जुन्या दूरदर्शन मालिका - हिंदी

Submitted by शुभंकरोती on 5 February, 2010 - 18:53

भारतात खर्‍या अर्थाने दूरदर्शन प्रसार पावला एशियाड (१९८२) नंतर. प्रथम एशियाड खेळांचे थेट प्रक्षेपण आणि पुढे सुरवात झाली मालिकांची. हा प्रयत्न आहे तुम्हाला आठवत असलेल्या जुन्या दूरदर्शन मालिकांची नावे आणि त्यासंबंधित आठवणी गोळा करण्याचा.

हम लोग
बुनियाद
तमस
नुक्कड
रजनी (प्रिया तेंडुलकर)
उडान
दादी मां जागी
करमचंद
इधर-उधर (सुप्रिया पाठक, रत्ना पाठक)
खानदान
मिर्जा गालिब
विक्रम वेताल
अडोस-पडोस (सई परांजपे फेम)
रामायण
महाभारत
कथा-सागर
वागले की दुनिया
गुल्-गुलशन-गुलफाम
कहां गये वो लोग
फास्टर फेणे
एक कहानी
फौजी
सर्कस
दूसरा केवल
भारत एक खोज
स्वोर्ड ओफ टीपू सुलतान
चाणक्य
मि. योगी
ये जो है जिंदगी (शफी इनामदार, टिक्कू तलसानिया)
मालगुडी डेज
तृष्णा
शो थीम
व्योमकेश बख्शी
चमत्कार
रिपोर्टर (शेखर सुमन)
लाइफ लाइन
नीम का पेड (मुंह की बात, सुने हर कोई, दिल के दर्द को जाने कौन ...)
स्पेससिटि सिग्मा
सुरभि
...
...
क्षितिज ये नहीं
सुबह
कच्ची धूप
मुंगेरीलाल के हसीन सपने
आसमां कैसे कैसे
मिट्टी के रंग
नींव
दादा दादी की कहानियाँ
सिंहासन बत्तीसी
फूल खिले हैं गुलशन गुलशन
फिर वही तलाश
कक्का या काका जी कहिन
आ बैल मुझे मार (अमोल पालेकर और भारती आचरेकर)
फटीचर ( पंकज कपूर - यार फटीचर तू इतना इमोशनल क्यों है ??)
देख भाई देख
खरी खरी
राग दरबारी
श्रीकांत
छोटी सी आशा
छोटी बडी बातें
चुनौती
दिल दरिया
सांझा चूल्हा
अपना अपना आसमान
कर्मभूमि
रथ चक्र
लेखू
छपते छपते
दर्पण
दाने अनार के
युगांतर
कशिश
गुनीराम (राकेश बेदी)
एक दो तीन चार
पोटली बाबा की
फ्लॉप शो
किले का रहस्य
हम पंछी एक डाल के
होनी अनहोनी
मृगनयनी
तहकीकात
गायब-आया
अकबर द ग्रेट
शांति
स्वाभिमान
मुजरिम हाजिर
मुल्ला नसरुद्दीन
एसा भी होता है (सिद्धार्थ काक)
परम वीर चक्र
बीबी नातियों वाली
कबीर
समंदर
तेरह पन्ने
पचपन खंबे लाल दीवारें
सुकन्या
बैरिस्टर विनोद
टर्रम टू
इंद्रधनुष
आनंदी गोपाल
वाह जनाब
गण देवता
अप्पू और पप्पू
तरंग
देखो मगर प्यार से
अपराधी कौन
अंक अजूबे
छुट्टी छुट्टी
उपन्यास
उल्टा-पुल्टा
चरित्रहीन

तुमच्या काही जुन्या आठवणी वाचायला मिळाल्या तर अजून उत्तम
गुगल शरण गेल्या वर ही साईट मिळाली बघा ...
http://oldidiotbox.blogspot.com/2009/03/watch-old-doordarshan-serials-cl...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या आवडत्या ,
हम लोग
बुनियाद
तमस
नुक्कड
रजनी (प्रिया तेंडुलकर)
करमचंद
विक्रम वेताल
रामायण
महाभारत
वागले की दुनिया
भारत एक खोज
स्वोर्ड ओफ टीपू सुलतान
सुरभि
ये जो है जिंदगी
मालगुडी डेज
आणि स्पायडर्मॅन

नक्की केव्हा ते आठवत नाही. पण ब्याण्णव-त्र्याण्णवच्या सुमारास असावे. 'क्षितिज यह नही' म्हणून एक मालिका होती तेरा भागांची. सुप्रिया पिळगावकर, तुषार दळवी आणि विक्रम गोखले. कुणाला आठवते का ? मला फार आवडायची.

नाही आठवत पण नाव ऐकल्यासारखं वाटतंय.
शुभंकरोती, तुझ्या यादीत 'सुबह' आणि 'कच्ची धूप' ही घाल. कच्ची धूपमध्ये भाग्यश्री पटवर्धन आणि अमोल पालेकरची मुलगी शाल्मली पालेकर होते.

अगो, मला आठवते 'क्षितीज ये नही'. छान होती ती सीरीयल. त्यामधे विक्रम गोखले हे सुप्रिया पिळगावकर चे सासरे असतात नं?

अजून एक होती 'मंजील' म्हणून.त्यात रेणूका शहाणे,स्मिता जयकर वगैरे मंडळी होती.सगळं शूटींग डेहराडून-मसुरी भागातलं होतं.

