गुणसूत्रांची भेसळ थांबवा!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 2 February, 2010 - 00:06

नमस्कार!

ह्या घडीला पर्यावरण मंत्री जयराम रमेश अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सना भारतातील फळभाज्यांचा राजा असलेल्या "वांग्या"च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल विचारविनिमय करत आहेत.

येथे एका अभिनव पद्धतीने मंत्री महोदयांना भारतातील वांग्याचे रक्षण करण्याची विनंती करण्यात येत आहे : जगातील सर्वात मोठ्या पातळीवर वांग्याचे भरीत बनविण्यात येत आहे. आणि ते भरीत दिल्लीतील हजारो गरीब व भुकेल्या जनतेला वाटण्यात येणार आहे.
ध्येय आहे २०,००० (वीस हजार) वांग्यांचे! तुम्ही खालील पिटिशनवर साईन (स्वाक्षरी) करून त्यांत एका वांग्याची भर टाकाल काय?

http://greenpeace.in/safefood/the-biggest-baingan-bharta-ever/

पिटिशन मध्ये लिहिले आहे : "भारताने आपल्या वांग्यांना अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सद्वारा प्रदूषित होऊ देऊ नये."

धन्यवाद!

--- अरुंधती

Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म....
अजून एक मुद्दा : म्हणे कधी काळी महाराष्ट्रात तांदळाच्या शेप्या वरंगळ, धुड्या वरंगळ, वरंगळ, डोंगरे, बुगडी, वाकसाळ, राजावळ, सकवार, मुडगा, टाकळे, मासडभात, हरकल, डामगा, डामरगा, जिरगा, जिरवेल, जिरेसाळ, गोदवेल, राता, पटणी आणि त्याच्या अनेक उपज़ा‌‌ती, चिमणसाळ, चिन्‍नोर, झिल्ली, मालकुडई, पांढरी साळ, काळी साळ, तांबसाळ, तांबकुडय इत्यादी इत्यादी पिकत होत्या. [असे माझ्या वाचनात आले.] आता त्या दिसत नाहीत. त्यांच्याऐवजी पचायला जड बासमती, कोलम, परिमल, कमोद आणि उकड्या तांदळासारखे काही तांदूळ आजकाल बाजारात मिळतात. थोडक्यात काय, वैविध्य, रुचिसंपन्नता व गुणवैशिष्ट्याच्या दृष्टीने ह्या धान्याच्या बाबतीत आपली पीछेहाटच झाली म्हणायची.
बीटी वांग्यांमध्ये आताच्या भारतात अस्तित्वात असणार्‍या वांग्यांच्या भिन्न प्रजातींच्या निरनिराळ्या चवी, रंग, रूप, गुण आणि जातिवैशिष्ट्य टिकून राहणार का?

<<<<<<५० वर्षामागचे तरुण आणि आताचे ,यांच्या खाण्यात्,व्यायामात कितीतरी फरक आहे ...>>>>>>>

तुम्हा काय म्हण्नयचे आहे, की हे सगळ रासायनिक खते वापरलेले आणि किटकनाशक फवारलेले अन्न धान्ये खाल्या मुळे झालं ?, आजकाल सगळ्या सुख सुविधा पाहीजे असतात, मेहनीतीचे काम करायला कोणीच तयार नाही असे बरेच कारणं आहेत.

<<<<<<<बीटी वांग्यांमध्ये आताच्या भारतात अस्तित्वात असणार्‍या वांग्यांच्या भिन्न प्रजातींच्या निरनिराळ्या चवी, रंग, रूप, गुण आणि जातिवैशिष्ट्य टिकून राहणार का?>>>>>>>

वरील प्रश्नाचे उत्तर " हो" आहे,
कारण बीटी फक्त त्या प्रजातींची ठरावीक ग्रुप च्या किटकांविरुध्द प्रतीकार शक्ती वाढवेल (अर्थात बीटी जिन्स त्या प्रजातीं मध्ये टाकले तर).

तुम्ही वर म्हटल्या प्रमाणे, महाराष्ट्रातील आधीच्या तांदळाच्या जातीचे नामशेष होऊन त्यांची जागा आताच्या, बासमती, कोमल, परीमल, कमोद, इत्यादी.... प्रजातींनी घेतली आहे, आधीच्या जाती पचायला हलक्या ही असतील परंतु उत्पन्न कमी देणार्या असल्यामुळे, शेतकरी आत्ताच्या जास्त उत्पन्न देनार्या प्रजाती कडे वळले आहेत, आणि हा सगळा बदल बीटी वांग बाजारात येण्या आधीच झाला आहे हे पण लक्षात घेतले गेले पाहीजे.......

