गुणसूत्रांची भेसळ थांबवा!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 2 February, 2010 - 00:06

नमस्कार!

ह्या घडीला पर्यावरण मंत्री जयराम रमेश अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सना भारतातील फळभाज्यांचा राजा असलेल्या "वांग्या"च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल विचारविनिमय करत आहेत.

येथे एका अभिनव पद्धतीने मंत्री महोदयांना भारतातील वांग्याचे रक्षण करण्याची विनंती करण्यात येत आहे : जगातील सर्वात मोठ्या पातळीवर वांग्याचे भरीत बनविण्यात येत आहे. आणि ते भरीत दिल्लीतील हजारो गरीब व भुकेल्या जनतेला वाटण्यात येणार आहे.
ध्येय आहे २०,००० (वीस हजार) वांग्यांचे! तुम्ही खालील पिटिशनवर साईन (स्वाक्षरी) करून त्यांत एका वांग्याची भर टाकाल काय?

http://greenpeace.in/safefood/the-biggest-baingan-bharta-ever/

पिटिशन मध्ये लिहिले आहे : "भारताने आपल्या वांग्यांना अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सद्वारा प्रदूषित होऊ देऊ नये."

धन्यवाद!

--- अरुंधती

Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महत्त्वाचा मुद्दा असा की, बी टी चे बियाणे साठवून पुनःपुन्हा वापरता येत नाही. त्यामुळे त्याची दरवर्शी खरेदी करावी लागते. याचा शेतकरी आणी त्याच्या आर्थिक विपन्नतेशी नक्किच सम्बन्ध आहे>>>>>>>>>>>>>>>>>

बी टी कॉटन बाजारात येण्याच्या आधी बरेचसे भारतीय शेतकरी हायब्रीड कॉटन च्या जाती ची लागवड करत होते, आणि हायब्रीड कॉटन चे बियाणे साठवून पुनःपुन्हा वापरता येत नाही, हे लक्षात घेतले पाहीजे.....

सेंद्रिय शेती झिंदाबाद म्हणणे सोप्पे आहे, पण करणे तितकेसे नाहीय.. मलाही शेती पुर्णपणे नैसर्गिक पद्धतीने, सेंद्रिय पद्धतीने करावी असे खुप वाटते म्हणुन मी स्वतः करुन पाहिलाय सेंद्रिय शेतीचा प्रयोग. पण जेवढे पैसे घातले तेवढे उत्पन्न (तेही फक्त घरापुरते) नाही मिळाले. बाहेरुन इतके किटक/किडा/मुंग्यांचे हल्ले होत असतात की मग किटकनाशकांचा आधार घ्यावाच लागतो. मला तोट्यामुळे फरक पडत नव्हता कारण प्रयोग म्हणुन करत होते, पण त्यावरच पोट असलेल्या शेतक-याला असला आतबट्ट्याचा व्यवहार करुन चालत नाही.

माझी सेंद्रिय शेतीबद्दलची मते मी ओळखीच्या शेतक-यांना सांगते तेव्हा ते फक्त हसतात, चेह-यावर 'अभी तुने देखा ही क्या है' असे भाव असतात Happy

गणेश आणि मृण्मयी, माहितीबद्दल धन्यवाद. बीटी धान्यामुळे शेतक-यांना आणि खाणा-यांना फायदा होत असेल तर ते चांगलेच आहे. पण याचा विरोधइतके लोक करतात त्याचीही काही कारणे असतील ना? विरोध करणा-यांच्या विरोधातले खरे खोटे काय आहे? की केवळ विरोधासाठी म्हणुन विरोध? की तिथेही काही व्हेस्टेड इंटरेस्ट्स आहेत?

विरोध करणा-यांच्या विरोधातले खरे खोटे काय आहे? की केवळ विरोधासाठी म्हणुन विरोध?>>>>>>>>>>>>>>>>
सामान्य माणसाचे मत जे तो एकतो/ वाचतो/पाहतो यावर अवलंबुन असते आणि या सगळ्या गोस्टी मध्ये प्रसार माध्यंमाचा फार मोठा रोल असतो.......... ५-१० बातम्यांवरुन आपले विचार सहज बदलतात. आज काल मिडिया मध्ये कुठल्या विषयाला पब्लिसीटी मिळते ते आपल्या सगळ्यांना माहीती आहे..........

