कल्लोळातील उरलेसुरले(वृत्तांतासह)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

डीजेच्या नजरेतून एक झलक- Proud

"आपका कुछ सामान
हमारे पास पडा है
डायपर के कुछ भीगे भीगे पॅक्स रख्खे है
हो और किसिका पारोसा एक स्वेटर पडा है
वोह स्वेटर लौटादू
आपका वो वो सामान लौटादू

पडझड है कुछ....
है ना?
पडझड है कुछ बेसमेन्ट कि
गिरनेकी नौबत
मस्तीमे किसीने वॉल पे एक लाथ मारी थी
बेसमेन्ट कि वो वॉल अभी तक काप रही है
बेसमेन्ट रिपेअर करवा दो
मेरा वो बेसमेन्ट लौटा दो

शेवटचं कडवं सायोच्या कान्देपोहे साठी :

११६ मोहरीचे दाणे
एक तुम्हारे बाग का onion
गिले लेमन कि खुशबू
उष्टे तुम्हारे चमचे कुछ
उष्टे खरकटे डब्बे भी कुछ
याद दिलादु
सब लौटादू
तेरा वो कचरा लौटा दू !

एक इजाजत दे दो बस
जब कचरा फेकूंगी
पोहे भी वही दफनाउंगी..
पोहे भी वही दफनाऊंगी !!

-दीपांजली

'डीसीला एक जीटीजी करावं' असा प्रस्ताव इस्ट कोस्टला सहसा जिथे जीटीजी होतात तिथल्याच, म्हणजे बाराच्या जीटीजीत कोणी बाराकरांनीच एकदा मांडला (बाकी कंपूंनी नोंद घ्यावी). एरवी जिथली मेजॉरिटी तिथे जीटीजी असा प्रकार असल्याने आम्ही डीसीकर उठून बाराला जायचो. पण अ‍ॅक्टिव्ह डीसीकर मेम्बरांच्या संख्येत २ वरुन एकदम ५ ते ६ अशी प्रचंड वाढ झाल्याने इथेही एखादे जीटीजी होऊ शकेल याबद्दल थोडी आशा निर्माण झाली. बाहेरुन कोणीच नाही आले तर निदान ४-५ टाळकी तरी असावीत हो.

आमचे गाव तसे बघण्यासारखे आहे त्यामुळे बरेच जणांनी ते आधीच बघितले असण्याची शक्यता, पण तरीही बाहेरगावहून येणार्‍यांना जीटीजी व्यतिरिक्त काहीतरी आकर्षण (आमिष) असावे म्हणून चेरी ब्लॉसमची वेळ निवडली. सर्वसाधारण कार्यक्रमाच्या रुपरेषेत 'डीसी भेट' हे मुख्य आकर्षण ठेवले. पण तरीही 'आम्हाला मायबोलीकरांना भेटून गप्पा मारण्यातच जास्त इन्टरेस्ट आहे' असे रोखठोक उत्तर देऊन कार्यक्रमाच्या मूळ उद्देशाचे महत्त्व लक्षात घेतले ते बाराकरांनी! (बाकी कंपूंनी नोंद घ्यावी).

मेनू ठरवणे आणि इतर व्यवस्था करणे यापलिकडे मला काही काम नव्हते. सगळ्यांचे सगळे जेवण घरी बनवायची कल्पना मनांतसुद्धा येऊ दिली नाही. तरी 'तुझे बटाटेवडे मस्त असतात असं ऐकलंय, ते मस्ट्च आहेत हां मेनूमध्ये!' अश्या एका माबोकरणीच्या (ते सुद्धा भारतातल्या, म्हणजे 'मदतीला ये' म्हणायची सोय नाही) स्तुतीपर दबावाला बळी पडून तसा विचार थोडावेळ केला, मग सोडून दिला. बाकी सांस्कृतिक कार्यक्रम ठरवावे लागत नाहीत, माबोकर एकत्र आले की ते आपोआपच होतात हे आधीच्या अनुभवावरुन माहीत होते. विनय आणि भाई असल्यावर काय काळजी. हे बाराकरच बरं का! (बाकी कंपूंनी....)