>>बीटी वांग्यांमध्ये आताच्या भारतात अस्तित्वात असणार्‍या वांग्यांच्या भिन्न प्रजातींच्या निरनिराळ्या चवी, रंग, रूप, गुण आणि जातिवैशिष्ट्य टिकून राहणार का?
बीटी वांगी जास्त उत्पन्न देत असतील तर शेतकरी आपसुकच तिकडे वळणार. जनतेला विविध वांगी खायला मिळावीत म्हणून तो आपले नुकसान का करून घेइल ? शिवाय आस्तित्वात असलेल्या बाकिच्या जातींच्या वांग्यात पण बीटी जीन घालून त्या त्या वांग्यांची बीटी आवृत्ती करता येइलच की. किटक नाशक फावरलेली वांगी खाण्यापेक्षा बीटी बरी.
क्वार्ट्झ ची घड्याळे आली आणी मेकॅनिकल घड्याळे मागे पडली. पण ज्यांना हौस आहे त्यंच्यासाठी मेकॅनिकल उपलब्ध आहेतच थोडासा प्रिमियम देऊन.

@ विजय,
अगदी बरोबर, मला तेच म्हणायचे आहे, बीटी ने फक्त पिकांची प्रतीकार शक्ती वाढेल, बीटी जर जास्त उत्पन्न देनारया प्रजातीमधे टाकला तर अजुन उत्पन्न वाढायला मदत होईल आणि भारताल ते करणे गरजेचे आहे.

@ मॄण्मयी,
क्रॉय जिन्स चे पेटंन्ट मॉनस्यन्टो या कंपनी कडेच आहेत...... असे भरपुर पिंकाचे वेगवेगळ्या कारणांसाठी जेनेटीक मॉडीफिकेशन सुरु आहे, भारता बद्द्ल बोलायचे झाल्यास, टमाटे, तुर, भेन्डी, पत्ता कोबी, फुल कोबी अशी मोठी यादी आहे.

गणेश, त्याच वेबसाइटवर भारतात मॉन्सॅन्टोच्या लॅब्ज कुठे कुठे आहेत त्याचे पत्ते दिलेत. तेव्हा ह्यांचं बरंचसं संशोधनाचं काम आपल्याकडे पण होत असावं.
मॉन्सॅन्टोच्या सीड मार्केट मोनोपोलाइझ करण्याबद्दल बर्‍याच तक्रारी आहेत. पण संशोधन मात्र खरोखरंच उच्च दर्जाचं होतं.

हो ते बरोबर आहे, त्यांचे भारतात महीको सोबत collaboration आहे, आणि बंगरुळ ला त्यांची स्वताची मोठी R & D Lab आहे.....

त्यांच्या कापसाच्या बीटी प्रजाती (महीको सोबत च्या) काही चालल्या नाही, कारण त्यानी बीटी जीन महीकोच्या कमी उत्पन्न देनार्या प्रजाती मध्ये टाकला होता. म्हणुन ते मोनोपॉली करु शकले नाही.
नंतर त्यांनी Royalty घेऊन ते जीन्स इतर भारतीय प्रजाती मध्ये टाकायला परवान्गी दिली, म्हणुन सध्या अशा २०० पेक्शा जास्त भारतीय कापसाच्या प्रजातीत ते जीन्स आहेत.... आणी आता तसा कायदा आहे की कुठला ही नविन जिन्स ला परवानगी मिळाली तर ते भारतीय प्रजाती मध्ये पण टाकले जातील, त्यामुळे कुठली ही परकीय कंपनी मोनोपॉली करु शकणार नाही.

म्हणजे थोडक्यात बीटी म्हणजे आहे त्याच प्रजातीत अजुन एक वेगळा जीन टाकला त्यामुळे त्या पिकाचे इतर गुणधर्म तर कायम राहिलेच जसे वास, चव, रंग इ. पण सोबत काही किटकांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली.

जर हे असेच असेल तर मग कृष्णाकाठच्या वांग्यांची जी चव आहे ती तशीच कायम राहिल...

तो किटकनाशक असलेला जीन आपल्या पोटात गेला तर आपल्यावर त्याचा काय परिणाम होणार हे पाहणे गरजेचे आहे, पण मला वाटते हे टेस्टींग खुप वेळ घेईल कारण मुळात तो जीन बाकीच्या जीन्सच्या तुलनेत माणसासाठी एवढा प्रभावी नसणार, शिवाय टेस्टींग करताना इतर गोष्टींचा माणसावर झालेला परीणाम वगळून फक्त ह्या जीनमुळॅ होणारा परिणाम पाहावा लागणार जे अतिशय कठीण असणार...

