वाचनाची आवड अशीही!!!!!!!!!!!

Submitted by हर्ट on 7 April, 2010 - 11:35

या बीबीचा उद्देश -- वाचन, साहित्य कशाला म्हणतात याची जराही जाण नसताना -- काहीच्या काही वाचन करणारे वाचक नक्की काय वाचतात त्याबद्दल इथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चर्चा चालली आहे.
भेळेच्या कागदाला १००० मोदक.
नंदन, विंदांच्या मुलाखतीतला संदर्भ अप्रतिम! जंगलाची उपमा भयंकर म्हणजे भयंकर आवडली. (रंगून जाणं महत्त्वाचं! क्या बात है! :)) आणि सॉमरसेट मॉमचं वाक्यही Happy

चिनूक्स पासून ललिता प्रीती पर्यंत सर्वांना अनुमोदन!
आता साहित्याची जाण , चांगले वाईट वगैरे यावर पुरेशी सुंदर चर्चा झाली असल्याने (आणि आता अनुमोदनांशिवाय वेगळे फार मुद्दे येतील असे वाटत नाही, पण असतील तर स्वागतच आहे) आपण हा बीबी थोडा मजेदार करुया का बी? म्हणजे 'वाचनाची अशीही आवड' ज्याने काही आठवणीतले किस्से घडले? जसे चिनूक्स, दीपूर्झा, दक्षिणा यांनी सांगितले..?
मला लहानपणी म्हणजे (आजही) वाचनाची प्रह्चंड आवड.. त्यामुळे रस्त्याने जाताना एकही पाटी वाचायची सोडायची नाही मी.. रोज त्याच पाट्याही पुन्हा वाचायची.. त्यामुळे व्हायचं काय की वर बघत चालल्याने पायाखाली काय येतंय हे कधी दिसायचं नाही.. मग कधी झोपलेल्या कुत्र्यांचं शेपूट, खड्डे, आणि अजून अनुल्लेखनीय बरंच काही पायाखाली यायचं.. या सवयीने चालता चालता पडले नाही असा एकही दिवस गेला नाही.. आई, ताई म्हणून माझा हात धरुन चालायाच्या (आंधळ्या सारखं).. ही गंमत नवीन लग्न झालेल्या काकूला माहित नव्हती.. एकदा तिच्या बरोबर घराजवळच दूध आणायला गेले.. तिने हात धरला नव्हता.. मी हळूहळू वाचत -चालत तिच्या मागे चालले होते.. बोलता बोलता ती पुढे गेली पार घरी... आणि घरी आल्यावर आईने विचारले, "आशू कुठाय?" काका म्हणे "पडली असेल रस्त्यात जा शोधून आण!!" बिचारी काकू.. इतकं कानकोंडं झालं तिला.. Proud

आशू Happy

मला लहानपणी जेवताना पुस्तक वाचायची सवय होती.. त्यामुळे १२-१५ घास जास्तीचे च जायचे.. Proud

वाचायचा नाद लागला चौथीत असताना पासून. पेपर वाच,कॉमिक्स वाच असं असायचं , तेंव्हा लोकमत सोबत कॉमिक्स यायचं दर शनीवारी. अक्षरशः त्यासाठी शनीवारची वाट पहायचो. माझ्या दुरच्या नात्यातल्या एका मावशीच्या मिस्टरांचे बस स्टँडला बूक स्टॉल होते. तिच्या बहीणीमुळेच (स्वाती) मलाही वाचनाची गोडी लागली. परळीला भालचंद्र वाचनालय हे त्याकाळी मोठे वाचनालय होते. (आता फार दुरावस्था झालीये. Sad ) उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे संध्याकाळी पडीक असायचो. सर्व पेपर वाचायचे, लोकसत्ता,मटा दुसर्‍या दिवशी सकाळी यायचा !!

त्या मावशीकडे दर आठवड्याला दुपारी आम्ही दोघे जायचोच. तिचे मिस्टर दुपारी जेवायला घरी याय्चे तेंव्हा काही न्यु रीलीज (:फिदी:) मासिके,साप्ताहीकं सायकलला लावलेली असायची अन आम्ही त्यावर तुटुन पडायचो. नंतर नंतर ते कुरकुर करायला लागले की हाताळून पुस्तकं खराब होतात वगैरे पण तसेच अगदी निलाजर्‍यासारखे आम्ही परत परत जायचो Proud नंतर हळूहळू ते बंदच झालं.