मागे काही दिवसा पुर्वी एकण्यात आले होते की, म्हणे बीटी ला विरोध करणार्या एन. जी. ओ. आणि इतर सस्थां ना पेस्टीसाईड कंपनी वाले मदत (आर्थिक) करतात,....... यात कीती तथ्य आहे ते माहीत नाही........

मुळात बीटी वांगे भारतात आणायचे कारण काय? तर वांग्याच्या उत्पादनात वाढ, कमी खर्च (कीड, रोग यांच्यावर करायला लागणारा कीटकनाशकाचा खर्च वाचेल हा दावा) इत्यादी इत्यादी.
प्रस्थापित देशी वांग्याची गुणवत्ता वाढवून, ते अधिक सकस कसे होईल हे पाहून व त्याच्या भरघोस उत्पादन देणार्‍या जाती विकसित करून हे सर्व नाही का होऊ शकणार?

@साधना : सेन्द्रिय शेती सन्दर्भात हिवरे गावचे सरपंच पोपटराव पवार ह्यांचे भाषण/ अनुभव मी मागे ऐकले होते. त्यांनी सेन्द्रीय शेती फायदेशीर कशी होते हे सप्रात्यक्षिक दाखवून दिले आहे. तुम्ही कृपया तो सन्दर्भ तपासा.

अरूंधती, धन्यवाद. मी शोधले गुगलवर. त्यांची पाण्याच्या संदर्भातली मुलाखत मिळाली. सेन्द्रिय शेती सन्दर्भातली शोधते. मला ह्या विषयावर मिळेल तेवढी माहिती हवीच आहे. Happy

साधना जी, माझी शेती आहे,त्यामुळे खूप वर्षापासुनच स्वप्न आहे ..फक्त 'सेंन्द्रिय शेती' करायची ..खूप संधी आहेत त्यात ..

@साधना : मला कृषीतज्ञ श्री. सुभाष पालेकरांचे भाषण फलटण येथे ५००० शेतकर्‍यांचा जो मेळावा झाला होता तिथे ऐकायला मिळाले. त्यात त्यांनी 'झीरो बजेट' शेतीचे मर्म, तंत्र, पध्दती इत्यादी माहिती दिली होती. त्यांची पुस्तकेही उपलब्ध आहेत बहुधा! मिळाली तर अवश्य वाचा.

एका ब्लॉग वर त्या काही पुस्तकांची नावेही मिळाली. ब्लॉगचा दुवा देत आहे:
http://spiritualfarming.blogspot.com/2008/04/shri-subash-palekarjis-book...

सेंद्रिय शेती चा खर्च फारच जास्त येतो त्यामुळे सेन्द्रिय भाज्या महाग असतात. ज्यांना हे परवडते त्यांना सेंद्रिय भाज्या खरेदी करायचे स्वातंत्र्य जरूर असावे पण त्याच प्रमाणे बी टी भाज्या खरेदी करायचे पण स्वतंत्र्य असावे. एखाद्या शेतकर्‍याला बी टी वांगी लावून उत्पादन वाढविण्याचे स्वातंत्र्य असावे.
@गणेश, म्रु, साधना, अरुंधती व इतर सर्व,
छान माहिती मिळते आहे, धन्यवाद.

साधना,
तुम्ही म्हणालात ते खरेच आहे. परन्तु महाराश्ट्रात आजही सेन्द्रीय शेती करणारे तुरळक का होईना छोटे गट आहेत. माझ्या माहितीनुसार, कै. विलास साळुंखेंच्या पाणी पंचायत या सन्स्थेशी ते जोडलेले आहेत. त्यांच्या अनुभवांचा नक्की उपयोग होईल प्रयोग करताना. पुण्यातील 'गोमुख एन्व्हायर्नमेंटल ट्रस्ट' ही NGO देखील सेन्द्रीय शेतीवर काम करते.
याशिवाय फार पूर्वी दाभोळकरांच्या प्रयोग परिवारातर्फे '१० गुंठे जमीन' वरील शेती प्रयोग आहेतच. मी २ ठिकाणी ते पाहिले आहेत. परन्तु ते व्यवसाय म्हणून किफायतशीर नाहीत. घरगुती स्तरावर उत्तम आहेत.

