वजन वाढवण्यासाठी काही टिपा

Submitted by हर्ट on 19 April, 2010 - 03:25

शरिरावर इतर कुठलाच अपाय होणार नाही अशा पद्धतीने मला वजन वाढवायचे आहे. मी शाकाहारी आहे. सात्विक आहार आवडतो. कृपया सहजशक्य उपाय सुचवा. आभारी आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे बघ, शालमली
ही गोष्ट फार चांगली आहे, की heamoglobin आणि stamina चांगला आहे,
पण.... वजन कमी आहे,
तुझे वय आणि वजन कळाले असते तर जास्त बरे झाले असते, पण ठिक आहे...
सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे योग्य आहार आणि विहार...
योगा करणे, सुर्यनमस्कार घालणे अशा गोष्टी करायल सुरुवात कर... मग थोडे चालणे, ब्रिस्क walking अशा गोष्टी करु शकतेस....एकदम सगळे सुरु करु नको...खाताना प्रत्येक पदार्थांची निवड काळजीपुर्वक कर...काहिही बाहेरचे खावु नको म्हणजे मर्यादेत खा ...आहारात सुका मेवा, चिज, पनीर यांचा समावेश कर...साय खाणे, दुध पिणे, रोज न्याहारी करणेच, अशा सवयी लाव...
एक गोष्ट लक्षात ठेव...वजन वाढवणे ही जादु नाही...त्याला वेळ द्यावा लागतो...जितक्या लवकर वजन उतरु शकते तितक्या लवकर वजन वाढवता येत नाही...आपल्यात पेशन्स हवेच आहेत...
ती खुप हळु प्रक्रिया आहे...
मानसिक रित्या सुद्धा आपण balanced हवे...सतत टेंशन घेत असशील, चिडचीड करत असशील तरिही वजन वाढु शकत नाही...

<<खजुर दुधात रात्री भिजवुन ठेवायची आणि सकाळी खायची>> यावर एक विचारू का..
मी पण एकदा रात्री खजूर दुधात भिजत घातलेले , पण सकाळी मिक्सरमध्ये बारीक केले , आणि ते दुध गरम केले ( लहान मुलाला द्यायचे होते म्हणून ) , पण मला ते दूध फाटल्यासारखे वाटले, म्हणून मी टाकून दिले.
अस कस झाल असेल ?

जुई, ते दूध नाही प्यायच. फक्त्त खजुर खायची.

प्रसन्न, रात्री झोपताना कपभर गरम दुधात एक चमचा साजुक तूप घालुन पी.

अच्छा, मग ते फक्त खजुर ताज्या दुधातून वाट्ले तर चालेले ना.. नुसते तो खायचा कंटाळा करतो म्हणून

खुप खुप धन्यवाद प्राची..
तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहारात बदल करतेय...रोज न्याहारी करण्याची सवय तर मला लहानपणापासुनच आहे,फ॑क्त त्यात आता सुकामेवा, दुध पिणे ह्याचा समावेश करतेय..
दुध पिण्याचा फार कंटाळा येतो मला..पण आता regularly घेण्याचा प्रयत्न सुरु आहे...:)
आणि हो, माझं वय - २५, वजन - ४०, उंची - जवळपास ५.३!! Happy

प्रसन्न तुम्ही कंप्लीट डायजेस्टिव सिस्टिमचा चेकप केला आहे का? जी आय स्पेशालिस्ट ला भेटा. काहीतरी अंडरलाईंग प्रश्न असू शकतो. जी आय सिस्टिम चे सर्व प्रॉब्लेम एकेक करून एलिमिनेट झाले कि तुमचे प्रश्न
आपोआप सुट्तील. अगदी धीर सोडू नका. वेडी वाकडी औशधे घेउनही त्रास वाढू शकेल.
तुमच्या खाण्यात फायबर आहे का? हे तर मस्त खाणे चापायचे वय आहे. रागवू नका जेन्विन काळजी वाट्ली म्हणून लिहीत आहे.

प्रसन्न
जेवणात भरपूर चोथा रोज हवा. रात्री २ च. काळ्या मनुका भिजत घाला. त्या सकाळी चावून चावून खा.
दुसरा उपाय - २ च. तीळ सकाळी उठल्या उठल्या १ च. घरच्या लोण्याबरोबर अगदी भरपूर चावून चावून खा.
जेवणातील चोथा(फायबर) - सालासकटची कडधान्ये, पालेभाज्या, फळे हे सर्व रोजच्या जेवणात हवे.
जोडीने व्यायाम - विशेषतः पोटाला व्यायाम देणारी आसनं. व भरपूर चालणे.

आणि हो त्रिफळा चूर्ण , पाटणकर काढा वगैरे औषधे सतत घेतल्याने पोटाच्या अस्तरास इजा होऊ शकते. ते न करता नैसर्गिक रित्या पोट साफ होण्याकडे लक्ष द्या.

मानुषी खरच धन्यवाद...

मनुकांचा उपाय नक्की करून बघेन...

बी चे वजन जर ती कामकरी असेल तर ९० मिलीग्राम पर्यंत वाढते, आणि राणी असेल तर १७०-१८० मिलीग्रामपर्यंत वजन वाढू शकते. वजन वाढवण्यासाठी नियमीत मध पिणे
downloa.jpg

मला पण वजन वाढवायचे आहे. मी अन्डरवेट आहे...
वय - २४ वजन ३५ हाईट - ५ फूट३ इंच ...
heamoglobin :-१३.०० आहे
सगळ्या टेस्ट , reports नॉर्मल आहेत
मी शाकाहारी आहे. कृपया सहजशक्य उपाय सुचवा

मला पण वजन वाढवायचे आहे.>>>>
प ल क , तुम्ही दररोज दुधात शतावरी क ल्प आणि वुम न्स होर्लिक्स सुरु करु शकता.
...

माझेही वजन खुप कमी होते. लग्न करुन काही वाढले नाही. फक्त खिशाचे कमी झाले
Ensure ने मला खरच फायदा झाला. Ensure + येथे BJs मधे मिळते

दुसरा सोपा उपाय जो मी आता करतो वजन राखण्यास तो म्हणजे अन्नावर प्रेम करा. मनापासुन आस्वाद घेत खा.
याने जेवन अंगी लागते. हे मझ्या बाबतीत तरी खरे आहे.
हे मात्र मला बायकोने शिकवले.....

शिर्षकावरून मला असे वाटले की बी वजन वाढवण्याचे उपाय सांगतोय..
"काहीही टिपा (आणि वज न वाढेल)"

बी अगदी चांगला उपाय म्हनजे किमान अर्धा तास वजनांचा व्यायाम आणि मग अशी सडकून भूक लागेल की मग कोणत्या पावडरीची गरज पडणार नाही.

बी,
काही महिने व्यायाम आणि चालण एकदम बंद करुन टाक,नुसत वेळेवर खाणे ,
वजन लगेच वाढेल ...! यात काहीच अडचन नाही !
Happy

दिवसाला १ लीटर दुधापासुन सुरवात करत करत, दिवसाला ३ लीटर पर्यन्त पोचावे... वजन नक्की वाढेल.

Search for GOMAD on internet

Pages