पुण्यातील म. सा. स. ग्रंथप्रदर्शन - २०१०

Submitted by हर्ट on 29 March, 2010 - 00:14

नंदनने सुचवल्याप्रमाणे मी इथे हा बीबी उघडत आहे जेणेकरुन त्या बीबीवर भेट न देत असलेली मंडळी चटकन इथे येऊन लिहितील.

मराठी साहित्य संमेलन, ग्रंथप्रदर्शन -२ ०१०, पुणे इथे अजून पुस्तकांची विक्री सुरु आहे का? कुणीकुणी भेट दिली? कुठली पुस्तके विकत घेतलीत? नवीन पुस्तके कुठली घेतली? नवीन काय काय होते.. हे सर्व लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघना- Happy रसेलचे Marriage is legalized prostitution आठवले एकदम. ते एकदा इथे माबोवर टाकायला हात शिवशिवतात कधीकधी.
स्वातीने माझ्या विपुत दिलेले "भारतीय लग्नसंस्थेचा इतिहास" डाऊनलोड करणे.

नीधप/ नंदिनी- सहमत.

रसेल एक डोक्याला भुंगा विचारवंत.. तर्क, तार्कीक विचार ह्यावरची त्याची भाष्ये अजब होती.. वर रैनाने उल्लेख केलेले मत त्याच्या मॅरेज अँड मोरल्स ह्या पुस्तकात लै विस्ताराने येते..

मेघना- रसेलचे Marriage is legalized prostitution आठवले एकदम. ते एकदा इथे माबोवर टाकायला हात शिवशिवतात कधीकधी
>> टाक!

मेघना, कवितेकरता थँक्स!
आणि रैना, लिंक बद्दल! Happy

डिसेंबर २०१०, ठाण्यातील सासं- पुप्रमधील खरेदी.
(दुसरा धागा नाही काढला सॉरी. हेच गोड मानुन घ्या. प्लीज.) यातील काही पुस्तके मित्रमैत्रिणींसाठी आहेत.
१. प्राक्तनाचे संदर्भ- द. भा. धामणस्कर (कवितासंग्रह)
२. आई समजून घेताना - उत्तम कांबळे
३. माणूसपणाचं भिंग बदलल्यावर- मल्लिका अमर शेख (कवितासंग्रह)
४. हाडकी हाडवळा- नामदेव ढसाळ
५. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - राजवाडे. प्रस्तावना: डांगे
६. जागतिक रंगभूमी (पूर्वरंग आणि पश्चिमरंग)- माणिक कानेड (मौजेने हँडबिलावर जागतीक लिहीले आहे). Proud
मागील आणि या संमेलनात मौजेने जरा खपाच्या दृष्टीने डोकेबाजी केली आहे. एकत्रित सेट पॅक ठेवतात. खप जास्त होतो. उदा- सुनीताबाई सेट, नारळीकर सेट,गौरीदे सेट वगैरे.
आणि मौज/ज्योत्सना/रोहन एकत्रित ठेवतात. खरं म्हणजे मौजेच्या स्टॉलवर फिरकणार नाही असे ठरवले होते, पण Sad
७. मुलं घडताना घडविताना - रेणू दांडेकर
८. चित्रलिपी- वसंत आबाजी डहाके (कवितासंग्रह)
९. निवडक राजन गवस (ढव्ह आणि लख्खं ऊन) संपादक- रणधीर शिंदे. एकंदरित लोकवांङमय गृहाचे कलेक्शन फार चांगले वाटले. खपाच्या दृष्टीने जरा उदासीन आहेत ते.
त्यांनी ही जी निवडक सीरीज काढली आहे, ती चांगली आहे (असे चाळुन वाटले). असो.
१०. सृजनाचे साक्षात्कार/ निशःब्दता ओलांडताना - संपादन- अंजली मुळे. (दृश्यकथाकार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची संपादित मनोगतं)
११. कातकरी विकास की व्यवस्थापन - मिलिंद बोकील
१२. टीकास्वयंवर- नेमाडे (कधीचे शोधत होते. मिळाले एकदाचे)
१३. लज्जागौरी- रा. चि. ढेरे
१४. बंदिश - किरण फाटक ( जरा बेसिक आहे. पण ठिक)
१५. एका जरा मोठ्या मुलीला इंग्रजी शिकवायला म्हणून. एव्हरिडे इंग्लिश- जेन साही. ज्योत्सना प्रकाशन.
१६. निसर्गायण- दिलीप कुलकर्णी. राजहंस महान आहेत. एरव्ही २५ टक्के सूट देतात. इथे ती स्कीम लागू नाही म्हणून सांगीतले. असो.
१७. अर्धी मुंबई- युनिक फीचर्स
१८. साहित्य आणि अस्तित्वभान- १ दिपुचित्रे. शब्दालय प्रकाशन. हे माहितच नव्हते. यांचा स्टॉक चांगला होता.
१९. कविता रती दिवाळी अंक २००५-
२०. स्त्रीवाद- संपादन सुमती लांडे (शब्दालय)
२१. भारतीय संदर्भातून स्त्रीवाद- स्त्रीवादी समीक्षा आणि उपयोजन शोभा नाईक
२२. कबीर गाता गाता- नीला भागवत
२३. लोकसाहित्य शोध आणि समीक्षा - रा चि ढेरे
२४. पिवळ्याधम्मक छत्रीतील मुलगी - उदय प्रकाश अनुवाद गणेश विसपुते
२५. धाकट्या नजरेतून: अल्का गोडे
२६. लिंगभाव समजून घेताना: कमला भसीन (भाषांतरः श्रुती तांबे)
२७. निवडक कमल देसाई काळ्या सुर्याखालच्या गोष्टी संपादक- संजय आर्वीकर
२८. वनांत जनातः अवचट
बाकी काही लहान मुलांची पुस्तकं घेतली.

