फिर मिले सुर... च्या निमित्ताने...

Submitted by अँकी नं.१ on 27 January, 2010 - 20:00

परवा प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर झूम चॅनेल आणि टाईम्स ग्रुप नी २३ वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या माध्यमातून जबरदस्त लोकप्रिय झालेलं लोक संचार सेवा परिषदेनी बनवलेलं 'मिले सुर मेरा तुम्हारा' गाणं रीक्रिएट केलं. त्याबद्दल वेगवेगळ्या बीबींवर चर्चा होत असलेली पाहून हा बीबी उघडला...

पहिल्या गाणं म्हणजे देशातल्या संगीत क्षेत्रातल्या आघाडीच्या कलावंतांनी एकत्र येऊन भारताचं घडवलेलं बहुरंगी आणि बहुढंगी दर्शन होतं. त्यात तत्कालीन सेलेब्रिटीज सोबत प्रांतीय कलाकारांचाही बरोबरीचा सहभाग होता. आणि ओव्हर ऑल गाण्यातनं भारतीयत्वाला साद घातली जायची...

त्या काळात लोक संचार सेवा परिषदेनी दूरदर्शनच्या माध्यमातून असे बरेचसे व्हीडिओ सादर केले होते... शास्त्रीय संगीत आणि नृत्यावर आधारलेला देस राग, देशात एकात्मता ठेवण्याचा संदेश देणारा फिल्मी तार्‍यांचा प्यार की गंगा बहे, स्वातंत्र्याची ज्योत नेणार्‍या खेळाडूंचा आणि मिले सुर.. हे व्हीडिओ खूप लोकप्रिय झाले कारण ते थेट भारतीय असण्याचा गौरव करायचे. (celebrate Indianism). आपल्या देशातल्या लोकांना जिथे देशाची आठवण फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला येते तिथे या व्हीडिओंमुळे देश, संस्कृती, एकता याच्याशी लोकांच्या मनाचे बंध जुळले.

पण पुढे खाजगी वाहिन्यांच्या भडीमारात हे व्हीडिओ आणि दूरदर्शन दोन्ही मागे पडलं. थोडी थोडकी नाही, चक्क वीसेक वर्ष या प्रकारचं काहीच बनत नव्हतं. वर्ल्डकप क्रिकेट च्या वेळी गाणी आली आणि गेली... खाजगी वाहिन्यांच्या उपक्रमांसाठी काही गाणी बनली आणि तेवढ्यापुरती वाजली (फलक पकडके उठो, हवा पकड के चलो : लीड इंडिया)... सरकारी उपक्रमांना प्रमोट करणारीही गाणी आली (स्कूल चले हम)... पण त्यांनी या पूर्वीच्या वीडिओंसारखी पकड घेतली नाही. कारण बहुदा ती फक्त एखादाच मुद्दा पकडून बनवली होती म्हणून असेल, अथवा त्यात मार्केटिंग फंडा असल्यानी ती पूर्ण पाक राहिली नसावीत...

आणि अशा परिस्थितीत हे नवीन गाणं आलं...
या इनिशिएटिव्ह साठी टाईम्स ग्रुप चं अभिनंदन.
पण ह्या गाण्याचा पहिल्या गाण्याच्या तुलनेत खास इम्पॅक्ट होत नाहीये. संथ लय, फिल्मी कलावंतांचा भडीमार, हरवलेला प्रांतीयपणा {राजस्थानशी संबंधीच्या दृष्यात शिल्पा शेट्टी कशाला हवी...??? सिनेमांमधे ती राजस्थानी नर्तकी असते म्हणून? की ती रजस्थानच्या नावच्या आयपीएल टीम ची मालकीण आहे म्हणून...??} आणि भरमसाठ लोकांना संधी देण्याच्या (दाखवण्याच्या) फंदात वाढलेली लांबी.
रीक्रिएशन करताना फिल्मी लोकांचं डेकोरेशन इतकं झालंय की मूळ रंग अधून मधूनच डोकावतोय... तिथे जरा ताबा ठेवायला हवा होता...
तरी बरंय... क्रिकेटवीर आणि सानिया मिर्झा नाहीत...

पण पूर्ण गाणं काही अगदीच वाया नाही कारण अनुष्का शंकर, राहुल शर्मा, कविता सुब्रम्हण्यम चा व्हॉयलिन वादक मुलगा, अमान आणि अयान अली बंधु आदि पूर्वीच्या गाण्याशी संबंधित कलावंतांच्या पुढच्या पिढीचा परफॉर्मन्स...

