नवीन लेखनापुढे 'बदलून' असे का दिसते ?

Submitted by मदत_समिती on 16 November, 2010 - 15:35

लेखनामध्ये लेखकाने पोस्ट केल्यानंतर बदल केले असतील, तर नवीन लेखनाच्या यादित लेखनाच्या नावापुढे लाल रंगात 'बदलून' असे दिसते. हे बदल लेखकाला ठाऊक असतात.

काही वेळा मात्र, लेख चुकीच्या ग्रुपमध्ये पडला असेल आणि प्रशासकांनी त्याचे वर्गीकरण बदलून तो योग्य जागी हलवला, तरी सुद्धा त्या लेखनाच्या नावापुढे 'बदलून' असे दिसते.

मी माझी ' या पावलांना काय त्याचे ' ही गझल चुकून कविता या सदरात टाकली आहे. ती योग्य ठीकाणी टाकता आल्यास बरे होईल. ही विनंती.

अजय प्रभाकर, तुमच्या त्या गझल वर जा. त्यात वरती संपादन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. आता लेखनाचा प्रकार यावर क्लिक करा. त्यात गझल असा पर्याय निवडा. सेव्ह करा. झाले Happy