ललिता, शर्मिला भेटल्या, शोनुने डिच मारला, मेघनाची भेट थोडक्यात हुकली. तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे बिलात घोळ आणि एक्स्ट्रा पुस्तकं आली दोन (महान). नंतर हिशेब कसा टॅली करतात कोण जाणे. इतक्या लांब नसते तर परत करुन आले असतेच. असो.
अध्यक्षीय भाषणाची प्रत उपलब्ध नव्हती. संयोजन पुण्यातल्या पेक्षा चांगले वाटले. स्टॉल्सचा एक तक्ता तरी होता (तो फारसा उपयोगी नव्हता, पण होता. :फिदी:). कडेकोट पोलिस बंदोबस्त होता.

यावेळेस प्रकाशकांचे स्टॉल जरा जास्त चांगले वाटले (विक्रेत्यांपेक्षा). पुण्यात नसल्याने कदाचित पण माहितीही देत होते व्यवस्थित, आणि चक्कं 'अहो हे पुस्तक पहा हो, पहायला पैसे लागतात का' वगैरे ऐकले. (सुदिन, सुवेळ) Proud

बुकगंगा डॉट कॉम ने जबर्‍या तामझाम वाला स्टॉल ठेवला होता, पीसी आणि ब्राऊझ करायची सोय वगैरे.
त्यांचा खरं म्हणजे स्टॉक अजून लैच मर्यादित आहे,पण मार्केटिंग सही जा रैला है.

साहित्य अकादमी आणि एनबीटीने आणि सिबीटीनेही यावेळेस जाम पाटीटाकु स्टॉल ठेवले होते. त्यांचे अक्षरधारातले कलेक्षन उत्तम म्हणायची वेळ आली.

मराठी स्नॉव्हेल (ऑडियो बुक?) म्हणे- याचे प्रीबुकिंग चालू होते. जी ए आणि आणखी दोन तीन कथा असे काहीतरी होते. जरा पॅम्फ्लेट पाहून सांगावे लागेल. कोणाला हवे असलेच तर सांगते. पण effort not bad होता.

अनुवादित पॉप स्वरूपाचे प्रचंड कलेक्षन दिसले. बरीच रेंज आहे यात. वाट्टेल त्या लेखक/पुस्तकाचे अनुवादित साहित्य दिसले.

रच्याकने: अ‍ॅटलस श्रग्ड चा मराठी अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी केलेला दिसला. अ‍ॅटलसचा कधीकाळी मराठी अनुवाद दिसु शकतो हेच भारी वाटले. चाळायचे राहिले. Sad कोणी चाळले असेल/वाचले असेल तर अपडेटस द्या ना कृपया

सही पुस्तक खरेदी केलेली दिसतेय रैना.
मराठी स्नॉव्हेल बद्दल ज्ञातीला विचार, ती त्या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहे/होती. डीसी गटगला तिने याबद्दल माहिती दिली होती.

रैना, अ‍ॅटलास श्रग्ड पॉप स्वरुपाचे कधीपासून झाले? Happy पुस्तक खरेदी मात्र जोरदार केली आहेस हो.. ग्रेटच.. एक प्रकारे अधिकाधिक साहित्य मराठीत येत आहे हे महानच आहे की. केवळ मराठी वाचणार्‍या कित्येकांना ते किती सुलभ आहे. भाषांतराचा दर्जा कसा आहे माहिती नाही पण माझ्या मते जसे अनुवादित साहित्य वाढेल तसा दर्जादेखील वाढेल (स्पर्धेमुळे).

