हेमलकशाचे श्रमसंस्कार शिबिर

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

बाबा आमट्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली आणि त्यातूनच आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ यां ठिकाणी प्रकल्प उभे राहिले. 'श्रम हि है श्रीराम हमारा' हा त्यांचा नारा होता. 'अपंग, कुष्ठरोगी जर असे आदर्श प्रकल्प उभारू शकतात, तर तुम्ही मागे का?', असा सवाल ते नेहमी तरुणांना करत. तरुणांनी श्रमाला महत्त्व द्यावं, घाम गाळावा, हा त्यांचा आग्रह असे. त्यातूनच बाबांनी सोमनाथला श्रमसंस्कार शिबिर सुरू केलं. स्वतः श्रम केल्याशिवाय कष्टकर्‍यांची दु:खं कळत नाहीत, श्रमाचं महत्त्वही पटत नाही, हे जाणून बाबांनी ही शिबिरं दरवर्षी घेतली जाऊ लागली. या शिबिराला दरवर्षी भारतभरातून लहानमोठी मंडळी हजेरी लावतात. श्रमदान करतात. ज्येष्ठ, प्रयोगशील कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. एका वेगळ्याच आयुष्याशी ओळख करून घेतात.

विदर्भातील भयंकर दुष्काळामुळे यंदा हे शिबिर पहिल्यांदाच हेमलकशाला होत आहे. डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे यांच्या कार्यामुळे या प्रकल्पाची महती जगभरात पोहोचली आहे. यंदा हे शिबिर १५ ते २२ मे, २०१०, दरम्यान आयोजित केले आहे.

डॉ. अच्युत गोडबोले, तरुण संशोधक व ऊर्जाक्षेत्रात भरीव कार्य केलेल्या डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, तसंच आनंदवनातील ज्येष्ठ कार्यकर्ते यंदा शिबिरार्थींशी संवाद साधणार आहेत. दिवसभराच्या शारीरिक व बौद्धिक परिश्रमांनंतर श्री. सुधीर गाडगीळ, श्री. विसुभाऊ बापट यांचे कार्यक्रमही संध्याकाळी आयोजित केले आहेत.

अधिक माहितीसाठी hemalkasacamp@gmail.com इथे अथवा
अनिकेत प्रकाश आमटे
लोक बिरादरी प्रकल्प
मु. हेमलकसा. पो. ता. भामरागड
जि. गडचिरोली. (महाराष्ट्र) -४४२७१०

या पत्त्यावर संपर्क साधू शकता.

भ्रमणध्वनी - ९४२३२ ०८८०२

प्रकार: 

नानबा,

हेमलकशाच्या श्रमसंस्कार शिबिरासाठी असा कुठलाही ग्रूप नाही. सोमनाथच्या शिबिरांसाठीचा आहे. तसंच, शिबिरासाठी संपर्क साधायचा असल्यास वर दिलेल्या ईमेल पत्त्यावर किंवा भ्रमणध्वनीवरच संपर्क साधावा. Happy

हेमलकशाच्या श्रमसंस्कार शिबिरासाठी असा कुठलाही ग्रूप नाही. >>>
बरोबर आहे..
पण क्रुपया खालिल लिन्क पहा आणि join करा...

http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=26380809&tid=543303555393772420...

माहितीबद्दल धन्यवाद चिनूक्स. जिने पुर्वी तुझ्याकडे चेक पाठवला होता ती ऑफिसमधली १ मैत्रिण जाण्याचे ठरवत आहे Happy