जुन्या दूरदर्शन मालिका - हिंदी

Submitted by शुभंकरोती on 5 February, 2010 - 18:53

भारतात खर्‍या अर्थाने दूरदर्शन प्रसार पावला एशियाड (१९८२) नंतर. प्रथम एशियाड खेळांचे थेट प्रक्षेपण आणि पुढे सुरवात झाली मालिकांची. हा प्रयत्न आहे तुम्हाला आठवत असलेल्या जुन्या दूरदर्शन मालिकांची नावे आणि त्यासंबंधित आठवणी गोळा करण्याचा.

हम लोग
बुनियाद
तमस
नुक्कड
रजनी (प्रिया तेंडुलकर)
उडान
दादी मां जागी
करमचंद
इधर-उधर (सुप्रिया पाठक, रत्ना पाठक)
खानदान
मिर्जा गालिब
विक्रम वेताल
अडोस-पडोस (सई परांजपे फेम)
रामायण
महाभारत
कथा-सागर
वागले की दुनिया
गुल्-गुलशन-गुलफाम
कहां गये वो लोग
फास्टर फेणे
एक कहानी
फौजी
सर्कस
दूसरा केवल
भारत एक खोज
स्वोर्ड ओफ टीपू सुलतान
चाणक्य
मि. योगी
ये जो है जिंदगी (शफी इनामदार, टिक्कू तलसानिया)
मालगुडी डेज
तृष्णा
शो थीम
व्योमकेश बख्शी
चमत्कार
रिपोर्टर (शेखर सुमन)
लाइफ लाइन
नीम का पेड (मुंह की बात, सुने हर कोई, दिल के दर्द को जाने कौन ...)
स्पेससिटि सिग्मा
सुरभि
...
...
क्षितिज ये नहीं
सुबह
कच्ची धूप
मुंगेरीलाल के हसीन सपने
आसमां कैसे कैसे
मिट्टी के रंग
नींव
दादा दादी की कहानियाँ
सिंहासन बत्तीसी
फूल खिले हैं गुलशन गुलशन
फिर वही तलाश
कक्का या काका जी कहिन
आ बैल मुझे मार (अमोल पालेकर और भारती आचरेकर)
फटीचर ( पंकज कपूर - यार फटीचर तू इतना इमोशनल क्यों है ??)
देख भाई देख
खरी खरी
राग दरबारी
श्रीकांत
छोटी सी आशा
छोटी बडी बातें
चुनौती
दिल दरिया
सांझा चूल्हा
अपना अपना आसमान
कर्मभूमि
रथ चक्र
लेखू
छपते छपते
दर्पण
दाने अनार के
युगांतर
कशिश
गुनीराम (राकेश बेदी)
एक दो तीन चार
पोटली बाबा की
फ्लॉप शो
किले का रहस्य
हम पंछी एक डाल के
होनी अनहोनी
मृगनयनी
तहकीकात
गायब-आया
अकबर द ग्रेट
शांति
स्वाभिमान
मुजरिम हाजिर
मुल्ला नसरुद्दीन
एसा भी होता है (सिद्धार्थ काक)
परम वीर चक्र
बीबी नातियों वाली
कबीर
समंदर
तेरह पन्ने
पचपन खंबे लाल दीवारें
सुकन्या
बैरिस्टर विनोद
टर्रम टू
इंद्रधनुष
आनंदी गोपाल
वाह जनाब
गण देवता
अप्पू और पप्पू
तरंग
देखो मगर प्यार से
अपराधी कौन
अंक अजूबे
छुट्टी छुट्टी
उपन्यास
उल्टा-पुल्टा
चरित्रहीन

तुमच्या काही जुन्या आठवणी वाचायला मिळाल्या तर अजून उत्तम
गुगल शरण गेल्या वर ही साईट मिळाली बघा ...
http://oldidiotbox.blogspot.com/2009/03/watch-old-doordarshan-serials-cl...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुक्कड संपल्यावर पुन्हा एकदा सेम कास्ट घेऊन सुरु झाली होती.. नाव बहुतेक वेगळे होते (?)" फिर से नुक्कड " कि काय? आठ्वतेय का कुणाला

त्याच दरम्यान 'मनोरंजन' अशी सिरियल सुरु होती.. टायट्ल सॉग अस काहीसे
मनोरंजन मनोरंजन चमकते सिन फिल्मोके
सभी प्यासे है ....(?)..
सजा देते....(?).... चिल्मन... (?)
( बाकी पुढ्चे काही आठ्वत नाही.. पण चाल लक्षात आहे )