<<<<<उद्या जर बीटी धान्य खाऊन खरोखरच कोणाला कायतरी झाले हे सिद्ध झाले आणि मग त्याने या सगळ्या संस्थांना कोर्टात खेचायचे ठरवले (अर्थात हे फक्त अमेरीकेत शक्य आहे), तर कोर्ट त्यालाच तुरुंगात टाकेल, किटकनाशक खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणुन.... >>>>>>>

बीटी पिकांची वर्गवारी किटकनाशक म्हणुन होत असली तरी, ते रासायनिक किटक नाशक नाही, ते जैविक किटकनाशक आहे, आणि माझ्या मते कोर्टात अशी एक ही केस आली नसेल की कोणी जैवीक किटकनाशक खाऊन आत्महत्या केली, जर अशी केस आलीच तर, न्यायधीशाना ही प्रश्न पडेल की आता काय निर्णय द्यावा...... Proud

कालच इंडियन एक्स्प्रेस मध्ये बातमी वाचली....बीटी वांग्याच्या भवितव्याचा पुनर्विचार करण्यासाठी पंतप्रधान, रमेश, पवार, चव्हाण इ. मधे मीटिंग झाली. बीटी वांगे जर निर्धारित चाचण्या उत्तीर्ण झाले तर त्याला हिरवा कंदिल दाखविण्यात येईल असे चित्र सध्या तरी उभे करण्यात येत आहे.

http://www.in.com/news/current-affairs/pm-upholds-moratorium-on-bt-brinj...

http://www.livemint.com/2010/02/25223130/Genetics-panel-may-propose-saf....

मला अजून एक प्रश्न पडतो, जो ह्या बीटी वांग्याशी थेट संबंधित नसला तरी दूरान्वयाने त्याचा ह्या वांग्याशी संबंध आहे. ज्या विशालकाय लोकसंख्येला अन्नधान्य पुरत नाही म्हणून हा सर्व खटाटोप चाललाय ती विशाल लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी, लोकसंख्या नियंत्रणासाठी जर एवढ्या 'युध्द' पातळीवर प्रयत्न केले तर? संततीनियमनासाठीचे कायदेकानून अधिक कडक केले तर? त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे केली तर?
....... कदाचित हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल Happy

ज्या विशालकाय लोकसंख्येला अन्नधान्य पुरत नाही म्हणून हा सर्व खटाटोप चाललाय ती विशाल लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी, लोकसंख्या नियंत्रणासाठी जर एवढ्या 'युध्द' पातळीवर प्रयत्न केले तर? संततीनियमनासाठीचे कायदेकानून अधिक कडक केले तर? त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे केली तर?

हा खरेच ह्या बीबीचा विषय नाहीये तरीही एक सांगावेसे वाटते, असे जर केले तर इथली मुळ हिंदु प्रजा अल्पसंख्यांक होईल.. कारण इथली जी प्रजा अगदी कॉंग्रेस गवतासारखी वाढतेय तिला तिच्या धर्मानेच संततीनियमनाची बंदी केलीय. आणि त्या प्रजेचा धर्म सध्या सगळे डोक्यावर घेऊन नाचताहेत, त्याला जरासाही धक्का लागला तर ती प्रजा एकवेळ सहन करेल पण ते डोक्यावर घेऊन नाचणारे इतर महान लोक सहन करणार नाहीत.......

इतर सगळ्या गोष्टींकडे पुर्ण दुर्लक्ष करुन फक्त देशहित व समाजहित हाच एकमेव अजेंडा घेऊन काम करणारे सरकार १९४७ नंतर एक-दोन निवडणुकीतुन निवडुन आले असेल तर मला माहित नाही, कारण माझा जन्म तेव्हा झाला नव्हता, पण माझ्या जन्मानंतर मी असले सरकार पाहिले नाही आणि आता यापुढे असले सरकार येईल ही शक्यता पुर्णपणे मावळली आहे.

साधना,अरुंधती जी ....
काही शेतकरी नेत्यांची विधाने पाहिली आणि अभ्यास केला तर मलाही असं वाटतयं ...की
बी टी बियाण्याला विरोध हा मु़ख्य करुन किटकनाशक कंपन्या आणि त्यांची साखळी याच्याकडुन होतोय ...आता पर्यंत देशातल्या कोणत्याही सरकारी तज्ञांनी बी टी विरोधात ठाम मत व्यक्त केलेल दिसत नाही ...
जर हे असेच असेल तर मग कृष्णाकाठच्या वांग्यांची जी चव आहे ती तशीच कायम राहिल...
"कृष्णाकाठच्या वांग्यांची चव " खूप मिस करतोय ...फक्त आठवण काढुन समाधान मानायचं !

बीटी वांगी जास्त उत्पन्न देत असतील तर शेतकरी आपसुकच तिकडे वळणार. जनतेला विविध वांगी खायला मिळावीत म्हणून तो आपले नुकसान का करून घेइल ? शिवाय आस्तित्वात असलेल्या बाकिच्या जातींच्या वांग्यात पण बीटी जीन घालून त्या त्या वांग्यांची बीटी आवृत्ती करता येइलच की. किटक नाशक फावरलेली वांगी खाण्यापेक्षा बीटी बरी.