शेजारच्यांचे कार्ड घेउन पुस्तकं बदलून आणायचे काम मी आवडीनं करायचो तेंव्हा. त्यांच्याकडे जवळपास सगळे दिवाळी अंक यायचे.

उन्हाळ्याचे सुट्टीतच मी आईकडे रहायला जायचो.आईच्या घरापासून वाचनालय फार जवळ होतं , स्वाती न मी अधाशासारखे पुस्तकं वाचायचो Proud एरवी शाळा,ट्युशन मुळे मामांकडेच रहावे लागायचे. एकदा आई म्हणाली होती ' एक महीन्यासाठी येतो इथे रहायला , ना जेवणात लक्ष , ना बोलण्यात Sad नेहमी पुस्तकात तोंड खुपसूनच असतोस'

गुरुवारी 'चित्रगंधा' पुरवणी यायची , मामी ऑप्शन ठेवायची एक तर वाच नाही तर जेव , मी आधी वाचून मगच जेवायचो. Happy

हे सगळं आज आठवलं ह्या बीबी मुळे. Happy

आता पेपर व्यतिरिक्त इतर वाचन करण्यात स्वारस्य राहिलं नाही. रोजचा पेपर छोट्या जाहिरातीं सकट वाचतो कारण त्यात " अमुक तमुक चा आधारस्तंभ. करुणेचा सागर. हॅण्डसम ब्रोकर..." वगैरे असलं काहीबाही असतं :).

वाचनाची गोडी लागली लहानपणापासुनच...अगदी ४-५ वी त असल्यापासुन! जादुची, राक्षसाची पुस्तके खुप आवडायची तेव्हा. राहुरी कृषी विद्यापीठात रहात असल्याने पुण्याला कोणीही गेलं की गोष्टींची पुस्तके हीच मागणी! तशी विद्यापीठाची मोठी लायब्ररी होती! त्यावेळेस खुप लांब वाटायची...तरीही एकदा गेले की तासन तास बाहेर पडायची नाही. अर्थात त्या काळी ती सुंदर कव्हर्स असलेली पुस्तके हाताळायला मजा वाटायची..! लायब्ररीतील ती शांतता...आणि पुस्तकांचा टिपिकल वास...अहाहा!

गुपचुप मैत्रीणींकडुन आणलेली व.पुं., पु.ल., चि.वी. चीच काय ... काकोडकरांच्या प्रणयधुंद कादंब-यांपासुन तर अर्नाळकरांच्या हेरांपर्यंत पुस्तकांचा फडशा पाडला ..त्या वयात Wink

लालू ला अनुमोदन Happy

म्हणजे हे सोडल्यास वर्तमानपत्र, माहिती पुरवणारी मासिके, टेक्निकल पुस्तके >> किंवा, मा.बो. वरचे प्रतिसाद, इतर सगळ्यांच्या वि.पु. Happy

चिनुक्स अनुमोदन.

मी एकदा ओरीएंट लाँगमन प्रकाशक कंपनीत असिस्टंट एडीटर पोस्ट साठी इंटरव्युला गेलेले. पार सिलेक्ट झालेले
शेवटी चेर्मन म्हण्ला काय काय वाचता तुम्ही आम्ही लगेच उत्साहाने सर काहीही. पार जीएंपासून गौरी पासून डेस्मंड मॉरीस सिमोन द बूवा पासून आर्ची ते मॅड मॅगेझिन परेन्त सगळे. चेर्मन हताश. त्यांनी नारळ दिला!
कहाण्या आवड्तात मला. माहेर मेनका पण. वाइट म्हण्जे खाणे मागवून ते येई परेन्त मेन्यू कार्ड वाचून त्यातील चुका काढ्णे. असले पण. नव्या शहरात दुकानांच्या पाट्या, यलो पेजेस वाचून काढ्णे. मला तर अंगठ्याने दुसर्‍या बोटावर काही तरी अक्षरे लिहावयाची पण सवय आहे. म्हण्जे वाचत नाही तेव्हा लिहीत असते शिवाय नेट वरील स्टंबल अपॉन साईटस, इंग्रजी मासिके, दोन तरी फिक्षन कादंबर्‍या एका वेळी. असे काहीही. आता म्हणा
मामी येडी आहेस ग. तर हो. Happy

मामी- अरेरे.
ऑरिएंट लाँगमन मध्ये असता एव्हाना. Proud

विक्रमसेठने (बहुतेक) हेच लिहीलं आहे की प्रकाशकाची निवड त्याने तो प्रकाशक पोएट्री पॅशनेटली वाचतो म्हणुन शेवटी केली. Happy