जीटीजीचा दिवस जवळ येऊ लागला.. बरीचशी तयारी झाली पण ऐनवेळी सगळे व्यवस्थित होईल की नाही या चिंतेनं थोडाफार तणाव जाणवू लागला, पण वाटलं माबोकर आहेत, आपलेच लोक आहेत. कमीजास्त झालं तर घेतील समजून. आदल्या दिवशी सुट्टी टाकली.. दिवसभरात काम संपवायच्या गडबडीत जास्त फिरकता न आल्याने ८ तारखेला संध्याकाळी इकडे चक्कर मारली तर काय! चक्क मुख्य पानावर "मायबोलीचा अमेरिकेतील आजपर्यंतचा सर्वात मोठा मेळावा. अजून हा धागा पहिला नसेल तर लवकर पहा आणि येण्याचे ठरवा." अशी बातमी. मी तसे काही करायला सांगितले नव्हते हो. म्हणजे एरवी सांगावे लागते असे नाही पण २ दिवस राहिलेत आणि "येण्याचे ठरवा"? आत्ता?? हे वाचून एकदम २०-२५ लोक वाढले तर काय करायचे या विचाराने मला घाम फुटला. सगळ्या प्लॅनिन्गचे बाराच वाजले असते! (पण तसे काही झाले नाही.. हुश्श Light 1 )
उलट ऐनवेळी ३-४ लोकांनी टांग मारत असल्याचे कळवले. प्रिती, माणूस, बाईमाणूस आणि असामी. हे शिट्टी कंपूवाले बरं का! पण मग विनयने (अर्थातच बाराकर) ३ लोक वाढत असल्याचे कळवले आणि बॅलन्स केले. (शिट्टीकरांनी नोंद घ्यावी).

कोणत्याच कंपूत नसलेल्या फिलीहून मेधा(शोनू), लोन स्टार स्टेटमधून लोन स्टार सीमा आणि 'अचूक' सशल यांचे ९ च्या रात्रीच आगमन झाले. शोनू साडेदहाच्या सुमारास आली तेव्हा आम्ही दोघं लास्ट मिनट ग्रोसरीला गेलो होतो, तिने बिचारीने किती वेळा बेल वाजवली माहीत नाही. पोरांनी अर्थातच अजिबात लक्ष दिले नव्हते. पण तेवढ्यात आम्ही घरी पोचलोच. सीमा आणि सशलचे विमान साधारण एकाच वेळेला येणार होते, त्या दोघी एअरपोर्टवर आधी भेटल्या मग शोनू आणि मी त्यांना घेऊन रात्री ११:३० च्या सुमारास घरी आलो. मग गप्पा मारत जेवण आटोपले. एक दीड वाजला तरी सशल झोपायचे नाव काढेना. अचूक वेळेप्रमाणे झोप येत नाही असे काहीतरी म्हणत होती पण तिला एका वेगळ्या रुममध्ये टाकून बाकीचे झोपले.

दुसर्‍या दिवशी तसं आरामात आवरावं म्हटलं, बारा(वेळ) शिवाय कोणी पोचणार नाही. तर कसलं काय. ११ च्या ठोक्याला बाराकर हजर! (नोंद घ्यावी.. ) वेळेवर म्हणजे किती वेळेवर यावं.. मी कपडेसुद्धा बदलले नव्हते.. बाराकर आले मागोमाग बाकी कंपू. फचिन दिसल्यावर त्याला म्हटलं, बरं झालं पुन्हा आलास.. तेवढ्यात अमृता आणि किरण आले, म्हणाले आम्हीही पुन्हा आलो.. हे शिट्टी कंपूवाले हं. माझ्याकडे एकापेक्षा जास्त वेळा येणारे शिट्टी कंपूत सर्वाधिक होते, ते बाराकरांपेक्षा लांब रहातात तरीही (बाराकरांनी नोंद घ्यावी). या बाबतीत सर्वांनी यापुढे शिट्टीकरांचा आदर्श ठेवावा. त्यानंतरच्या १० तारखेच्या कार्यक्रमांचा वृत्तांत आता सर्वांना माहीतच आहे...

