डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून

Submitted by अमृता on 13 April, 2010 - 16:27

बाराकरांकडुन किती वेळा तोच तोच वृतांत ऐकायचा Proud तर हा नवा वृतांत शिट्टीच्या चष्म्यातून.

ठरल्याप्रमाणे आम्ही शुक्रवारी रात्री ८ वाजता सिंडरेला कडे पोहोचलो. पन्नाच आगमन झालच होत त्यामुळे तेव्हा सुरु झालेली अखंड बडबड आणि हसणं रविवारी रात्री पन्नाला घरी सोडल तेव्हा म्हणजे ११:३० वाजता संपल. आल्यावर मोठी बस आणायला चमन, किरण नी नितेश (मि.सिण्डी उर्फ् ‘ते गृहस्थ’) गेले. नितेश सांगत होता की 'इधर दस मिनीट मे ही है'. ते गेल्यावर अर्ध्या तासाने त्याचा सिण्डीला फोन आला की ते अजून पोचले नाहेत आणि रस्ता सापडत नाहीए! मग अर्ध्या तासाच काम दिड तासात करुन मंडळी घरी आली.
सिंडीने सुरेख पैकी पाणीपुरी, सायो फेम दिपसे समोसे आणि पिझ्झ्याची व्यवस्था केली होती. पाणीपुरीच्या पुर्‍या भाईंच्या सल्यानुसार तांदळाच पोत ठेउन आणल्या गेल्या नव्हत्या पण मग त्या उडाल्या का नाहीत? हे विचारायचच राहिल. अखंड बडबड आणि हास्यात खाण्याचा फडशा पडला.. मधे पग्या आणि आरजेला फोन करुन झाले.
गप्पा काही संपत नव्हत्या. त्यात पन्नाला चमनच्या बातमीचा सुगावा लागल्या कारणाने तिने त्याचा पिच्छा पुरवला होता आणि तो पण अगदी नव्या नवरीसारखा लाजत बिजत होता. गप्पांमधे रात्रीचे २ वाजले. पन्नाचं बर्‍याचदा सगळ्यांना 'चला आंघोळीला लाईन लावा' सांगुन सुद्धा कुणी ऐकत नव्हत. फचिन आणि चमन 'किती गॉसिप करता' अस म्हणत म्हणत अगदी सगळं ऐकत बसलेले. Wink शेवटी झोपायच ठरल.
आम्ही तिघी आतल्या खोलीत आलो तरी गप्पा संपत नव्हत्या. मधेच 'हेच, हेच मला पटत नाही' अस काहीस बडबडत पन्ना पुन्हा उठुन बसली. ती काहीतरी बोलत होती आणि सिंडीकडे नीट पाहिल तेव्हा ती झोपुन गेल्याच कळल तेव्हा कुठे पन्ना शांत झाली. Proud
शेवटी एकदाचे पहाटे ३ वाजता झोपलो. पहाटे ५ ला उठुन पटापटा आंघोळी करुन आम्ही बायका तयार. पण ही पोरं आवरायला किती वेळ घेतात हे त्या दिवशी कळल. शेवटी इशान, जुई, चमन, फचिन अश्या ४ लहान पोरांना तयार करुन आम्ही निघालो.

पन्नाने चिवडा आणि नारळीपाकाचे लाडू आणलेले. बाकी चरबट खाणं होतच. मधे मधे बाराकरांना फोन झाले. ते उगिच आपलं 'हे पोचलोच आम्ही लालूकडे असं सकाळी ८ लाच बोलत होते. जाताना नितेश आणि किरण ह्यांनी आलटुन पालटुन डायवर आणि किन्नरच काम पार पाडल. गाडी आधीच रंपा घेतल्यासारखी इथुन तिथे वाहात होती. गाणि म्हणत, गेम्स खेळत आम्ही लालूकडे पोचलो.
दारातच शोनू आणि लालूने स्वागत केल. Happy

लालू आणि धनंजय ह्यांच खरच कौतुक. अतिशय सुरेख व्यवस्था होती.
मधला लालूकडचा वृतांत इथे , इथे आणि इथे वाचा.

