फिर मिले सुर... च्या निमित्ताने...

Submitted by अँकी नं.१ on 27 January, 2010 - 20:00

परवा प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर झूम चॅनेल आणि टाईम्स ग्रुप नी २३ वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या माध्यमातून जबरदस्त लोकप्रिय झालेलं लोक संचार सेवा परिषदेनी बनवलेलं 'मिले सुर मेरा तुम्हारा' गाणं रीक्रिएट केलं. त्याबद्दल वेगवेगळ्या बीबींवर चर्चा होत असलेली पाहून हा बीबी उघडला...

पहिल्या गाणं म्हणजे देशातल्या संगीत क्षेत्रातल्या आघाडीच्या कलावंतांनी एकत्र येऊन भारताचं घडवलेलं बहुरंगी आणि बहुढंगी दर्शन होतं. त्यात तत्कालीन सेलेब्रिटीज सोबत प्रांतीय कलाकारांचाही बरोबरीचा सहभाग होता. आणि ओव्हर ऑल गाण्यातनं भारतीयत्वाला साद घातली जायची...

त्या काळात लोक संचार सेवा परिषदेनी दूरदर्शनच्या माध्यमातून असे बरेचसे व्हीडिओ सादर केले होते... शास्त्रीय संगीत आणि नृत्यावर आधारलेला देस राग, देशात एकात्मता ठेवण्याचा संदेश देणारा फिल्मी तार्‍यांचा प्यार की गंगा बहे, स्वातंत्र्याची ज्योत नेणार्‍या खेळाडूंचा आणि मिले सुर.. हे व्हीडिओ खूप लोकप्रिय झाले कारण ते थेट भारतीय असण्याचा गौरव करायचे. (celebrate Indianism). आपल्या देशातल्या लोकांना जिथे देशाची आठवण फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला येते तिथे या व्हीडिओंमुळे देश, संस्कृती, एकता याच्याशी लोकांच्या मनाचे बंध जुळले.

पण पुढे खाजगी वाहिन्यांच्या भडीमारात हे व्हीडिओ आणि दूरदर्शन दोन्ही मागे पडलं. थोडी थोडकी नाही, चक्क वीसेक वर्ष या प्रकारचं काहीच बनत नव्हतं. वर्ल्डकप क्रिकेट च्या वेळी गाणी आली आणि गेली... खाजगी वाहिन्यांच्या उपक्रमांसाठी काही गाणी बनली आणि तेवढ्यापुरती वाजली (फलक पकडके उठो, हवा पकड के चलो : लीड इंडिया)... सरकारी उपक्रमांना प्रमोट करणारीही गाणी आली (स्कूल चले हम)... पण त्यांनी या पूर्वीच्या वीडिओंसारखी पकड घेतली नाही. कारण बहुदा ती फक्त एखादाच मुद्दा पकडून बनवली होती म्हणून असेल, अथवा त्यात मार्केटिंग फंडा असल्यानी ती पूर्ण पाक राहिली नसावीत...

आणि अशा परिस्थितीत हे नवीन गाणं आलं...
या इनिशिएटिव्ह साठी टाईम्स ग्रुप चं अभिनंदन.
पण ह्या गाण्याचा पहिल्या गाण्याच्या तुलनेत खास इम्पॅक्ट होत नाहीये. संथ लय, फिल्मी कलावंतांचा भडीमार, हरवलेला प्रांतीयपणा {राजस्थानशी संबंधीच्या दृष्यात शिल्पा शेट्टी कशाला हवी...??? सिनेमांमधे ती राजस्थानी नर्तकी असते म्हणून? की ती रजस्थानच्या नावच्या आयपीएल टीम ची मालकीण आहे म्हणून...??} आणि भरमसाठ लोकांना संधी देण्याच्या (दाखवण्याच्या) फंदात वाढलेली लांबी.
रीक्रिएशन करताना फिल्मी लोकांचं डेकोरेशन इतकं झालंय की मूळ रंग अधून मधूनच डोकावतोय... तिथे जरा ताबा ठेवायला हवा होता...
तरी बरंय... क्रिकेटवीर आणि सानिया मिर्झा नाहीत...

पण पूर्ण गाणं काही अगदीच वाया नाही कारण अनुष्का शंकर, राहुल शर्मा, कविता सुब्रम्हण्यम चा व्हॉयलिन वादक मुलगा, अमान आणि अयान अली बंधु आदि पूर्वीच्या गाण्याशी संबंधित कलावंतांच्या पुढच्या पिढीचा परफॉर्मन्स...

असो... इतक्या कालखंडानंतर कुणालातरी असं काही करावंसं वाटलं ना...
हे ही नसे थोडके...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अँकी, मी तुला लिंक दे म्हणणार होते पण इतक्या सगळ्यंच्या नकारार्थी पोस्ट वाचून माझी बघायची हिंमत होत नाहीये. अज्ञानात सुख म्हणतात ना.

मराठी कलाकारांची "जन गण मन" फिल्म आहे तिची लिन्क युट्युब वर आहे का?

>>
ती यू ट्यूबवर टाकण्याच्या लायकीची आहे काय?

श्रुती, तुम्ही दोन गाणी मिक्स करताय.. "प्यार की गंगा बहे.. " हे गाणं बॉलीवुड अभिनेत्यांना घेऊन केलेलं होतं.. आणि ज्यात क्रिकेटपटू पारंपारिक वेषात दाखवले होते.. ते गाण झी टिव्ही सुरु झाला होता जस्ट तेव्हा लागायचं... "एकता ही जीत है और एकता ही रित है.. " असे काहितरी बोल होते..
सचिन, कांबळी आणि प्रविण अमरे बहूतेक धोतर, कोट, टोपी अश्या वेशात होते... Happy

Pages