साथ

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

कोकणात भटकताना मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याच्या शिवापूर गावी पोचले. जातच राह्यले. अश्याच एका शिवापूर भेटीत डागदराकडून घराकडे परत जाणारे हे आजोबा आजी भेटले.
आजोबांना आधार देत देत हळूहळू घरापर्यंत नेणार्‍या आजी, हात पाय सुजलेले आजोबा... घर बहुतेक गडकरवाडीच्या डोंगरात म्हणजे थोडा चढ मग वहाळ ओलांडायचा आणि मग एक छोटा पण खडा चढ संपवायचा की आलंच घर...
sath-01.jpg

सगळं कसं एकमेकांच्या साथीनं.. किती काय काय दिवस पाह्यले असणार त्यांनी. कित्ती वर्षं कुणास ठाऊक. आत्ताचेही दिवस कष्टाचे असतीलच की पण तरी डोक्यात जास्वंद का होईना माळण्याइतक्या आजी उत्साही होत्याच.

sath-02.jpg

ते दूर जाईपर्यंत, डोळ्यात आलेल्या पाण्यामुळे मला दिसेनासे होईपर्यंत मी त्यांच्याकडेच बघत राह्यले. हे असंच कायम रहावं अशी इच्छा करत आणि तोच आशिर्वाद त्यांच्याकडे मागत....

sath-03.jpg

- नी

विषय: 

ती कोकणातल्या बर्‍याचश्या विशेषतः डोंगरातल्या प्रत्येकच गावाची कहाणी आहे.
>>>>अगदी बरोबर. त्यांच्या कष्टांना पर्याय नाही नव्हे अंतच नाही. आपण एक दिवस चाललो तर त्याचं कौतुक करत बसतो, पण म्हणतात नां रोज मरे त्याला कोण रडे. मलाही अगदी फोटो बघून गलबलून आले.

नीधप, मस्त फोटो आहेत...

कोकणातल्या म्हातार्‍यांचं मला कायम कौतुक वाटतं.. शरीराने वगैरे थकलेले दिसतील पण मनाने??? तुम्हालाच म्हातारे वाटायला लावतील!!! आणि उत्साह तर भरपूर.... आमच्याकडच्या कुणबी माम्याना फिगर मेंटेन करायला विषेष परिश्रम घ्यावे लागत नाहीत. बाजारात जायचय ना... हे काय इथे तर आहे पल्याड पाच सहा किलोमीटरवर Happy

नीरजा,
तुझा देवनागरी वॉटरमार्क फार मस्तं आलाय एकदम झाडाची सावली पडल्या सारखा.

धन्स लोक्स..

>>साथ खरी की खोटी ते तेव्हाच कळेल नाही ?<<
खरंय. जगून झाल्यावर शेवटीच कळणार मिळालेली आणि आपण दिलेली साथ किती खरी/ खोटी. Happy

नी, फोटो फिचर छान आहे.

आजी आजोबांना अजून केवढा तरी पल्ला एकत्र गाठायचाय असचं सूचित होतय चित्रांमधून.. फारच भावस्पर्शी Happy

बरच काही मनात येऊन गेलं .......

या वयात कसं वाटत असेल ना? दोघांपैकी एकाला आधी जायचयं - कोण साथ आधी सोडेल? मागे एकटं कसं रहायचं? उद्याचा दिवस पण बोनस ठरेल का?

तरूण वयात background ला असलेले हे प्रश्न म्हातारपणी क्षणोक्षणी मनात येत असतील ना .... खरंतर इगो, कटूता दूर सारून जीवनाच्या संध्याकाळी केलेली एकमेकांची साथ किती सुखद असेल किंवा निदान करता तरी येईल. किती आश्वासक असेल. पण त्याचबरोबर एक भिती ही .....

माझ्या आजीच्या निधनानंतर आजोबांची जगण्याची इच्छाच नाहिशी झाली होती. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या मुलं-सुना-नातवंडांनी भरलेल्या घरात ते एकाकी वाटायला लागले. आजी गेल्यानंतर अडिच महिन्यात ते गेले - त्यांनी तारीखही सांगून ठेवली होती आणि त्याप्रमाणे अचानक त्या दिवशी आजारी पडून ते गेले.

Pages