देवनागरीत कसे लिहावे?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:09

नवीन मायबोलीत लिप्यंतर तक्ता (Transliteration Chart) आता उपलब्ध आहे. लेखनासाठी असलेल्या खिडकीवरील प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा तक्ता दिसू शकेल. तुम्हाला जर हा तक्ता दिसला नाही तर तुमच्या Browser चे पान ताजेतवाने (refresh) करून पहा.

अधिक माहितीसाठी खालील नियम पहा:
अ = a, आ= aa or A, इ= i, ई= I or ee, उ= u, ऊ= U or uu, ए= e, ऐ= ai, ओ= o, औ= au, अं= a.n or aM

क= ka, ख= kha, ग=ga, घ=gha, ङ= Ga

अनुस्वार= M

च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za, ञ = Y

ट= Ta, ठ= Tha, ड= Da, ढ= Dha, ण= Na

त= ta, थ= tha, द= da, ध= dha, न=na

प= pa, फ=pha or fa, ब= ba, भ=bha, म=ma

य= ya, र= ra, ल= la, व= wa, श= sha, ष= Sha, स= sa, ह= ha, ळ= La, क्ष= xa, ज्ञ= dnya, श्र= shra

का= kaa or kA, कि= ki, की= kI, कु= ku, कू= kU, कं=kM, क्र= kra, कृ= kR, र्क= rk
Examples:

माझे (maaze) नाव (naaw) लक्ष्मण (laxmaNa) आहे (aahe).
फुले (phule) वार्‍यावर (vARyAvar) नाचत (nAchat) होती (hotI).
राजाचे (rAjAche) सेवक (sevak) अष्टौप्रहर (aShTauprahar) पहारा (pahArA) देत (det).
वक्रतुंड = wakratu.nD
अर्जित रजा = arjit rajaa
सर्व = sarva
कर्क = karka
क्षत्रिय=xatriya
चाँद=chO.nda
मॅच=mEch
खूँखार=khEMUkhAr
हूँ=hEMU

विंडोज ८ किंवा आय. ई. ८ /९/१० वर देवनागरी लिहीता येत नसेल तर त्यासाठी मदतपुस्तिकेतले हे पान बघावे.

डॉ. सुनिल अहीरराव
नक्की काय होतय ज्यामुळे मराठीत लिहीता येत नाहीये, सवय नसल्यामुळे की अजून काही. जर तुम्ही मराठीत लिहायचा प्रयत्न करून पण इंग्रजीच उमटत असेल तर वरच्या म/E चा वापर करून भाषा बदला आणि हे करुनही इंग्रजीच उमटत असेल तर नेट ब्राउझरच्या कुकीज साफ करा आणि मग लिहा.
-मदत समिती

मी गेले काही दिवस मराठीमध्ये कसे लिहावे हे शोधत होतो.
अचानक मला आज एकाने "थरार - २६/११ " ची लिंक पाठवली. त्यामुळे मी आपला सभासद होऊ शकलो.
खूप आनंद झाला.
पण टाईप करायला फार वेळ लागतोय.
मी ओफलाईन टाईप कसे करु, जे मी copy & paste करू शकेन.

>>>> कि बोर्ड्ला मराटित काय म्हणायचे?
टन्कफळा किन्वा कळफलक / कळाफलक असे म्हणू शकतो

देवनागरी ऑन ठेवुन AUM टाईप केले की ॐ येते
हरि ॐ तत्सद

च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za

यानंतरचे जे अक्षर आहे ज्याचा उच्चार ंज च्या जवळ जातो ते कसे टायपायचे?

Hi all,

I'm a new member here.........I can't read posts from 'Old Mayboli'....what should I do or which font I should download....?
Pls reply...

अवग्रह कसा द्यायचा?
(दोSSSSन - असं लिहितांना मी आत्ता इंग्रजी एस् अक्षर वापरलं. त्याऐवजी अवग्रह देता येतो ना?)

कारण फक्त तुमचाच प्रतिसाद तुम्हीच संपादित करू शकाल म्हणून Happy
मी दिलेला एखादा प्रतिसाद नंतर मला संपादित करावासा वाटला तर मी त्या संपादित वर क्लिक करून तो प्रतिसाद बदलू शकते. पण मी तुम्ही दिलेला प्रतिसाद नाही बदलू शकत ! Happy

Pages