चुक होणार नाहि.

लेखमालेचंच पुस्तक गं. म्हणजे लेखमाला कुठे पब्लिश करत बसण्यापेक्षा त्याच फॉर्मॅट मधे लिहून पुस्तक पब्लिश करायचं. बघू कोणी प्रकाशक मिळतो का ते.

घडल त्या भूतकाळावर पुस्तक्/लेख लिहीण्यात वेळ घालवू नका! Happy
त्यापेक्षा आता दिग्दर्शनाचे/प्रेझेन्टॅशनचे दुसरे काही एक जगावेगळे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून त्यावर लक्ष केन्द्रीत करुन नविनच काही निर्माण करा!
पुस्तक्/लेखमालेपेक्षा त्याने जगाचे डोळे जास्त दिपतील (पक्षी उघडतील)!

त्यापेक्षा आता दिग्दर्शनाचे/प्रेझेन्टॅशनचे दुसरे काही एक जगावेगळे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून त्यावर लक्ष केन्द्रीत करुन नविनच काही निर्माण करा!<<
ते चालूच आहे की. ते थोडीच थांबणारे.

पुस्तक डॉक्युमेंटेशनसाठी गरजेचं आहे. एका गाजलेल्या चित्रपटनिर्मितीची तांत्रिक व कलात्मक प्रक्रिया लोकांपुढे येण्यासाठी.

पुस्तक डॉक्युमेंटेशनसाठी गरजेचं आहे. एका गाजलेल्या चित्रपटनिर्मितीची तांत्रिक व कलात्मक प्रक्रिया लोकांपुढे येण्यासाठी.

येस.. even i think so....

काहि मासिकात शेवटी, या मासिकात प्रसिद्ध झालेल्या मतांशी संपादक सहमत असतिलच असे नाही, असे छापलेले पूर्वी वाचले आहे. लोकसत्ताच्या छापील आवृत्तीवर शेवटच्या पानावर असे काहि असते का ?

आता सहज , एक प्रश्ण ताणतणाव दुर करण्यासाठी !!

राखी सावंत ने किती सिनेमात काम केले हो ? पण शेंबड्या पोराला पण ती माहीत असते.

आमचे सावंत साहेब, याकडे लक्ष देतील का ?

लोकसत्ताच्या पत्रकारितेचा दर्जा गडकरीं नंतर घसरतच गेला.
तेव्हा बातमी छापण्या अगोदर ती कुणी वाचत असेल ह्याची अपेक्षा बाळगणे गैरच.
अमेरिकेत ९/११ च्या हल्ल्याचं वर्णन सब्-हेडींग मधे असं केलं होतं:
"....हल्ल्यात सुमारे ५००० जण ठार किंवा मृत झाल्याचा अंदाज आहे" Proud

असो. पण नशीब या केस मध्ये एवढं होऊन गेल्या नंतर का होईना त्यांनी स्पष्टीकरण छापलच.

बोलणार्‍याची माती विकली जाते पण न बोलणार्‍याचं सोनंही विकलं जात नाही म्हणून, वर काही लोकांनी म्हटल्याप्रमाणे, संदीप सावंत यांनी आता फार प्रसिद्धिपराङमुख राहू नये Happy ते सोनंच निर्माण करतायत, मग जाहीररित्या (लोकांसमोर) श्रेय घ्यायलाच हवं.

स्पष्टीकरण छापून आल्याचे वाचून बरे वाटले.
पण नीरजा, आता ही बाब कायम लक्षात ठेव. मीडीया रिलेशन्स संदीप सावंत याना पुढल्या सर्वच प्रोजेक्टसाठी फारच गरजेची आहेत. ते एक प्रतिभावान दिग्दर्शक आहेत यात वाद नाही. पण तरीदेखील आजकाल लोकाना हेदेखील ओरडून ओरडून सांगावे लागतेच. खासकरून पत्रकारानाच. Happy

पी आरसाठी कधीदेखील माझी गरज लागली तर बिनदिक्कत सांग.

आणि हो, पुस्तकासाठी नक्की प्रयत्न करत रहा. प्रकाशक नक्की मिळेल. Happy

"अनवधानाने अरूण नलावडे यांचे नाव दिग्दर्शक म्हणून छापले गेले. 'श्वास' चे दिग्दर्शक संदीप सावंतच आहेत. "
>> ग्रेट!

>>लोकसत्ताच्या आजच्या छापील आवृत्तीत स्पष्टीकरण आहे.
"अनवधानाने अरूण नलावडे यांचे नाव दिग्दर्शक म्हणून छापले गेले. 'श्वास' चे दिग्दर्शक संदीप सावंतच आहेत. "

वेल हे ही नसे थोडके.>>

मायबोली झिंदाबाद Happy

चला बेजबाबदार वृत्तपत्राने घेतली एकदाची जबाबदारी, आता त्या श्रेय उपटण्याची वृत्ती असणार्‍यांनीसुद्धा खुलासा केला तर बरे!

अत्यंत चुकीची गोष्ट आहे ही.
परवा एकदा( याच्याशी संबंधित नाही...पण मिडीयामधील बेजबाबदारपणाबद्द्ल आहे)
साम टीव्हीवर(चॅनलचे नाव नक्की लक्षात नाही.) जलतरंगवर राग कलावती वाजत होता. आणि नंतर चक्क दुसर्‍याच कुठल्या तरी रागाचं नाव टाकलं .........त्याच कार्यक्रमात पुढे कहरच झाला.........एका रागाचं नाव "राग दादरा" असं टाकलं होतं.
अरे..........आपण पब्लिकला काय दाखवतोय ते तपासण्याचंही साधं काम करणारं कुणी नाही का या वाहिन्यांवर?
शुद्धलेखनाची तर कंप्लीट बोंब आहे. ईटीव्हीवर "हीच माझी मैत्रिण" नावाचा कार्यक्रम येतो . ती मधुराणी बसते तिच्या अगदी डोक्यावर "हिच माझी मैत्रिण" हे नाव येते ते प्रकर्षाने खटकते. इतके लोक येऊन गेले कुणीही साधी सजेशन पण केली नसेल का?

हे सगळे प्रतिसाद प्रिंट करुन मा. श्री. नलावडे साहेबांकडे पोस्ट करा! म्हणजे त्यांना त्यांची चुक कळुन येइल अन असे पुन्हा करणार नाहीत.

लोकसत्ताचा निषेध Angry

>> लिहायचं आणि मग संपादित करून पिवळी टिकली लावायच्या फ्याशनीतून ते पण सुटले नाहीत तर...

तरीच म्हटले नीढप बाईंच्या टोमणायटीसने अजून डोके कसे वर काढले नाही ते Lol
उगी उगी हां Proud

नरो वा कुंजरो वा.. हा असो न्हाईतर तो... आमी शिनेमा मुकाटपणे पायरेटेड सीडीवर बघितला... Happy .. बरं काही का असेना, ज्याचं त्याचं श्रेय मात्र ज्याला त्यालाच मिळायला हवं यात मात्र वाद नाही... यशस्वी संघर्षाबद्दल अभिनंदन..

पण हे आपापसातले वाद मायबोलीवर कशाला? तुम्ही आणि लोकसत्ता पाहुन घ्या की.....
फुकटचे फुटेज खायला पायजेल लोकांना.

Pages