शेवटी सर्व प्रश्न 'आर्थिक फायद्या'पाशीच येऊन थांबतात हे खरंय! शेतकरी, दलाल व विक्रेते ह्या सर्वांनाच आपापला आर्थिक फायदा बघायचा आहे. बीटी वांगी खाणे मानवाच्या प्रकृतीला व पर्यावरणाला हानीकारक अथवा नाही हे तर संशोधन व काळ ठरवेलच! पण तोवर भारतातील ग्राहकराजाचा 'आपल्या मर्जीचे' खाण्याचा हक्क जोपासला जाण्याचे चिन्ह दिसत नाही. आज अमेरिकेतील ग्राहक खूप सजग आहे ह्याबाबतीत.... आपल्या शरीरात आपण कोणत्या रसायनांना, घटकांना जाऊ द्यायचे अथवा नाही ह्याबाबत तो आग्रही दिसून येतो. किमानपक्षी त्याबद्दलची जागरूकता तिथे वाढीस लागलेली दिसते. पण भारतातील जनतेचे अद्याप तसे नाही. अमेरिकेने 'टाकलेले', त्याज्य ठरवलेले अनेक अन्नपदार्थ, खाद्यपेये आपल्याकडे आरामात नांदताना दिसतात. तसेच ह्या बीटी वांग्याचेही होऊ नये म्हणजे झाले!

सध्याचं जुनी/देशी वांगी जे खातोय ...त्यावर देखिल कितीतरी किटकनाशकाची फवारणी केलेली असतेच ,त्यानुसार बीटी वांग म्हणजे खूप काही वेगळी गोष्ट आहे .....अस मानु नये ...

वरील चर्चा वाचुन १ प्रश्न पड्ला आहे, कुणी उत्तर देऊ शकेल का?
- बीटी वांगी वापरुन अन्न धान्याची टन्चाई कशी दूर होणार? i mean त्यासाठी अन्य पिके पण बीटी स्वरुपात येणार आहेत का?
माझा प्रश्न अज्ञानमुलक असु शकतो, केवळ उत्सुकता म्हणुन विचार्तेय..

सरकारचा व बीटी संशोधन करणाऱ्या काही शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की बीटी पीक रोग, कीड कमी लागल्यामुळे भरघोस उत्पादन देईल. त्यामुळे सध्या एकरी जे उत्पादन मिळते त्यात मोठ्या प्रमाणात भर पडेल. पर्यायाने अन्न-धान्य टंचाई दूर होण्यास मदत होईल. [परंतु येथे वाढत्या लोकसंख्येचा अक्राळविक्राळ प्रश्न दुर्लक्षित दिसतो. त्यावर उपाय करणे नाही.... ही वरवरची डागडुजी.... शिवाय इतर गोष्टी इतक्या महागल्या असताना त्याचा परिणाम शेतीमालाच्या किंमतीवरही होणार.... मग जे 'भुकेले', गरीब लोक आहेत, त्यांची भूक कशी मिटणार??? पण असे सवाल सामान्य माणसाने म्हणे विचारायचे नसतात. कारण सरकारी धोरणांमध्ये त्यांना उत्तर नसते.... किंवा असलेच तर ते फारच तकलादू स्वरूपाचे असते. ]
आता बीटी वांग्यापाठोपाठ इतरही पिके, जसे, टोमॅटो, भात, बटाटा, भुईमूग, मका, सोयाबीन इत्यादींमध्ये बीटी संशोधन चालू आहे/ ती वांग्याच्या पाठोपाठ भारताच्या बाजारपेठेत येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अर्थात बहुतेक सर्व पिकांच्या संशोधनात महिको, मोन्सॅटो ह्या दोनच कंपन्या प्राबल्याने आढळतात. आजच सकाळमध्ये गुरुचरण दासचा बीटीगुणगान करणारा लेख छापून आलाय. पवारांच्या पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रापाठोपाठ अनेकांना कंठ फुटलेत सध्या. अगोदर ही मंडळी झोपली होती काय?

<अगोदर ही मंडळी झोपली होती काय?>

नाही. झोपली नव्हती. पण फारसा अभ्यास न करता मुक्ताफळ पाजळणार्‍या इको-माफियांच्या गदारोळात त्यांचा आवाज दबला होता, इतकंच.
इडोनेशिया, फिलिपिन्स या देशांनी आता बीटी वाणांना परवानगी दिली आहे.

>>आज अमेरिकेतील ग्राहक खूप सजग आहे ह्याबाबतीत...
अमेरिकेतील बहुतेक मका, सोय वगैरे बीटी असतात. अर्थात आपण अमेरिकेचे अंधानुकरण करावे असे नाही, पण बीटी अमेरिकेतही आहेच.
>>पण तोवर भारतातील ग्राहकराजाचा 'आपल्या मर्जीचे' खाण्याचा हक्क जोपासला जाण्याचे चिन्ह दिसत नाही.
हेही तितकेसे खरे नाही. एखाद्या ग्राहकाला ऑरगॅनिकच ( किंवा नॉन बीटी) हवे असेल आणी त्यासाठी तो जास्त पैसे देत असेल तर त्याला जरूर मिळेल.
>>इको-माफिया
Happy
पवारांनी मांडलेले मुद्दे खरेच चांगले आहेत.
>>अगोदर ही मंडळी झोपली होती काय?
नाही हो ! मी केव्हापासून देव पाण्यात घालून ठेवले आहेत बीटी साठी. Happy

< नाही. झोपली नव्हती. पण फारसा अभ्यास न करता मुक्ताफळ पाजळणार्‍या इको-माफियांच्या गदारोळात त्यांचा आवाज दबला होता, इतकंच.
हे तितकंसं पटत नाही. आज पवारांचं मुखपत्र असलेल्या सकाळमध्ये गुरुचरण दास, अनंत बागाईतकर यांसारखी मंडळी नियमित स्तंभलेखन करतात, वादग्रस्त विषय निवडतात व वादग्रस्त विधानेही करतात. त्यांचे आवाज असे 'दबण्या' सारखे नाहीत! त्यामुळे आपला हा मुद्दा तितका पटला नाही.