ए सॉरी रे टण्या. अ‍ॅटलसला पॉप म्हणायचे नव्हते. दोन मुद्दे मिक्स झाले. बाकी काय पेशन्स असेल नाही अ‍ॅटलसचा अनुवाद करायचा म्हणजे.

एक प्रकारे अधिकाधिक साहित्य मराठीत येत आहे हे महानच आहे की. >>ए हो. तेच म्हणायचे होते. खरंच छान झाले हे. मराठी वाचकांना इंग्रजीचे दडपण घ्यायला नको अजिबात.

रुनी- धन्यवाद. एकदा ज्ञातीला विचारायला हवे.

अजून कोणी इथे आपली लिस्ट टाकली नाही तर मी माझे पोस्ट काढुन टाकेन दोनेक दिवसात. मागच्या वेळेस सर्वांनी इथे आपापली यादी टाकली त्यामुळे मजा आली खरंच, म्हणून इथे पोस्ट टाकले सहज. Happy

आता कोणी गेलंच नसेल तर लिस्ट कशी टाकणार बाय!! Happy
तू तूझी लिस्ट काढू नको. पुढच्या वेळेला तुझ्या घरी येताना हल्लाबोल ची तयारी करून यायला बरं.. Happy

वॉव रैना, चौफेर खरेदी केलीस पुस्तकांची. मला ९, १२,१३, २७. अर्थातच, तुझे वाचून झाली की प्लीज. Happy
सुदिन, सुवेळ >> सुस्थळी गेली मुलगी. (असे पुणेकर म्हणतायत.):फिदी:
मला पुण्यातल्या सासंची आठवण आली, ग्रँड धमाल केली होती आपण. Happy

अरे वा! एक धड चांगला मोठ्या अक्षरातला नकाशा लावायला काय त्रास आहे की कल्पकता? Uhoh
क्रेडिट कार्डाने पेमेन्ट चालू केले का? बाकी, लिस्ट भारी.

कोणी अध्यक्षीय भाषणाला गेले होते का?

ही माझी यादी:
लिहावे नेटके (माधुरी पुरंदरे)
छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि रहस्य (नरहर कुरूंदकर)
तुकाराम (भालचंद्र नेमाडे)
महापुरुषांच्या नजरेतून स्त्री (मंगला आठलेकर)
बापमाणूस (सं. निखिल वागळे)
विवाहसंस्थेचा इतिहास - समग्र राजवाडे खंड ७ व ८ (राजवाडे)
अंतकाळाची बखर (नंदा खरे)
प्राक्तनाचे संदर्भ (धामणस्कर) (रैना, :))
सुनीताबाई (मंगला गोडबोले)
चांगदेव चतुष्ट्य (यांतली दोन पॉप्युलरच्या ष्टॉलवरही संपली होती. ती साकेतवाल्यांनी हुडकून दिली!)
शब्देविण संवादु (राणी दुर्वे)
ओरिगामी (रत्नाकर महाजन)
कोबाल्ट ब्लू (सचिन कुंडलकर)
तमस (भीष्म साहनी)
कर्वालो आणि गूढ माणसं (पूर्णचंद्र तेजस्वी) (शेवटची प्रत!)

बाकीचे डिटेल्स आज रात्री...... Happy

मेघना, नंदा खर्‍यांचे अंतकाळाची बखर की अंताजीची बखर? अंताजीची बखर मिळाले असेल तर लैच लकी आहेस तू..

काय छान खरेदी केलिये ग. Happy
तुमच्या पुस्तकांच्या लिस्ट्स बघून वाचायच्या आणि घ्यायच्या यादीतली पुस्तकं वाढली.

अग्गं- मेघना अंताजीची बखर मिळाले? काय सांगतेस..
नेमके मी यावेळेस ग्रंथाली भुक्कड म्हणून स्कीप केले. Sad
- तुकाराम (भालचंद्र नेमाडे)- हे मी चाळले. पण त्यात नेमाड्यांचे काहीही भाष्य दिसेना. मग सार्थ नाही म्हणल्यावर आपल्याला झेपणार नाही म्हणून ठेऊन दिले. आता कसे आहे ते तू सांग.
-महापुरुषांच्या नजरेतून स्त्री (मंगला आठलेकर) >> हेही चाळले. Happy
- लिहावे नेटके (माधुरी पुरंदरे) >> हे मी मध्यंतरी घेतले होते. फार उत्तम काम केले आहे. वर्कबुक्स सोडवायला हवीत.