साधना, काल मी सुभाष पालेकर नाव गूगल केले त्यात हा व इतर बरेच दुवे मिळाले. त्यांची 'झीरो बजेट' शेतीवर बरीच पुस्तके आहेत, व्याख्याने होत असतात, भरपूर माहिती आहे. तुम्हाला व इतरांनाही कदाचित उपयोगी पडेल.
http://palekarzerobudgetnaturalfarming.com/aboutme.html

अरुंधती जी, खूप दुर्मिळ माहीती आहे , तसं पालेकर यांना मी एकदा पुण्यात २००२ च्या शेती प्रदर्शनामध्ये भेटलो होतो ..सगळं शक्य आहे ,पण रिस्क घ्यायला तयार नाही ..आमच्याकडे !

पण रिस्क घ्यायला तयार नाही ..आमच्याकडे !

ह्म्म... अनिल, सगळी जमीन वापरण्याऐवजी थोड्या जमिनीवर करुन बघायला काय हरकत आहे? अर्थात, ह्या बाबतीत शेतकरी कोणाचे ऐकत नाहीत हे अगदी खरेय.. Happy

पालेकरांची माहिती खरेच भन्नाट आहे. एकदा वाचलंय, परत परत वाचायला पाहिजे नीट समजण्यासाठी. धन्यवाद अरुंधती.

ह्म्म... अनिल, सगळी जमीन वापरण्याऐवजी थोड्या जमिनीवर करुन बघायला काय हरकत आहे ?
हे शक्य आहे ...पण ज्या वेळी स्वःत हे करुन मग इतरांना त्याची खात्री पटेल ..परवडत असेल तर ...त्यावेळी ते पुढे येतील

जे रिस्क घ्यायला तयार नाहीत त्यांना पालेकरांची किंवा अशा प्रकारची शेती करून यशस्वी झालेल्या शेतकर्‍यांची भेट घेता येऊ शकेल. अनेक शेतकरी तसे त्यांना भेट देतात.... मळे पाहतात... स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करतात. साईटवर अशा अनेक शेतकर्‍यांचे पत्ते, फोनही आहेत.

<< मागे काही दिवसा पुर्वी एकण्यात आले होते की, म्हणे बीटी ला विरोध करणार्या एन. जी. ओ. आणि इतर सस्थां ना पेस्टीसाईड कंपनी वाले मदत (आर्थिक) करतात,....... यात कीती तथ्य आहे ते माहीत नाही.......>>
शेतकर्‍यांच्या खिशातला पैसा कुणी पळवायचा, बीटी वाल्यांनी की पेस्टीसाईड वाल्यांनी-असाच सामना आहे हा.
दोन्ही बाजू तगड्या आहेत म्हणुन देशभर कल्ला,वादंग होतो आहे. बीटी / पेस्टीसाईड या व्यवसायात गडगंज नफा नसता तर एवढी चर्चा झाली असती? Happy

<< पालेकरांच्या साईटवरील ऑर्गनिक फार्मिन्ग वाचुन धक्का बसला... >>
धक्का बसण्याचे कारण?

ऑर्गनीक फार्मिंग मध्ये त्यांनी वर्मिकंपोस्टबद्दल लिहिलेय ते वाचुन धक्का बसला कारण मी इतकी वर्षे वर्मिकंपोस्ट चांगले असेच समजत होते.

मी स्वतः माझ्या बागेतल्या फुलरोपांवर वर्मी कंपोस्टचा प्रयोग केलेला, आणि तो इतका काही वाईट नव्हता. राणी बागेत दरवर्षी जे फळाफुलांचे प्रदर्शन भरते त्यातल्या भाज्या आणि फळभाज्या ह्या वर्मिकंपोस्टवरच वाढवतात असे मला तिथे उभ्या असलेल्या माणसांनी सांगितलेले. माझ्या ओळखीतल्या एका फॅमिलीने त्यांच्या गच्चीत वर्मिकंपोस्टवर खुप छान झाडे लावलेली. आणि त्या झाडांना फळॅ वगैरेही ब-यापैकी यायची.

