वांग्याची नॉर्थ इंडियन स्टाईल ने भाजी

Submitted by सशल on 18 February, 2010 - 16:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वांगी, बटाटे, टोमॅटो
तेल, जिरे, हिंग, आलं, हळद, लाल तिखट, धनेपूड, मीठ

क्रमवार पाककृती: 

वांगी, बटाटे आणि टोमॅटो रश्श्यासाठी कापतो तसे तुकडे (dice/cubes) करा ..

तेल तापवून त्यात जिरे घाला .. ते तडतडले की हिग आणि हळद घाला ..

त्यावर बटाटे, वांगी आणि आलं घालून परतून एक वाफ काढा .. मग त्यात टोमॅटो, तिखट, धने पूड, मीठ घालून परत झाकण ठेवून शिजवा .. भाजी तयार!

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे
अधिक टिपा: 

नेहेमीच्या पद्धतीने वांग्याची भाजी करून कंटाळा आला म्हणून हा प्रयोग करून पाहिला .. आणि चव आवडली ..
माझ्या मैत्रिणींकडून ऐकून उत्तर भारतीय पद्धतीने भाजी करायची तर आलं, लाल तिखट आणि धनेपूड घालायची हे बर्‍याच वेळा ऐकलं आहे .. त्यामुळे नविन पद्धतीने काही करायची हुक्की आली की मी असं करून बघते ..

मला स्वतःला आल्याच्या उभ्या सळ्या कापून घालायला आवडतात ..

माहितीचा स्रोत: 
मैत्रिणी, प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तर भारतीय पद्धतीने भाजी करायची तर आलं, लाल तिखट आणि धनेपूड घालायची हे बर्‍याच वेळा ऐकलं आहे >>> म्हणजे मी बर्‍याच भाज्या उत्तर भारतीय पद्धतीने करत होते हे मला आत्ताच कळले. Happy

आमचा एक मित्र अक्षरश: सगळ्या भाज्या अशाच करायचा. तो कूकरमधे फोडणी करुन भाजीत वरील मसाला घालायचा आणि पाणी. ३-४ शिट्ट्या की गाळ तय्यार Wink

अशीच भाजी वांगी न घालता जास्त छान लागते Happy

..

मला इकडे अमेरिकेत मिळणारी वांगी अजिबात आवडत नाहीत .. गर फक्त नावाला आणि बाकीच्या बियाच सगळ्या, त्याही बर्‍याच वेळा कुरूप काळ्या! (:p) .. त्यातल्या त्यात ती Japanese eggplants बरी वाटतात काप करायला .. आणि मध्ये मी त्या Good Eats मध्ये पण ऐकलं की वांग्यात काही nutrients नसतात म्हणून ..पण घरातल्या 'बाकी' लोकांच्या आवडीखातर करायला लागते भाजी!

छान रेसेपी. झटपट आहे. मी पण वाचले होते कुठेतरी की वांग्यांमध्ये काही पोषणमुल्ये नसतात. म्हणुन वांगी आणायचे बंद करुन टाकले होते. आता इथे सध्या छान रेसेपी येतायत वांग्याच्या सो आणायलाच लागतील आता वांगी

वांग्यात काही nutrients नसतात >>> http://www.umext.maine.edu/onlinepubs/htmpubs/4307.htm इथे म्हंटल्याप्रमाणे वांग्यात fat नसतं .. कॅलरीज् कमी आणि good source of fiber .. खरंखोटं देव जाणे!

तू कृष्णाकाठची का ? >> नाही नाही, मी मुंबईची!

>>नेहेमीच्या पद्धतीने वांग्याची भाजी करून कंटाळा आला म्हणून हा प्रयोग करून पाहिल>><<

नेहमीची पद्धत काय मग? खोबरे+ तीळ नाहीतर शेंगदाणे कूट घालून का?
मी अशीच नेहमी वरच्या पद्धतीने करते,वाटणाची कटकट नाय. अधी मधी सोडे नाहीतर कोलंबी घालते. चवीष्ट होते मग. Happy

स्वाती, मासे खात असशील तर सोडे घाल नाहीतर ताजी कोलंबी ह्यात अधून मधून हि भाजी करशील तेव्हा, मिळेल पोषण. नाहीतरी रोज नाही करणार ना तू.? Happy

म्हणून वांग्याला बेगुन म्हणतात का ? मला वाटतं अकबर-बिरबलाच्या गोष्टींत उल्लेख होता असा काही तरी Happy

सशल, आवडली रेसिपी.
उत्तर भारतीय जेवणात कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट मस्ट आहे. त्याशिवाय त्यांचं जेवण होत नाही.

माझ्या सासरी पण अशीच करतात. खरं तर सगळ्याच भाज्या अश्याच करता. कांदा, टॉमेटो, आलं चिरुन(लसूण नसला तरी चालतो), हिरवी मिरची, धण्याची पूड, अन घरात असला तर गरम मसाला आणि हो बटाटे.. हे प्रत्येक भाजीत असतचं.
कदाचित त्याच त्या चवीच्या सगळ्या भाज्या खाल्ल्यामूळे नवर्‍याला मराठी पद्धतीच्या भाज्या जास्त आवडता. Happy

पंजाबी भाज्यात तोच तो मसाला व आलू त्यांच्या पाचवीला पूजलेला असतो. Happy ह. घ्या.

मिळेल त्या भाजीत आलू घालायचाच नाहीतर पाप लागेल असे काही.
लहानपणी माझ्या एका पंजाबी मैत्रीणी कडे भाज्यात आठवड्यात फक्त हेच प्रकार मिळत. व वरचा मसाला खालील सर्व भाजीत आलूसकट,
आलू मेथी
आलू पालक
आलू मटर
आलू भिंडी
आलू बैंगन
आलू गोबी
आलू फली (बीन्स)
रसवाला आलू(ह्याच्यात टोमॅटो ज्यास्त जरा)

त्यात तिची आई एकच पंजाबी मसाला बनवून ठेवायची लवंग बारीक वाटून बाकी धणे ओबड्धोबड, जीरे व अनारदाना. झाला पंजाबी मसाला तयार. तो सर्व भाजीवर वरून भुरभुरवला की झाले. भाजीत आलू व टोमॅटो व आले असतेच. :)मला तीच भाजी दोनदा जरी खायला लागली तरी कंटाळा यायचा(मिजास होती माझी लहानपणी).
मैत्रीण आमच्याकडे हात मारून जेवायची.

फोडणीत ओवा घालूनही छान होते भाजी, शिवाय वांगे वातूळ असल्याने ओवा बरा यात.
वांगी, कांदा फोडी करून ओव्याच्या फोडणीत हिंग, हळद, तिखट टाकून परतून वाफेवर शिजवायच्या मग मीठ , थोडा गुळ घालायचा.