वाचनाची आवड अशीही!!!!!!!!!!!

Submitted by हर्ट on 7 April, 2010 - 11:35

या बीबीचा उद्देश -- वाचन, साहित्य कशाला म्हणतात याची जराही जाण नसताना -- काहीच्या काही वाचन करणारे वाचक नक्की काय वाचतात त्याबद्दल इथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली रावण भाताची चर्चा चाल्लेली..
खरी वाचक असल्यानं मी ते एन्जोय ही करत होते.. (बी बीचा विषय कुठला का असेना Wink )
मग तुम्ही विषय बदललात - तर मी ते ही एन्जॉय करतेय.. कारण मी खरी वाचक आहे Wink Proud

भेळ कागदावर देत नाहीत हे ऐकून वाईट वाटले
>> अग वाईट कसलं वाटून घेतेस नंदिनी .. झाडं वाचली ह्याचा आनंद मान (प्रोव्हायडेड, रियुजेबल प्लेट्स वापरल्यात!) (मराठीत येवढे इंग्रजी शब्द वापरल्यानं माझ्या मराठीचीही प्रत खराब आहे असं तुम्हाला वाटू शकतं.. पण ते माझ्या इंग्लिश (पेपर) वाचनानं झालंय Wink )
(Just kidding - अर्रेच्या पुन्हा इंग्लिश!)

>>काहीच्या काही वाचन करणारे वाचक नक्की काय वाचतात
गाडीतुन जाताना दुकानावरच्या पाट्या, होटेलात गेल्यावर तिथले मेन्युकार्ड, इलेक्ट्रीक उपकरणांची मॅन्युअल्स, खास पुणेरी पाट्या, टेलिफोन डिरेक्टर्‍या, पुष्पादिदींचा सल्लासारखी सदरे आणि पतसंस्थांचे अहवाल!
तुर्तास एव्हढेच आठवतेय... बाकीचे लिहिन सवडीने Happy

वाचन म्हटले की लहानपण आठवते. मी आणि माझी मैत्रिण एवढा वेळ वाचनालयात वाचत बसायचो की शेवटी आता वेळ संपली , निघा असे सांगीतले जायचे (रात्रिच्या साडेआठ वाचता)!त्यावेळी विसखांडेकर,सुमति क्षेत्रमाडे,सावरकर, आनंदी गोपाळ अशी पुस्तके 'वाचून काढलेली' आठवताहेत. नासी, मिल्स ..,गुढ कथा केव्हा वाचलेल्या नाही आठवत. आता वाचते व शोधायलाही बघते गूढ मधून मधून. मोठेपणी इतर भाषांमधील पुस्तके. पण कागद दिसला की अजूनही मन झेप घेते हे खरे. वाचायला किंवा लिहायला! एक आवडते पुस्तक आणि मी , बस्स. लहानपणी निबंधही लिहून झाला होता- पुस्तकांशी मैत्री. तात्पर्य काय, एकदा एखाद्या लेखकाचे साहित्य आवडायला लागले कि ते वाचण्याकडे कल राहतो खरा; पण वाचन असे मर्यादी राहू नये हेही खरे. पुस्तक हातात घेतल्यावर अगोदर मी प्रस्तावना, किंवा पृष्ठभागावर लिहिलेली माहिती वाचते आणी मगच वाचायला घेते.

भेळ जरी कागदात येणे बंद झाले असले तरी भाजक्या भुईमुगाच्या शेंगा, खारेदाणे, तिखटदाणे, फुटाणे वगैरे अजून तरी कागदाच्याच पुड्यात येतात.... त्यात तो कोणाच्या वहीचा कागद असला की अजून मजा येते....!!!! कविता, निबंध, जोड्या लावा, गणिते, प्रमेये इत्यादी इत्यादी वाचायचे व त्या त्या पदार्थाचा फन्ना उडवायचा.... शिवाय ज्याच्या वहीचा कागद आहे तो मुलगा/ मुलगी कसा/कशी असेल असे उगाचच मनोचित्र रंगवायचे!!!! रिक्कामटेकडेपणा... दुसरे क्काय! Wink