असो... इतक्या कालखंडानंतर कुणालातरी असं काही करावंसं वाटलं ना...
हे ही नसे थोडके...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय भंकस आहे नविन वर्जन. अज्जिबात नाही आवडले.
>>सगळ्यात विचित्रः
१.दिपिका एक मॉडेल पोझ देवून पाण्यात उभी व त्यात तो विचित्र ड्रेस घालून शास्त्रीय ताना घेतेय...
२. अ‍ॅश एकदम नाटकी भाव आणून गाते मग मागे बघत अभिषेकची एंट्री... (जया बच्चन नाही घेतल्या का?)
३. थकलेली भागलेली सोनाली व जराही प्रसन्न हसत नसलेला अतुल कुलकर्णी.
आणि नेहमीचा नाटकी शाहरुख कल हो ना हो ची पोझ देवून्(हात मागे घेत)...
पकाव एकदम.>> १००% अनुमोदन

सगळ्यांना सगळ्या मतांकरता १००% अनुमोदन. मला एकही जण माहिती नाही ज्याना हा व्हिडीओ बरा वाटलाय (चांगलापण नाही), जुन्याशी कंपॅरिझन वगैरे तर फार दूरची गोष्ट आहे!!
सगळ्या त्रुटी जर आपल्या सारख्या लोकांना समजतात तर मेकर्सना लक्षात आल्या नसतील? हा व्हिडीओ फक्त त्यात भाग घेतलेल्या लोकांना घरी दाखवण्याच्या लायकीचा आहे (त्यातही कमी फूटेज मिळालेल्या लायक लोकांना नाहीच).

मै Biggrin
या टाइम्सच्या pseudo मिले सुर पेक्षा MIT-US च्या विद्यार्थ्यांनी हौस म्हणून केलेला मिले सुर मेरा तुम्हाराचा व्हिडीओ खूप जास्त दर्जेदार होता/आहे.

सगळ्यांना मनापास्नं अनुमोदन, अगदी ५००%. फिर मिले अतिशयच टुकार आहे.
त्या पेक्षा सगळे हौशी विडीओ मस्त आहेत.

रूने, त्या MIT च्या विडीओमधे क्रिकेट अन शेवटचा रोबोच्या हातातला झेंडा मस्त!!

मै, जबरी!!!! Lol Lol

http://timesofindia.indiatimes.com/videoshow/5502160.cms इथे पहा.

जुन्याची सर नाही हे पूर्णपणे खरे, पण सगळे आक्षेप बाजूला ठेवून बघितले तर एव्हढे टाकाऊ नाही वाटले.

वर सलमानबद्दल म्हटलय. Seriously guys, त्या piece मधे सलमान एव्हढा मह्त्वाचा आहे का ? त्याच्या बरोबरच्या मुलांकडे कोणाचेच लक्ष नाही गेले का ? एव्हढिशी मूक-बधिर मुले sign language मधे ते शब्द सांगताहेत. Why give a woot about what Salman is wearing or not wearing ?

जुन्याची सर कश्शालाच येणार नाही हे खरे. पण नविन व्हिडेओ बनवताना निदान तसा प्रयत्न करायला हवा होता. जुही चावला पंजाबी दाखवून मग शिल्पा शेट्टी राजस्थानात दाखवायचा अट्टाहास का? जुन्यामधे अमिताभ इतका सुपरस्टार असूनदेखील मिथुन आणि जितेंद्रच्या सोबतच उभा होता ना? मग आता शाहरूख रणबीर शाहिद इतके स्टार क्दाखवाय्ची गरज काय? दिपिका भारताच्या कुठल्या भागात घालणारा ड्रेस घालून उभी आहे??

असे कित्येक प्रश्न व्हिडेओ बघताना मला पडत होते. उत्तर शेवटी मिळाले. टाईम्स ग्रूपच्या झूम चॅनलने बनवलेला व्हिडीओ. या लोकाचा भारताशीच काही संबंध नाही तर लोक सेवा संचार परिषद नावाशी तरी का असेल???

फक्त मुलांनाच घेतलं असतं तर बरं झालं असतं. खूप heart warming वाटलं असतं. सलमान महत्त्वाचा नसला तरी डोळ्यात खुपतो त्याला काय करणार?

जुन्याशी आजिबात तुलना केली नाही तरी टाकाऊच वाटतो मला तरी Sad

सलमान महत्वाचा नाहीच्चे पण मग तो हवाच कशाला? ते पण शर्ट न घालता. फक्त मुलच नसती का चालली???>> आपण video बनवलाय का ? आपन बनवू तेंव्हा नको घेउया त्याला. सलमान मह्त्वाचा नसता तर त्याच्याबद्दल लिहा कशाला ? Happy

शेवटी जय हे, जय हे सुरू झाल्यावर भारताचा झेंडा बघून भरून आले ना ? बस त्यात सगळे आले. (माझ्यासाठी तरी ........ )

नाही आल रे भरुन.. Sad बहुदा तेव्हा वैताग ही भावना जास्त मोठी असेल.
जुना पाहिला तेव्हा पहिल्याच क्लिपला भरुन आल.

