मराठी बोलताना येणारे ईंग्रजी शब्द

Submitted by हर्ट on 5 February, 2010 - 01:27

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण जेंव्हा एकमेकांशी मराठी भाषेतून बोलतो त्यावेळी व्याक्यागणिक आपल्या तोंडी ईग्रजी शब्द येतात. आजकाल ईंगजीमिश्रित मराठी बोलण्याची इतकी सवय झाली आहे की ज्यांचे मराठी खूप चांगले आहे त्यांच्या देखील ह्या चुका होतातचं. आपण जर अगदी अट्टाहास बाळगला की नाही मी फक्त मराठीतूनचं बोलणार तरी देखील वेळेवर एखादा मराठी शब्द आठवत नाही. आठवला तरी देखील तो चपखल बसत नाही. इतकी आपल्याला ईंग्रजी भाषेची सवय झाली आहे. काही उदाहरणे बघा:

१) अवलंबून हा शब्द वापरण्याऐवजी आपण हल्ली depend हा ईंग्रजी शब्द अगदी सहजपणे वापरतो.
२) अनेकदा वारांची नावे देखील ईंग्रजीच वापरतो. उदा. मंडेला भेटूया.
३) धोका वा जोखीम ऐवजी आपण risk हा शब्द अनेकदा वापरतो. मी तो धोका पत्करणार नाही किंवा मी ती जोखीम घेणार नाही असे हल्ली कुणी म्हणतचं नाही. सरळ मी ती रिक्स घेणार नाही असेच म्हणतात.
४) अडचण निर्माण झाली किंवा अडथडा आलाय असे म्हणण्याऐवजी 'अरे एक problem आला आहे' असे म्हणतो.
५) पुढल्या वेळी ऐवजी सहजपणे next time असे म्हणतो.
६) दडपण ऐवजी tension हा शब्द वापरतो.

तर मित्रांनो आपण इथे काम करुया. तुम्ही किंवा इतर तुमचे मित्र-आप्त मराठी बोलताना कुठले ईंग्रजी शब्द सहजपणे वापरतात ते इथे लिहा. त्याला पर्यायी मराठी शब्द सांगायला इतर वाचक इथे मदत करतील. असे केले तर कदाचित काही अंशी आपल्याला आपली चूक कळेल. पुढल्यावेळी तुम्ही मराठीतून बोलताना तुम्हाला इथे सुचवलेला मराठी शब्द आठवेल.

धन्यवाद सर्वांना.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, आमच्याकडे उलट आहे रे. नवरा खूप शुद्ध मराठीतून बोलतो बर्‍याचवेळा आणि मीच त्याला पर्यायी इंग्लिश शब्द सांगून त्याच्या चुका सुधारायचा प्रयत्न करते. Sad

नजर जाईल तिथवर मायबोलीचे हिरवेगार दाट कुरण पसरलेय आणि न आवरणा-या वासराच्या गळ्यात बांधतात तसा मोठा ओंडका गळ्यात अडकवुन झक्की पाय नेतील तिथे धावताहेत ....... मस्त आहे हा सिन.... (अजुन एक इंग्रजी शब्द)

या शब्दांना इंग्रजी प्रतिशब्द सांगा.
ढालगज भवानी
धसकट्या
खुसपट काढणे

माझा जन्म तमसेच्या तीरी झाला असता तर नक्कीच प्रतिशब्द सांगितले असते. तिथल्या मातीतल्या ढालगज भवान्याही नको तिथे धसकट्या मारुन खुसपटे काढत असणार.... Happy

हा बाफ म्हणजे झक्कींसाठी जणू आकाशातून मिळालेले आयते कुरणच आहे

>> आता संध्याकाळी दिसेलच रवंथ करतानाचे चित्र.
kuran.jpg

Angry

माझा जन्म तमसेच्या तीरी झाला असता तर नक्कीच प्रतिशब्द सांगितले असते.>>>>
मला येत नाही अस स्पष्ट शब्दात सांगितल तरी चालल असतं. उगीच लाम्हन कशाला लावलीय.

फ्रेंच, जर्मन, जपानी रशियन इ. भाषा जाणकारांनी सांगा की, त्यांच्या बोलीत आंग्ल भाषेतील शब्दांचे प्रमाण किती?

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण बघता मराठीवरचे हे अतिक्रमण थांबवणे अवघड आहे.

शुद्ध मराठीत गप्पा मारण्यासाठी मायबोलीवर आपण एक बा फ उघडूयात का?

कृपया इथे बातमी फलकाला अनुसरुन लिहा अशी प्रेमळ विनंती.

