घडाभाजी हा थंडीत करायचा एक पारंपारिक प्रकार आहे. पूर्वी तो मातीच्या घड्यात करत असत. पण कुठल्याही जाड बुडाच्या भांड्यात करता येतो. त्यावर बसणारे घट्ट झाकण मात्र हवे.
भाज्यात वांगी, लाल भोपळा, बटाटे, घेवडा, नवलकोल, पडवळ, शिराळी, गाजर, मूळा अश्या उपलब्ध असतील त्या भाज्या घ्यायच्या. यात घाटे (ओले हरभरे ) ओले शेंगदाणे, काजू वगैरे घालता येतील.
नाविन्य म्हणून, शिंगाडे, गंडेरी, बोरे वगैरे घ्यायची.
याशिवाय, तेल, मीठ, लाल तिखट (किंवा नेहमीच्या वापराचा मसाला ), हिंग, हळद, थोडासा गुळ (किंवा उसाचा रस )
थोडा खडा मसाला (मिरिदाणे, वेलची, दालचिनी वगैरे )
थोडक्यात यात भाज्या घ्यायच्या त्या शिजल्यावर देखील आकार राखतील अश्या. सुरण, अरवी, कोनफळ वापरता येते, पण खाजरे नाही याची खात्री करावी. पालेभाजी आवडत असेल तर यात माठ, मेथी सारखी एखादी भाजीहि घालता येते.
यात सगळ्या भाज्या चिरुन घ्यायच्या. त्याला मीठ लावायचे. जरा पाणी सुटले कि मसाला चोळायचा. तेल चोळायचे.
जाड बुडाच्या पातेल्यात तळाशी थोडे तेल घालून खडा मसाला घालायचा. त्यावर भाज्या नीट मिसळून टाकायच्या. यावेळेस जर सुटलेले पाणी कमी वाटले, तर थोडेसे पाणी घालायचे. मग घट्ट झाकण ठेवायचे. झाकणाची कड भिजवलेल्या कणकेने सीलबंद करता आली तर फार उत्तम (थोडी कणीक बाजूला ठेवावी ) मग भांडे मंद आचेवर ठेवावे (अर्थातच वरची सर्व कृति आचेवर ठेवायच्या आधी करायची आहे )
१५ ते २० मिनिटात भांड्यातून उकळल्याचे आवाज येऊ लागतील. कणीक लावली असेल तर ते सील तूटून वाफ बाहेर येऊ लागेल. तिथे परत कणीक लावून शक्यतोवर ते बंद करत रहावे. अधून मधून सर्वच पातेले फडक्याने घट्ट धरुन आसडावे (हलवावे )
अर्ध्या पाऊण तासाने, खमंग वास यायला लागेल. लगेच आच बंद करावी.
हि भाजी भाकरीबरोबर खावी. शेकोटीवर शिजवता येते. मातीचा घडा मिळाला, तर सोन्याहून पिवळे.
या भाजीला फोडणीही नसते वा ती ढवळायचीही नसते. पण चवीला उत्तम लागते. तिखट मिठाचा अंदाज मात्र अचूक हवा.
हा उकडहंडीसारखा प्रकार
हा उकडहंडीसारखा प्रकार वाटतो.
http://www.maayboli.com/node/13048
.
.
मस्त आहेच. थोडी करण्याची
मस्त आहेच. थोडी करण्याची पध्दत वेगळी...
मला तर हा उकडहंडीचा प्रकार , किंवा पोपटी देखील असाच असतो .
आपल्याकडे संक्रांतीला भोगीच्या दिवशी केलेली भाजी , थोडाफार प्रमाणात गुजराथी लोकांमधला ऊंधियो देखील असाच असतो.
अशी मिश्र भाजी करायची पद्धत
अशी मिश्र भाजी करायची पद्धत सर्वच राज्यात आहे, उदा केरळमधे अवियल, उत्तर प्रदेश मधे अन्नकूट, बंगालमधे शुक्तो. पद्धत जरा बदलली कि चव बदलतेच.
छान आहे.. juyee.. अगदी
छान आहे..
juyee.. अगदी अगदी.. मला पण वालांच्या पोपटीचीच आठवण झाली.
छान
छान
आज उकडहंडी करणार
आज उकडहंडी करणार
त्याच गर्दीत अळूवड्यापण करून घेणार , एकावर एक फ्री
मस्त चमचमीत!
मस्त चमचमीत!
मस्त दिसतय तोंपासू
मस्त दिसतय तोंपासू
मस्त दिसतय तोंपासू >>> +
मस्त दिसतय तोंपासू >>> + १०००० . नक्की करून बघण्यात येइल