पण साईटवरील माहितीनुसार Eisenia Foetida हे गांडूळ वापरले तर जमिनीची भयानक हानी होते. मी पनवेलपुढे तारा गावातल्या एका ग्रामोद्योग संस्थेतुन गांडूळ आणलेले. ४०० रुपयांना १०० गांडुळ! आता ह्यांची जात मला माहित नाही, पण ते आपल्या नेहमीच्या गांडूळांपेक्षा लांबीने कमी पण जाडीने खुपच जास्त असे होते, रंग तोच. इंपोर्टेड आहेत असे मला तेव्हा सांगितलेले.... (पण साईटनुसार हे किडे म्हणजे गांडूळ नव्हेतच..) (माझ्या घराच्या रिनोवेशनवेळी मला माझ्या गच्चीतल्या सगळ्या कुंड्या शेजा-याच्या बागेत हलवाव्या लागल्या आणि त्याची बाग खाली जमिनीवर असल्याने माझे सगळे गांडूळ गडप झाले की उंदरानी खाल्ले देव जाणे Sad आता माझ्याकडे फक्त पावसाळ्यात गांडूळ असतात Happy )

पण साईटवर लिहिलेले ऑर्गॅनिक फार्मंग महाग आहे ते मात्र खरे आहे. त्यानी दिलेले खत व इतर गोष्टींचे रेटस मीही बाजारात पाहिलेले आहेत.

मग ह्याही दोन्ही लिन्क्स पहा... आता मीडिया, शास्त्रज्ञ आणि सरकार ह्यांपैकी कुणाचे व काय खरे मानायचे?

http://72.78.249.107/esakal/20100109/5146630926337437577.htm

http://72.78.249.107/esakal/20100124/5523931376657961135.htm

<<<<<<आता मीडिया, शास्त्रज्ञ आणि सरकार ह्यांपैकी कुणाचे व काय खरे मानायचे?.......>>>>>>>

वरिल वादविवादा चे कारण असे आहे की, बीटी वांगे हे जगातिल पहिले vegetable crop ठरेल , आणि भारत त्याला परवानगी देणारा जगातील पहीला देश ठरेल...... त्यामुळे काही लोंकाना असे वाटते की ते मानवी आरोग्याला हाणीकारक ठरु शकते, म्हणुन त्याच्या भरपुर चाचण्या घेतल्या गेल्या पाहीजे,...परंतु कुठल्या आणि किती चाचण्या ह्यावर बोलायला कुणी तयार नाही), आणि दुसर्या गटाला असे वाटते की बीटी कापुस मध्ये जो जीन आहे तोच जिन बीटी वांग्या मध्ये पण आहे, म्हणुन परत त्याच त्या चाचण्या घेऊन काही साध्य होणार नाही,.........
कारण बीटी कापसाला परवानगी देण्या आधी जेवेढ्या शक्य होत्या त्या सगळ्या चाचण्या अमेरीकेत घेतल्या गेल्या होत्या.... भारतात घेतल्या गेलेल्या चाचण्यांमध्ये, बीटी कापसाच्या सरकी पासुन बनविलेली ढेप गायी/म्हशी ना खाऊ घालन्यात आली होती, सरकी पासुन तेल बनते म्हणुन त्याची पण चाचणी घेन्यात आली होती...... आणि आता बीटी वांगे शेळ्यांना पण खाउ घातले गेले..... अजुन अशा किती चाचण्या हव्यात?