जगातले सर्वच अनुभव स्वतःने घेणे अशक्य आहे. लोकांच्या अनुभवांबद्द्ल वाचून आपल्याला एक निराळच आयुष्य जगता येत. निरनिराळ्या लोकांच्या सुख, दुःख, त्याग, राग, मोह, इर्षा, यश, अपयश, चिकाटी आणि काहि जगावेगळ्या अनुभुतींमधून वेगवेगळ्या पैलुंची प्रचिती होते.अर्थात तुम्ही काय वाचता ह्यालासुध्दा महत्त्व आहे. कधी कधी पुस्तक तुम्हाला भारावून टाकतात तर कधी ती तुमचे त्यक्तिमत्त्व व विचार बदलण्यास कारक ठरतात. त्यामुळे योग्य पुस्तक वाचण हे आपल्याच हातात असत.

>>आमच्याकडे इथे परदेशात भेळ ही प्लेटीतचं देतात त्यामुळे इथे खरे खोटे वाचक कळत नाहीत. अकोल्यालापण चौपाटीवर भेळ स्टीलच्या प्लेटीतचं देतात. कितीतरी वर्ष मागे पडलीत वाण्याचे सामान पुर्वी पेपराच्या कागदात यायचे. भेळ वगैरे कागदावर मिळायची. काही ठिकाणी द्रोण वगैरे वापरतात. त्यामुळे माझ्यामते खरा वाचक भेळीचे कागदपण वाचतो हा निकष आता उरलाच नाही. असो.
>>
मी मायबोलीची नियमित वाचक आहे. (थोडक्यात खरी वाचक आहे :फिदिफिदि:)
कोणत्याही वाक्याचा सन्दर्भ सोडुन अर्थ घेणे यात "बी" चा कोणीही हात धरु शकणार नाही असे मला वाटते. :स्मितः

>>>त्यामुळे माझ्यामते खरा वाचक भेळीचे कागदपण वाचतो हा निकष आता उरलाच नाही. असो.

अरे हा विनोद आहे ना?

माझी अजुन एक सवय म्हणजे रद्दीची दुकाने धुंडाळणे... कधी कधी तिथेही घबाड सापडते. मला 'चेम्बरलेन'स डीक्शनरी पुण्यातील स्पायसर रोडवरील रद्दीच्या दुकानात सापडली. अर्नाळकरांची कितीतरी पुस्तके मंडईजवळच्या रद्दीच्या दुकानातुन ५-५ रुपयांना घेतलेली.....

मीपण! प्रचंड प्रमाणात दिवाळी अंक, बरीच्शे इंग्रजी पुस्तके, पेंडशांचं आकांत, कोसला, गौतमची गोष्ट, माणसे अरभाट आणि चिल्लर, लॉर्ड ऑफ दी फ्लाईज... हे सगळं मी अत्यल्प मोबदल्यात रद्दीवाल्यांकडून मिळवलं आहे. रद्दीवाल्यांचा विजय असो... Happy

चांगली रावण भाताची चर्चा चाल्लेली..
खरी वाचक असल्यानं मी ते एन्जोय ही करत होते.. (बी बीचा विषय कुठला का असेना )
मग तुम्ही विषय बदललात - तर मी ते ही एन्जॉय करतेय.. कारण मी खरी वाचक आहे >>> नानबा Lol

blogs sodun itar

लहानपणी लीना मोहाडीकर यांचे लेख, किशोरावस्थेत विठ्ठल प्रभू यांची पुस्तकं अशी वाचनाची गोडी लागली.