जुन्याची सर नाही हे पूर्णपणे खरे, पण सगळे आक्षेप बाजूला ठेवून बघितले तर एव्हढे टाकाऊ नाही वाटले. >>>

मला असामी चं हे मत पटलं .. जुनं खरंच खुप appealing होतं ह्यात वादच नाही .. पण जुनं आवडणारे आपण आता 'मागची पिढी' नाही का झालो?

दिपीका चा ड्रेस >>> ती मॉडेल आहे .. जुन्यातल्या तनुजा चा स्लीव्हलेस ब्लाऊज चालला तर नव्यातला दिपीका चा ड्रेस चालवून घ्यायला हरकत नसावी .. मला वाटतं की नविन व्हर्जन ची थीम 'फ्युजन' आहे आणि बॉलिवूड मधली जास्त लोकं आहेत कारण कदाचित तिथल्याच celebrities कडे masses पर्यंत पोचण्याचं potential आहे .. नविन व्हर्जन आपल्याला appeal होत नाही ह्याचं कारण फक्त त्याचे makers हेच आहे की अजूनही न बदललेला, bollywood celebrities मध्येच धन्यता दिसणारा audience पण आहे?

मलाही नाही आवडले हे नवीन वर्जन अजीबात. एक तर पहिला भाग बघून झाल्यावर जाम कंटाळा आला पुढचा भाग बघायचा. ते शारुख, रणबीर, करण जोहर वगेरे जनता तर मी पाहिलीच नाही आधीच बंद करून टाकले Happy आता बघायला पहिजे थोडा जास्त पेशन्स ठेवून. चाल पण बोरींग वाटली. जुने तर फारच छान आहे. अजूनही बघितले की फ्रेश वाटते.

सुरवातीला रेहमान, अनुश्का वगेरे बघुन जरा बरे वाटले होते पण पार्ट २ आहे हे बघूनच धीर खचला अजुन बघायचा Proud

मैत्रेयी Lol

मला वाटतं की नविन व्हर्जन ची थीम 'फ्युजन' आहे आणि बॉलिवूड मधली जास्त लोकं आहेत कारण कदाचित तिथल्याच celebrities कडे masses पर्यंत पोचण्याचं potential आहे >>
मला नाही वाटत की फक्त तिथल्या (बॉलीवूड) celebrities कडे masses पर्यंत पोचण्याचं potential आहे. आपल्या देशात तरी क्रिकेटीअर्सकडेपण ते पॉटेंशियल आहे, पण ते ह्या व्हिडीओ मध्ये नाही आहेत.
जर थीम 'फ्युजन' असली तर ती फारच पूअरली पोर्ट्रे केली आहे. सेलिब्रिटीस आणि अधून मधून नक्षीकाम असलेली मंदिरं आणि लोकल पब्लीक दाखवलं की फ्युजन होत असेल तर अवघड आहे :).

जुन्याची सर कश्शालाच येणार नाही हे खरे. पण नविन व्हिडेओ बनवताना निदान तसा प्रयत्न करायला हवा होता. जुही चावला पंजाबी दाखवून मग शिल्पा शेट्टी राजस्थानात दाखवायचा अट्टाहास का?
>> अगं राजस्थान रॉयल्स - विसरलीस काय? जुन्यातपण तनुजा मराठी ओळींवर गाताना दाखवली होतीच की.

जुन्यामधे अमिताभ इतका सुपरस्टार असूनदेखील मिथुन आणि जितेंद्रच्या सोबतच उभा होता ना? मग आता शाहरूख रणबीर शाहिद इतके स्टार क्दाखवाय्ची गरज काय?
>> नवीन जमाने मे स्टार पावर वाढतेय असे सूचित करायचे असेल बहुतेक.
[स्टार टिव्ही, सिनेस्टार, *करी, *डी Proud इ.इ.]

दिपिका भारताच्या कुठल्या भागात घालणारा ड्रेस घालून उभी आहे??
>> त्या भागाला बॉलिवूड म्हणतात गं.

मला तरी असामीचे मत पटले.