गेल्या महिनाभरात:बीटी वांग्यासंदर्भात निदर्शनाला आलेल्या काही विसंगती / त्रुटी :

१]प्रसारमाध्यमांची अचानक बदललेली भूमिका. जी वर्तमानपत्रे अगोदर बीटी विषयी साधक - बाधक चर्चा करत होती, ती आता बीटी वाणाचे व वांग्याचे अचानक गुणगान गाऊ लागली. एका महिन्यात असे काय चित्र बदलले? मग कोणती भूमिका खरी समजायची? आधीची की नंतरची?

२] सरकारातील अनेक मंत्र्यांना, अनेक शास्त्रज्ञांना अचानक बीटीचे समर्थन करावेसे वाटू लागले. बीटी वांग्याला स्थगिती मिळेपर्यंत यांची तोंडे का बंद होती? आता जे समर्थन चालू आहे ते स्वतःच्या टीआरपी साठी, राजकीय - आर्थिक लाभासाठी की देशाच्या व शेतकर्‍यांच्या हिताच्या प्रामाणिक (?) कळवळीपोटी???

३] चव्हाण यांनी पाठविलेल्या पत्रात मोन्सॅटो व महिको कंपन्यांची भलावण करणार्‍या ग्रुपने दिलेल्या पत्राची हुबेहूब कॉपीच जर करण्यात येत असेल तर त्यांचे धोरण/ मत पूर्वग्रहदोषमुक्त कसे मानायचे? त्यांचे कोणतेही हितसंबंध गुंतलेले नाहीत हे कसे?

४] खाजगी प्रयोगशाळेत केल्या गेलेल्या प्रयोगांना व त्यांच्या निकालांना देशव्यापी पातळीवर ग्राह्य धरून त्यानुसार धोरण ठरवायला ते निकाल तेवढे पारदर्शी व हितसंबंधमुक्त आहेत का, ह्याची कसोटी कशी ठरणार?

५] जर सरकार, कृषीमन्त्री व इतर मंत्रीमंडळाला खाजगी प्रयोगशाळेत संशोधित केलेल्या बीटी वाणाची एवढी खात्री आहे तर ते जे ग्रुप्स, संस्था, शास्त्रज्ञ बीटी वाणाला विरोध करत आहेत त्यांना आपले म्हणणे ठराविक काळात पुराव्यासकट पारदर्शी पध्दतीने सिध्द करण्याचे आव्हान का देत नाहीत? किंवा ज्या प्रयोगशाळेचे कोणतेही हितसंबंध ह्या संशोधनात गुंतलेले नाहीत अशा अन्य खाजगी प्रयोगशाळेकडून बीटी वाणाची पुनर्तपासणी का करून घेत नाहीत?

आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरे ज्ञात असल्यास जरूर प्रकाश टाकावा! Happy

** बीटी कॉटन नापास व अयशस्वी झाल्याची कबुली खुद्द मोन्सॅटो कंपनीच देत आहे! २ तासांपूर्वी आलेली ही लिन्क तपासा : http://indiatoday.intoday.in/site/Story/86939/India/Bt+cotton+has+failed...

त्याच लिंकला जोडून ही अजून एक लिंक मिळाली, जिथे मोन्सॅटोचे माजी प्रमुख मोन्सॅटो कंपनीने अप्रुव्हलसाठी डाटा fake केल्याची कबुली देतात. हे कसे? पहा ही लिंक!

http://indiatoday.intoday.in/site/Story/83093/Top%20Stories/Monsanto+'faked'+data+for+approvals+claims+its+ex-chief.html

ह्म्म्म्म............. (डोके धरुन बसलेली बाहुली.....) (कोणीतरी असल्या बाहुल्याही टाका इकडे..)

सामना ज्या अर्थाने शिवसेनेचे मुखपत्र आहे त्या अर्थाने सकाळ पवारांचे नव्हे.
>>]प्रसारमाध्यमांची अचानक बदललेली भूमिका. जी वर्तमानपत्रे अगोदर बीटी विषयी साधक - बाधक चर्चा करत होती, ती आता बीटी वाणाचे व वांग्याचे अचानक गुणगान गाऊ लागली. एका महिन्यात असे काय चित्र बदलले? मग कोणती भूमिका खरी समजायची? आधीची की नंतरची?

consistency is a virtue of a donkey असे म्हणतात. एखाद्या विषयावरची भुमिका जास्त माहिती मिळाल्यावर बदलु शकते.

