परवा प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर झूम चॅनेल आणि टाईम्स ग्रुप नी २३ वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या माध्यमातून जबरदस्त लोकप्रिय झालेलं लोक संचार सेवा परिषदेनी बनवलेलं 'मिले सुर मेरा तुम्हारा' गाणं रीक्रिएट केलं. त्याबद्दल वेगवेगळ्या बीबींवर चर्चा होत असलेली पाहून हा बीबी उघडला...
पहिल्या गाणं म्हणजे देशातल्या संगीत क्षेत्रातल्या आघाडीच्या कलावंतांनी एकत्र येऊन भारताचं घडवलेलं बहुरंगी आणि बहुढंगी दर्शन होतं. त्यात तत्कालीन सेलेब्रिटीज सोबत प्रांतीय कलाकारांचाही बरोबरीचा सहभाग होता. आणि ओव्हर ऑल गाण्यातनं भारतीयत्वाला साद घातली जायची...
त्या काळात लोक संचार सेवा परिषदेनी दूरदर्शनच्या माध्यमातून असे बरेचसे व्हीडिओ सादर केले होते... शास्त्रीय संगीत आणि नृत्यावर आधारलेला देस राग, देशात एकात्मता ठेवण्याचा संदेश देणारा फिल्मी तार्यांचा प्यार की गंगा बहे, स्वातंत्र्याची ज्योत नेणार्या खेळाडूंचा आणि मिले सुर.. हे व्हीडिओ खूप लोकप्रिय झाले कारण ते थेट भारतीय असण्याचा गौरव करायचे. (celebrate Indianism). आपल्या देशातल्या लोकांना जिथे देशाची आठवण फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला येते तिथे या व्हीडिओंमुळे देश, संस्कृती, एकता याच्याशी लोकांच्या मनाचे बंध जुळले.
पण पुढे खाजगी वाहिन्यांच्या भडीमारात हे व्हीडिओ आणि दूरदर्शन दोन्ही मागे पडलं. थोडी थोडकी नाही, चक्क वीसेक वर्ष या प्रकारचं काहीच बनत नव्हतं. वर्ल्डकप क्रिकेट च्या वेळी गाणी आली आणि गेली... खाजगी वाहिन्यांच्या उपक्रमांसाठी काही गाणी बनली आणि तेवढ्यापुरती वाजली (फलक पकडके उठो, हवा पकड के चलो : लीड इंडिया)... सरकारी उपक्रमांना प्रमोट करणारीही गाणी आली (स्कूल चले हम)... पण त्यांनी या पूर्वीच्या वीडिओंसारखी पकड घेतली नाही. कारण बहुदा ती फक्त एखादाच मुद्दा पकडून बनवली होती म्हणून असेल, अथवा त्यात मार्केटिंग फंडा असल्यानी ती पूर्ण पाक राहिली नसावीत...
आणि अशा परिस्थितीत हे नवीन गाणं आलं...
या इनिशिएटिव्ह साठी टाईम्स ग्रुप चं अभिनंदन.
पण ह्या गाण्याचा पहिल्या गाण्याच्या तुलनेत खास इम्पॅक्ट होत नाहीये. संथ लय, फिल्मी कलावंतांचा भडीमार, हरवलेला प्रांतीयपणा {राजस्थानशी संबंधीच्या दृष्यात शिल्पा शेट्टी कशाला हवी...??? सिनेमांमधे ती राजस्थानी नर्तकी असते म्हणून? की ती रजस्थानच्या नावच्या आयपीएल टीम ची मालकीण आहे म्हणून...??} आणि भरमसाठ लोकांना संधी देण्याच्या (दाखवण्याच्या) फंदात वाढलेली लांबी.
रीक्रिएशन करताना फिल्मी लोकांचं डेकोरेशन इतकं झालंय की मूळ रंग अधून मधूनच डोकावतोय... तिथे जरा ताबा ठेवायला हवा होता...
तरी बरंय... क्रिकेटवीर आणि सानिया मिर्झा नाहीत...