शेवटी एकदा(चे) बाराकर गेले. मग जेवायला कुठे जायचे ह्यावर विचारमंथन चालू झाले. काहीतरी जागा ठरली. मि. मिनी म्हणे २ जणांना पत्ता देउन गेले. त्यातले १ म्हणजे अटलांटाकर, ते कधी गुल झाले कळलच नाही आणि दुसरे म्हणजे स्वाती, तीने पण हातात हात( तोच तो पपेट शो) घालुन कधी कल्टी मारली कळल नाही. शेवटी आरजेला फोन करुन पत्ता घेतला आणि इच्छीत स्थळी पोचलो.
मेडीटरेनियन रेस्टॉरंटमधे पुन्हा गप्पांत खाण झाल. (लालूकडे माझे एवढे गोड पदार्थ हुकलेत हे माहित असत तर मी तेच नसते का खाल्ले?)
हॉटेलात चेकइन करुन पुन्हा गप्पांचा फड जमला.. जोग काकांनी मुलांना आधीच झोपवुन घेतल्याने तो एक आयटम बघायचा राहुनच गेला. Proud
मग अ‍ॅडमिन नी वेबमास्तर जॉइन झाले नी दरबार भरला. जनता आपापली गर्‍हाणी सांगू लागली. आमच्याकडे अर्धा र दिसत नाही(मग बर्‍याच जणांनी त्याची री ओढली), आमच्याकडे मायबोलीवर वायरस वाल्या अ‍ॅड्स येतात इथपासुन मायबोली हाच वायरस आहे इथपर्यंत लोकं बोलली. ..मधेच कोणीतरी वास्तुशास्त्राचा विषय काढला. त्यात म्हणे प्रवेशद्वारासमोर संडासाचे दार असणे अशुभ असते (साहजिक आहे! रोजचाच डायेरिया झालेला माणूसच घराची अशी रचना करुन घेइल ना?) मग त्रिकोणी दरवाजे शुभ असतात पण ते उघडायचे कसे ह्यावर विवेचन सुरु झाले. नितीनने तेव्हा बरीच फटकेबाजी केली. हॉबीट्स काय, रम पोटाला लावणे काय?? Proud चायनिज बुद्धाचा किस्सा पण छान होता.
मधेच प्रचंड झोप येत असल्याने थुत्तरफोड ऐवजी मी रॉबीनफोड म्हणुन गेले आणि माझी झोप मी स्वतःच उडवली. Wink

अधिक माहिती साठी वाचा लाफींग बेडुक आणि ब्रँडी

लोकांचा उत्साह काही संपत नव्हता. शेवटी जेव्हा बेवमास्तर निघाले तेव्हा मग हळुहळू सभा बरखास्त होउ लागली. सगळे झोपायला पांगले.
रविवारी सकाळी पुन्हा अगदी लालूसकट सभा भरली नी ब्रेकफास्ट झाला. मग मात्र सगळे आपापल्या दिशेला पांगले. दुरच्या किनार्‍यावरचे रॉनी कडे गेले. ती गाईडची भुमिका करणार होती. अटलांटाकर डिसी डाउन्टाउनात गेले आणि आम्ही शिट्टीकर ट्युलिप फेस्टीवर पहायला लाँगवुड बागेत गेलो. काय सुरेख बाग आहे ती. तिथे ट्युलिप्स, डॅफोडिल्स आणि असंख्य फुललेली फुलझाड पाहुन मन तृप्त झाल. तिथल्या कंझरवेटरीत अगदी आपला अनंत, जाई, जुई पण होते. बागेत छान छान आकार दिलेली झाडं होती. त्यातच सिंडीच मांजर होत पण ते मला कोल्ह्या सारख दिसल. उशिरा पोहोचल्यामुळे जास्त वेळ तिथे थांबता आल नाही..

पुढच बाराच गटग त्या बागेत करायच आम्ही शिट्टीकरांनी ठरवल. Proud

गप्पा नॉनस्टॉप होत्याच. येताना नितेश आणि चमनने गाडीचा कार्यभार उचलला. मजलदरमजल करीत आणि घासघासभर लालूने सायोसाठी दिलेला चिवडा खात शिट्टीत पोहोचलो. (सायो, चिवडा तुझ्यापर्यंत पोचला नाही, तर कुठे गहाळ झाला ते समजुन जा. आम्ही घासभरच खाल्लाय ;)) आम्ही घरी पोचलो तेव्हा ह्या ३ दिवसाच्या ट्रिपची सांगता झाली.

एका मस्त, जोशभर्‍या, शाळेची आठवण करुन देणार्‍या विकांतासाठी लालू, सिंडी आणि सगळ्याच मायबोलीकरांचे खूप खूप आभार.

वाढीव नंबराचा चष्मा...

