मायबोली का बंद होती?

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मायबोली तांत्रीक कारणामुळे बंद होती हा संदेश/मजकूर तुम्ही गेले २ दिवस पाहिला असाल. नेमकं काय झालं होतं? आणि एवढा वेळ का लागला?

मायबोलीचे सर्व्हर ज्या डेटा सेंटरमध्ये आहेत तिथे भारतीय वेळेप्रमाणे सोमवारी संध्याकाळी ६:३० वाजता वीजपुरवठा खंडीत झाला. तिथे जनरेटर आणि UPS असूनही वेळेत वीजपुरवठा पुन्हा सुरू न झाल्याने बरेच सर्व्हर बंद पडले.

सर्वसाधारणपणे अश्या प्रसंगी पुन्हा वीज आल्यावर सर्व्हर चालू होऊन सर्व सुरळीत चालायला लागतं. ह्यावेळी मात्र बरेच सर्व्हर चालू (boot) झाले नाहीत. त्यात मायबोलीचेही सर्व्हर होते. डेटा सेंटरने सांगीतलं की आधीचा संगणक चालू होत नसल्याने नवा देत आहोत. तो अमेरिकेतील वेळेनुसार रात्री २:०० ला मिळाला. हा सर्व्हर मिळाला असला तरी तो पुर्णपणे नवा असल्याने त्यात मायबोलीला लागणारी प्रणालीची स्थापना (setup) करायची होती. मंगळवारी पहाटेपासून त्यावर काम सुरू केलं. सर्वात महत्वाचं म्हणजे मायबोलीकरांनी लिहिलेलं सर्व लेखनसाहित्य, प्रकाशचित्रं, इतर फाईल्स पुन्हा चढवल्या आणी आज मायबोली नेहेमीसारखीच पुन्हा दिसू लागली.

मायबोलीवरचा सर्व Data रोजच्यारोज संग्रहीत (Backup) केला जात असल्याने एकही फाईल अथवा अक्षर हरवलं नाही. सोमवारी बंद होण्यापूर्वी ज्या स्थितीत मायबोली होती त्याच स्थितीत मायबोलीला इतक्या कमी अवधीत आणता आलं.

या गडबडीत एक राहूनच गेलं. सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! Happy

विषय: 
प्रकार: 

मायबोली चालवणार्‍यांचे अभिनंदन व आभार.
असे म्हणतात की पाडव्याला प्रथम काहीतरी कडू खावे नि मग गोड खावे. मग वर्षभरात कडू गोष्टी वाट्याला येत नाहीत. पाडव्याला मायबोली बंद याहून जास्त कडू काय असणार? पण अनायसे एक जुना रीतिरिवाज पाळला गेला.

नवीन वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा. मायबोलीची व मायबोलीकरांची उत्तरोत्तर उन्नति होवो.

अ‍ॅडमिन टीमला धन्यवाद. डेटा लॉस झाला असेल की काय अशी शंका मला पण आली होती. पण सगळा बॅक्ड अप डेटा आणि प्रणाली इतक्या त्वरेने नव्या संगणकावर टाकली म्हणजे ग्रेटच.

सर्व मायबोलीकरांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा !!!

Pages