हे गाणे भारतातील विविधता मग ती भाषेची, बेशभुषेची आहे मग बॉलीवूड एक प्रांत ही आहे व त्यात मॉडेलची वेशभुषा अशी असते (दिपिका दाखवून) असे आहे काय? हे न्हवते माहीती.:)

तसे आधीच्या 'मिले सुर..' मध्ये पण होत्या नायिका दाखवलेल्या पण त्यांच्याकडे लक्षच जायचे नाही व गेले नाही कारण बाकीच बरेच चांगले आहे.
असो.(किती ते चिरफाड... स्वःताला सांगतेय मी ) Happy

जुन्याची सर नाही हे पूर्णपणे खरे, पण सगळे आक्षेप बाजूला ठेवून बघितले तर एव्हढे टाकाऊ नाही वाटले. >>>>> आक्षेप बाजुला ठेवता बघण्यासारखं फारच कमी उरतं.. आणि ते बघायचं असेल तर हे गाणं कशाला बघायचं ??? त्या लोकांचे बाकीचे अनेक ऑडियो-व्हिडियो आहेत.. ह्या गाण्याचा म्हणून जो ईफेक्ट यायला पाहिजे जो जुन्या व्हर्जन मधे आला होता तो आला नाही..

जर थीम 'फ्युजन' असली तर ती फारच पूअरली पोर्ट्रे केली आहे. >>>> अनुमोदन.. Happy

जुन्यातल्या तनुजा चा स्लीव्हलेस ब्लाऊज चालला तर नव्यातला दिपीका चा ड्रेस चालवून घ्यायला हरकत नसावी .. >>>>> तेव्हा तनुजाने स्लीव्हलेस ब्लाऊज घातला म्हणून आत्ता दिपीकाचा हा ड्रेस चालवून घ्या... Lol भारी लॉजिक आहे हे...

जुन्यातल्या तनुजा चा स्लीव्हलेस ब्लाऊज चालला तर नव्यातला दिपीका चा ड्रेस चालवून घ्यायला हरकत नसावी .. >>>>> Happy
सशल, अगं पण जुन्यात तनुजाच्या ब्लाउज कडे लक्ष जात नव्हतं ग. गाण्याचे बोल, चाल, मागून जाणारी डेक्कन क्वीन आणि तनुजाच प्रसन्न हास्य लक्षात रहायचं.

आक्षेप बाजुला ठेवता बघण्यासारखं फारच कमी उरतं..>> अपना अपना नजरिया ! मला सलमानच्या scene मधे काय बघावेसे वाटले ते मी लिहिले बघ वर, तसच इतरही बघता येते. संपूर्ण video बघायला अतिशय photogenic आहे. पूर्ण १६ मिनिटांमधे २-३ मिनिटे असलेले सिनेस्टारच कशाला बघायचे ? Happy

शेवटी जय हे, जय हे सुरू झाल्यावर भारताचा झेंडा बघून भरून आले ना ? >>> ह्याला अनुमोदन. बाकी सगळं भंगार विसरायला झालं ते ऐकल्यावर. ती लहान मुलं पण भारी आहेत.

असो, सोनाली कुलकर्णी दोन बाळांतिणींचे लाडु मटकावल्यागत जाड दिसलीये. युट्युब वर्जन आहे म्हणुन का ?

एवढी चर्चा वाचून मी पाहिला तो व्हिडीओ... अजिबात आवडला नाही.

जर थीम 'फ्युजन' असली तर ती फारच पूअरली पोर्ट्रे केली आहे. >> अनुमोदन.

आक्षेप बाजुला ठेवता बघण्यासारखं फारच कमी उरतं..
>>
संपूर्ण अनुमोदन... जे नीट दाखवायचं ते खेळ, सैन्य, बिझनेस वगैरे शेवटच्या एक-दोन मिनिटांमध्ये गुंडाळलं आहे. उरलेला बराचसा व्हिडीओ फक्त बॉलीवूडवाल्यांनी भरला आहे.

ऐश्वर्या, अभिषेक, शाहरूख यांची फिल्मी अ‍ॅक्टिंग पाहून हसू आले. दिपिका तर कुठलेसे कपडे घालून पाण्यात उभी राहून सुर लावून गातीये. भयंकर हसलो. मराठीचं 'माझ्या तुमच्या..' तर वाईट वाटेल इतकं वाईट केलंय.

असं केल्यावर भारतातल्या प्रत्येक तरुणाला अ‍ॅक्टरच व्हावसं वाटणार, दुसरं काय?

नव्या गाण्यात जे सेलिब्रिटि दाखवले आहेत त्यांचा रोजच्या रोज अगणित चॅनल्स आणि पेज थ्री बातम्या या माध्यमांमधून रतीब घातला जातोय.... त्यांना परत परत किती पाहणार.
प्रेक्षक फक्त एकदाच हे गाणे पुर्ण पाहू शकतील ... पुढच्या वेळी ते दाखवले जात असेल तर चॅनल बदलले जाणार हे नक्की .

Pages