मायबोली का बंद होती?

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मायबोली तांत्रीक कारणामुळे बंद होती हा संदेश/मजकूर तुम्ही गेले २ दिवस पाहिला असाल. नेमकं काय झालं होतं? आणि एवढा वेळ का लागला?

मायबोलीचे सर्व्हर ज्या डेटा सेंटरमध्ये आहेत तिथे भारतीय वेळेप्रमाणे सोमवारी संध्याकाळी ६:३० वाजता वीजपुरवठा खंडीत झाला. तिथे जनरेटर आणि UPS असूनही वेळेत वीजपुरवठा पुन्हा सुरू न झाल्याने बरेच सर्व्हर बंद पडले.

सर्वसाधारणपणे अश्या प्रसंगी पुन्हा वीज आल्यावर सर्व्हर चालू होऊन सर्व सुरळीत चालायला लागतं. ह्यावेळी मात्र बरेच सर्व्हर चालू (boot) झाले नाहीत. त्यात मायबोलीचेही सर्व्हर होते. डेटा सेंटरने सांगीतलं की आधीचा संगणक चालू होत नसल्याने नवा देत आहोत. तो अमेरिकेतील वेळेनुसार रात्री २:०० ला मिळाला. हा सर्व्हर मिळाला असला तरी तो पुर्णपणे नवा असल्याने त्यात मायबोलीला लागणारी प्रणालीची स्थापना (setup) करायची होती. मंगळवारी पहाटेपासून त्यावर काम सुरू केलं. सर्वात महत्वाचं म्हणजे मायबोलीकरांनी लिहिलेलं सर्व लेखनसाहित्य, प्रकाशचित्रं, इतर फाईल्स पुन्हा चढवल्या आणी आज मायबोली नेहेमीसारखीच पुन्हा दिसू लागली.

मायबोलीवरचा सर्व Data रोजच्यारोज संग्रहीत (Backup) केला जात असल्याने एकही फाईल अथवा अक्षर हरवलं नाही. सोमवारी बंद होण्यापूर्वी ज्या स्थितीत मायबोली होती त्याच स्थितीत मायबोलीला इतक्या कमी अवधीत आणता आलं.

या गडबडीत एक राहूनच गेलं. सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! Happy

विषय: 
प्रकार: 

सगळ्यांच लिखाण आहे तसं आहे ...पण माझ बरचस लिखाण गायब आहे , मी कितीतरी ,शेकडो कविता केल्या होत्या त्या कुठे गेल्या ? .जाऊ दे .....!

अ‍ॅडमिन टीम, दोन दिवस मायबोलीचा उपास चांगलाच जाणवला. तुमचं सर्वांचं इतक्या झटपट सर्वकाही सुरळीत केल्याबद्दल कौतुक व धन्यवाद! आणि सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

धन्यवाद!
अ‍ॅडमिन, http://www.maayboli.com/ या मुख्य पानावर अजुनही
Maayboli.com is down due to technical difficulties .... kanokani.maayboli.com are being restored
March 16, 2010 00:40 am EDT

हेच दिसतय ??!!

मामी तुम्ही डेक्कन क्रॉनिकल मध्ये शोधताय का? की निझाम समाचार मधे?>>> सियासत आणि हिन्दी मिलाप राहिले की साहेब. Proud

अ‍ॅडमिन टीमचे आभार. साईट पूर्ववत करायला तुम्हांला दोन दिवस कंबर कसून काम करावं लागलं असेल ह्याची पूर्ण कल्पना आहे, तरीपण आम्हांला खरंच अजिबातच करमत नव्हतं. आता सुरू झालं असेल म्हणत थोड्या थोड्या वेळाने सारखं सुरु झालं का बघत होते.

अ‍ॅडमिन टीमचे अनेक आभार व नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------
एक सुचना आहे - लेखक, कवींना.
तुम्ही करतच असाल,
पण जे नसतील करत त्यांच्यासाठी:

आपण जे लिहू त्याची एक प्रत (वर्ड्/पी.डी.एफ इत्यादी स्वरूपात) आपल्याकडे ठेवावी.
मी पी.डी.एफ स्वरूपात ठेवतो.