हम्म... पण बीटी वांग्याच्या माणसांवर किती चाचण्या झाल्या, त्यांचा कालावधी काय होता, भारतीय माणसांवर चाचण्या झाल्या का वगैरे प्रश्न अनुत्तरितच राहतात. काही शास्त्रज्ञांच्या व तज्ञांच्या म्हणण्यानुसार ह्या चाचण्यांना पुरेसा कालावधी दिला गेलेला नाही. बीटी वांगे हे अन्न प्रकारात मोडत असल्यामुळे त्यासाठी अजून प्रदीर्घ चाचण्यांची गरज आहे.

बीटी वांग व इतर बीटी टाकुन बनविलेले पिंक हे किटकनाशक ग्रुप मध्ये येतात म्हणुन त्यांच्या माणसांवर चाचण्या घेतल्या नाही...........ते जर human medicine म्हणुन बाजारात आले असते तर त्यांच्या माणसांवर clinical trials घेणे compulsory राहीले असतं.

कालावधी बद्द्ल सांगायचे झाल्यास, १-२ वर्ष कालावधी सुधा पुरेसा नाही....... माझ्या मते human medicine च्या पण clinical trials या पेक्षा जास्त काळा साठी घेतल्या जात नसतील........ समजा बीटी पासुन बनविलेल्या पिकांची (अन्न पिकात मोडणारे) चाचणी अजुन ८-१० वर्ष घेतली तरी त्याचे उत्तर जर/ तर मध्येच येइल.

भाजी-पाला जेव्हा बाजारात आणला जातो, तेव्हा त्यावर भरपुर प्रमाणात किटकानाशकांचे अंश असतात, त्याचे भाजी-पाला वर असलेले प्रमाण माणवी आरोग्या साठी नक्कीच हाणीकारक असते, त्याचे side effect आता जरी दिसत नसले तरी काही कालावधी नंतर जरुस दिसतात. पंजाब व हरयाणा मध्ये किटकनाशकांचा वापर फार मोठ्या प्र्माणावर केला जातो, म्हणुन तेथे human cancer च्या प्रमाणात अचाणक वाढ झाली आहे. पंजाब / हरयाणा चे लोकं cancer च्या उपचारा साठी बिकानेर च्या regional cancer hospital मध्ये रात्री ची ट्रेन ने जातात म्हणुन त्या ट्रेन ला cancer train म्हणुन ओळखले जाते.

बीटी कापुस बाजारात येण्याचा आधी कापसावर भरपुर प्रमाणात किटकनाशक वापरले जायायचे, नव्वद च्या दशकात, भारतात कापुस लागवडी चे क्षेत्र एकुण लागवडी खालील क्षेत्राच्या प्रमाणात फक्त ५% होते, परंतु त्यावर देशाच्या एकुण किटकनाशक वापराच्या ५०% किटकानाशक वापरले जायायचे.

बीटी वांग व इतर बीटी टाकुन बनविलेले पिंक हे किटकनाशक ग्रुप मध्ये येतात

म्हणजे बीटी टाकुन बदललेल्या धान्यबीजाची धान्यबीज म्हणुन वर्गवारी न होता किटकनाशक म्हणुन वर्गवारी होते? मग त्या वर्गवारीत ढकललेल्या ह्या बीजाची विक्री/ साठा/ किंमत यावर परिणाम नाही होत याचा??

मुळात माणसांचेच सगळीकडे चुकते असे मला तरी वाटते. किटकनाशके हव्या त्या प्रमाणात वापरायला काय जाते यांचे? जास्त फवारणी केली तर जास्त पिक येणार काय?

भाजी-पाला वर असलेले प्रमाण माणवी आरोग्या साठी नक्कीच हाणीकारक असते, त्याचे side effect आता जरी दिसत नसले तरी काही कालावधी नंतर जरुस दिसतात.
ह्म्म स्लो पॉयजनींग.... Sad

<<<<<म्हणजे बीटी टाकुन बदललेल्या धान्यबीजाची धान्यबीज म्हणुन वर्गवारी न होता किटकनाशक म्हणुन वर्गवारी होते? मग त्या वर्गवारीत ढकललेल्या ह्या बीजाची विक्री/ साठा/ किंमत यावर परिणाम नाही होत याचा??>>>>>
बीटी टाकुन बदललेल्या धान्यबीजांपासुन तयार होणारे Plant हे विशिष्ट प्रकाराच्या किटकांसाठी हाणीकारक असते म्हणुन त्याची वर्गवारी किटकनाशक म्हणुन होते........(किटकांचा जे नाश करते ते किटक नाशक) म्हणुन त्याची किमंत पण non- BT बीजा पेक्षा जास्त असते.......