>सरकारातील अनेक मंत्र्यांना, अनेक शास्त्रज्ञांना अचानक बीटीचे समर्थन करावेसे वाटू लागले
हेही अचानक झालेले नाही. ते आधीपासूनच समर्थक होते.

>>बीटी कॉटन नापास व अयशस्वी झाल्याची कबुली खुद्द मोन्सॅटो कंपनीच देत आहे! २ तासांपूर्वी आलेली ही लिन्क

असा निष्कर्ष घाई घाईने काढणे योग्य नाही. शिवाय बी टी कॉटन नापास झाले तर शेतकरी त्याची लागवड करणारच नाहीत ना? एकादे नवे तंत्रज्ञान आले के सुरुवातीला थोडे setbacks होतातच.

अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट आहे आणी लोकसंख्या एक तृतियांश. शिवाय अमेरिकेत पाणी मुबलक आहे. भारतातील वाढती लोकसंख्या, वाढते रहाणीमान, न वाढणारे,( किम्बहुना कमीच होणारे ) शेतीचे क्षेत्रफळ, आणी बायोटेक मध्ये शिक्षण झालेले बरेच युवक, याचा विचार करता बायोटेक हा एक पर्याय आहे. आणखी काही वर्षांनी बायोटेक निर्यात करण्याची क्षमता आली तर बरेच होईल.

१. <<प्रसारमाध्यमांची अचानक बदललेली भूमिका. जी वर्तमानपत्रे अगोदर बीटी विषयी साधक - बाधक चर्चा करत होती, ती आता बीटी वाणाचे व वांग्याचे अचानक गुणगान गाऊ लागली. एका महिन्यात असे काय चित्र बदलले? मग कोणती भूमिका खरी समजायची? आधीची की नंतरची? >>

जयराम रमेश यांनी निर्णय दिल्यावरच हा विषय लोकांपर्यंत अधिक पोहोचला. एखादा मुद्दा पटला तर त्यांनी तो स्वीकारला असेल. या मुद्द्याचं प्रयोजन अजिबातच कळलं नाही.

२. <<सरकारातील अनेक मंत्र्यांना, अनेक शास्त्रज्ञांना अचानक बीटीचे समर्थन करावेसे वाटू लागले. बीटी वांग्याला स्थगिती मिळेपर्यंत यांची तोंडे का बंद होती? आता जे समर्थन चालू आहे ते स्वतःच्या टीआरपी साठी, राजकीय - आर्थिक लाभासाठी की देशाच्या व शेतकर्‍यांच्या हिताच्या प्रामाणिक (?) कळवळीपोटी???>>

शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, कपिल सिब्बल हे मंत्री फार पूर्वीपासून बीटी वाणांचे समर्थक आहेत. त्यांची भूमिका अचानक बदललेली नाही.

३. बीटी वाणांसंबंधीचे सर्वच प्रयोग खाजगी संस्थांत केले गेलेले नाहीत. राहुरी, परभणी, अकोल्यातील कृषी विद्यापीठंही त्यात सहभागी होती. Centre for Molecular Biology, Coimbatore, Tamil Nadu Agriculture University (TNAU), University of Agricultural Sciences (UAS) Dharwad, Indian Institute of Vegetable Research, Lucknow अशा सरकारी संस्थांतही चाचण्या झाल्या आहेत, आणि नवीन वाण तयार करण्याचं काम अजूनही सुरू आहे. कलिंगड, भेंडी, कोबी अशी वाणं या विद्यापीठांनी तयारही केली आहेत.

Bio-safety चाचण्यांमध्ये मात्र खाजगी संस्था सहभागी होत्या.

४. यावर शास्त्राज्ञांची चर्चा होत नाही, किंवा प्रयोग थांबले आहेत, हेही साफ खोटं आहे. प्रयोग, चाचण्या सुरू आहेत.
CSIRच्या समीर ब्रह्मचारी यांनी CSIRच्या प्रयोगशाळांत प्रयोग व चाचण्या करून बीटी वाणांचा वापर करण्यास हरकत नाही, असा निर्वाळा दिला आहे.

बाकी, इंडिया टुडेतील बातमीत बीटी कॉटन फक्त गुजरातेतच अयशस्वी ठरल्याचं स्पष्ट लिहिलं आहे, आणि ते का, याचं कारणही दिलं आहे. या बातमीमुळे बीटी वांग्यांच्या विरोधात मत कसं तयार करता येईल, ते कळलं नाही. शेतकर्‍यांनी लागवड योग्य केली नाही, आणि लागवड योग्य न झाल्यास होणार्‍या परिणामांबद्दल Central Institute for Cotton Researchच्या शास्त्रज्ञांनी पर्यावरण मंत्र्यांना लिहिले होते, असं त्या बातमीतच म्हटलं आहे.