अवनी, मराठीतून बोलणे अवघड झाले आहे असे जर आपण म्हंटले तर फार नाही अजून पाच-पन्नास वर्षांनी मराठी भाषा पुसली जाईल. तेंव्हा पुन्हा एकदा आपण आपले पाउल अलिकडे घेऊन पुर्णतः मराठीतून बोलण्याचा प्रयास आणि तोही फक्त या बाफ पुरताच मर्यादीत न राखता दैंनदिन जीवनात कुणाही मराठी व्यक्तीशी सवांद साधताना करु. हवे तर याला तू २०१० चा नवीन संकल्प म्हण.

>>बर्फमलई ... नाही ना कारण आपण icecream बनवताना त्यातले पाणी आटवतो न बर्फ म्हटला की पाणी आले ना ...

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण बघता मराठीवरचे हे अतिक्रमण थांबवणे अवघड आहे.>> दोन्ही भाषा वेगळ्या आहेत, त्यांची भेसळ कशाला करायची? मी माझ्या मुलाशी जास्त करुन मराठीच बोलते, तो ही तसचं बोलतो, अगदीच माहित नसेल की एखाद्या शब्दाला मराठीत काय म्हणतात तर तो ईंग्रजी शब्द वापरतो. त्याला माहित नसेल तर, आजकाल तोच विचारतो ह्याला मराठीत काय म्हणतात. वातावरण, मनुष्य हे शब्द तो सर्रास वापरतो. माझ्या जावेला एक दिवस तो म्हणे "आज वातावरण एकदम गरम आहे.", ती एकदम अवाक.

बाईमाणूस थॅन्क्स आपलं धन्यवाद!! मला काय वाटतं - आईसक्रीम = दुग्धशर्करायुक्तशीतघनगोललड्डू हे कसं आहे? Proud

बरं आज मी मेरूच्या कॉलसेंटरला फोन केला होता. मराठीत बोललो! कॉलसेंटरला मराठीत काय म्हणता येईल?

ज्या गोष्टी बाहेरुन इथे आल्या जसे आइसक्रिम, ट्रेन, टोमॅटो वगैरे त्यांना त्यांच्या मुळ नावानेच ओळखायला पाहिजे. तिथे मुद्दाम त्याचे भाषांतर करुन शब्द तयार करण्यात अर्थ नाही, उगाचच हसे होते.

प्रीति, बरोबर लिहिलय्स. पण बोलताना कधीकधी लक्षात येत कि खूप सारे मराठी शब्द आपण हल्ली वापरत नाही आहोत. आपल्या बोलण्यात जितके मराठी शब्द येतील तितके शब्द मुल उचलतीलच.

अगदी सहमत साधना.. वर जरा गंमत करत होतो.

बी, तुला काय म्हणायचे आहे ते अत्यन्त स्पष्ट पणे माझ्यापर्यन्त पोहोचले, व मला ते एकशे एक टक्के मान्य आहे Happy
(माफ कर पण २००४ साली विशिष्ट विषय हाताळण्याकरता म्हणून मी ही जी आयडी वापरु लागलो, तिची तेव्हाचि मूळ व्यक्ति न ऑळखण्यासाठीची गरज अर्धा न वापरण्याची होती, आता ती सवईने येवढी ...... असो, तुझ्या एके ठिकाणच्या सुचनेनुसार येथुन पुढे मी अनुस्वार द्यायचा प्रयत्न करेन -
पण दोन-चार नाही तर दहावीस शिव्या मी कायम त्यान्ना देतो ज्यान्नी माझी मूळ ओळख उघड करायचा सूर्याजीपिसाळाचा डाव मान्डला - ते प्रयेक्जण दोषी आहेत, मग ती विषकन्या असेल वा यस्जीरोडवरचे तथाकथित सुशिक्षित (पण कदाचित बुभुक्षितही) नर-नारीपुन्गव असतील)

या शब्दांना विंग्रजी प्रतिशब्द सुचवा:

बेणं
कार्टं
भटकभवानी
दारकांडं
वाकळ
तेगारा

Biggrin

शरद

शरद Proud

खरेच काही काही शब्दांना प्रतिशब्द नसतातच. मग ते इंग्रजी असोत वा मराठीत.

पण ह्या बीबीचा मुळ विषय जो आहे, 'मराठी बोलताना आपण वापरत असलेले इंग्रजी शब्द' हा कितपत गंभीर प्रश्न आहे? ज्या वेगाने अगदी गावातले लोकही कल्पना नसताना इंग्रजी शब्दांचा वापर करतात ते पाहुन खरेच असे वाटते का की काही वर्षात मराठी लुप्त होईल म्हणुन?

