......मी कितीसा .... !

Submitted by कौतुक शिरोडकर on 19 February, 2010 - 13:35

(अभिजितराव http://www.maayboli.com/node/1408 क्षमा असावी. वृत्त, मात्रा चुकल्यास नक्की मार्गदर्शन करावे.)

बापास प्रेयसीच्या नडणार मी कितीसा ?
केला मला खुजा तर उरणार मी कितीसा..!

माझ्यावरी उधारी आहे अजून बाकी,
कोठे ? किती ? खुलासा करणार मी कितीसा..

कोणी न मान ठेवी बेकार माणसाचा,
छळती परोपरीने, रडणार मी कितीसा..

मारून शुद्ध थापा फ़िरतो जरी सदा मी,
घालून रोज टोप्या, लपणार मी कितीसा..

हातात माल नाही आता फिरावयाला,
खर्चीवरी तिच्या त्या, जगणार मी कितीसा..

केव्हा खपेल आबा, माझ्या सखे तुझा तो,
"अविरत" वाट सांगा, बघणार मी कितीसा..!

गुलमोहर: 

श्री, कधी कधी घास सरळ तोंडी घेण्यात गंमत नसते. मी माझ्या पद्धतीने गझल लिहण्याचं तंत्र शिकतोय. यात सगळ्यांच्या मागे लागणे आलेच. पण ते चांगल्या अर्थाने. अजून तशी कोणी हरकत घेतली नाही. कुणी दुखावलच तर मग तंत्र बदलावं लागेल.

Lol

कौतुकशेठ : विडंबन आवडले... मिटरही जमेश तेवढे त्या बंडलाचे काहितरी करा.. Happy

मारून शुद्ध थापा फिरतो जरी सदा मी
घालून रोज टोप्या, लपणार मी कितीसा..

त्या 'अविरत' चेही काहितरी करावे लागेल.. आणि मूळ गझलेचा 'दुवा' द्या की म्हणजे अभिजित तुम्हाला दुवा देईल Happy

साक्षात विडंबनसम्राटांची आज्ञा, माझ्यासारखा यत्किचिंत पामर मोडेल कसा बरे ? बदल केले आहेत. अविरतचे काय करावे याचा अविरत विचार करत आहे.