तोफू मसाला

Submitted by भान on 10 March, 2010 - 05:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तोफू (माझ्याकडे ४००ग्रॅमचं पॅकेट होतं)
१ मोठा कांदा
२ टोमॅटो (प्युरी करुन)
१ मोठा चमचा आले लसुन पेस्ट
१टिस्पून धना पावडर
१टिस्पून जीरा पावडर
१ चमचा तिखट(आवडीनुसार कमी जास्त करु शकता,मी घरचा काळा मसाला वापरते ति़खटाच्या ऐवजी)
१टिस्पून कसुरी मेथी
१तमालपत्र,२लवंगा,१ वेलची,दालचिनी अर्धा बोटभर,२-३ मिरी दाणे,
८-१० काजु व १ चमचा खसखस (२ तास पाण्यात भिजवून नंतर पेस्ट करुन घेणे)
चवीनुसार मीठ

क्रमवार पाककृती: 

प्रथम तोफूचे छोटे तुकडे करुन थोड्या तेलावर परतुन घेणे.
पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात खडा मसाला टाकावा(१तमालपत्र,२लवंगा,१ वेलची,दालचिनी अर्धा बोटभर,२-३ मिरी दाणे).नंतर त्यात कांदा गुलाबी होउस्तोवर परतावा.त्यात मीठ व नंतर आले लसुनची पेस्ट टाकावी.चांगलं परतुन मग गार करुन मिक्सरमधुन (अगदी)बारिक वाटुन घेणे.
मिश्रण पुन्हा गरम पॅनमध्ये टाकुन परतुन त्यात टोमॅटो प्युरी टाकणे. नंतर त्यात धने जिरे पावडर,तिखट टाकुन परतणे,थोडं तेल सुटायला लागल्यावर त्यात काजु व खसखसची पेस्ट टाकावी व परतुन घेणे.(काजुची पेस्ट टाकल्यावर थोडा वेळ परतणे गरजेचं आहे)
नंतर त्यात तोफूचे तुकडे टाकून व कसूरी मेथी हाताने कुस्करुन टाकावी.झाकण लाऊन एक वाफ येउन द्यावी.
तोफू मसाला तय्यार.:) चपाती,फुलके,किंवा पराठ्याबरोबर कींवा जीरा राईसबरोबर छान लागतील.
मलातरी पनीर व तोफूमध्ये चवीत फरक जाणवला नाहि.

वाढणी/प्रमाण: 
३ जणांसाठी अगदी पोटभर होते
अधिक टिपा: 

काजु वगळले तरी चालावेत.
सर्वात शेवटी क्रिम किंवा साय टाकली तर अजुन छान चव येईल.

माहितीचा स्रोत: 
स्वयंपाकघरातले प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हसरी, तोफू हा सॉय दुधापासून बनवलेला पदार्थ आहे. हा पदार्थ पूर्वेकडच्या देशांमधून आलाय. जपान, चीन, कोरिया तसेच व्हिएटनाम व इंडोनेशिया यांसारख्या देशात हा बघायला मिळतो.

हसरी,टोफू(कि तोफू?) म्हणजे सोया दुधाचे पनीर.अर्थात टोफु घरी बनवणे शक्य आहे कि नाहि माहित नाहि.मी विकत आणलेलं.टोफुमध्ये प्रोटिन्स भरपुर प्रमाणात असतात्.तेच पनीरमध्ये फॅटस असतात.
चवीत दोन्हित मलातरी फरक वाटत नाहि.

रोहिणी तोफू. हा शब्द जपानी आहे. खरंय, तोफूला स्वतःची काहीच चव नाही. त्यामुळे पनीरसारखंच वापरता येतो.

एकदम यम्मी प्रकार वाटतोय....
चक्क घरात तोफू आणला आहे आणि ही रेसिपी वाचायला मिळतेय, तर आज तोफू मसाला केलाच पाहिजे Happy
प्रयत्न कसा होता ते सविस्तर कळवेनच.

मलाही माहिती नव्हतं तोफू काय प्रकार आहे. आत्ता समजलं. Happy मस्त रेसिपी...
रोहिणी, तुला तोफू कुठे मिळाला? जर्मन सुपरमार्केट मधे मिळातो की फक्त एशियन शॉप मधेच?