हं, ही मॅन, स्केलिटॉर (ह्याची मी फार धास्ती घेतली होती Happy ), सॉर्सरर, एव्हलिन, रॅममॅन (ह्याला आमच्या सोसायटीतली मुलं राममॅन म्हणायची. आता रामाचा आणि ह्याचा काय संबंध ते बरेच दिवस कळालं नव्हतं. मग इंग्लिश कळू लागल्यावर ते ram - रॅम म्हणजे धडक देणं ह्या अर्थी आहे ही ट्यूब पेटली!) आणि एक भूत होतं छोटं हवेत तरंगणारं. ह्यावर आलेला एक पिक्चरही पाहिला होता नंतर.

एक भूत होतं छोटं हवेत तरंगणारं. ह्यावर आलेला एक पिक्चरही पाहिला होता नंतर.
==============================
कैस्पर

शुभंकरोती, अहो हे नाही. ही मॅन मध्ये एक भूत असतं तरंगणारं. Happy कठीण समय येता गुगल कामास येतो. आत्ता सर्च केलं. त्याचं नाव ऑर्को.

दूरदर्शनवर एक टेलिफिल्मही दाखवायचे. हिंदीत 'सिर्फ चार दिन' आणि मराठीत 'फक्त चार दिवस' नाव होतं. एका खूनाचा तपास दाखवला होता. प्रदीप कुलकर्णी होता त्यात.

giant robot हि इंग्रजी मालिका दूरदर्शन (DD2) ला यायची माहिती आहे का कुणाला?

giant robot हि इंग्रजी मालिका दूरदर्शन (DD2) ला यायची माहिती आहे का कुणाला?
>>
येस्स येस्स. माझी आणि बहिणीची फेवरीट होती ती Happy

giant robot हि इंग्रजी मालिका दूरदर्शन (DD2) ला यायची माहिती आहे का कुणाला?
<<<

ही आमचीही फेवरिट होती. कुठेही खेळत असलो तरी या वेळी घरी परत. आणि मला वाट्त ती मंगळवारी लागायची नेमक दुरदर्शन च्या पहिल्या वाहीनीवरील बातम्यांच्या वेळीच, Sad मग आजोबा आणि आम्ही भावंड असा संघर्ष घरात. आणि शेवटी तह.

फिरदौस म्हणुन एक मालिका होति ति आठवतेय का कुणाला?
माचिस पिक्चर बघितल्यावर मला परत परत त्या मालिकेचि आठवण येत होति

आणि अभिमान म्हणुन पण एक मालिका होति ति पुर्ण झालिच नाहि
रिमा लागु, विक्रम गोखले

त्याच टायटल सॉन्ग मस्त होत
इन लाम्होमे आन बसा
नाज से सीना तान हसा
जीत है मेरी तेरी हार
प्यार नही ये है अहंकार

असे काहीतरी शब्द होते बहुतेक

बीवि नातियोंवाली : अजून परत पहावीशी वाटतेय. दूरदर्शन मालिका मनोरंजनाबरोबर सामाजिक समस्या प्रश्नही हाताळायच्या. आताच्या खाजगी मालिका नवे प्रश्न निर्माण करतात.

डॉक्टर बीबी म्हणून एक मालिका सकाळी लागायची. त्यात डॉक्टर असलेली बायको नवर्‍याला तब्येतीबद्दल सूचना देऊन हैराण करते. "हो गये हम बेजार डॉक्टरबीबीसे" असं काहीतरी त्याचं टायटल सॉन्ग होतं.

रेणुक शहाणे, स्मिता जयकर, रझामुराद, किरण कुमार यांची मंझील नावाची सिरियल नव्हती तर घुटन
नाव होतं. " कथासागर" नावाची तेरा आठ्वड्याची सिरियल खुप छान होती. शिवाय "तुतु मैमै" शारुखची
"सर्कस", "तोबा रे तोबा" ह्या सिरियल पण छान होत्या. सगळ्या सिरियल्ची नावं वाचून खूप
आनन्द झाला पण " शांति" आणि " स्वाभिमान" ही नावं वाचले अन माझी शान्ति आणि आनंद
दोन्हीहि ढ्वळून निघाले.

