मराठी बोलताना येणारे ईंग्रजी शब्द

Submitted by हर्ट on 5 February, 2010 - 01:27

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण जेंव्हा एकमेकांशी मराठी भाषेतून बोलतो त्यावेळी व्याक्यागणिक आपल्या तोंडी ईग्रजी शब्द येतात. आजकाल ईंगजीमिश्रित मराठी बोलण्याची इतकी सवय झाली आहे की ज्यांचे मराठी खूप चांगले आहे त्यांच्या देखील ह्या चुका होतातचं. आपण जर अगदी अट्टाहास बाळगला की नाही मी फक्त मराठीतूनचं बोलणार तरी देखील वेळेवर एखादा मराठी शब्द आठवत नाही. आठवला तरी देखील तो चपखल बसत नाही. इतकी आपल्याला ईंग्रजी भाषेची सवय झाली आहे. काही उदाहरणे बघा:

१) अवलंबून हा शब्द वापरण्याऐवजी आपण हल्ली depend हा ईंग्रजी शब्द अगदी सहजपणे वापरतो.
२) अनेकदा वारांची नावे देखील ईंग्रजीच वापरतो. उदा. मंडेला भेटूया.
३) धोका वा जोखीम ऐवजी आपण risk हा शब्द अनेकदा वापरतो. मी तो धोका पत्करणार नाही किंवा मी ती जोखीम घेणार नाही असे हल्ली कुणी म्हणतचं नाही. सरळ मी ती रिक्स घेणार नाही असेच म्हणतात.
४) अडचण निर्माण झाली किंवा अडथडा आलाय असे म्हणण्याऐवजी 'अरे एक problem आला आहे' असे म्हणतो.
५) पुढल्या वेळी ऐवजी सहजपणे next time असे म्हणतो.
६) दडपण ऐवजी tension हा शब्द वापरतो.

तर मित्रांनो आपण इथे काम करुया. तुम्ही किंवा इतर तुमचे मित्र-आप्त मराठी बोलताना कुठले ईंग्रजी शब्द सहजपणे वापरतात ते इथे लिहा. त्याला पर्यायी मराठी शब्द सांगायला इतर वाचक इथे मदत करतील. असे केले तर कदाचित काही अंशी आपल्याला आपली चूक कळेल. पुढल्यावेळी तुम्ही मराठीतून बोलताना तुम्हाला इथे सुचवलेला मराठी शब्द आठवेल.

धन्यवाद सर्वांना.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्रहो, एखाद्याच्या यशाबद्दल आपण त्याचे 'अभिनंदन'च करूयात. 'Congrats'ला मूठमाती देऊयात. मी नेहेमीच 'अभिनंदन'च करतो. अर्थात ९०% वेळा संबंधित व्यक्ती मात्र त्यावर 'thanku' असाच प्रतिसाद देते!

>>या शब्दांना विंग्रजी प्रतिशब्द सुचवा:

बेणं
कार्टं
भटकभवानी
दारकांडं
वाकळ
तेगार <<

अहो त्यांचे आधी मराठी अर्थ किंवा समानार्थी शब्द सांगा (समजतील असे..) Happy

बाकी, कार्ट याला ब्रॅट म्हणजे बिघडलेला हा शब्द जवळचा वाटतो. भटकभवानी लाडाने म्हटलं असेल तर इंग्रजी शब्द सुचत नाही पण शिवी म्हणुन वापरला असेल तर माहीती आहे. परंतु इथे लिहु शकत नाही... Happy

Expert ला तज्ञ/कुशाग्र/तरबेज्/निपुण इतके शब्द आहेत Happy

deserving विशेषण म्हणून वापरला असल्यास, त्यासाठी 'पात्र', 'लायक' असा प्रतिशब्द योजणे योग्य ठरेल.

eligible= फक्त पात्र वा लायक
deserving= पात्र वा लायक+ देण्याजोगा गरजू= होतकरू\
चू भू दे घे

मी 'रोड' वर उभा आहे. (मी 'रस्त्या' वर उभा आहे. )
मी 'सिट' वर बसलो. (मी 'बाकावर' वर बसलो.)
मी 'स्लो' 'ट्रेन' पकडली. (मी 'धीमी/ संथ' 'वीजगाडी' पकडली.)
मी 'लाईट" 'ऑन' केली. (मी 'वीजपुरवठा' / दिवा चालू केला.)

इंग्रजी माध्यमातून शिकणार्या मराठी मुलांचे मराठी व्याकरण कसे बिघडते पहा.
इंग्रजीत आपण आणि आम्ही या दोन्हीला we हा एकच शब्द आहे. आमच्या शेजारचा
मुलगा आजोबांना' आमच्याकडे अमुकतमुक आहे का' असे विचारतो. अर्थात ही भविष्यातल्या संबंधांची चाहूल असू शकते.

Pages