जाता जाता, शास्त्रीय विषय व कारणं नीट समजावून न घेता विधानं करणार्‍या पर्यावरणवाद्यांनी सर्वत्र बरंच नुकसान केलं आहे. मध्यंतरी नॅनोतंत्रज्ञानाबद्दलही अशीच काही भन्नाट विधानं काही पर्यावरणवाद्यांनी केली होती. दापोलीला राहणार्‍या एका पर्यावरणवाद्यांनी एकदा मला "कार्बन नॅनोट्युब विषारी असतात, त्यांमुळे माणसाचं आयुष्य कमी होतं. तरी तुम्ही त्या टिव्हीत, औषधामध्ये वापरता. तुमच्यामुळे त्या ट्युबा आता घराघरात आल्या आहेत" असं सुनावलं होतं. आता या ट्युबा विषारी आहेत किंवा नाहीत, यावर संशोधन सुरू आहे. अमेक शास्त्रज्ञ या कामी गुंतलेले आहेत. नक्की निष्कर्ष निघालेले नाहीत. तरीही नॅनोकण विषारी नाहीत, असाच प्राथमिक निष्कर्ष आहे. आता या ट्युबा काही आम्ही घराघरात पोहोचवलेल्या नाहीत. आपण निरांजनावर वाटी धरून काजळ तयार करतो, त्या काजळीतही सुमारे ४०% नॅनोट्युबा असतात. आपण प्रत्येकाने लहानपणी निरांजनावरचं काजळ डोळ्यात घातलेलं आहे. तरीही त्या काजळामुळे काही आपला मृत्यू झाला नाही. टिव्हीतल्या ट्युबांमुळे आपण कसे मरू? आयुर्वेदिय औषधांमध्ये सोन्याचांदीचे नॅनोकण पूर्वापार वापरले जातात. आयुर्वेदिय ग्रंथांत सूक्ष्मभस्मांबद्दल सांगितलं आहे. हेसुद्धा नॅनोकणच. या औषधांच्या वापरामुळे कोणी देवाघरी गेलं आणि खडीकर वैद्य किंवा नानल वैद्य यांच्या घरांवर मोर्चे गेले, असं काही झालेलं नाही. टायगर वूड वापरत असलेला गोल्फ बॉल, अमेरिकन ओपनमध्ये वापरल्या जाणार्‍या रॅकेट्स, नासाने तयार केलेले स्पेससूट्स यांतही नॅनोट्युबा असतात. हे जाणून न घेता, शास्त्रीय प्रयोगांची वाट न पाहता अनेक पर्यावरणवाद्यांनी आणि संस्थांनी एकंदर नॅनोविज्ञानातील संशोधनावरच बंदी घालण्याची मागणी घातली आहे. पर्यावरणवाद्यांचा हा अतिरेकही अतिशय घातक आहे. असो.

< बाकी, इंडिया टुडेतील बातमीत बीटी कॉटन फक्त गुजरातेतच अयशस्वी ठरल्याचं स्पष्ट लिहिलं आहे, आणि ते का, याचं कारणही दिलं आहे. या बातमीमुळे बीटी वांग्यांच्या विरोधात मत कसं तयार करता येईल, ते कळलं नाही. शेतकर्‍यांनी लागवड योग्य केली नाही, आणि लागवड योग्य न झाल्यास होणार्‍या परिणामांबद्दल Central Institute for Cotton Researchच्या शास्त्रज्ञांनी पर्यावरण मंत्र्यांना लिहिले होते, असं त्या बातमीतच म्हटलं आहे >

त्या रिपोर्टमध्ये बीटी कॉटनला लागणार्‍या नव्या किडीचाही उल्लेख आहे. बीटी कॉटन हे फक्त bollworm साठी विषारी असून कापसावर येणार्‍या इतर कीड/ रोगांस ते रोखू शकत नाही हेदेखील हा रिपोर्ट सांगतो. तसेच नवीन आढळलेल्या कीडीमुळे बर्‍याच प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे असेही त्यात म्हटले आहे.

सध्या बीटी वांग्याबाबतही त्याला कीड, रोग लागणार नाहीत व परिणामी कीटकनाशकांवरचा खर्च वाचेल, जास्त उत्पादन येईल हे ठासून सांगितले जात आहे. जर बीटी कॉटनच्या बाबतीत अगोदर अशीच विधाने करूनही त्याला नवी कीड लागून उत्पादन कमी होऊन आर्थिक तोटा होऊ शकतो तर तीच गोष्ट बीटी वांग्याच्या बाबतीत का घडणार नाही?

तसेच मोन्सॅटो कंपनीचे माजी-प्रमुखच जर आपल्या मुलाखतींतून भारत सरकारला कंपनीतर्फे माहिती/ डाटा पुरविताना तो कसा manupulate/ fake केला गेला असे सांगत असतील, तर त्या कंपनीने आतापर्यंत दिलेल्या अहवालांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह का उभे राहू नये? खास करून जेव्हा भारत सरकार त्या डाटाला प्रमाणीभूत मानत असेल, त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहत असेल तेव्हा?