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<पोटाला ब्रँडी काय अन लाफिंग बुध्दा काय>

हे वाक्य बहुधा "पोटात ब्रँडी अन लाफिंग बुद्धा " असे असायला हवे होते का?

प्रतिसाद देताना अमृताने लिहिलेल्या वृत्तांताविषयी एखादी ओळ लिहिलीत तर चालेल ~हुक्मावर्नं

देसाई,बाई धन्यवाद बर्का प्रयत्नांना प्रोत्साहन दिल्याबद्दल. Proud
बुवा तर स्वतःच गंडलेले आहेत. त्यामुळे नो कमेंट्स
आणि झक्की, अहो ते पोटाला ब्रँडी असच आहे. कारण कार ते नितीन कधी भेटला तर नक्की विचारा. Wink

सिंडी, वृत्तांत की वर्णन हे एकदा नक्की ठरलं की लिहू हो ओळ. Wink
अमृता, चांगलं लिहिलंय (पण काय?) गॉसिप्स काय काय केले ह्याची झलक वाचायला आवडली असती Wink

अरे तुला पण सगळे कॉमेंट्स स्वतःवर घ्यायची सवय लागली की काय? मी हुडाला म्हणत होतो, तु का म्हुन रागवतेस?

सायो, अस कस लिहिणार ग गॉसिप उघडउघड?? त्यासाठी स्वतः हजर असावच लागत. Wink आणि ते सारख चिवडा चिवडा करु नकोस बरं.. चिवडा सहीसलामत आहे तुझा.

बुवा, अजुन कुणाला आहे हो ही सवय?? Proud

अमृता मस्तय ग वृतांत. काय गं आणि तुम्ही शिट्टीकर हजारदा विचारल चला जेवायला जायचय निघुयात का, निघुयात का? प्रत्येकजण त्या घोळक्यात नसलेल्या शिट्टीकराचे नाव घेउन मला नाही याला माहिती त्याला माहिती अस करत होतात. म्हणुन मग आम्ही पळुन आलो तिथुन.

अस्स झाल होय.. मग ठिक आहे Proud बाकी तुम्ही पळुन का गेलात ह्याबद्दल लोकं नाही नाही ते बोलत होती.. जळ्ळ मेल्यांच लक्षण. Wink

वृत्तांत चांगलाच लिहीला आहे.
ब्रँडी बद्दल असे करा, की मला बाटलीच देऊन टाका, म्हणजे पोटाला की पोटात वगैरे माझे मी ठरवीन.

म्हणुन मग आम्ही पळुन आलो तिथुन.
काय हे? अहो, जेवायच्या बाबतीत तरी असे करायचे नसते. विचारत कसले बसायचे. जी बाई (किंवा बुवा, बुवांना सहसा असल्या गोष्टी लक्षात येत नाहीत) म्हणाली असेल तिचा पदर्/ओढणी, जे हाताला लागेल ते घट्ट धरून ठेवायचे, म्हणजे नीट जेवायला जायला मिळाले असते. एका हाताने नवर्‍याला घट्ट धरून ठेवले असले तरी दुसरा हात तर मोकळा होता ना? Happy Light 1

(घायाळ) स्वाती, एक आरोळी ठोकायची नं सुनित सारखी.. सगळे भानावर आले असते! Proud

आत्ताच न्यूज दाखवत होते की नॉर्थ आणि साऊथ जर्सीत (पार्सीपेनी/मॅडीसन आणि प्रिंन्स्टन भागात )प्रचंड जळल्याचा वास येतोय. Proud Proud

प्रचंड जळल्याचा वास <<< आत्ता मी बाहेर गेलो तेव्हा येत होता.. मग कळलं कुणितरी बॅकयार्डात चटणी भरून पापलेटं तळत होतं Lol

भारीच मजा केली तुम्ही!! हे सगळे व्रुत्तांत वाचताना बाराकर आणि शिट्टीकर असे उल्लेख कुणाचे आहेत? (उसगावाबद्दलचं माझं द्यान फारच कमी आहे हे चाणाक्श माबोकरांच्या लक्शात आलं असेलचः))

बारा = बाग राज्य = गार्डन स्टेट = न्यु जर्सी.
शिट्टी = सीटी = कनेक्टीकट (हे नेहमी चष्म्यातुन बघतात.) Happy

हा हा हा! धन्स अनिलभाई! आता अजुन काही संदर्भ लागले! एकदा जागतिक स्तरावर माबोकरांचे एक गटग व्हायला हवे!

Pages