आशू खरंच- यावेळेसही टण्या/अर्भाट/साजिरा/तू/ पूनम यांची खूप आठवण आली. मज्जा आली होती ना ?

आता कोणी गेलंच नसेल तर लिस्ट कशी टाकणार बाय!! >> ओके नीरजा. आता मेघनाने यादी टाकली म्हणून नो प्रॉब्लेम. Happy

क्रेडिट कार्डाने पेमेन्ट चालू केले का>> छे छे. अजून कुठे. मॅन्युअल बिल, बिलात चुका, लागणारा वेळ, वाढलेली गर्दी, आणि वट्टं नगात रुपये. यातले सगळे तसेच आहे पूनम.

'अंताजीची बखर' नव्हे मंडळी. ते औटॉफ्प्रिंट आहे. पण येत्या दोनेक महिन्यात आवृत्ती येईल असे 'मनोविकास'वाल्यांनी सांगितले. हा त्याच्या पुढचा भाग 'अंतकाळाची बखर'.

ही दोन राहिली टंकायची-
सिनेमाचे दिवस पुन्हा (विजय पाडळकर)
राइनर मारिया रिल्केची निवडक पत्रे (अनु. निखिलेश चित्रे)
आता जाऊन अशोक केळकरांचं 'रुजुवात' घेऊन येईन, असं वाटतं आहे!

ही शर्मिला फडक्यांची लिस्ट

१) मेरु पर्वताच्या पल्याड- प्रकाश गोळे
२) पाश्चिमात्य कलेचा संक्षिप्त इतिहास- प्रा.अनिल बापट
(रसग्रहणात्मक्)(प्रागैतिहासिक काळ ते आधुनिक काळ)
३) स्मरणसावल्या- मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष
४) अनोळखी प्रदेशात- सुनंदा भोसेकर
५) मराठी नियतकालिकांतील दृश्यकलाविचार- रमेशचंद्र पाटकर
६) सृजनाचे साक्षात्कार- संपादन अंजली मुळे (स्पॅरो)
(दृश्यकथा कार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची संपादित मनोगतं)
७) नि:शब्द ओलांडताना- संपादन अंजली मुळे(स्पॅरो)
(मौखिक कथा कार्यशाळेतील स्त्रियांची संपादित मनोगतं)
८) माधव सातवळेकर-ज्योत्स्ना प्रकाशन
९) दीनानाथ दलाल- ज्योत्स्ना प्रकाशन
१०) सफरनामा- प्रा. के.ज.पुरोहित
११)माझी मुंबाई- वा.वा. गोखले
१२) पूर्णिया- अनिल अवचट
१३) खलिल जिब्रान-भावानुवाद विश्वास साक्रीकर
१४) भारतातील आदिवासी वंश- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
१५) लालकोवळा काळोख- गुरुनाथ धुरी
१६) आर्यांच्या शोधात- मधुकर केशव ढवळीकर: राजहंस प्रकाशन
१७) कोणे एके काळी सिंधु संस्कृती- मधुकर केशव ढवळीकर: राजहंस प्रकाशन
१८) अभिधा नंतर (दिवाळी २००३ ते २००८ एकत्रित अंक, मधले काही अंक आणि अरुण कोलटकर विशेषांक)
१९) खेळ (दिवाळी २००६ ते २०१० एकत्रित अंक)
२०) वलय,भुमिका,प्रवास- सानिया
२१) विश्रब्ध शारदा- खंड ३
२२) राजधानीतली बारा वर्षं- द्वा.भ.कर्णिक
२३) लिलियनची बखर- अनंत सामंत
२४) जन-मन- अरुण टिकेकर
२५) समाज स्पंदने- अरुण टिकेकर
२६) प्रकाशकनामा(आत्मचरित्र)- मधुकाका कुलकर्णी
२७) आयलँड्स ऑफ डेव्हलपमेन्ट- निळू दामले
२८) तुका सेज- दिलिप चित्रे

अजून एक पुस्तक गानयोगी-अंजली किर्तने(पं.डि.व्ही.पलुस्कर चरित्रग्रंथ) घेतलं आहे पण ते आदल्या दिवशी यशवंतरावला झालेल्या पुस्तक आणि डॉक्युमेन्टरीच्या प्रकाशनसमारंभात घेतलय. केवळ अप्रतिम होता तो कार्यक्रम आणि हे पुस्तकही अत्यंत सुरेख आहे.

Pages