अ‍ॅटलांटा कंपूपैकी पराग सोडल्यास कोणालाच मी पूर्वी भेटलेले नव्हते. एवढी मोठी ट्रीप त्यांनी विश्वास टाकून ठरवली आणि जीटीजी बरोबरच डीसी भेटीचा कार्यक्रमही पार पाडला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. बाकी कंपू डीसीला भेट न देताच पळाले. याच कंपूतील परागने आणलेल्या खव्याच्या पोळ्यांबद्दल त्याचे खास आभार. तसेच बाकीचे काही २ जणांचा कंपू असलेले स्वाती, ज्ञाती, अंजली, झारा-समीर, अजय-भावना यांचे काम, व्याप सांभाळून, वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आभार.

११ च्या सकाळी साडेआठला सीमाची परतीची फ्लाईट होती, सशलची संध्याकाळी साडेपाचला होती. सीमा गेल्यानंतर बाकी कंपूबरोबर डीसी, की मूव्ही/शॉपिन्ग असा विचार करत असताना झारा-समीर रुनीकडे जाणार असे कळले. मग मी आणि सशलही रुनिकडे गेलो. तिथे भरपूर गप्पा आणि रुनी-नितीन यांच्यातर्फे इथिओपिअन लंच जेवून आम्ही तीनच्या सुमारास निघालो. ४ वाजता मी सशलला एअरपोर्टवर टाकले आणि घरी जायला निघाले. घर एकदम सुनं वाटत होतं. सर्वांना निरोप दिल्याने आणि मुख्यतः वसंतात बाहेर बागडल्यामुळे माझ्या डोळ्यातून (आणि नाकातून) नकळत पाणी वाहू लागले.. आणि घसा दाटून आला.

सगळ्यांच्या वृत्तांतातून जीटीजी आवडल्याचे, घराचे, व्यवस्थेचे कौतुक वाचून आनंद झाला. इथे राहिल्यावर कालांतराने मोठी घरं, एकापेक्षा जास्त घरं होऊ शकतात. पण ती कधी अशी माणसांनी गजबजली नाहीत तर त्यांचा काय उपयोग?

या कार्यासाठी माझ्या आख्ख्या कुटुंबाने जी मदत केली त्याला मोल नाही, त्यांच्या पाठिंब्याशिवाय यातले काहीही शक्य झाले नसते.

-लालू

प्रकार: 

येत आहे, येत आहे...
मी सुपारी न देताही डीजेने माझ्या भावना इतक्या सुंदर शब्दांत व्यक्त केल्याने मला आता काय लिहावे कळत नाही आहे.. Lol

डीजे Rofl
आता (काही हुद्यानी वरिष्ठ मंडळी वगळता) गटगला न जातापण आवाज कुणाचा, कॅलिफोर्नियाचा!

हो हो, आवाज अर्थात कॅलिफोर्नियाचाच Proud
रजनीगंधा,
तुझा हाच आयडी आहे कि आधी वेगळा होता?

कॅलिफोर्नियाची लोकं भारीच हुशार असतात हो!
डीजे, हो ग, माझा आधी वेगळा आयडी होता. लै पुर्वी. पण अनेक वर्षात न फिरकल्यानी तो मेला बिचारा.
म्हणून आता नये पॅकेट मे चिज पुरानी, म्हणजे इतकीही पुरानी नाहिये बर्का मी Happy

मेनू ठरवणे आणि इतर व्यवस्था करणे यापलिकडे मला काही काम नव्हते. >>> Uhoh किती साठ होती ना माणसं? इथे बाहेर हॉल ठरवून केटररकडे बाकी व्यवस्था करायला दिली तरी एकंदर कार्यक्रमाच्या तयारीच्या टेन्शनने घाम फुटतो. ही 'इतर व्यवस्था' नक्की काय आणि कशी करायची असते यावर एक बीबी उघड पाहू स्वतंत्र Proud

पण ती कधी अशी माणसांनी गजबजली नाहीत तर त्यांचा काय उपयोग? >> खूपच छान वाटलं वाचून.

