जुन्या दूरदर्शन मालिका - हिंदी

Submitted by शुभंकरोती on 5 February, 2010 - 18:53

भारतात खर्‍या अर्थाने दूरदर्शन प्रसार पावला एशियाड (१९८२) नंतर. प्रथम एशियाड खेळांचे थेट प्रक्षेपण आणि पुढे सुरवात झाली मालिकांची. हा प्रयत्न आहे तुम्हाला आठवत असलेल्या जुन्या दूरदर्शन मालिकांची नावे आणि त्यासंबंधित आठवणी गोळा करण्याचा.

हम लोग
बुनियाद
तमस
नुक्कड
रजनी (प्रिया तेंडुलकर)
उडान
दादी मां जागी
करमचंद
इधर-उधर (सुप्रिया पाठक, रत्ना पाठक)
खानदान
मिर्जा गालिब
विक्रम वेताल
अडोस-पडोस (सई परांजपे फेम)
रामायण
महाभारत
कथा-सागर
वागले की दुनिया
गुल्-गुलशन-गुलफाम
कहां गये वो लोग
फास्टर फेणे
एक कहानी
फौजी
सर्कस
दूसरा केवल
भारत एक खोज
स्वोर्ड ओफ टीपू सुलतान
चाणक्य
मि. योगी
ये जो है जिंदगी (शफी इनामदार, टिक्कू तलसानिया)
मालगुडी डेज
तृष्णा
शो थीम
व्योमकेश बख्शी
चमत्कार
रिपोर्टर (शेखर सुमन)
लाइफ लाइन
नीम का पेड (मुंह की बात, सुने हर कोई, दिल के दर्द को जाने कौन ...)
स्पेससिटि सिग्मा
सुरभि
...
...
क्षितिज ये नहीं
सुबह
कच्ची धूप
मुंगेरीलाल के हसीन सपने
आसमां कैसे कैसे
मिट्टी के रंग
नींव
दादा दादी की कहानियाँ
सिंहासन बत्तीसी
फूल खिले हैं गुलशन गुलशन
फिर वही तलाश
कक्का या काका जी कहिन
आ बैल मुझे मार (अमोल पालेकर और भारती आचरेकर)
फटीचर ( पंकज कपूर - यार फटीचर तू इतना इमोशनल क्यों है ??)
देख भाई देख
खरी खरी
राग दरबारी
श्रीकांत
छोटी सी आशा
छोटी बडी बातें
चुनौती
दिल दरिया
सांझा चूल्हा
अपना अपना आसमान
कर्मभूमि
रथ चक्र
लेखू
छपते छपते
दर्पण
दाने अनार के
युगांतर
कशिश
गुनीराम (राकेश बेदी)
एक दो तीन चार
पोटली बाबा की
फ्लॉप शो
किले का रहस्य
हम पंछी एक डाल के
होनी अनहोनी
मृगनयनी
तहकीकात
गायब-आया
अकबर द ग्रेट
शांति
स्वाभिमान
मुजरिम हाजिर
मुल्ला नसरुद्दीन
एसा भी होता है (सिद्धार्थ काक)
परम वीर चक्र
बीबी नातियों वाली
कबीर
समंदर
तेरह पन्ने
पचपन खंबे लाल दीवारें
सुकन्या
बैरिस्टर विनोद
टर्रम टू
इंद्रधनुष
आनंदी गोपाल
वाह जनाब
गण देवता
अप्पू और पप्पू
तरंग
देखो मगर प्यार से
अपराधी कौन
अंक अजूबे
छुट्टी छुट्टी
उपन्यास
उल्टा-पुल्टा
चरित्रहीन

तुमच्या काही जुन्या आठवणी वाचायला मिळाल्या तर अजून उत्तम
गुगल शरण गेल्या वर ही साईट मिळाली बघा ...
http://oldidiotbox.blogspot.com/2009/03/watch-old-doordarshan-serials-cl...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेखर सुमन ची फर्स्ट सिरिअल "वाह जनाब" किरन जुनेजा बरोबर .
इन्द्रधनुश- त्यात टाइममशिन कोन्सेप्ट पहिल्यन्दा बघितला..खुप आवडलेलि तेन्ह्वा.