काय भारी चर्चा आहे ही! माझिया जातीचे अनेक आहेत हे पाहून मस्त वाटतंय! मी काय वाट्टेल ते वाचू शकते आणि वाचते...दुकानावरच्या पाट्या, जाहिराती, गुळगुळीत कागदावरची मासिकं, संध्यानंद ते गीता, महाभारत वै.
पण हिंदी तितकं वाचलं जात नाही जितकं सहज मराठी किंवा इंग्रजी वाचन होतं! बडोद्याला असताना गुजराथी पेपर वाचण्याचा उद्योग करून भरपूर हसायचो!
किराणा मालाच्या दुकानात एकदा वहिनी बरोबर गेले होते (४/५ वीत असेन) तिचं आटपेपर्यंत मी केरसुण्या गुंडाळायला जो वर्तमानपत्राचा कागद वापरला होता तो वाचत बसले होते!! माझी वहिनी मला धन्य म्हणाली! बाकी जेवताना अर्धे लक्ष पुस्तकात! पुस्तकात डोकं खुपसलं असेल तर आईने मारलेली हाक आजिबात ऐकू यायची नाही (आगीचा बंब जरी गेलं असता शेजारून तरी कळल नसतं मला!)
मला रोजच्या पेपर बरोबर जे जाहिरातींचे कागद येतात ना ते वाचायला आवडतं! सुखी आयुष्याच्या माझ्या कल्पनेत खूप सारी पुस्तकेच आहेत! आणि हो तेवढाच वेळही Happy
विंदा आणि सॉमरसेट मॉमची वाक्ये विशेष आवडली!

पाट्या वाचण्याचा उद्योग पुढे चांगलाच कामाला आला. त्यावेळी गुगल मॅप नव्हतं तरी एक्झॅक्ट पत्ता सांगण्यात बराच हुशार झालो होतो. Happy

आमच्या कॉलनीत प्रत्यक घराला छानसं अंगण आहे, तिथेच बसुन मी बरीचशी पुस्तकं वाचली. शिरवाळकरांची इतकी पुस्तकं वाचली होती की शेवटी लायब्ररियन "अजुन नविन पुस्तकं आली नाहीत" असं मी दिसताच सांगायचा.
आता वाचायला काहीच उरलं नाही, म्हणुन कोण्या एका महाराजांचे वेगवेगळे योग (कर्म योग, भक्तीयोग, वगैरे) ६ वी/ ७वीला असताना वाचले होते... Happy

रुचिरा कापुन जुन्या वह्यांत चिटकवले होते. अजुनही त्या वह्या असतील घरी.

>> कोण्या एका महाराजांचे वेगवेगळे योग (कर्म योग, भक्तीयोग, वगैरे >> स्वामी विवेकानंदांच्या प्रवचनांची पुस्तके आहेत ती.

नाही नाही.... ते वेगळेच... कोणी स्थनिक महाराज होते, त्यांनी लिहिलेलं होतं. स्वामी विवेकानंदांचं नाव विसरणं शक्य नाही हो.

ही पुस्तके खरं तर त्यांच्या प्रवचनावरुन लिहिलेली होती आणि त्यांच्या एका शिष्याने ती छापुन लायब्ररीला भेट दिली होती.

पांढ-यावर काळं छापलेलं/लिहिलेलं/खरडलेलं काssहीssहीsss चालतं!! चंपक, अमर चित्रकथा, नॉडी, लहान मुलांसाठी तयार केलेली सगळी पुस्तकं अगदी बडबडगीतांचीसुध्दा चवीचवीनं. मिल्स अँड बून ऑलटाईम फेवरिट आहेत. खुप बोजड काही हातात आलं आणि अजिबात नाही झेपलं तर ते फेकून मस्तपैकी योगिनी जोगळेकर, ज्योत्स्ना देवधरांची पुस्तकं हे माझे रामबाण उतारे आहेत.

ते जाणबिण किंवा उच्च साहित्य (म्हणजे काय?) दुसरं कुणी कसं काय आणि का ठरवणार मुदलात?? मी माझ्यासाठी वाचते ना? त्या क्षणीचा मूड, लहर काय असेल आणि जे उपलब्ध असेल त्यावर पण बरंच काही अवलंबून असतं.

Pages