हो भाग्य. आणि सुप्रिया पिळगावकरच्या मुलीचं काम राजसी बेहेरे हिने केलं होतं ( चौकट राजा मधील लहान मुलगी )
पूर्वा, मंझील मध्ये रेणुका शहाणेच्या वडिलांचं काम रझा मुराद ह्यांनी केलं होतं का ? स्मिता जयकर घुसमट सहन करणारी बायको आणि बंडखोर मुलगी असं काहीसं कथानक होतं का ?

कब तक पुकारूं?
जुनून (दुपारी लागणारी मालिका)
तुम्हारे लिये (दुपारी लागणारी मालिका)
फरमान
हमराही
गुच्छे (रविवारी सकाळी असलेली लहान मुलांसाठीची मालिका)
कॅप्टन व्योम (रविवार सकाळ)
कुछ खोया, कुछ पाया (गो. नी. दांडेकरांच्या पडघवली कादंबरीवर आधारलेली मालिका)
उजाले की ओर

इतिहास (अमन वर्मा, स्मिता बन्सल- दुपारी १)
वक्त की रफ्तार (दुपारी २)
मुंगेरी के भाई नवरंगीलाल (राजपाल यादव)
इंद्रधनुष्य (सायन्स फिक्शन / टाइम ट्रॅव्हल)
क्विझ टाइम (सिद्धार्थ बसु)
मोहिंदर अमरनाथ्स क्रिकेट शो
मशाल (अरुण गोविल)
परशुराम (मुकेश खन्ना)
पीसी और मौसी (जावेद जाफ्री)
ट्रक धिना धिन (जावेद जाफ्री, जगदीप)
एक से बढकर एक (कार्तिका राणे, मुकुल देव, असरानी, जगदीप, टीकू तल्सानिया)

अर्चना पूरणसिंग आणि तिच्या नवर्‍याचा पण एक काउंट डाऊन शो यायचा... नाव विसरलो... त्यात दर गाण्याआधी आकडा दाखवताना कुणितरी अगम्य पंजाबी आरोळी मारायचं ("XXX XXX पोट्टे" असं काहीसं होतं...)

देख भाई देख
स्वाभिमान
शांती
उडान
ऐसा भी होता है
कशिश

घुटन म्हणुन पण एक मालिका होती ना.. रेणुका शहाणे होती बहुतेक..
"झोपी गेलेला जागा झाला" अस काही होतं का.. खुप लहान होते तेव्हा.. ५-६ वर्ष मे बी.सो नक्की नाव नाही आठवत..

पूर्वा, अगो, मंझील मधे सचीन खेडेकर होता नं रेणुका शहाणे चा हिरो?

अजुन आठवतात त्या म्हणजे,

रंगोली (रविवारी सकाळी ७ ला असायचा हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम)
असे पाहुणे येती,
गजरा,
साप्ताहिकी,(बहुतेक वेळा स्व. भक्ती बर्वे सादर करायच्या )
पुणेरी पुणेकर
मुलखावेगळी माणसे

आपण घुटन आणि मंझील मध्ये गल्लत करतोय असं मला वाटतंय. घुटनमध्ये रेणुका शहाणे बरोबर अजून कोण होतं ?

अजुन एक मालिका होति..त्याचे title song सुरु व्हायच्या आधि, हुम घुना..हुम घुना..हुम घुना रे हुम घुना ..
अशी सुरुवात होती.आणि एका डोली मधुन ते मजुर नववधुला आणायचे..मी खुप लहान होते तेव्हा.कुणाला
माहित आहे का ती हिन्दि मालिका?

हो..मलाही आठवतय...आणी एका लहान मुलाचा आवाज ," कालीगंज की बहु..ओ कालीगंज की बहु"

"छोटे बडे" शेखर सुमनची पहिली मालिका

शनिवारी दुपारी "डीडीज कॉमेडी शो" असायचा.त्याआधी २ वाजता एक बाहुल्या बाहुल्यांची कार्टुन सिरीयल होती (नाव नाही आठवत) ! फार आवडीने पहायचो आम्ही!

हेमामालीनीची ऐतिहासीक सिरीयल होती..त्यात सगळ्या राण्यांवरील कथा होत्या.. (रानी रुपमती वगैरे)

बहूतेक दर रविवारी सकाळी..
१. डिस्ने कार्टुन्स सिरिज लागायची.. त्यात बलु (अस्वल) चे कॅरॅक्टर मस्त होते..
२. मोगली- जंगल बुक
३. पोटली वाले बाबा की
४. अलिफ लैला
५. चंद्रकांता
६. तेनालीराम

यात बहूतेक अलिफ लैला आणि चंद्रकांता राहिलेत

चंद्रकांता चे गाणे.. 'चंद्रकांता की कहानी है बहोत पुरानी' आणि यक्कू डायलॉग फेवरेट..

डिस्ने कार्टुन्स सिरिज लागायची.. त्यात बलु (अस्वल) चे कॅरॅक्टर मस्त होते.. >>>
केदार ते टेलस्पिन आहे.. अजुनही डिस्ने चॅनलला लागतं ते..

सिद्दार्थ बसु चे 'क्विझ टाईम' आणि यशपाल नावाच्या सायंटीस्ट ची एक सिरीयल रविवारी सकाळी लागायची!
मराठीत 'गोट्या' , 'सिधा सादा सदा' , मीस्टर योगी, ... मराठीवर संध्याकाळी ५ वाजेची 'दामिनी' खुप महिने काय वर्ष चालली!

Pages