रेणुक शहाणे, स्मिता जयकर, रझामुराद, किरण कुमार यांची मंझील नावाची सिरियल नव्हती तर घुटन
नाव होतं. " कथासागर" नावाची तेरा आठ्वड्याची सिरियल खुप छान होती. शिवाय "तुतु मैमै" शारुखची
"सर्कस", "तोबा रे तोबा" ह्या सिरियल पण छान होत्या. सगळ्या सिरियल्ची नावं वाचून खूप
आनन्द झाला पण " शांति" आणि " स्वाभिमान" ही नावं वाचले अन माझी शान्ति आणि आनंद
दोन्हीहि ढ्वळून निघाले.

भारत एक खोज : ते धीर गंभीर टायटल साँग, ते रोशन सेठ चं निवेदन
अमोल पालेकर अभिनीत "आ बैल मुझे मार"
सुलभा देशपांडे, बबलु मुखर्जी, अभिनीत शकुन अपशकुन वर एक मालिका, नाव आठवत नाही.
चित्रमाला : सगळ्या भाषांची छायागीत
होनी अनहोनी.
करमचंद
असे पाहुणे येती.
गजरा.
हास परिहास : बबन प्रभु आणि याकुब सईद
चिमणराव, काऊ, गुंड्याभाऊ, मोरू, मैना Happy
डी डी 's कॉमेडी शो
फायर बॉल XL5 : My Favourite

Sports Round Up
World of Sports
खेळियाड (खेळां वर आधारीत मिलिंद वागळे यांचा मराठी प्रश्न मंजुषा)

क्रिकेट समलोचन साठी डॉ. नरोत्तम पुरी आणि अनुपम गुलाटी तेव्हा फार बोरिंग वाटत होते.

सबीरा मर्चंटचा व्हॉट्स द गुड वर्ड?
दूरदर्शनच्या नॅशनल चॅनेलवर एक बहुभाषिक गायनाची स्पर्धा झाली होती. त्यात स्पर्धकाने आपल्या मातृभाषेखेरीज अन्य भाषेतून गाणे गायचे होते. शेवट फेरीत एक मराठी भाषक संस्कृत गीतगायन करून बाजी मारून गेला होता.

नव्वद साली मी पाच वर्षांचा होतो ,त्यावेळी लागणार्या सिरियल आठवतात पण नीटश्या नाहीत.हा धागा वाचून पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या.मला आठवणार्या सिरियल्स
मोगली
सुपरमॅन
नाईट रायडर
जुनुन
स्वाभिमान
शांती
अगदी अलिकडल्या म्हणजे...
वक्त की रफ्तार
युग(आझादी की महागाथा)
फर्ज

तस्वीर का दुसरा रुख,
एक कहानी, वाह जनाब( शेखर सुमनचा पहिला टीवी शो),
मिस्टर & Mrs ( अर्चना पुरण सिंघ आणि जयंत क्रिप्लानि)
नीव ( बोर्डींग स्कूल च्या विद्यार्थ्यांवर)
विक्रम और बेताल ( बेताल चा अल्टिमेट डाइलॉग ' विक्रम, तू बोला, मै चला...हा, हा, हा हा....)
बिवी नातियो वाली ( लखनौ दूरदर्शन की पेशकश:)
कक्काजि कहिन
निम का पेड ( जगजित सिंघ चं शीर्षक गीत ' नीम की बात सुने हर कोई, खामोशी पेहेचाने कौन')
दादा दादी की काहानिया
हम लोग ( अशोक कुमारचं छंद पकैय्या, छंद पकैय्या...)
देखो मगर प्यारसे...
दर्पण ( दर्पण यानी आयना..झिंदगी के सुख दुख का आईना..केहेते दर्पण झूट नही बोलता....)
फर्मान ( कवलजीत आणि दीपिका देशपांडे)

सुजीत बेरी आणि मालविका तिवारी ची सीरियल आठवते का कोणाला?

MPA थॅंक्स गं. कशीश... बरोबर आहे. मस्तं होती ती सीरियल. त्यात सुदेश बेरी च्या आईच्या रोल मधे कल्पना अय्यर होती.

Addition :
हिंदी मध्ये :
सी हॅाक्स (माधवन होता यात), सुराग़,औरत,नीव, निर्माण,अजनबी
मराठी मध्ये:
घरकुल, बंदिनी

Pages