'क्षितिज यह नही' >> ह्या मालिकेचा सुरूवातीचा नामनिर्देशाचा भाग अतिशय सुरेख होता. चित्रात एकेक रेघ उमटत जायची, चित्र हळू हळू पुरे व्हायचे. आणि सगळ्यात शेवटी तो सुप्रियाचा चेहेरा दिसल्या नंतर, त्यात कुंकवाचा लाल टिळा यायचा.

अरे लोक्स, शांती नावाची महाभयंकर सिरियल विसरलात तुम्ही...........
मंदीरा बेदी आणि बरीच मंडळी होती यात............
ती संपल्यावर (एकदाची) त्या जागी मंदीराचीच अजुन एक मालिका सुरु झाली होती, नाव नाही आठवत आता.

'हॅलो इन्स्पेक्टर' दर सोमवारी... हिचे टाईटल साँग खुप मस्त होते... ! 'लाईफ लाईन' सारखीच मराठीत डॉक्टरांवर सिरीयल होती बुधवार की गुरुवारी....जीवनरेखा- असं काहीस नाव होतं

अजुन एक "स्वाभिमान" नावाची मालिका होती. त्यात पण बरीच मंडळी होती.
मला वाटत याच मालिकेपासुन दु.द च्या मालिकांमध्ये विवाहबाह्य संबंध, कुमारी माता वगैरे विषय सुरु झाले. तो पर्यंत सार आलंबेलं होत.

पूर्वा, हो आठवलं. पण मग घुटनमध्ये कोण होतं ? Happy ते ही कुणाला आठवलं तर सांगा.
हो, शांती म्हटलं की तिची ती टिकलीच आठवते.

एका मराठी सिरीयलचे टायटल साँग हे होते:

"आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सुर जैसा ओठातुनी ओघळावा"

मोगली!

रविवारी सकाळी एक सिरियल असायची, नाव आठवत नाही पण pride & Prejudice वर आधारलेली होती.
प्रिया तेंडुलकरची 'रजनी' विसरलात काय?

नुकत्याच 'ये जो है जिन्दगीच्या' व्हिसीडीज विकत घेतल्यात्...मी आणि मझ्या ६ वर्षाच्या मुलीनेही खुप एन्जॉय केली...जो खरा है वो कभी नही बदलता हेच खरं...आत्ताच्या मालीकांपेक्षा तांत्रीक द्रुष्ट्या मागे असली तरी अस्सल करमणुक करुन जाते. सध्याच्या मालीका आणि कार्टुनमय झालेल्या माझ्या लेकीने इतक्या सहजतेने आणि आवडीने ही मालिका स्विकारली त्यातच 'ये जो है जिन्दगीच्या' पुर्या टिमचं यश आहे असं मला वाटतं.

शुभंकरोती ,तुस्सी ग्रेट हो बर्‍याच सिलीयल आठ्वतायत तुला. नाव वाचल्यावर टायट्ल साँगस पण आठवली Happy . जुन्या सिरीयल मधे कच्ची धुप परत कधी लागेल याची मी वाट बधतेय. भाग्यश्री, अशुतोष गोवारीकर अमोल पालेकर आणि त्याची मुलगी ( तीचं नाव माहीत नाही. ) अजुन एक छोटी मुलगी होती , ती पण खुप क्युट होती.

दिप्ती नवल, नादिरा, मोना आंबेगावकर ची सिरियल होती 'थोडासा आसमान' त्याचं टायटल साँग आणि कथा दोन्ही आकर्षक होतं.. Happy

'संसार' असं टाईटल असलेल्या २-३ सिरीयल येउन गेल्या...मराठी हिन्दीमधे! "आमची माती आमची माणसे' मधील 'गप्पागोष्टी' कार्यक्रम आवर्जुन बघायचो आम्ही!

ghutan aani Manzil donhi malik ekach. AAdhi Ghutan hi malika doordarshan var lagaychi aani mag Star ne tiche rights ghetale vikat mag ti Manzil mhanun prasarit keli naav badaloon.
Sukanya cha title track athavto " Sukanya teri Kahani hain niraleeeeeeeeeee"
Ajun ek Imtihaan mhanun lagaychi Renuka shahane aani alok nath chi.
And not to forget Surf Dhamaka!! India's 1st reality show. Hosted by Krutika Desai.!!

