साथ
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
94
कोकणात भटकताना मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याच्या शिवापूर गावी पोचले. जातच राह्यले. अश्याच एका शिवापूर भेटीत डागदराकडून घराकडे परत जाणारे हे आजोबा आजी भेटले.
आजोबांना आधार देत देत हळूहळू घरापर्यंत नेणार्या आजी, हात पाय सुजलेले आजोबा... घर बहुतेक गडकरवाडीच्या डोंगरात म्हणजे थोडा चढ मग वहाळ ओलांडायचा आणि मग एक छोटा पण खडा चढ संपवायचा की आलंच घर...
सगळं कसं एकमेकांच्या साथीनं.. किती काय काय दिवस पाह्यले असणार त्यांनी. कित्ती वर्षं कुणास ठाऊक. आत्ताचेही दिवस कष्टाचे असतीलच की पण तरी डोक्यात जास्वंद का होईना माळण्याइतक्या आजी उत्साही होत्याच.

ते दूर जाईपर्यंत, डोळ्यात आलेल्या पाण्यामुळे मला दिसेनासे होईपर्यंत मी त्यांच्याकडेच बघत राह्यले. हे असंच कायम रहावं अशी इच्छा करत आणि तोच आशिर्वाद त्यांच्याकडे मागत....

- नी
विषय:
प्रकार:
शेअर करा
छायाचित्रांपेक्षा तुझी वरची
छायाचित्रांपेक्षा तुझी वरची वाक्य.. तुझ्या भावना फार फार आवडल्यात.>>>>> अनुमोदन
खुप सुंदर आणी ह्रदयस्पर्शी
हे मी पाहिलच नव्हतं. सुंदर!
हे मी पाहिलच नव्हतं. सुंदर! भावना पोचल्या.
छान फोटोस्टोरी!
छान फोटोस्टोरी!
दिनकर दिघे नावाचा ओतूरच्या
दिनकर दिघे नावाचा ओतूरच्या कॉलेजात शिक्षक असलेला इसम इथे माबोवर कुणाला माहिती आहे का?
या इसमाने माबोवरून/ माझ्या ब्लॉगवरून या वरच्या तीन फोटोंपैकी एक उचलून स्वतःच्या फेबु वॉलवर डकवलाय. शर्मिलाने ते पकडलं तर आधी तिच्या कमेंटस डिलिट केल्या मग शेवटी मानभावीपणाने 'नीरजा यांच्या सौजन्याने' असं लिहिलंय.
पण ना मला कधी परवानगी विचारली होती ना मी ती कधी दिली होती आणि तसंही माझ्याकडे सौजन्य शून्य आहे.
तर कृपया या अतिशहाण्या माणसाला कुणी ओळखत असाल तर मला इथे सांगा.
Pages