आपण ज्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया देतो त्याही अशाच सेव्ह कराव्यात.

धन्यवाद अ‍ॅडमिन टीम. तुमच कौतुक कराव तितक थोड आहे.दोन दिवस अगदी करमलं नाही !<<जरा वेगळा मेसेज दिसला की म्हणजे आता लौकर चालू होईल बहुतेक असा समज करून घेत होतो >>
अगदी अगदी..
तुम्हाला आणि सर्व माय्बोलीकरान्ना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .

मायबोलीची किती सवय झालीय ते कळले साईट अशी अवचित बन्द पडल्यावरच! अगदी करमले नाही - वेगवेगळ्या मराठी साईट्स पण पाहिल्या गेल्या मायबोली नसल्याने - आणि मायबोलीची गुणवत्ता किती उच्च प्रकाराची आहे हे ही पटले (मी तर भक्तच आहे - अगदी पाच - दहा वेळा दिवसातून फेरी मारतेच!). एडमिन टीम चे खूप अभिनन्दन!

अमी

अ‍ॅडमिन, मायबोली साईट पुर्ववत आणण्याकरता तुम्ही अव्याहत प्रयत्न केलेले वरील महितीवरुन कळतेच आहे. धन्यवाद आणि अभिनंदन!
उत्सुकतेपोटी विचारतेय, मायबोली सर्व्हर्स कुठ्ल्या डेटा सेंटर्स मध्ये आहेत? माझी कंपनी (मी जिथे काम करते) ती सुद्धा डेटा सेंटर बिझनेस मध्ये आहे म्हणून ही उत्सुकता! Happy

धन्यवाद अन अभिनंदन अ‍ॅडमीन टीम ,
सर्व मायबोलीकरांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !
नेमकं गुढीपाडव्याला मायबोली बंद पडली त्यामुळे जरा जास्तच वाईट वाटलं .

अ‍ॅडमिन टीम
तुमचा डिझास्टर रिकव्हरी प्लॅन प्रकाशित करा पाहू Happy
बर्‍याच व्यावसायिक कंपन्यांना देखील इतकी पूर्ण रिकव्हरी क्वचितच जमते . त्याबद्दल खास अभिनंदन!

कौतुक आहे मायबोली एडमीन टीमचे.. नि अभिमान आहे आम्ही मायबोलीकर असल्याचे !! Happy
संयम सारखा सुटत असुनही संयम ठेवत होतो Proud आता कुठे बरे वाटले.. Happy
नववर्षाच्या शुभेच्छा !! Happy

धन्यवाद अ‍ॅडमिन टीम. २ दिवस अजिबात करमलं नाही. दिवसातुन १०० वेळा चेक करत होते माबो चालू झाली का ते :). आता कसं छान वाटतय. Happy सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नविन वर्षाच्या शुभेच्छा!!! Happy
मायबोलीवरच्या गोष्टी हरवतायत कि काय अस मलाही काल वाटुन जाउन धस्स झालेल. पण तस काहीही झाल नाही माबो परत चालू झाली ह्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद Happy

रैना, मायबोली बंद बघुन आमच्याकडे माझी लेक खूश झालेली.. तुझ 'मायबोली' बंद आहे?? येSSS अस म्हणाली सरळ मला. Sad

अ‍ॅडमीन टीमचं अभिनंदन आणि आभार. गुढीपाडव्याच्या दिवशी बरच बिझी झाले असाल तरीही लवकरात लवकर माबो सुरू केलंत याबद्दल मनापासून धन्यवाद.
नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!

आचार्य रजनीश म्हणत 'व्यसन म्हणजे ज्याच्यावाचून माणसाचं चालू शकतं पण चालत नाही ते !!"

दॅट इज मायबोली Proud

मटा मधील बात्मीत अजुन एक माय्बोलिकर चा उल्लेख आहे दिपाली देशपांडे. अजय भावना व दिपाली चे अभिनंदन!

अ‍ॅड्मिन, अभिनंदन..!!

माबोसाठी आय ड्या खळबळतात कशा?
पाण्यावाचुन मासोळ्या तळमळतात तशा.

Pages