पण पूर्ण गाणं काही अगदीच वाया नाही कारण अनुष्का शंकर, राहुल शर्मा, कविता सुब्रम्हण्यम चा व्हॉयलिन वादक मुलगा, अमान आणि अयान अली बंधु आदि पूर्वीच्या गाण्याशी संबंधित कलावंतांच्या पुढच्या पिढीचा परफॉर्मन्स...
असो... इतक्या कालखंडानंतर कुणालातरी असं काही करावंसं वाटलं ना...
हे ही नसे थोडके...
असो... इतक्या कालखंडानंतर
असो... इतक्या कालखंडानंतर कुणालातरी असं काही करावंसं वाटलं ना...
हे ही नसे थोडके...
अगदी सहमत अँकी तुझ्याशी.
आजच बातम्यांमधे हे गाणे थोडेसे पाहीले, पूर्ण नाही त्या मुळे अधिक मत व्य़क्त करत नाही.
फिर मिले सूर मेरा तुम्हारा
फिर मिले सूर मेरा तुम्हारा बिलकूल नाही आवडले. मूळ गाण्यात सुरांची कंट्यूनिटी इतकी छान होती. प्रत्येक तुकड्याचे वेगवेगळ्या वेळी सोयीने शूटिंग झाले असेल पण प्रत्येक वेळी तोच तानपुरा छेडला जातोय आणि गाणे गायले जातेय असं वाटतं. इथे ते अजिबात सांभाळले गेले नाहीये. मिले सूर मेरा तुम्हारा मध्ये एकाचे दुसर्याशी सूरच जुळले नाहीयेत. केवढा विरोधाभास
अंकू अनुमोदन. मला नाही
अंकू अनुमोदन. मला नाही आवड्ले. पहिल्याचे ग्रिप, स्पीड व संगीताची क्वालिटी ग्रेट होती. तसेच आर्टिस्ट्स पण उच्च कोटीचे होते. हे नवे प्रकरण किती लांबडे आहे. स्लो आहे शेवटी बोर होउन च्यानेल बदलले जाते.
तेव्हा कधीही मिले सुर ऐकू आले की धावत पळत टीवी समोर येऊन ऐकत असू.
{राजस्थानशी संबंधीच्या दृष्यात शिल्पा शेट्टी कशाला हवी...???>> मला पण तसेच वाट्ले होते. शिवाय इतर फील्ड्स मधल्या उच्च लोकांना संधी हवी नाही का? ज्यांच्या मुळे देशाला ऐपत व इज्जत आहे? शास्त्रज्ञ, संशोधक, समाज कार्यकर्ते, विचारवंत, अभियंते, उद्योजक हे नकोत का? असे मला नेहमी वाटत आले आहे. पण फक्त फोटोजेनिक लोकांनाच घेतात काय?
कम्युनिकेशन हे नेहमी नेमके व अचूक असावे तर ते क्लटर बस्टर होउन इम्पॅक्ट साधते. हे भोंगळ व रॅम्बलिन्ग आहे. एडिटर कात्री विसरला बहुतेक. ते एक देस रागावरचे असेच होते ते ही चान्गले होते या पेक्षा.
सलमान मूक बधिरांच्या भाषेत सांगतो ते आवड्ले. पण ओवरऑल नो लंप इन द थ्रोट् फीलिन्ग.
ते गाणे 'बजे सरगम हर तरफ
ते गाणे 'बजे सरगम हर तरफ से,गुंजे बनके देश राग..." असे होते. अप्रतिम होते तेही !
पण सलमानला निदान तिथे तरी
पण सलमानला निदान तिथे तरी शर्ट घालायला काही प्रॉब्लेम होता का?
बच्चन कुटुंबियांना समस्त भारतीय मिडीयामधून बॅन करायला हवं! बघावं तिकडे स कु स प मिरवत असतात! प्रियांका चोप्रा काय... रणबीर कपूर काय... काहीही! मला तर पूर्ण बघवलंही नाही.
आणि आता तेच गाणं केलंय म्हटल्यावर "जुन्याशी तुलना केलीच पाहिजे का?" म्हणण्यात अर्थ नाही. तुलना नको होती तर नवं गाणं करायचं की. Why mess with a good old thing?
मुळ गाणे केव्हाही जास्त
मुळ गाणे केव्हाही जास्त चांगले आहे.हे अजिब्बात पकड घेत नाही.