<<<<त्या रिपोर्टमध्ये बीटी कॉटनला लागणार्‍या नव्या किडीचाही उल्लेख आहे. बीटी कॉटन हे फक्त bollworm साठी विषारी असून कापसावर येणार्‍या इतर कीड/ रोगांस ते रोखू शकत नाही हेदेखील हा रिपोर्ट सांगतो. तसेच नवीन आढळलेल्या कीडीमुळे बर्‍याच प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे असेही त्यात म्हटले आहे.>>>>

मागच्या २-३ वर्षा पासुन मिली बग या रस शोषण करणार्या किड मुळे कापसाचे नुकसान झाले, मीली बग चा प्रदुर्भाव आणि बीटी याचा सबंध जोडणे चुकीचे ठरेल, मीली बग ची ही स्पेसीस पाकीस्तानातुन आली आहे (अतीरेकी/ आय एस आय यांचा याच्यात हात नाही बरका) प्रथम उत्तर भारत आणि नंतर संपुर्ण भारतात त्याचा प्रादुर्भाव झाला.... बीटी कॉटन हे फक्त बोंडअळी साठी विषारी आहे हे सगळ्यांना माहीत आहे, बोंडअळी कॉटन ची प्रमुख कीड आहे आणि त्यामुळे कापसाचे ७०-८०% नुकसान होऊ शकते, म्हणुनच त्यासाठी कापसात बीटी टाकन्यात आले, इतर कापसाच्या किडामुळे फार मोठे नुकसान होत नाही व त्यांचे निंयत्रण करणे फारसे अवघड नाही......

<<<<सध्या बीटी वांग्याबाबतही त्याला कीड, रोग लागणार नाहीत व परिणामी कीटकनाशकांवरचा खर्च वाचेल, जास्त उत्पादन येईल हे ठासून सांगितले जात आहे. जर बीटी कॉटनच्या बाबतीत अगोदर अशीच विधाने करूनही त्याला नवी कीड लागून उत्पादन कमी होऊन आर्थिक तोटा होऊ शकतो तर तीच गोष्ट बीटी वांग्याच्या बाबतीत का घडणार नाही?>>>>

बीटी वांग हे फक्त शेंडा आणि फळ पोखरणारी आळी या दोन किड साठी विषारी आहे कारण ते वांग्या चे प्रमुख किड आहेत आणि त्यामुळे आर्थिक नुकसान जास्त होते..... बीटी मुळे १००% नुकसान होणार नाही असं कोणीही म्हटले नाही, नुकसान कसे कमी होईल या बर भर आहे.....

<<<<तसेच मोन्सॅटो कंपनीचे माजी-प्रमुखच जर आपल्या मुलाखतींतून भारत सरकारला कंपनीतर्फे माहिती/ डाटा पुरविताना तो कसा manupulate/ fake केला गेला असे सांगत असतील, तर त्या कंपनीने आतापर्यंत दिलेल्या अहवालांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह का उभे राहू नये? खास करून जेव्हा भारत सरकार त्या डाटाला प्रमाणीभूत मानत असेल, त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहत असेल तेव्हा?>>>>

ही मुलाखत कुठ वाचायला/ एकायला मिळेल का?.......

गूगल सर्च ला india today monsanto ex chief हे शब्द घालून पहा.... ती लिन्क इथे नीट पेस्ट होत नाहिये.

इंडिया टुडे मधला त्या लेखावरून बीटी नापास हा निष्कर्ष काढणे म्हणजे एखाद्या कॅन्सर च्या औषधाने एडस बरा होत नाही यावरून ते औषध नापास ठरविण्यासारखे आहे. बीटी वापरा अगर न वापरा मिलिबग ने नुकसान व्हायचे ते होणारच. बोंड आळीचे नियंत्रण होते का हे महत्वाचे आहे.

अरुंधती जी,
लिंक दिल्या बद्दल धन्यवाद.
मॉनसन्टो चे भारताचे Ex Chief यांच्या बद्दल ची बातमी वाचली, त्यांचे म्हणने बरोबर आहे की १९८० च्या दरम्यान भारताकडे असे रिझ्ल्ट्स टेस्ट करण्यासाठी काहीच व्यवस्था नव्हती, आणि त्यानी नेमके कोणते रिझ्ल्टस खोटे होते ते नाही सांगीतल.... कारण थोंड फार खोट सगळी कडे असतेच......

आत्ता कालच मॉनसन्टो ने प्रेस रिलीज दिले की, गुजरात मध्ये कापसाचे नुकसान पींक बोलवर्म या कीड ची प्रतीकार शक्ती वाढल्या मुळे झाले, आता प्रयन्त जगात कुठे ही या कीड ला ओपन फिल्ड मध्ये प्रतीकार शक्ती वाढल्याचे आढळुन आले नाही..... बहुतेक ही त्यांची ३ जिन्स असनारी कापसाची नविन प्रजात मार्केट मध्ये येण्या आधी चे मार्केटींग स्ट्रटेजी आहे.

Pages