भाजीपाला बाजारात येण्याच्या २-३ दिवसा पुर्वी त्यावर फवारणी केलेली असते, त्यामुळे त्यावर किटकानाशकांचे अंश मोठ्या प्रमाणावर असत्तात......

आजकाल सगळ काही स्लो पॉईसन आहे

ह्म्म्म्म..... इथे दिलेल्या लिन्क्स वरुन असे दिसते की महाराष्ट्रातले काही शेतकरी तरी यातुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना जसे जमेल तसे.. इतरत्रही जगभरात असेच काही ना काही उपाय निघतील जे उत्पन्नही देतील, खर्चही कमी करतील आणि आरोग्यही देतील अशी आशा करते... नाहीतर भविष्यातली मानव जात अधिकाधिक कमकुवत बनत जाणार आणि मानव जातीच्या आरोग्यासाठी टोनिके, औषधे, लसी इ.इ, गोष्टीवरच सगळा खर्च होत राहणार... या किटकनाशकांच्या रुपात आपण आपल्यासाठी भस्मासुर तयार करुन ठेवलाय...

माझ्या मते बीटी वांगे किंवा बीटी अन्नधान्य हे 'फूड क्रॉप' वर्गवारीत मोडत असल्याने त्याची चाचणी मानवावर होणेही अनिवार्य आहे. कारण शेळीच्या व माणसाच्या आंतररचनेत, प्रतिकारशक्तीत, शरीरांतर्गत रसायनांमध्ये आणि प्रतिक्रियेत नक्कीच फरक असतो. जर हे संशोधन गेली अनेक वर्षे चालू आहे, माणसाच्या अन्नभक्षणासाठी चालू आहे, तर ज्या माणसासाठी ते बीज/ अन्न/ धान्य बनविले जात आहे त्याला ते अनुकूल आहे अथवा नाही हे पाहणे ही शास्त्रज्ञांची, शासनाची, आरोग्य विभागाची, पर्यावरण खात्याची नैतिक व शास्त्रीय जबाबदारी आहे असे मला वाटते. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून बाजारात येणारे अन्न आपल्या माणसांच्या प्रकृतीस धोकादायक नाही ना, त्याने आपल्या भूमीची - वातावरणाची कोणती हानी तर होत नाही ना, हे जाणून घेण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे. त्या हक्कांतर्गत तरी अशा प्रकारचे संशोधन होणे गरजेचे आहे.

अरुंधती, ते तुमचे मत आहे ना Happy

वर्गवारी करणा-यानी बीटीला किटकनाशकात ढकलले आहे, आणि त्याचबरोबर, ही किटकनाशके माणसाचे खाद्य म्हणुन उपलब्धही करुन दिली आहेत.

उद्या जर बीटी धान्य खाऊन खरोखरच कोणाला कायतरी झाले हे सिद्ध झाले आणि मग त्याने या सगळ्या संस्थांना कोर्टात खेचायचे ठरवले (अर्थात हे फक्त अमेरीकेत शक्य आहे), तर कोर्ट त्यालाच तुरुंगात टाकेल, किटकनाशक खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणुन.... Proud

नाहीतर भविष्यातली मानव जात अधिकाधिक कमकुवत बनत जाणार आणि मानव जातीच्या आरोग्यासाठी टोनिके, औषधे, लसी इ.इ, गोष्टीवरच सगळा खर्च होत राहणार...
साधना जी , सध्या हळु हळु तेच तर चाललयं ...आपण नुसता युरिया टाकुन जोमदार वाढवलेली मेथी ,कोथींबीर अगदी चवीनं खातोय .... फार लांब नाही ..पण ..५० वर्षामागचे तरुण आणि आताचे ,यांच्या खाण्यात्,व्यायामात कितीतरी फरक आहे ...

Pages