मला ते गाणं बघतांना राहून
मला ते गाणं बघतांना राहून राहून आता पुढच्या फ्रेममध्ये हिमेश रेशमिया दिसतो की काय अशी भिती वाटत होती.
बरे झाले इथे हा नवीन मिले वर
बरे झाले इथे हा नवीन मिले वर लिहायला कोणीतरी सुरुवात केली(मला वाचा फोडायला मिळाली).
हे नवीन मिले सुर म्हणजे एकदम बकवास आहे. त्यात ते बच्चन कुटुंब म्हणजे एक घ्या विकत(अमिताभ) मग दोन अर्ध्या किमतीत( अभि नी अॅश) व चौथे फुकट( जया बच्चन..).
जया बच्चन नाहीत इथे(ह्या गाण्याच्या पडद्यामागे आहेत का?)
मग एकेक नमुने सलमान्,दिपिका वगैरे....
आवडलेले (फक्त )काही भागः सर्व संगीत वादन व गायक कलाकार जसे अनुष्का शंकर, कविता,झाकीर हुसैन, आसामचा कोण ते गायक्(ह व्रून नाव) वगैरे बरे वाटले.
सगळ्यात विचित्रः
१.दिपिका एक मॉडेल पोझ देवून पाण्यात उभी व त्यात तो विचित्र ड्रेस घालून शास्त्रीय ताना घेतेय...
२. अॅश एकदम नाटकी भाव आणून गाते मग मागे बघत अभिषेकची एंट्री... (जया बच्चन नाही घेतल्या का?)
३. थकलेली भागलेली सोनाली व जराही प्रसन्न हसत नसलेला अतुल कुलकर्णी.
आणि नेहमीचा नाटकी शाहरुख कल हो ना हो ची पोझ देवून्(हात मागे घेत)...
पकाव एकदम.
पुर्वीच्या मिले सुर मध्ये पंडित़जींची मस्त आलाप, त्यावेळची तमसची टीम, नंतर प्रत्येक प्रादेशिक भाषेत गाण्याचे तुकडे, प्रादेषिक वेश भुषा असलेले आसाम, केरळा वगैरे पहायला मस्त वाटते अजुनही.
.दिपिका एक मॉडेल पोझ देवून
.दिपिका एक मॉडेल पोझ देवून पाण्यात उभी व त्यात तो विचित्र ड्रेस घालून शास्त्रीय ताना घेतेय...
२. अॅश एकदम नाटकी भाव आणून गाते मग मागे बघत अभिषेकची एंट्री... (जया बच्चन नाही घेतल्या का?)
३. थकलेली भागलेली सोनाली व जराही प्रसन्न हसत नसलेला अतुल कुलकर्णी.
आणि नेहमीचा नाटकी शाहरुख कल हो ना हो ची पोझ देवून्(हात मागे घेत)...
पकाव एकदम.>> अनुमोदन १००% तिथे तरी दीपिकाने भारतिय कपडे घालायला हवे. निदान सलवार कमीज?
मराठी लोकांना अगदी कमी एक्ष्पोजर नेहमी प्रमाणे.
ते जुन्यामध्ये डेक्कन क्वीन जायची कामशेत च्या तिथून व तनुजा गायची तर अगदी गहिवरून यायचे.
लगेच पुण्याला परत जावे असे वाटायचे. ( आय मिस माय महाराष्ट्रा मोमेन्ट नेहमीच. )
रनबीर तर झोपेतून आल्यासारखा दिस्तो नाही का, घरातलाच लेन्गा शर्ट घालून आल्यावाणी.
अमर सिंग पण असेल मागे. तो त्यांच्यामागे जिथे कानला रेड कार्पेट ला जाउ शकतो तर. ( डिस्गस्टींग)
परवाच २६ जानेवारीच्या
परवाच २६ जानेवारीच्या निमित्ताने दूरदर्शन व लाईव्ह इंडिया चॅनेलवर जुनं मिले सूर बघायला मिळालं व म्हणतात नां काय ते दिल खूश हो गया वगैरे तसं काहीसं झालं. इतक्या वर्षांनी काहीतरी जुनं व सुंदर बघायला मिळालं. नंतर थोड्याच वेळात नवीन मिले सूर ही लागलं. पण सुरूवात बघितल्यावर का कोण जाणे पुढे बघावसंच वाटलं नाही.
