तोंडलीची रस्सा भाजी

Submitted by अमृता on 18 February, 2010 - 16:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तोंडली, फोडणीचे साहित्य, तिखट, गोडा मसाला, शेंगदाण्याच कुट, गुळ, मिठ

क्रमवार पाककृती: 

तोंडलीचे ४ तुकडे होतील अश्या पद्धतीने कापावी. म्हणजे मधुन एक काप आणि मग त्या २ कापांचे पुन्हा २ काप.
कुकरमधे उकडुन घ्यावी. अगदी फार जास्त शिजवु नये.
कढईत फोडणी करुन तोंडली टाकावी, जरा परतुन घ्यावी. मग त्यात तिखट, गोडा मसाला घालावा. थोड पाणी घालाव. एक वाफ काढल्यावर कुट, चवीनुसार मिठ व गुळ घालावा. अजुन १ वाफ काढावी.
भाजी तयार. गरम गरम पोळ्यांबरोबर खावी.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे
अधिक टिपा: 

वेळ असेल तर बाहेर वाफेवरही शिजवु शकतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आई पण अशीच करते. कुट आणि गुळ भाज्यामध्ये छान लागत. माझ्या सासरी गुळ आवड्त नाही म्हणून मी अशा भाज्या करत्त नव्ह्ते, पण आता ही उदद्याच करुन बघते.
आजच मेथीआम्बा केला - केरी, मेथ्या आणि गुळ.