वजन वाढवण्यासाठी काही टिपा

Submitted by हर्ट on 19 April, 2010 - 03:25

शरिरावर इतर कुठलाच अपाय होणार नाही अशा पद्धतीने मला वजन वाढवायचे आहे. मी शाकाहारी आहे. सात्विक आहार आवडतो. कृपया सहजशक्य उपाय सुचवा. आभारी आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार्‍या भाग्यशाली लोकांचा मला नेहमीच हेवा वाटतो. कशाला वाढवताय ते वजन? रहा की बारीकच. Proud

सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे
जे सुदूर जे असाध्य तेथे मन धावे.

मला वजन वाढवायचे आहे परंतु पोटावरील चरबी वाढत आहे काय करु आणि संपुर्ण दिवसाचा डाएट प्लान सांगू शकाल का? केंव्हा काय खावे ते

निखिल,भात पुर्णपणे बंद करा.चरबी वाढतेय याचेब्कारण कार्बोहायड्रेट्स आणि फॅट घेत आहात.त्याऐवजी उकडलेल्या डाळी,दूध,अंडी घेत जा ,बाकी चपाती भाजी नेहमीप्रमाणे.
रोज किमान पाच किमी चालणे ,असे आठवड्यातून पाच दिवस तरी झाले पाहीजे.वजन वाढवणे सोपे आहे ,उअतरवणे महाकठीण हे लक्षात ठेऊन त्या हिशेबाने वजन वाढवा! शुभेच्छा!!

Pages