त्यात ते बच्चन कुटुंब म्हणजे
त्यात ते बच्चन कुटुंब म्हणजे एक घ्या विकत(अमिताभ) मग दोन अर्ध्या किमतीत( अभि नी अॅश) व चौथे फुकट( जया बच्चन..). >>>>>
मामी, मराठी बद्दल अनुमोदन... मला वाटलं होतं ह्या वेळी तरी जास्त घेतील पण नाहीच...
मघाशी पार्ल्यात बरीच चर्चा झाली गाण्यावर... एकूण कोणालाच आवडलेलं दिसत नाही...
अँकी बर झालं हा बीबी उघडलास
अँकी बर झालं हा बीबी उघडलास ते.
>>>शिवाय इतर फील्ड्स मधल्या उच्च लोकांना संधी हवी नाही का? ज्यांच्या मुळे देशाला ऐपत व इज्जत आहे? शास्त्रज्ञ, संशोधक, समाज कार्यकर्ते, विचारवंत, अभियंते, उद्योजक हे नकोत का?
यासाठी प्रचंड अनुमोदन!
एका मित्राने मला लिंक दिली,
एका मित्राने मला लिंक दिली, आणि पहिल्याच सीन मधे रेहमान फिंगर्बोर्ड वर वाजवताना दिसला..
आता काहितरी भारी पहायला-ऐकायला मिळणार या आशे वर सरसावून बसलो.. पण कसच-काय.. सगळा पार विचका केला या लोकानी ... :रागः
१. अमिताभ-ऐश्वर्या याना घेतले हे एक ठीक आहे, पण अभिषेक का ? १ पे १ फ्री?
२. शंकर-एहसान-लॉय मंडळीनी उगाचच चाल बदलली गाण्याची.. का ?
३. कॄष्णमूर्ती कूटुंब का दाखवले सगळे ? (आजी-आजोबा, नातवंड पण दाखवायची मग.. खेळण्यातले व्हायोलिन वाजवत.. :फिदी:)
४. शिवामणी चा विडिओ चांगला होता..पण गाण्याचे आणि वाजवण्यात काही रिलेशनच नव्हते.. उगाचच बडवत होता असे वाटले..
५. ओलिम्पिक चे खरे हीरो आणि बाय्चिंग भूतिया.. याना १-२ सेकंद फक्त दाखवले.. त्यापेक्षा त्याना घ्यायचेच नाही .. अपमान केल्यासारखा वाटला त्यांचा..
६. उगाचच बर्याच ठिकाणी ओढून-ताणून गाणे बदलले..
७. सगळ्यात कहर म्हणजे करण जोहर ला पण दाखवले... मला वाटले आता राखी सावंत वगैरे मंडळी पण येतील कि काय ...
८. मधूनच ते कीबोर्ड आणि पेटी वाजवणारे कोण होते.. पाहिले पण नाही त्याना..
पण या गाण्यामुळे.. मूळचे गाणे किती चांगले आणि सरस होते ते परत सिद्ध झाले..
प्रयत्न करायला हरकत नाही.. पण किमान पातळी तरी कायम ठेवा.. कारण अशी गाणी म्हणजे देशाचे प्रतिके म्हणुन बनवलेली असतात.
>>तिथे तरी दीपिकाने भारतिय
>>तिथे तरी दीपिकाने भारतिय कपडे घालायला हव>><<
हो तेच म्हणायचे होते. अनुष्काने कसा मस्त ड्रेस घातला होता.
पहिल्या मिले सुर मध्ये सुंदर स्थळ होती.. केरळामधील हत्ती...वगैरे... त्या त्या भागातील काही भाग.
>>शंकर-एहसान-लॉय मंडळीनी उगाचच चाल बदलली गाण्याची.. का>><<
हो, उगाच ती चाल बदलून ओढून ताणून शंकर महादेवन गात होता.
सगळ्यांना अगदी १००% अनुमोदन..