श्रिमान श्रिमती बघणारी मीच एक महान होते वाटतं, ऑल द बेस्ट्,सतिश शहा + स्वरूप संपत + लक्ष्या
या मालिका पहण्यासाठि मी मार ही खाल्लाय, अभ्यास नाही झाला तरी या मालिका सोडायची नाहि मी .
तितली नावाची मालिका होती,त्यात निलिमा अझिम होती, तिचे कॅरॅक्टर चंचल दाखवलेय, नवरा बहुधा नविन निश्चल्...ती एका दाढिवाल्या कळकट पेंटरच्या प्रेमात पडते.

निलिमा आजीमची एक रविवारी यायची सिरियल. त्यात ती मेन हिरोइनची मैत्रीण होती. नाव आता आठवत नाही. खुप आवडायची ती सीरियल मला. Happy

मंजुषा....निलीमा आझीम ची 'फिर वही तलाशच' ना ! त्यात ती मुस्लीम दाखवलीये वाटतं! याच निलीमा आझीमने पंकज कपूरशी ( करमचंद फेम) लग्न केलय ना!

तन्वी आझमीची एक सिरीयल यायची... 'पलाश के फुल' माझ्या माहीतीप्रमाणे! आणी तन्वी आजमी 'इन्स्पेक्टर' असलेली सुद्धा एक सिरीयल होती!

'ओशीन'
नावाची जपानी (हिंदीत डब केलेली) सिरीयल होती सोमवारी रात्री ९वा.

क्षितिज यह नही मला पण खूप आवडायची. तशाच रवी रायच्या सग़ळ्या सिरिअल्सही मस्त होत्या. सैलाब, स्पर्श, थोडा है थोडे की.., अजूनही काही असतील, नाव विसरले.
श्रीमान श्रीमतीही धमाल होती की. मी तर त्याचे रिपिट एपिसोड्सही पाहिले मधे सब टिव्हीवर. जतीन कनाकियाकडे ग्रेट कॉमेडी सेन्स होता. आणि राकेश बेदीचं दिलरुबाचं बेअरिंग काय सही होतं.

टीव्हीच्या नॅशनल चॅनलवर 'एक कहानी' मधला एक रिपिट एपिसोड बघितला अचानक. फणिश्वरनाथ रेणूंच्या 'पंचलैट' नावाच्या एका कथेवर आधारीत अर्ध्या तासाचा हा भाग इतका सुरेख सादर केला होता. बिहारच्या खेड्यातलं वातावरण, पंचायतीची बैठक, गावकरी, झोपड्या, त्यातले महातो जातीचे लोक हुबेहुब उभं केलं होतं. मानवी स्वभावांचे नमुने इतक्या बारीकसारीक हालचाली, हावभावांतून फक्त अर्ध्या तासात संपूर्ण कथानकासहित सादर करणं खरंच सोपं नाही. शिवाय एपिसोड झाल्यावर फणिश्वरनाथ रेणूंच्या साहित्यिक आणि वैयक्तिक जीवनावरचं छोटसं भाष्य डॉ. प्रभाकर माचवे आणि लतिका रेणूंनी थोडक्या शब्दांमधे खूप प्रभावीपणे सांगितलं.

दूरदर्शनवरचे हे सुंदर कार्यक्रम खूप मिस होतात आता.

p.s. एक प्रिया तेंडूलकरची सिरियल सुरु झाली होती आणि काही भागांनीच बंद झाली. तिच्याच कथेवर आधारीत होती बहुतेक. नवर्‍यापासून वेगळी होऊन स्वतःच नवं आयुष्य सुरु करताना दाखवली होती प्रिया सुरुवातीच्या काही भागामधे. प्रदीप वेलणकरही होते बहुतेक. नाव आठवतय का कुणाला?

अजुन एक मालिका होति..त्याचे title song सुरु व्हायच्या आधि, हुम घुना..हुम घुना..हुम घुना रे हुम घुना ..
अशी सुरुवात होती.आणि एका डोली मधुन ते मजुर नववधुला आणायचे<<<<<

"मुजरीम हाजिर हो" नाव होत त्या मालिकेच.

आणि "दिल दरीया" नावाची एक सिरियल रात्री उशीरा लागायची दूरदर्शनवर. पंजामधली पार्श्व अभूमी होती. अशीच अजुन एक "सांझा चुला".

एक शाळेतल्या मुलाची होती बहुतेक " नीव"....त्याच टयतल सॉग पण मस्त होतं

Pages