पण मुळात मराठीत इतर भाषांतुन आलेले कितीतरी शब्द आहेत आणि हे काय आज आलेले नाहीत तर मराठीचा जन्म झाला तेव्हापासुन हे येणे चालु आहे. तेव्हा फारसी आले, आज इंग्रजी येताहेत. फारसी आणि इतर भाषांमधले शब्द घेऊन आलेली मराठी ही एक पुर्ण आणि समृद्ध भाषा आहे असे आपण आजवर मानत आलोय, मग त्यात इंग्रजी शब्दांची भर पडली तर काय बिघडले? शिवाय इंग्रजीची भरही काय आज पडत नाहीये. गेल्या दोनशे वर्षांपासुन ती प्रक्रिया चालुच आहे. फक्त आता अगदी बालपणापासुन इंग्रजीचा संस्कार होत असल्याने त्या शब्दांचे अस्तित्व जास्त जाणवतेय.

आज गावचा एखादा 'लालटेन' घेऊन रात्री बाहेर पडतो. शेतातुन दहा 'केरेट' टोमॅटो काढले, घराशेजारी कांदे ठेवायला 'छड' बांधली म्हणुन सांगतो तेव्हा त्याला माहितही नसते की तो इंग्रजीमिश्रित मराठी बोलतोय ते.

>> मग त्यात इंग्रजी शब्दांची भर पडली तर काय बिघडले?
करेक्ट.. पण, इंग्लिश वर्डस् ची अ‍ॅडिशन होणं डिफ्रंट आणि त्यांनी मराठी वर्डस् ना रिप्लेस करणं डिफ्रंट... करेक्ट ना?
इथल्या टिवल्या बावल्या संपल्या आणि खरचं काही वाचायला मिळालं तर आवडेल.

करेक्ट.. पण, इंग्लिश वर्डस् ची अ‍ॅडिशन होणं डिफ्रंट आणि त्यांनी मराठी वर्डस् ना रिप्लेस करणं डिफ्रंट... करेक्ट ना?

हो, हे मराठी नाहीय, हे फक्त कर्ता आणि क्रियापद वगळता बोललेले इंग्रजी आहे. इंग्रजी शब्दांचा असा वापर अर्थातच अपेक्षित नाही. मला इतर भाषिक शब्द जसे मराठीत एकरुप झालेत आणि आता वेगळे ओळखता येत नाहीत त्याप्रमाणे इंग्रजी शब्द म्हणायचेय, जसे टेबल, पेन, पेपर, पेन्सिल, बिस्किट, आइसक्रिम, चेन, रिंग.... इ. शब्द.

बी जी , तुमची 'आईडया' तशी 'फणटासटीक' आहे, 'व्हेरी गुड' आहे, तसा मी'बी 'बीजी' असतो 'वर्क' मध्ये 'आल टाइम' ,कारण 'लोड' 'हाय' आहे, तरीपण मि 'टेस्ट' करुन, 'चेक' करुन,'कमेंट' करतो की तुमचं हे 'रायटींग' एकदम 'राईट' आणि 'फसक्लास','इनट्रेस्टींग' आहे,'बेस्ट' आहे ! ठअँक यु बरं का ! सी यु 'नेक्स्ट टाइम' !

जपानी भाषेत पण बरेच शब्द इतर भाषांमधुन आले आहेत, मुख्यत्वेकरून इंग्रजीमधुन.
नविन तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी नाही), संगणक, इ. क्षेत्रांशी संबंधित बरेच शब्द हे इंग्रजी असुन ते जसेच्या तसे वापरले जातात. पण ते लिहिताना त्यांच्याच लिपीत लिहितात, तसेच उच्चार पण जपानाळलेले असतात.
उदा. टेबल = तेबुरू ; संगणक = कोम्प्युताS
जर्मन भाषेतुन आलेला एक शब्द मला माहिती आहे तो म्हणजे,
आरूबाईतो = अर्धवेळ काम करणे (पार्ट टाईम वर्क)
आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे संस्कृतमधुन पण काही शब्द आले आहेत.
त्यापैकी मला माहित असलेला आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा शब्द म्हणजे,
सेवा = सेवा (उच्चार आणि अर्थ यात काही बदल नाही) सेवा ओ सुरू म्हणजे सेवा करणे (help; do a service ((to)); take care ((of)); look after.)
या व्यतिरिक्त आणखी काही भाषांमधुन शब्द आले असण्याची शक्यता आहे. पण मला माहिती नाहीये.
तसेच परकीय भाषेतुन जपानी मधे आलेले शब्द किती आहेत, ही संख्यात्मक माहिती पण सांगता येणार नाही.
शोध घ्यावा लागेल.

Pages