सगळ्यांना अगदी १००% अनुमोदन.. अज्जीब्बात म्हणजे अज्जिब्बात आवडल नाही हे नविन वर्जन. अगदीच टाकाउ.. आणि किती मोठ??? जवळजवळ सगळे फिल्मि कलाकार?
आणि माझ्या मते सचिन हवाच होता.. मराठी लोकांना तर उगाच आपला घ्यायच म्हणुन घेतल्यासारख वाटल..
भीमसेन जोशीं ऐवजी अमिताभ???? नहेमी आवडणारा अमिताभ पण बघवला आणि मुख्य म्हणजे ऐकवला नाही. सलमानने शर्ट घालायला हवा होता. शंकर एहेसान लॉय ह्यांनी तर शेवटची ट्युन वाजवली अस वाटल. शिल्पा, दिपीका, रणबीर, शाहीद, शाहरुख आणि सगळ्यात कळस करण जोहर अगदी बघवत नाहीत.
अगो म्हणजे तशी सुरांची कंट्यूनिटी नाहीच दिसत. कित्येक लोक तर ओळखु पण आली नाहीत.
त्यातल्यात्यात झाकिर हुसेन, शिवकुमार शर्मा ह्यांना पाहुन बर वाटल.
हे नविन पाहिल्यानंतर पुन्हा जुन पाहिल तेव्हा कुठे मनाला शांती मिळाली
छान लिहीले आहे अँकी! मी
छान लिहीले आहे अँकी! मी थोडेफार पाहिले, फारसे आवडले नाही. जुने खूपच मस्त होते.
हे नविन पाहिल्यानंतर पुन्हा
हे नविन पाहिल्यानंतर पुन्हा जुन पाहिल तेव्हा कुठे मनाला शांती मिळाली फिदीफिदी>> अगदी मी अत्ता तेच केले. केदार जोशी पूर्ण अनुमोदन. शिवामणी सरकला आहे असे वाट्ते. करण जोहर फ्रॅटर्निटी म्हणाला नाही नशीब.
वरस्ट इज आरती व कैलास सुरेन्द्रनाथ बड्बड इन द मेकिन्ग ऑफ फिर मिले सूर. हे मुम्बैचे सोशल लाइट्स अगदी सहन करावे लागतात. त्यांना चूप केले पाहिजे एक कानाखाली सूर काढून.
अरे लोक हो पण त्यानिमित्ताने आपले सूर जमलेत हे ही नसे थोडके.
भयानक टाकावू गाणे.. तेव्हाचे
भयानक टाकावू गाणे.. तेव्हाचे आदर्श आणि आताचे आयडॉल्स - २५ वर्षात भंपकपणा किती वाढलाय हे परत एकदा कळले...
करायला गेलेत National
करायला गेलेत National Integration आणि झालेय Bollywood Integration...
मला सारखी भीती वाट्त होती कि जया बच्चन दिसते कि काय...
१५-१६ मिनिटे अगदीच वाया घालवली आहेत...
अतुल कुलकर्णी किती विचित्र वाट्तोय...
अतुल आणि सोनाली दिसण्याआधी ३ बायका दिसतात त्यांनी साड्या पण काहीतरीच नेसल्या आहेत...
जुने ऐकले पाहिले ...आत्ता कुठं बरं वाट्तयं...
जुन्या गाण्यचे गायक कोण कोण होते ते शोधत होते..नाही मिळाली माहिती...
पड्द्यावर जे आहेत ते ओळखू येतात पण इतरही असतील ना...?
शेवटच्या १ मिनिटात २-३ खेळाडू
शेवटच्या १ मिनिटात २-३ खेळाडू आणि काही सेकंड्स डिफेन्सचे लोक दाखवलेत.
दिपिका आणि इतर सगळे - नाटकी आणि बकवास!!
तेव्हाच्या गाण्यात राजस्थानचे
तेव्हाच्या गाण्यात राजस्थानचे प्रतिनिधित्व नरेंद्र हिरवाणि करत होता... आता शिल्पा शेट्टी
अरे कोणाला मिळाली तर लिंक
अरे कोणाला मिळाली तर लिंक द्या रे. मी नवीन बघितल नाहीये पण ऐकल आहे, तेव्हाच म्हणाले होते की इतक काही खास वाटत नाहीये.