मला पाककृतींवरची पुस्तकं, लेख, चर्चा वाचायला खूप आवडतात.
स्वयंपाकाच्या, साठवणीच्या पारंपरिक पद्धती, त्यातले प्रयोग, प्रादेशिक खासियती, त्या त्या हवामानात शरीरावर होणारे त्या पदार्थांचे परिणाम आणि उपयोग, घरच्या घरी हे पदार्थ टिकवण्याच्या पद्धती, घरच्या बागेत फळं आणि भाज्या पिकवण्याच्या शक्यता, त्यातले प्रयोग, फायदे-तोटे, स्वयंपाकातलं विज्ञान आणि संस्कृती, पदार्थांचा जगभर होणारा प्रवास आणि त्यांत होणारे बदल... वगैरे वगैरे वगैरे!
या विषयावरची पुस्तकं मी कादंबरीसारखी रंगून वाचू शकते. लोक हसतात, पण मला गंमत येते बुवा हे सगळं वाचताना.

आमच्याकडे इथे परदेशात भेळ ही प्लेटीतचं देतात त्यामुळे इथे खरे खोटे वाचक कळत नाहीत. अकोल्यालापण चौपाटीवर भेळ स्टीलच्या प्लेटीतचं देतात. कितीतरी वर्ष मागे पडलीत वाण्याचे सामान पुर्वी पेपराच्या कागदात यायचे. भेळ वगैरे कागदावर मिळायची. काही ठिकाणी द्रोण वगैरे वापरतात. त्यामुळे माझ्यामते खरा वाचक भेळीचे कागदपण वाचतो हा निकष आता उरलाच नाही. असो.

दक्षिणा रुचीरा माझे ही फेव्रीट. रावणभात व एक गुरनळ्या नावची रेसीपी आहे. त्यात आत मोगर्‍याच्या कळ्या घालायच्या व त्या गुरनळ्या फोड्ल्याकी आत फुले. ही माझी सर्प्राइज ची जाम कल्पना होती. शिवाय रंगीत खीर.
अगदी डिसने अ‍ॅनिमेशन सारखी च वाटायची. आईकडे अजूनही एक संसाराची मुलींना माहिती टाइप पुस्तक होते ते ही फार जानी.

वडिलांकडे जुन्या संगीत नाट्कांची पुस्तके होती ती वाचून संवाद म्हणायचे, फोटो बघायचे, संगीताच्या नोटेशनची पुस्तके काहीही न समजता वाचायची. हे दुपारचे उद्योग होते.

मला वाटतं तो मेनू रावणभात नसून रावण-पिठलं आहे. विदर्भात रावण-पिठलचं करतात. मग ते भाताबरोबर खातात. असो. चुभुदेघे!

रावण पिठल्या मध्ये बेसन, तिखट, तेल सगळं एक एक वाटी घेतात. रावणासारखा अघोरी माणूसच खाऊ शकेल असे वाटल्याने नाव ठेवले असेल रावणपिठले. पण कलियुगाची डिमांड अशी की त्याचीही पाकृ लिहून पुस्तकात छापावी लागली! Wink

>> ह्या बीबीवर रावणपिठले , भेळ , रावण भात बद्दल का बोलताय लोक्स << मी पण हेच लिहायला आले होते इथे..
दिप्स मामीने फोकस बदलला बीबीचा.. Lol

>>खरा वाचक भेळीचे कागदपण वाचतो हा निकष आता उरलाच नाही
Rofl मग आता त्या स्टील प्लेटी वरचे नाव/लेबल वाचणार्‍याचा निकष लावायला हवा .. Proud

Metaphor, रूपक, उपमा इत्यादी असं काही आता उरलंच नाही. >>खरा वाचक तुंबलेल्या BB वरचे प्रत्येक निरर्थक पोस्ट वाचतो, हा निकष कसा वाटतो ?

खरा वाचक तुंबलेल्या BB वरचे प्रत्येक निरर्थक पोस्ट वाचतो, हा निकष कसा वाटतो ?
>>>>
ही खर्‍या वाचकाची नसून 'स्थितप्रज्ञ' वाचकाची प्रतिज्ञा आहे.. महाभारतात जर मायबोली असती तर कृष्णाने 'स्थितप्रज्ञस्य का भाषा' वर अर्जुनाला वेगळेच उत्तर दिले असते.. (त्यामुळे झक्कींचे नाव मात्र अजरामर झाले असते हे नक्की Happy )

Pages