डीजे च्या कवितांइतकाच वृत्तांतही भारी हो.

चक्क मुख्य पानावर "मायबोलीचा अमेरिकेतील आजपर्यंतचा सर्वात मोठा मेळावा. अजून हा धागा पहिला नसेल तर लवकर पहा आणि येण्याचे ठरवा." अशी बातमी. मी तसे काही करायला सांगितले नव्हते हो. म्हणजे एरवी सांगावे लागते असे नाही पण २ दिवस राहिलेत आणि "येण्याचे ठरवा"? आत्ता?? हे वाचून एकदम २०-२५ लोक वाढले तर काय करायचे या विचाराने मला घाम फुटला. सगळ्या प्लॅनिन्गचे बाराच वाजले असते! >>>>>>>>बरं झालं मी यायचा विचार रद्द केला ते.

हुम्म्म...
एरन्डेल मोड ऑन ..
बरं झालेलं दिस्तय गटग.
माणसं ही बरी जमवलीन हिनं. वाटलं नव्ह्तं हिच्याकडं एवढी लोकं येतील.
अर्थात पुख्खा झोडायचा असेल तर लोकं कुठून कुठेही जातात.
सारख्या मेल्या खाण्याच्या गप्पा. बकर्‍या मेल्या!
मजाही जरा बरीच आली वाट्टे.
अन काय ते भ. मे. , अन कपडे. कसं आवडतं कुणास ठाउक.

काही तर वयाची लाजलज्जा सोडून उथळपणात पुढे.
बरं झालो आपण नाही गेलो. अरिष्ट मेलं...
आता रिक्शा रिक्शा करीत काव काव करतील. आम्ही आमचे चार चव्वल खर्चून फिरवतो रिक्षा. काय कुणाच्या तीर्थरूपाच्या दमड्या नाही खर्चत
स्वतः सगळीकडे वृत्तांताच्या लेंड्या टाकीत फिरायचे अन दुसर्‍याच्या रिक्षाच्या नावानी बोम्बलायचे.
चल रे तू काय पहातोस माझं तोंड .
ओढ दान्डा अन चल पुढच्या बीबी वर...
एरन्डेल मोड ऑफ....

---(विशिष्ठ शहराच्या विशिष्ठ पेठेत (अतिविशिष्ठ)गल्लीत उभा असलेला ) टोणगा (इंग्रजी.)

{आमचा दुसरा कोणताही आय डी नाही. सदृश्य आयडीने केलेल्या विधानास आम्ही सहमत असूच असे नाही....}

लालु,
मस्त लिहिलेयेस.
टोणगा,
मला नाही वाटत कोणी एरंडेल छाप लोक सुध्दा इतक्या छान जीटीजी बद्दल असे बोलतील :).

लालू, तुझा वृत्तांत वाचला. शेवट एकदम छान केला आहे. डोळ्यातून मोती निसटले. अमृताचा वृत्तांत वाचेन वाचेन म्हणतो पण वेळ होत नाही.

लालू, सही. तुझं अभिनंदन. (करायचं राहून गेलं होतं. :))
डीजे.. Proud

बी, जाऊ दे रे. सार्‍यांनाच नाही कळत अश्रुमौक्तिकांचं मोल..!

सही लालु!
अख्ख्या लालु कुटुंबाचे अभिनंदन.
पां.शा. :इतक्या आणि 'विशिष्ठ' माबोकरांना झेलणे म्हणजे चेष्टा हाय का?: पांशा ऑफ Proud
(इकडचा प्रतिसाद नंतर बदलून पिवळी स्माईली टाकेन, तोवर संबंधितांना दिवे!)

Pages