आणि आता इथल्या कमेंट्स वाचुन बघित्लच पायजे अस वाटत आहे.
आणि त्या राजस्थानात
आणि त्या राजस्थानात तिलोनियातल्या स्त्रिया सोलर कुकर बनवताना शिल्पा शेट्टी तिथे अतिशय विसंगत वाटते.
करण जोहर, शाहीद, दीपिका तर अक्षरशः डोक्यात जातात.
जुन्या गाण्यात सुनील गंगोपाध्याय, गणेश पाइन, मारियो मिरांडा असे लोक होते. इथे फक्त बॉलिवूदवरच लक्ष केंद्रीत केलं आहे. आणि परिणामही एकसंध नाही. मराठी ओळींचा उच्चारही चुकीचा. 'जुळत्या'मधल्या 'ळ'चा उच्चार चक्क 'ड' असा केला आहे. अमराठी गायकांनी गायलं आहे हे लगेच कळून येतं.
जुन्या 'मिले सुर'मध्ये लताबाई गाताना पडद्यावर हेमामालिनी, शर्मिला आणि वहिदा रेहमान दिसत. आता सोनू निगम गातो आणि पडद्यावर शाहीद, रणबीर.
२२ वर्षांतला हा केवढा मोठा फरक आहे.
मी पण बघितले नाहीये.. लिंक
मी पण बघितले नाहीये.. लिंक द्या ह्या नविन गाण्याची..
सोनू निगम छपरी दिसतो. (
सोनू निगम छपरी दिसतो. ( आमच्या काळातील विशेषण)
अमर सिंग पण असेल मागे >>
अमर सिंग पण असेल मागे >> मलाही तेच आश्चर्य वाटले जया आणि अमरसिंग कसे नाहीत बाबा?
वाईट...याशिवाय दुसरा शब्दच
वाईट...याशिवाय दुसरा शब्दच नाही.
जूने गाणे ऐकतांना/बघतांना "ऊर अभिमानाने भरून येणे" म्हणजे काय याचा खरच अनुभव यायचा, अजूनही येतो. आताचे बघतांना/ऐकतांनासाठी एकच विशेषण - चीडचीड.
>>मी पण बघितले नाहीये.. लिंक
>>मी पण बघितले नाहीये.. लिंक द्या ह्या नविन गाण्याची
कशाला उगाच, आ बैल मुझे मार
कालच पार्ल्यात झाली यावर
कालच पार्ल्यात झाली यावर चर्चा. टोटल फसला आहे हा प्रयत्न.
माझी जवळपास आता खात्रीच झालीय , बहुधा "पेड वर्जन" असावं हे !!
अन्यथा करण जोहर वगैरे प्रभृतींचे यात दर्शन याचे कोणतेच दुसरे स्प्ष्टीकरण दिसत नाही मला !!
यु नो, म्हणजे,
"फिर मिले सूर ... या लिजंडरी व्हिडिओ मधे विविध गुणदर्शनाची संधी
चमकायचे दर : अमुक लाख रु. प्रतिसेकंद .**
** सामुहिक /कौटुंबिक दर्शनास सवलतीचे दर! अधिक माहितीसाठी कृपया ५६८९९६३२३७८ येथे दूरध्वनी करा
सोबत खालील प्रवेशिका भरून पाठववी:
अपेक्षित फूटेज (सेकंद) :
अपेक्षित ठिकाण : ---- (सरकारी मालकीच्या ठिकाणी चित्रिकरणास जादा दर आकारण्यात येईल)
विविधगुणदर्शनाचा तपशील : खालील्पैकी एक पर्याय निवडावा
१)गाणे
२)वाजवणे
३)नाचणे
४)बोलणे
५)चालणे
६)वरील सर्व काही
७) वरील पैकी काहीही नाही
चेक किंवा म ऑ या पत्त्यावर पाठवाव्यात : --- --- -- .
पैसे भरायची शेवटची तारीख ../../....
..
वगैरे वगैरे...!
अगदी अगदी मै..
अगदी अगदी मै..
Pages