कितीसा..!

Submitted by मी अभिजीत on 11 March, 2008 - 08:29

सोडून सावलीला पळणार मी कितीसा ?
केले तुला वजा तर उरणार मी कितीसा..!

स्वप्नातले उखाणे होते अजून बाकी,
जागेपणी खुलासा करणार मी कितीसा..

कोमेजतो कधी का निवडुंग कुंपणाचा,
फुललो जराजरासा, गळणार मी कितीसा..

घालून मी मुखवटे फ़िरतो जगात वेड्या,
पाहून चेहरा हा कळणार मी कितीसा..

साथीस कृष्ण नाही गीता कथावयाला,
वारस धनंजयाचा लढणार मी कितीसा..

सारे तुझ्या जगाचे पाळीन कायदे पण,
"अभिजित" वेगळा मग ठरणार मी कितीसा..!

- अभिजीत दाते

(नेहमीप्रमाणेच मार्गदर्शन अपेक्षित..!)

गुलमोहर: 

सोडून सावलीला पळणार मी कितीसा ?
केले तुला वजा तर उरणार मी कितीसा..!>>>>जबरी शेर,आरपार एकदम

स्वप्नातले उखाणे होते अजून बाकी,
जागेपणी खुलासा करणार मी कितीसा..>>हं

कोमेजतो कधी का निवडुंग कुंपणाचा,
फुललो जराजरासा, गळणार मी कितीसा..>>>व्वा

सारे तुझ्या जगाचे पाळीन कायदे पण,
"अभिजित" वेगळा मग ठरणार मी कितीसा..!>>सलाम

एक मस्त गजल.
मार्गदर्शक मार्गदर्शन करतीलच, आम्ही नुसत काय आवडलं तेवढ सांगतो बाबा Happy

उत्तम गझल!
मतला आणि मक्ता तर खूप आवडले. मस्त लहजा आहे! निवडुंग शेरही छान.

उत्तम गझल.

घालून मी मुखवटे फ़िरतो जगात वेड्या,
पाहून चेहरा हा कळणार मी कितीसा..

साथीस कृष्ण नाही गीता कथावयाला,
वारस धनंजयाचा लढणार मी कितीसा..

हे विशेष आवडले. निवडुंगही मस्त. पुलस्तींनी म्हटल्याप्रमाणे लहजा उत्तम आहे.

- चक्रपाणि जीवन चिटणीस

जवाब नही .. एक एक शेर उतरला आहे... थेट काळजात
क्या बात है!! क्या बात है!! मजा आला...

स्वप्नातले उखाणे होते अजून बाकी,
जागेपणी खुलासा करणार मी कितीसा..

कोमेजतो कधी का निवडुंग कुंपणाचा,
फुललो जराजरासा, गळणार मी कितीसा..

घालून मी मुखवटे फ़िरतो जगात वेड्या,
पाहून चेहरा हा कळणार मी कितीसा..

छान आहे गजल. हे तीन शेर खूप आवडले! निवडुंगाचा फार मस्त जमलाय!

मस्त झालीय गझल अभिजीत. निवडुंग खासच.
धनंजय म्हणजे अर्जून का? मला ते कृष्णाचंच नाव वाटत होतं.

सोडून सावलीला पळणार मी कितीसा ?
केले तुला वजा तर उरणार मी कितीसा..!

कोमेजतो कधी का निवडुंग कुंपणाचा,
फुललो जराजरासा, गळणार मी कितीसा..

साथीस कृष्ण नाही गीता कथावयाला,
वारस धनंजयाचा लढणार मी कितीसा..

सारे तुझ्या जगाचे पाळीन कायदे पण,
"अभिजित" वेगळा मग ठरणार मी कितीसा..!

या कल्पना जास्तच आवडल्या

सुधीर

अभिजीत,
मतला छान आहे. 'स्वप्नातले उखाणे' आणि 'चेहरा' हे शेर विशेषच छान. आवडले.
कृष्णाच्या शेरातल्या 'भूमिकेबद्दल' असं वाटलं की 'साथीला' पेक्षाही 'मार्गदर्शनाला' तो नाही असं यायला हवं होतं. कारण पुढे 'लढायचा' उल्लेख आहे म्हणून.
-सतीश

अभिजीत,
मतला छान आहे. 'स्वप्नातले उखाणे' आणि 'चेहरा' हे शेर विशेषच छान. आवडले.
कृष्णाच्या शेरातल्या 'भूमिकेबद्दल' असं वाटलं की 'साथीला' पेक्षाही 'मार्गदर्शनाला' तो नाही असं यायला हवं होतं. कारण पुढे 'लढायचा' उल्लेख आहे म्हणून.
-सतीश

मस्त अभि. सहि गजल.

स्वप्नातले उखाणे होते अजून बाकी,
जागेपणी खुलासा करणार मी कितीसा..

कोमेजतो कधी का निवडुंग कुंपणाचा,
फुललो जराजरासा, गळणार मी कितीसा..

हे दोन्ही शेर खूप आवडले. छान गझल.

क्या बात है! आवडेश !

परागकण

केले तुला वजा तर उरणार मी कितीसा..!

क्या बात है अभिजीत. मस्त गझल.

श्यामली च्या प्रत्येक शब्दाला अनुमोदन! Happy
तरीही... सारे तुझ्या जगाचे पाळीन कायदे पण,
"अभिजित" वेगळा मग ठरणार मी कितीसा..!>> क्याSSSS बात है!

सही यार.....!!
निवडुंग.......कातिल !!
मक्ता, मतला पण जबरी !!
आवडलीच गझल Happy

अलकाजी : मराठीगझल्.कॉम च्या गझल मुशायर्‍यात ऐकली असेल तुम्ही

अभिजित मस्तच गझल... मतला.. मक्ता .. निवडुंग सुरेख

उत्तम गझल...' कितीसा' ह्या रदीफमधेच दर्द आहे.. पण अजून खूप शक्यता आहेत आशय व्यक्त करण्याच्या... म्हणजे अजून शेर येऊ शकतात.. निवडुंगाचा शेर फार छान आहे.
सांगावयास गीता आहे कुठे मुरारी?... असे केल्यास ..अर्थात मुरारीपेक्षा चांगला शब्द शोधता येइल..
-मानस६

कोमेजतो कधी का निवडुंग कुंपणाचा,
फुललो जराजरासा, गळणार मी कितीसा..

हा शेर खुप आवडला...
बाकीची गजल ही खूप छान...

Pages